Skip to main content

करुण

हापिसातली कविता

लेखक विजुभाऊ यांनी गुरुवार, 29/10/2009 या दिवशी प्रकाशित केले.
क्लायन्ट शी बोलताना चेहेर्‍यावरचे उसने हसू सांडत जाते. वीकएंडचे प्लॅनिंग गंडत जाते तेवढ्यात ती बातमी येते. कोणी एक आपल्यातलाच रोजच्या पहाण्यातला एक मेल धाडतो तुमचे सहकार्य मिळाले म्हणूनच मी इथवर पोहोचलो. अन्यथा होतोच काय मी?
काव्यरस

जखमी चित्रबलाकाचा अलारिपु

लेखक शरदिनी यांनी बुधवार, 28/10/2009 या दिवशी प्रकाशित केले.
ऋष्यमूक पर्वतावर कोळीगीत गाणार्‍या स्पायडरमॅनला, नखुरडे ठसठसत तिल्लाना नाचणार्‍या रणराणीला, वास येतोय सटरफटर जळक्या कबाबांचा, ड्रोन ड्रोन ड्रोन प्रतिभेचे अंतर्गत सोळा आणे फटाकडे व्यक्ती / सामाजिक दारूण समस्यासाकडे लोचट ओशट कडबाकुट्टी लाल्लाल खरपूस वीटभट्टी वादळवारे प्रतीक कॅत्रिना घोरी महमद कैफ वासना दुय्यम संयम अळम् टळम् सत्य अहिंसा गर्रम गर्रम लाटावाटा कोमल भाटा महापुरातील लव्हाळत्राता लायटर फ़ायटर रुधिरवंचिता मेजर्मायनर धेनुवल्लभा विहिरीतेली बॆरलबॆरल वजिरीस्तानी क्वीन घायल ड्रोन ड्रोन ड्रोन

(बहुधा)

लेखक चेतन यांनी शुक्रवार, 23/10/2009 या दिवशी प्रकाशित केले.
क्रांती ताईंची सुंदर गझल बहुधा वाचुन लिहण्याचा मोह आवरला नाही :( त्यांना त्याचे मोहरणे रुचलेच नसावे त्यांचे त्याचे बंध कधी जुळलेच नसावे बंधाचे हे नाव ठाकरे, गोजिरवाणे, भावा- र्थाचे बीज इथे रुजलेच नसावे भावांनी तोडली, जपावी, असली नाती, नेते मन त्यांचे, महाभारतच बघावे !
काव्यरस

निरोप

लेखक कौतुक शिरोडकर यांनी मंगळवार, 20/10/2009 या दिवशी प्रकाशित केले.
पुन्हा सख्या नववधू होऊनी आली दिवाळी दाराशी इंद्रधनूचे रंग वेचुनी रेखिली रांगोळी मी खाशी इवल्या इवल्या पणतीतून स्पर्धा नभीच्या तार्‍यांशी गंध खमंग फराळातला.... प्रीत तोलतो हाताशी उल्हासाची पखरण भवती, आतिशबाजी आकाशी तुझी लक्ष्मी तुझ्या स्वागता उभी बावरी उंबर्‍याशी ..... ......... तुझ्याएवजी निरोप आला....... काळोखाच्या घनराशी मोरपिशी पदराने रोखते... जळता हुंदका ओठाशी विखुरलेल्या रंगावली या, कुणी मिळवले अभिरासी ? तव नामाची इवली पणती... ज्योत उडाली आकाशी अर्ध्यावरती डाव मोडता... प्रीत एकली उपवासी मिटले कुंकु.. फुटले कंकण...
काव्यरस

पाळणाघरात

लेखक मनोज यांनी शनिवार, 17/10/2009 या दिवशी प्रकाशित केले.
नको आई नको आज पाळणाघरात नको जाऊ कामाला तू राहुया घारात छान खाऊ मिळे तिथे चॉकलेट गोळी जेवायला असते तूप साखर पोळी चव तुझ्या हताची पण नसते कशात डोळ्या मध्ये पाणी आणी हूंदका घाशात खेळायला खेळन्या काऊ आन चिऊ निजायला असते उशी मऊ मऊ ऊब तुझ्या कुशीची पण नसते कशात डोळ्या मध्ये पाणी आणी हूंदका घाशात गोष्टी राजा-राणीच्या असतात छान पावसाच्या गान्यात हारवते भान गोडी त तुझ्या अंगाईची पण नसते कशात डोळ्या मध्ये पाणी आणी हूंदका घाशात नाही आई तुला मी त्रास देनार सांगशील ते सारे ऐकनार दंगा केला तर रागव तू मला खोडी केली तर सांग बाबाला नको आई नको आज पाळणाघरात नको जाऊ कामाला तू राहुया घारात
काव्यरस

बुधवारच्या कविता: २

लेखक llपुण्याचे पेशवेll यांनी बुधवार, 14/10/2009 या दिवशी प्रकाशित केले.
मंडळी आजही आम्ही बुधवार सत्कारणी लावण्यासाठी आलो. पण ४ दिवसाच्या सक्तिच्या उपासामुळे आमची अवस्था काहीशी अशी झाली आहे. सांगा आता काय करायचे? लेखन विपुल आहे, पण पेच हाच आहे हातात लेखणीही, पण दौत आत आहे येईल कुठून उर्मी,जर बार ड्राय आहे आरक्त वारुणीही, फक्त दोन पेग राहे मध्येच येई पोलिस, बाजार बंद होतो राजास सामिषाच्या, मोताद होई अंडे जाई फिरुन तेथे,पण निराळेच थेर मुजर्‍यास नेहमीच्या,आचारबंदी आहे उत्साहपूर्ण बुधवार, येई पुन्हा पुन्हा का? आजच करा हवे ते, उद्या गुरुवार आहे
काव्यरस

(विरजण)

लेखक मिसळभोक्ता यांनी मंगळवार, 13/10/2009 या दिवशी प्रकाशित केले.
(प्रेरणा: सांगायलाच हवी काय?) तू बोलावलंस म्हणून प्रतिसादांच्या दूधदुभत्याने प्रसन्न जाऊन लेखांमागून लेख पाडू लागलो तेव्हा... तेव्हा म्हणालास, ‘’क्या बात है, +१, असेच म्हणतो या खेळात पडतोसच कशाला? दूधदुभतं स्वतःसाठी असतं, अन् विरजण मिसळ्भोक्त्यांसाठी. तात्याची जात एकच - (म्हातार्‍याचा) नातू हीच" ताक पिण्याची वेळ आली तेव्हा हेच विरजण तुझा आधार ठरले कारण त्या मडक्यात दही तयारच होतं लेखनाचा उत्साहच काढून घेणारं! *** गेल्या त्या काळी मनोगतावर आपण वावरलो होतो आता ह्या काळी मिपा झालंय... आता आवरून घ्यायचं आहे रद्द केलेले सदस्यत्त्व विसरण्याचा खटाटोप तरी करावाच लागेल, कारण मालकाला शिव्या देण्याचं एक
काव्यरस

(प्रकरण)

लेखक बेसनलाडू यांनी मंगळवार, 13/10/2009 या दिवशी प्रकाशित केले.
तू सांगितलंस म्हणून मेकॅनिक्स् चं प्रकरण समजून घेताना फोर्सेसचे कम्पोनन्ट्स् लिहू लागलो तेव्हा... तेव्हा म्हणालीस, एफ् साइन् थिटा, एफ् कॉस् थिटाच्या या प्रकरणात पडतोसच कशाला? 'प्रकरण' दोघांसाठी असतं, अन् मेकॅनिक्स् फक्त मार्क मिळविण्यासाठी प्रकरणाची जात एकच - लफडं हीच लफडं करण्याची वेळ आली तेव्हा हेच शब्द माझ्यावर आघात ठरले कारण तुझ्या प्रकरणात नाव भलत्याचंच होतं माझा आधारच काढून घेणारं! *** गेल्या वार्षिक परीक्षेत मी बोंबललो होतो पुन्हा वार्षिक परीक्षा आलीय... आता पास व्हायचंच आहे मागे खाल्लेली गटांगळी विसरण्याचा खटाटोप तरी करावाच लागेल, कारण पास होण्याचं एक स्वप्न त्यातलंच! तू आपटली असशीलच!
काव्यरस

बोच

लेखक अरुण मनोहर यांनी सोमवार, 12/10/2009 या दिवशी प्रकाशित केले.
दूर दूर दारी दाटली गोधूळ पाडसा पाजाया परतल्या गाई चोचीतला चारा चिमण्याशी द्याया पक्षीणी पंखाना पसरूनी येई वेणूचे वाजती वाऱ्यावर सूर विरही वेडी व्याकुळ मी होई साद साजणाची संगतीला आज कशी कानावर किंचीतही नाही? उंबऱ्यात उभी उदास एकाकी पहात परकी पसरली राई ओसाड उजाड अंधारला रस्ता सावल्या सांडत सुस्तावला राही अंधाऱ्या आकाशी एकला तारा साथ सजणाची सुचवून जाई नभी निसटता निखळला कोणी अपशकूनाची उगा बोच देई
काव्यरस