आई..मिटलेला श्वास -१ http://www.misalpav.com/node/14964
पार्श्वभुमी: कातरवेळी अंधाराकडे झुकलेले नभ आणी त्या वेळेस आठवणींच्या झोक्यावर आसवांची शब्दांध रात्र श्वासधागे कशे उसवत आहे हे वर्णन
तळ्याचे नीर दर्पण | विखुरले नभांकण |
वाळलेले नक्षीपर्ण | तरंगीत ||
ढळलेली सांजसंध्या | निजलेले सूर्यपक्षी |
स्वप्नफ़ुले जागलेली | सुगंधीत ||
धरणीची ग्लान झोप | तार्यांचे सूरेल गीत |
उसवले श्वासधागे | अंतरात ||
छतावर रातवैरी | तेवलेला ह्रदयदीप |
शब्दांध झाली आसवे | आठवात ||
----- शब्दमेघ
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचन संख्या
1419
प्रतिक्रिया
3
मिसळपाव
प्रतिक्रिया
सुरेख
ढळलेली सांजसंध्या | निजलेले
हो वेगळी आहे .. प्रत्येक
In reply to ढळलेली सांजसंध्या | निजलेले by प्रकाश१११