इतिहास
आजकाल असं होत नाही; पण भालचंद्र नेमाड्यांच्या कादंबरीवरच्या धाग्यात प्रतिक्रिया देता-देता हात आवरला आणि झोपी गेलो. झोपेतल्या-झोपेत ह्या खालच्या ओळी बडबडत होतो म्हणे; कुणीतरी त्या लिहून घेतल्यात, मी त्या इथं टाकतो. आता जिथे प्रतिक्रिया द्यायची होती तो धागाच सापडत नाहीय (सवय होईपर्यंत असंच होणार).
इतिहास म्हणजे धूळ
इतिहास म्हणजे कचरा
इतिहास म्हणजे खून
इतिहास म्हणजे लढाया
इतिहास म्हणजे अन्याय
इतिहास म्हणजे साटलोटं
इतिहास म्हणजे कारस्थानं
इतिहास म्हणजे गुंता
इतिहास म्हणजे वर्तमानाच्या मानगुटीवरचा वेताळ
अरे मिशाळ माणसा
तुझा सव्वा किलोचा म्हातारा मेंदू आणि तुझी हजारबाराशे पानं
त्यात तुझी जात आणि ती वाचतील त्यांच्या जाती
पुन्हा आमचे मेंदू आणि आमची हवेसारखी मतं
हा सगळा चिखल-चिखल
सांग बाबा तुच आता, तुझी कादंबरी वाचू की नको??
गुढरम्य!
नेमकं काय गूढरम्य?
रोचक
ओ यशवंत राव काय कविता
पुस्तकानं नाही, मुलाखतीनं वाट लावली
मूळ पुस्तक वाचलेलं नाही,
खरे आहे ...सगळा चिखल-चिखल