छंद
लेखनविषय:
काव्यरस
- Read more about छंद
- 5 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
हा छंद जिवाला का लागला रे
डॊळा भरुन तुला असे पाहते रे
हा छंद.......
बिलगुनी तुला अशी बसले मी
स्वप्नात तुझ्या माझ्या रंगले मी
तुला माझे म्हणताना फुलले रे
डोळा भरुन तुला पाहते रे
हा छंद.......
हरवुनी तुला अशी बसले मी
तू निघोन जाता का हरले मी
स्वप्नच माझे बघ चुरगळले रे
डोळे भरुन तुला मग पाहते रे
हा छंद.....
प्रसन्ना जीके. २६-११-०८