मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

करुण

माणूस म्हणून जगण्याची ही किंमत....

दशानन ·
लेखनविषय:
काव्यरस
माणूस म्हणून जगण्याची ही किंमत नशीबाच्या खेळामुळे जरा जास्तच होती अस्तित्व जेथे गहाण पडले तेथे शब्दांची लकीर खुप मोठी होती घाव शब्दांचे चार छोटे होते पण जख्म जरा मोठी होती लपवावे काय आता येथे व्रण चेहर्‍यावर पडले होते नको नको म्हणत असताना दर्द पदरी पडला होता लवपावे काय व दाखवावे काय आपल्यातच खोट दिसली होती चार पुस्तके कमी शिकलो त्यांची ही किंमत खुप वजनी होती काय खरं व काय खोटं नशीबाची थट्टाच थोरं होती वाहत जावे असेल ठरवले तरी जमीनीचे वळण खुप वेगळे होते तडफडत जावे कोठे तरी येथे आरसा दाखवणारे अनेक होते माणूस म्हणून जगण्याची ही किंमत जरा खरंच मोठी होती... मेल्यावर तरी समाधान लाभेल मुक्त हो

“( अ ) द्वितिय ” प्रेम

निरन्जन वहालेकर ·
लेखनविषय:
काव्यरस
“( अ ) द्वितिय ” प्रेम प्रीतीत संगत तुझी, मज कधी ना लाभली, साथ संगत नव्हती कुणाची, पण वेदनांनी मज दिली. खेद नाही, राग नाही, प्रेम तव जरी ला लाभले, वेदनांशी “इश्क” माझे, प्रेमांत तुझिया जाहले. निरंजन वहाळेकर

देवा तु चुकलास

प्रीत-मोहर ·
लेखनविषय:
काव्यरस
देवा तू चुकलास.... माणसाला बनवताना मन का दिलेस? सगळं साठवण्याची कुवत का दिलीस? टोचत रे खूप आत्ता.....सहन होत नाही मन दिलेस ते दिलेस.....भावना ही दिल्यास आत्ता लहान सहान गोष्टींतले...हेतू कळतात... न कळते तर बरं झालं असतं.... आता केलीस ती चूक केलीस पुन्हा मात्र चुकू नकोस..... माणसासारखा बनू नकोस.... माणूस काय......

हे खेळ संचिताचे .....!

गंगाधर मुटे ·
लेखनविषय:
काव्यरस
हे खेळ संचिताचे .....! काजळील्या सांजवाती, चंद्रही काळोखला का असा रे तू समुद्रा निर्विकारे झोपला सर्वसाक्षी तू म्हणाला "सर्वमय आहेस तू" हस्त माझा रेखतांना का असा भांबावला हंबरूनी वासराने हंबरावे ते किती आज गायीने पुन्हा तो मस्त पान्हा चोरला तृप्त झाल्या क्रुद्ध वाटा, पावले रक्ताळूनी का कशाला धोंड कोणी जागजागी मांडला पाठराखा का मिळेना, का मिळेना सोबती एकलाची झुंजतांना, श्वासही सुस्तावला घेतले ओठात होते, सप्तकाचे सूर मी साद ती बेसूर गेली, नाद ही मंदावला संचिताचे खेळ न्यारे, पायवाटा रोखती चालता मी अभय रस्ता, काळही भारावला गंगाधर मुटे ..................

इतिहास

यशवंतकुलकर्णी ·
लेखनविषय:
काव्यरस
आजकाल असं होत नाही; पण भालचंद्र नेमाड्यांच्या कादंबरीवरच्या धाग्यात प्रतिक्रिया देता-देता हात आवरला आणि झोपी गेलो. झोपेतल्या-झोपेत ह्या खालच्या ओळी बडबडत होतो म्हणे; कुणीतरी त्या लिहून घेतल्यात, मी त्या इथं टाकतो. आता जिथे प्रतिक्रिया द्यायची होती तो धागाच सापडत नाहीय (सवय होईपर्यंत असंच होणार).

व्यथा

राजेश घासकडवी ·
लेखनविषय:
काव्यरस
काय सांगू अंधकारा या चिरागाची व्यथा? काय सांगू या प्रकाशा आंधळ्याची मी व्यथा? ही मिजाशी आज कोत्या काजव्यां व्हावी कशी? पौर्णिमेला ग्रासलेल्या चंद्रम्याची ही व्यथा मेंढरांनी गांजलेला शक्तिशाली सिंह मी काय सांगू या गजांना अंतरीची ही व्यथा राजझेंडा होउनीया काय चिंध्या जाळती, रक्तरंजी भर्जरी या क्रांतिवस्त्राची व्यथा? बोलणेही खुंटले जेव्हा मला फर्मावले कर्णदोषी, मूक लोकां सांग जा तूझी व्यथा ब्राह्मणाची रक्तशोषी दानझोळी, तीतल्या कुंडलांना का कळावी विद्ध कर्णाची व्यथा?

जीणं

अमोल मेंढे ·
लेखनविषय:
काव्यरस
कुणीही येतं आणी ... भुकेलेल्याला अन्न मिळावं असं तुटुन पडतं... कुस्करुन जातं... पन्नासची नोट अंगावर फेकुन... त्याच्या प्रेमात मी पडले... अन् ... पळुन आले त्याच्या बरोबर... राजा राणीच्या सुखी संसाराच्या अपेक्षेत... पण शेवटी राजानेच राणीचा घात केला... आणी फक्त दहा हजारात माझा सौदा झाला... सुरुवातीला वाटायचं ... असल्या जीण्यापेक्षा.. आत्महत्याच करावी... पण आता सवय झालीय... अन् कालची सीता.. आजची सितारा म्हणुन बाजारात उभी राहलीय... तेव्हापासुन गल्लीत उभं राहुन... गिर्‍हाईकांची वाट पाहणं... आणी स्वत:ला कुस्करुन घेऊन... त्यांचं समाधान करणं... हेच आमचं जीणं.... हेच आमचं जीणं...

आईचं छप्पर.

गंगाधर मुटे ·
लेखनविषय:
काव्यरस
आईचं छप्पर. कडाक्यात भांडतात मेघ गडगड करून भरून येते नभाला अश्रू ढाळते वरूण ...! अश्रू बनती गारा वादळ तांडव करी गारठल्या हवेसवे विजेस हिंव भरी ...! हिंव भरल्या विजेस ताप चढवी गारा तिला पांघराया छप्पर नेतो वारा ...! छप्पर उडल्या संसारात ब्रम्हपुत्रा वाहते तेल मिरची शिदकुट पाण्यावरती पोहते ....! पोहतांना पुस्तक वही सरस्वती भिजते माती करून जीवाची चूल उल्हे निजते ....! गरजत्या पावसात चोळी झबले न्हाती पदराखाली लेकरं कवटाळती छाती ....! ...गंगाधर मुटे.. . ( शिदकूट = मोजक्या काळासाठी पुरेल एवढी अन्नसामग्री) ( उल्हा = एकप्रकारची कच्च्या मातीची चुलच पण लाकडा ऐवजी कोळशाचा जाळ घालत

पाऊस वेडा

स्वाती फडणीस ·
लेखनविषय:
काव्यरस
पाऊस वेडा ================= पाऊस वेडा मोर मनाचा मेघ पाहता हर्षुन जातो.. मेघ बावरा जीव मोराचा ग्रीष्म लागता आतुर होतो.. थेंब आठव ठेवा मनाचा अनुरागी हरपून जातो.. मेघ बावरा मोर जिवाचा नाच नाचरा सागर होतो.. पाऊस वेडा मोर मनाचा थेंब सरीत शहारून जातो.. प्रीत बावरा पिसारा मोराचा भिजून चिक चिक होतो.. आनंद फुलोरा मनोरथांचा वादळ झडीत थिजून जातो.. सर आतुर हर्षित जिवाचा गहिवर डोळी बोलका होतो.. चिखल भिजल्या स्वप्नांचा पिसा पिसातून गळून जातो.. वेडा पाऊस मोरा मनीचा ढग फुटीत भोवरा होतो.. नाच नाचऱ्या फुलेर मनाचा हुंकार कंठीच राहतो.. उजाड भुंडक्या मनमोराचा हुंदका पाऊस होतो.. पाऊस वेडा मोर मनाचा काळ सरीं

तो पाऊस

सुनिल पाटकर ·
लेखनविषय:
काव्यरस
तुझ्या अंगणातला पाऊस माझ्या अंगणातला पाऊस शेतात मरमर राबणा-या ढवळ्या-पवळ्याचा पाऊस टोपलीतून भाकरी आणणा-या अनवाणी पावलांचा पाऊस एका छत्रीत भिजलेल्या अनेक प्रेमकथांचा पाऊस रानफूलांच्या वाटेवर हरवून गेलेला पाऊस वाफाळलेल्या चहाच्या कपात चिंब भिजलेला पाऊस डोक्यावरून घेतलेल्या रजईत दडून बसलेला पाऊस पाण्यात भिरभिरणा-या कागदी होड्यांचा पाऊस गरागरा फिरणा-या इवल्याशा छत्रीतला पाऊस पावसात मनसोक्त भिजणारी चिमुकली मुलं पाहिली की आठवतो मला तो पाऊस आभाळा एवढा डोंगर कवेत घेऊन आलेला पाऊस डोंगराखाली गाडलेले ते, इवलेसे जीव आठवले की माझ्याही डोळ्यातून बरसतो न थांबणारा तो पाऊस