Skip to main content

आई.. मिटलेला श्वास ... ४

लेखक गणेशा यांनी गुरुवार, 28/10/2010 19:22 या दिवशी प्रकाशित केले.
आई.. मिटलेला श्वास ३ - http://www.misalpav.com/node/15127 पार्श्वभुमी : दारातील रांगोळी ही काही तरी स्मरणांचे टीपके बोलते आहे, आणी संध्या समयी जीवन सूर्य क्षितिजापल्याड गेलेला पाहुन स्वताचे वलयांकीत जीवन ही व्यर्थ वाटणारा हा नायक .. उंबर्‍यावर सांजसमयी मन माझे रडते आई पाणावलेली आर्त रांगोळी तुझेच स्मरणगीत गाई सूर्यबिंबावीन क्षितिजी किरणांचा मखर ओस जीवनदेव्हार्‍यात आई देवत्वाची जागाच रिक्त --------- शब्दमेघ
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 2572
प्रतिक्रिया 9

प्रतिक्रिया

शब्दांची रांगोळी...

उंबर्‍यावर सांजसमयी मन माझे रडते आई पाणावलेली आर्त रांगोळी तुझेच स्मरणगीत गाई मला खरोखर आवडली. काळजाला भिडली. दुसरे शब्दच नाहीत.