Skip to main content

आई .. मिटलेला श्वास .. ५

आई .. मिटलेला श्वास .. ५

लेखक गणेशा
Published on मंगळवार, 02/11/2010 प्रकाशित मुखपृष्ठ
आई .. मिटलेला श्वास .. ४ http://www.misalpav.com/node/15170 पार्श्वभुमी : घरामध्ये वावरताना .. घरातील प्रत्येक गोष्टीकडे पाहताना त्या वस्तु ही आपापल्या पद्धतीने आपल्या दु:खात सामील होत आहेत असा भास कवितेतील नायकाला होतो .. एक व्याकुळ मन आई साठी रणकंदन करताना नयनांची दोन पिल्ले आसूसले घरटे मायेच्या छप्पराला काळजाची झुंबरे पापण्यांच्या तोरणाला अबोल आसवांची घुंगरे हरवलेल्या ह्रदयतरंगावर सूर ओळखीचे हळवे अमुर्त स्वप्नशिल्पाला विचारांची जळमटे जाळीदार मनचक्षूमध्ये श्वासांचे बोजड तडफ़डणे नभपोकळीच्या वाटेवरती मेघकल्लोळाचे रणकंदन मुक्त आत्म्याचेही फ़क्त आता नश्वर शरीरात रुदन ---------- शब्दमेघ
काव्यरस
लेखनविषय:

याद्या 1379
प्रतिक्रिया 1

प्रतिक्रिया