Skip to main content

आई..मिटलेला श्वास - २

आई..मिटलेला श्वास - २

लेखक गणेशा
Published on बुधवार, 20/10/2010 प्रकाशित मुखपृष्ठ
आई..मिटलेला श्वास -१ http://www.misalpav.com/node/14964 पार्श्वभुमी: कातरवेळी अंधाराकडे झुकलेले नभ आणी त्या वेळेस आठवणींच्या झोक्यावर आसवांची शब्दांध रात्र श्वासधागे कशे उसवत आहे हे वर्णन तळ्याचे नीर दर्पण | विखुरले नभांकण | वाळलेले नक्षीपर्ण | तरंगीत || ढळलेली सांजसंध्या | निजलेले सूर्यपक्षी | स्वप्नफ़ुले जागलेली | सुगंधीत || धरणीची ग्लान झोप | तार्‍यांचे सूरेल गीत | उसवले श्वासधागे | अंतरात || छतावर रातवैरी | तेवलेला ह्रदयदीप | शब्दांध झाली आसवे | आठवात || ----- शब्दमेघ
काव्यरस
लेखनविषय:

याद्या 1419
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया

आणि भावपूर्ण शब्दयोजना!

ढळलेली सांजसंध्या | निजलेले सूर्यपक्षी | स्वप्नफ़ुले जागलेली | सुगंधीत | छानच लिहिले आहे . नंतरच्या कवितेपेक्षा थोडी निराळी वाटली . आवडली !!

In reply to by प्रकाश१११

हो वेगळी आहे .. प्रत्येक कडव्यातील पहिल्या ३ ओळीमध्ये ओवी प्रमाणे ८ अक्षरे आहेत मात्र शेवट अभंगाच्या लास्टच्या अपुर्ण ओळीप्रमाणे (साडेतीन ओळींचे अभंग) केला आहे