✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

व्यथा

र — राजेश घासकडवी, Mon, 08/16/2010 - 09:09
काय सांगू अंधकारा या चिरागाची व्यथा? काय सांगू या प्रकाशा आंधळ्याची मी व्यथा? ही मिजाशी आज कोत्या काजव्यां व्हावी कशी? पौर्णिमेला ग्रासलेल्या चंद्रम्याची ही व्यथा मेंढरांनी गांजलेला शक्तिशाली सिंह मी काय सांगू या गजांना अंतरीची ही व्यथा राजझेंडा होउनीया काय चिंध्या जाळती, रक्तरंजी भर्जरी या क्रांतिवस्त्राची व्यथा? बोलणेही खुंटले जेव्हा मला फर्मावले कर्णदोषी, मूक लोकां सांग जा तूझी व्यथा ब्राह्मणाची रक्तशोषी दानझोळी, तीतल्या कुंडलांना का कळावी विद्ध कर्णाची व्यथा?

प्रतिक्रिया द्या
1984 वाचन

💬 प्रतिसाद (3)

कविता आवडली. व्यथा काळजाला

सुभाष् अक्कावार
Mon, 08/16/2010 - 10:04 नवीन
कविता आवडली. व्यथा काळजाला भिडली.
  • Log in or register to post comments

कल्पना आणि मिसरे

विसुनाना
Mon, 08/16/2010 - 15:30 नवीन
काही कल्पना, मिसरे चांगले आहेत.
काय सांगू या प्रकाशा आंधळ्याची मी व्यथा? मेंढरांनी गांजलेला शक्तिशाली सिंह मी
इ.
राजझेंडा होउनीया काय चिंध्या जाळती,
यावरून इथला हा शेर आठवला - उकंड्यातल्या फडक्याला त्या मिंध्या चिंध्या ठिगळत जाती - कुणा कळावे कशाकशाचा येथे झेंडा फडकत जातो? :). असो. अजून गझला याव्यात ही अपेक्षा.
  • Log in or register to post comments

वा!!!!

असुर
Mon, 08/16/2010 - 16:50 नवीन
>>>ब्राह्मणाची रक्तशोषी दानझोळी, तीतल्या कुंडलांना का कळावी विद्ध कर्णाची व्यथा? <<< वा!!!! --असुर
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा