हे खेळ संचिताचे .....!
काजळील्या सांजवाती, चंद्रही काळोखला
का असा रे तू समुद्रा निर्विकारे झोपला
सर्वसाक्षी तू म्हणाला "सर्वमय आहेस तू"
हस्त माझा रेखतांना का असा भांबावला
हंबरूनी वासराने हंबरावे ते किती
आज गायीने पुन्हा तो मस्त पान्हा चोरला
तृप्त झाल्या क्रुद्ध वाटा, पावले रक्ताळूनी
का कशाला धोंड कोणी जागजागी मांडला
पाठराखा का मिळेना, का मिळेना सोबती
एकलाची झुंजतांना, श्वासही सुस्तावला
घेतले ओठात होते, सप्तकाचे सूर मी
साद ती बेसूर गेली, नाद ही मंदावला
संचिताचे खेळ न्यारे, पायवाटा रोखती
चालता मी अभय रस्ता, काळही भारावला
गंगाधर मुटे
..................
हम्म...
In reply to हम्म... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
+१
In reply to +१ by सहज
माझ्या लेखन कलेचे जाणकार दोन
In reply to माझ्या लेखन कलेचे जाणकार दोन by दशानन
तसलेच आहेत ते.. दोघेही
कविता आवडली
करुण आहे. एका हमालाला ४ बुकं
छान मांडणी ! ! !
कविता आवडली...
छान कविता...
मस्त ! बरेच दिवसांनी मिपावर