Skip to main content

हे खेळ संचिताचे .....!

हे खेळ संचिताचे .....!

Published on रवीवार, 29/08/2010 प्रकाशित मुखपृष्ठ
हे खेळ संचिताचे .....! काजळील्या सांजवाती, चंद्रही काळोखला का असा रे तू समुद्रा निर्विकारे झोपला सर्वसाक्षी तू म्हणाला "सर्वमय आहेस तू" हस्त माझा रेखतांना का असा भांबावला हंबरूनी वासराने हंबरावे ते किती आज गायीने पुन्हा तो मस्त पान्हा चोरला तृप्त झाल्या क्रुद्ध वाटा, पावले रक्ताळूनी का कशाला धोंड कोणी जागजागी मांडला पाठराखा का मिळेना, का मिळेना सोबती एकलाची झुंजतांना, श्वासही सुस्तावला घेतले ओठात होते, सप्तकाचे सूर मी साद ती बेसूर गेली, नाद ही मंदावला संचिताचे खेळ न्यारे, पायवाटा रोखती चालता मी अभय रस्ता, काळही भारावला गंगाधर मुटे ...................................................... (वृत्‍त- देवप्रिया) ......................................................
काव्यरस
लेखनविषय:

याद्या 2310
प्रतिक्रिया 10

प्रतिक्रिया

हंबरूनी वासराने हंबरावे ते किती आज गायीने पुन्हा तो मस्त पान्हा चोरला सुंदर... पाठराखा का मिळेना, का मिळेना सोबती एकलाची झुंजतांना, श्वासही सुस्तावला वा...

संचिताचे खेळ न्यारे, पायवाटा रोखती चालता मी अभय रस्ता, काळही भारावला
सुंदर.! देवप्रिया वृत्ताबद्दल काही माहितीपर लिहावे ही विनंती.. तात्या.