कोल्हापुरी भेळ

श्वेता२४'s picture
श्वेता२४ in पाककृती
5 May 2018 - 2:59 pm

परवा आईने फ्रिज मध्ये ठेवलेली कैरी पाहिली आणि नाळेसाठी घोडा हि म्हण मी प्रत्यक्षात उतरवली. कारण कैरी साठी मी भेळ करायची ठरवली. कैरी या प्रकरणाशी माझ फारसं कधी जमलं नाही. पण ती जेव्हा ओल्या भेळेसोबत मिळणाऱया उकडलेल्या मिरच्याच्या बाजूला जाऊन बसे तेव्हा तिची दृष्टच काढविशी वाटायची. रंकाळ्यावर मिळणारी कागदाच्या कोनात झणझणीत चटकदार भेळ भरलेली त्यावर दोन मिरच्या, सोबत हि कैरीची फोड आणि पत्याचे खोचलेलं पान! पत्त्याचा चमचा करून खाल्लेली ती भेळ म्हणजे निव्वळ स्वर्गसुख! आज त्याच भेळेची रेसिपी देणार आहे. कोल्हापूर पुणे आणि मुंबई मधल्या भेळेतील फरक चिमुरयंपासून सुरु होतो. (हो चिरमुरेच! कुरमुरे मुरमुरे न्हवे. कोल्हापूरकडचे चिरमुरे गोल आणि टपोरे मोठे असतात. त्यामुळे चिंचेच्या चटणीत भिजून लगेच मऊ होत नाहीत)
आधी भडंगाची पाकु पाहू
कोल्हापुरी चिरमुरे 2 पिशव्यया
1 गड्डी लसूण ठेचून
1 वाटी शेम्गदाने
15-20 पाने ताजा कडीपत्ता
1 वाटी पिठीसाखर
4 चमचे मिर्चीपुड
2 चमचे मेतकूट
फोडणीसाठी
1 वाटी तेल
हळद, हिंग,जिरे,मोहरी


भडंग


फोडणी

भडंग

तेल तापू द्यावे आच माध्यम करून त्यात शेंगदाणे घालावेत मग मोहरी,जिरे,हिंग, हळद घालावी. लगेच कडीपत्ता व लसूण घालून परतावे. आता तिखट, मीठ आणि साखर घालावी. गॅस बंद करून शेवटी मेतकूट टाकून फोडणी हलवावी. चिरमुरे घालून चनगले एकजीव करावे.

आता चिंचेचा कोळ बनवू -
1 वाटी चिंच
1 वाटी गुळ
3 चमचे साखर
1 चमचा तिखटपुड
1 चमचा पाणीपुरी मसाला
मीठ

चिंच,गूळ, साखर व तिखट घालून 7-8 मिनिटे उकळावे.
थंड झाल्यावर चुरून चिंचेचा कोळ काढून घ्या. त्यात मीठ व पाणीपुरी मसाला घाला


साहित्य


चिंचेचा कोळ

चाळणीत हिरव्या मिरच्याना तेल व मीठ लावून 10 मिनिटे वाफवून घ्या तसेच कैरीच्या फोडिंना मीठ व तिखट लावून घ्यावे


वाफवलेल्या मिरच्या

भेळ

1 टोमॅटो, कांदा, बारीक चिरून
फारसाण(यात गाठी व पापडी जास्त)
कोथिंबीर भरपूर बारीक कापून
कोळ
वाफावलेली मिरची व कैरी
1 बाउल भडंग

कृती-
भडंग, त्यात कांदा,टोमॅटो, कोथिंबीर, फरसाण, व शेवटी चिंचेचा कोळ टाकून चमच्याने फटाफट हलवा. मग ही भेळ एका डिश मध्ये काढून त्यावर बारीक शेव टाका. बाजूला दोन मिरच्या आणि एक कैरीची फोड ठेवा. आणि मारा कि ताव


भेळ


भेळ


भेळ

मराठी पाककृती

प्रतिक्रिया

जेम्स वांड's picture

5 May 2018 - 3:16 pm | जेम्स वांड

फोटू नसलेली पाककृती फाऊल मानली जाते म्हणे, तेवढं धाग्यात फोटुचं बघा.

बाकी भेळपुरी म्हणजे मुंबई'च' हे मी 'नम्रपणे ठणकावून' सांगू शकतो :D

श्वेता२४'s picture

5 May 2018 - 3:23 pm | श्वेता२४

पूर्णत: असहमत. मुंबईची भेळ खाल्यापासून मुंबईत भेळ खाणे बंद केले हे मी नम्रपणे नमुद करु इच्छीते. बाकी फोटो टाकलेत. संपादक मंडळाने ते लेखात समाविष्ट करण्याबद्दल मदत करावी.

जेम्स वांड's picture

5 May 2018 - 3:25 pm | जेम्स वांड

अजून काय!

मृत्युन्जय's picture

16 May 2018 - 4:02 pm | मृत्युन्जय

मुंबै च्या भेळी एवढा आचरट प्रकार मी कुठेही खालेला नाही. भेळ म्हणजे केवळ कोल्हापुरचीच. रंकाळ्या ची भेळ अह्हाहा. आणि राजाभाऊ.

श्वेता२४'s picture

5 May 2018 - 3:18 pm | श्वेता२४

कृपया मी फोटो ऐवजी लिंक अपलोड केली आहे.
साहित्य
भ डं ग
भ डं ग

साहित्य

चिंचेचा कोळ

वाफवलेल्या मिरच्या

भेळ

सस्नेह's picture

5 May 2018 - 3:22 pm | सस्नेह

शेवटचा फोटो भारी आहे .
बाकी भेळ ही रंकाळ्याचं वारं तोंडी लावून खाल्ल्यासच मस्त लागते असा अनुभव असल्यामुळे घरी करायच्या भानगडीत पडणे नाही !!

श्वेता२४'s picture

5 May 2018 - 3:24 pm | श्वेता२४

मी पण ितके दिवस घरी करत नव्हतेच. पण मुंबईत आल्यपासून मुकाट करायला लागले :(

संजय पाटिल's picture

7 May 2018 - 10:41 am | संजय पाटिल

बाकी भेळ ही रंकाळ्याचं वारं तोंडी लावून खाल्ल्यासच मस्त लागते

राजाभाऊंना विसरलात वाटतं..

सस्नेह's picture

7 May 2018 - 11:48 am | सस्नेह

राजाभाऊ हे आणि एक वेगळंच प्रकरण !
पण अलीकडे राजाभाऊ मल्टीपल झाल्यापासून ओरिजिनल टेस्ट सापडेना.

संजय पाटिल's picture

8 May 2018 - 10:17 am | संजय पाटिल

खरं आहे :(

कंजूस's picture

5 May 2018 - 3:59 pm | कंजूस

छान!
मुंबई भेळेत चिरमुय्रांना फोडणी लावलेली नसते.

कोल्हापुरी भडंग असते, प्रवासाकरता उत्तम. चिंचेचा कोळ नसतो नेलेला. कैरी/लिंबू/टोमॅटो वापरायचे, बाकी सुके पदार्थ आणि कांदा नेता येतो.

श्वेता२४'s picture

5 May 2018 - 4:13 pm | श्वेता२४

कोल्हापूर भागात बऱ्याच घरांमध्ये डबाभरुन भडंग करुन ठेवले जाते. व ते नुसतेच किंवा फक्त कांदा कोथिंबिर घालूनही खातात. मी लहान असताना तर छोट्या हॉटेलांमध्येही भडंग हा एक मेनू असायचा. प्रवासात तर हा पदार्थ मस्टच

लई भारी's picture

5 May 2018 - 4:08 pm | लई भारी

पाककृतीबद्द्ल धन्यवाद.

रंकाळ्यावर मिळणारी कागदाच्या कोनात झणझणीत चटकदार भेळ भरलेली त्यावर दोन मिरच्या, सोबत हि कैरीची फोड आणि पत्याचे खोचलेलं पान! पत्त्याचा चमचा करून खाल्लेली ती भेळ म्हणजे निव्वळ स्वर्गसुख!

ह्याच्यापुढे काय बोलणार आता.
बरेच दिवस जाण्याचा योगच आला नाही :(

ज्ञानोबाचे पैजार's picture

5 May 2018 - 4:45 pm | ज्ञानोबाचे पैजार

ही पाकृ एकदा घरी करुन बघायला पाहीजे, भेळेचा एक वेगळा प्रकार म्हणुन.

रंकाळा हे प्रकरण जरा अतिरंजीतच वाटते. एका कोल्हापुरी मित्राच्या सल्ल्याने हि भेळ एकदा तिकडे खाल्ली होती. पण अतिशय पानचट आणि बेचव होती.
भेळ म्हटले की हिरव्या मिरचीचा भरपुर ठेचा हवाच.

पुण्यात किंवा मुंबई मधे बर्‍याच ठिकाणे रंकाळ्या पेक्षा चांगली भेळ मिळते.

पैजारबुवा,

अगदी. अगदी. कोल्हापूरचं सगळंच ओव्हररेटेड आहे. अतिशय उत्तम चवीची ओली भेळ तीसेक वर्षांपूर्वी जुहू चौपाटीला एका मराठी माणसाच्या भेळगाड्यावर खाल्ली होती. तद्नंतर तशी ओली भेळ कुठेही मिळाली नाही. श्वेताताई, तुमची पाककृती चांगली दिसतेय, पण अशी भेळ काही आवडत नसल्याने पास. पुण्याच्या आसपास छोट्या गावांतून मटकी भेळ म्हणून सुक्या भेळीचा एक प्रकार मिळत असे. फार चविष्ट. आताशा तशी जुनी चव मिळतात नाही. कारण तशी बारीक, गावरान मटकीच मिळायची बंद झाली आहे. पंढरपुरास एकदा मोठ्या भडंगाची सुकी भेळ खाल्ली होती. तीही छान होती. पुण्यात नवग्रह मंदिराच्याजवळ एक अप्रतिम चवीची भेळ मिळते. तीही एकदा खाऊन पहा कधी पुण्याला आलात तर.

कानिफनाथ मंदिराच्या समोरची मटकी भेळ उत्तम लागते. आता ते दुकान आहे का याची कल्पना नाही.
===
पुणे पंढरपूर मार्गावरील लोणंद गावची "शालिमार ओली भेळ" मला आवडणारी सर्वोत्तम भेळ. पण संध्याकाळी ६ नंतर चालू होते.
===
शिवाजीनगर रेल्वे स्टेशनच्या अगदी समोर एका छोट्याश्या टपरीत लाईन लावून मिळणारी भेळ देखील उत्तम.
===
कल्याण भेळ वगैरे पांचट. त्या खेडशिवापूरला लोक गाड्या थांबवू थांबू का खात असतील देव जाणे. आवड ज्याची त्याची.

शिवाजीनगर रेल्वे स्टेशनच्या अगदी समोर एका छोट्याश्या टपरीत लाईन लावून मिळणारी भेळ देखील उत्तम.

ती झटका भेळ, तो म्हातारा कधीच गेला, मग त्या भेळेत मजा नाही राहिली.

पुढच्या पिढीला ते चालवता आले नाही म्हणायचे??
४ वर्षांपूर्वी मी खाल्ली होती. पण आवडली होती. त्यावेळेस मला तिची महिमा काही माहित नव्हती. मी आव बघितले ना त्याव डायरेक्ट कॉउंटर समोर गेलो म्हणालो एक ओली भेळ द्या. भेळ बनवणाऱ्याने माझ्याकडं बघितले म्हणालं," लाईन दिसेना का?"
चायला, १०-१५ जणांची लाईन.
लाईन लावून आयुष्यात पहिल्यांदा भेळ खाल्ली पुण्यात.
पुणे तिथे काय उणे!

पुण्यात सर्वोत्तम भेळ म्हणजे संभाजी बागेतली व्यास भेळ.
अजूनही तो कागदी पुठ्ठे देतो भेळ खायला. चवीला एकदम भारी.

विशुमित's picture

7 May 2018 - 12:40 pm | विशुमित

नोटेड...
धन्यवाद..!

श्वेता२४'s picture

5 May 2018 - 6:34 pm | श्वेता२४

आपण जिथे वाढतो तिथल्या खाद्यपदार्थाची चव आपल्या जिभेला सवयीची झालेली असते. मला पुण्यात आल्यावर नुसत्या चिर्मुरीची भेळ खायची या विचारानेच कसतरी झालं काही काळाने मला पेरू गेट जवळील साई बा इथे मिलनारी भडंग भेळ व विजय टॉकीज समोरील भेळेची टेस्ट आवडायला लागली . तो माणूस भेळेत खर्डा टाकतो. जाम भारी लागते.
पण मुंबई मध्ये मात्र मला अजूनही चांगली भेळ खायला मिळालेली नाही मागे एका धग्यात कोणीतरी विठ्ठल ची भेळ चांगली असे म्हणाले होते मी पत्ता विचारलया पण मला प्रतिसाद मिळाला नाही . नेट वर जो पत्ता होत तिथे तए दुकान नाहीय. जेम्स वांड यांनि कृ पया मार्गदर्शन करावे

मृत्युन्जय's picture

16 May 2018 - 4:07 pm | मृत्युन्जय

विठ्ठल ची भेळ अतिशय बकवास असते. कृपया तसदी घेउ नये. कोल्हापूरकरांना आवडणे तर अगदीच अशक्य आहे. गिरगाव चौपाटी वर मिळणारी भेळ आणी विठ्ठल ची भेळ यात फारसा फरक नसतो. गिरगाव चौपाटीची जरा बरी आणि बरीच स्वस्त असते.

बादवे विठ्ठल ची भेळ व्हीटी स्टेशन पासुन जवळ स्टर्लिंग थेटरच्या आसापासच्या कुठल्यातरी लेन मध्ये आहे. स्टर्लिंग पाशी विचारले तर कुणीही सांगेल

विठ्ठल भेळवाला सिएस एमटी समोरच्या रसत्यावर क्यापिटॉलच्या डावीकडे न्यू इक्सेलसिअर थिएटर आहे तिथे होता. सरळ दुकानच होते ७० पर्यंततरी होते.
पाणी पुरी जेवणाच्या थाळीतल्या वाट्या मांडतात तशा देत असे. तुमचे तुमी बुडवा पुय्रा.

भेळ छान सजवून देत असे. काही जणांना भेळ खायची असे परंतू भेळवाले जे काही हात पुसणे वगेरे करतात ते आवडायचे नाही ते आवर्जून इकडे येत.

ही असली आंबतचिंबट भेळ आवडत नाही बाबा.
बार्शीची गुंडाची सुक्की भेळ एक लंबर.
अस्सल पंढरपुरी चुरमुर्याचा चिवडा, थोडा तिखट पोहे चिवडा, शेव, ओले हरभऱ्याची उसळ, बारीक कांदा आणि लिंबू.
टोटल म्हणजे हाहू करत कागदाला हात पुसणे आनि एक गुडदाणी खाऊन तृप्त होऊन निघणे.

आमच्या सोमेश्वरची मल्लापाची सुक्की (सुखी) भेळ पण लय जोरदार. रोज ताजा घाना असतो.
पण एक भेळ खायला ३ जण पाहिजेत. एकट्याचा घास नाही.

सुम्या तुला मल्लाप्पा माहिती आहे?
लैच जवळचा माणूस हैस तु तर

जवळचा म्हणजे आमिनभाईची पुरी भाजी खाण्यात जिंदगी गेली.
खासगीत बोलू.

पुंबा's picture

6 May 2018 - 12:25 am | पुंबा

हॅट्ट साला!!
ही काय भेळ झाली का??
आमच्या झुमरीतलैय्याला मिळते तीच खरी भेळ हो..

श्वेता२४'s picture

6 May 2018 - 11:17 am | श्वेता२४

आता सगळे भेळेवर घसरू नका. पुण्यातील मटकी भेळ खेड राजगुरूनगर भागात छन मिळायची. एस यां नि सुचवलेल्या ठिकाणी जाऊन येईन कधीतरी. मला वाटतं एखाद पदार्थ वेगवेगळी ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने बनवतात. एखाद्यला ती चव आवडते एखाद्याला नाही. इथे मी कोल्हापूरची भेळ सर्वश्रेष्ठ असल्याचा दावा मुळीच केलेला नाही. ज्यांना अशाप्रकारची भेळ आवडते त्यांनी ती जरूर करून बघावी यासाठी हा प्रयत्न. या रेसिपीबद्दल चागले वाईट प्रतिसाद देणाऱ्या सर्वाना धन्यवाद

हॅट तेरी की. असं मनाला लावून घ्यायचं नाही ताई. सगळे असे खेळीमेळीच्या वातावरणात चिडवतात, उचकवतात. ते हसूनखेळून आपणही करायचे असते. असे मोकळेढाकळे वातावरण फक्त मिपावरच मिळेल. :-) कुणी म्हटलं ना की आमचं तुमच्यापेक्षा भारी, की आपणही ठासून म्हणायचं, छट, आमचं डबल भारी. पुणे-मुंबई-कोल्हापूर-नागपूर वगैरे आलं की सगळे बाह्या सरसावून अहमहमिकेने प्रतिसाद देतात. ते एन्जॉय करायचं. मजा येते.

बरं चला, आता तुम्ही मान्य केलं ना की कोल्हापूरची भेळ पुण्याच्या भेळीइतकी भारी नाहीये?

फाऊल! फाऊल! फाऊल! असं कसं काय मान्य केलंत लगेच? चला, भांडा बघू दणकून. ;-)

(स्वगत : अपर्णाताई यायच्या बंद झाल्यापासून मिपावर कोल्लापूरची बाजू पारच लंगडी पडाया लागली पघा!) आता पळा...! :-D

श्वेता२४'s picture

7 May 2018 - 10:31 am | श्वेता२४

उलट विरोधी का होईना या रेसिपिवर सगळ्यांनी मनमोकळ्या प्रतिक्रीया दिल्या याचेच समाधान आहे. वाकी एस तुम्ही म्हणल्याप्रमाणे
कुणी म्हटलं ना की आमचं तुमच्यापेक्षा भारी, की आपणही ठासून म्हणायचं, छट, आमचं डबल भारी. असं कसं काय मान्य केलंत लगेच? चला, भांडा बघू दणकून. ;-)
हे बाकी जमायला जरा वेळ लागेल
हे आधी कोल्हापूरकर होते तेव्हा सहज जमायचं. पण त्यानंतर काही काळ पुणेकर व मुंबईकर झाल्यामुळे भांडण करण्याच्या स्टाईलबाबत कन्फ्यूज झालेय.

सस्नेह's picture

7 May 2018 - 11:51 am | सस्नेह

अपर्णाताई यायच्या बंद झाल्यापासून मिपावर कोल्लापूरची बाजू पारच लंगडी पडाया लागली पघा!)

क्या एसभाय, हम अभी जिंदा हुं ना !!

अर्रर्रर्र. इसरलोच पघा. स्नेहातै, येलकम टू द रान. आम्ही काडी टाकलीय. तुमीबी तुमची सासू* घिऊन या.

(*सासू हा शब्द माहीत नसणाऱ्यांना सूचना : टेन्शन घेऊ नका!) ;-)

लई भारी's picture

9 May 2018 - 10:31 am | लई भारी

जिकलंयस की भावा!
हा शब्द ऐकल्यावर 'कडाक्याच्या थंडीत धगाला बसल्यावर कसं बेश्ट वाटतंय' तस वाटलं.

ओ असे एकदम वाइट वाटून घेऊ नका. तुमची भेळ चांगलीच आहे.
झणझणीत प्रतिसाद देण्याची इकडे पद्धतच आहे.
आता मुंबईचंच म्हणाल तर जुन्या भेळेचं आसन केव्हाच डळमळीत झालं आहे. त्याची जागा चाइनिज भेळ नावाच्या नभेळेने घेतली आहे. अरे बाबा भेळेत काय काय घालून तिचे कल्याण ( पुण्यातली कल्याण भेळ) कर पण त्यातले चिरमुरे शेव कांदा काढू नकोस असे सांगायची वेळ आलीय.

अक्षय कापडी's picture

6 May 2018 - 7:28 pm | अक्षय कापडी

Chan

अक्षय कापडी's picture

6 May 2018 - 7:54 pm | अक्षय कापडी

Chhan

श्वेता२४'s picture

7 May 2018 - 12:44 pm | श्वेता२४

प्रतिसादांबद्दल धन्यवाद.

घरी बनवलेल्या भेळीला काहीही करा ती टेस्ट येत नाही असे माझे मत आहे.
दुकानवाले काही टेस्टीफायर वापरात असतील का ?

कपिलमुनी's picture

7 May 2018 - 1:37 pm | कपिलमुनी

रस्त्यावरची धूळ :)
त्याशिवाय 'ती' चव येत नाही

अभिदेश's picture

7 May 2018 - 4:18 pm | अभिदेश

आणि मिसळीला सुद्द्धा बाहेरच्या सारखी टेस्ट येत नाही. दोन्ही गोष्टी अगदीच घरच्या सारख्या होतात.

घरी भेळ खाल्ली जात नाही चरतो.

अक्षय कापडी's picture

7 May 2018 - 1:29 pm | अक्षय कापडी

भेळ काय खाण्याची गोष्ट आहे का?? काहीही

जेम्स वांड's picture

7 May 2018 - 5:52 pm | जेम्स वांड

तुम्ही भेळ टाकून गुंडाळलेला कागद अन पुठ्ठ्याचा चमचा खाता काय? :D :D

पद्मावति's picture

7 May 2018 - 5:27 pm | पद्मावति

मस्तं पाकक्रुती. चटपटीत आणि सोपी.

जेम्स वांड's picture

7 May 2018 - 5:55 pm | जेम्स वांड

कोल्हापुरी लोकांना आपण 'लैच जास्त तिक्कट' खातो ह्याचा अहंगंड का असतो? , एखाद्या कोल्हापुरी माणसाला नागा चिली उर्फ घोस्ट पेपर खायला घालून, रक्काळ्यावर तुम्ही हेच्याहून तिखट खात असाल नाही पाहुणे असे विचारावे असा एक दुष्ट विचार सतत मनात येतो

कुठलं काय कोल्लापुराचं तिक्कट घेऊन बसालायसा मर्दा,
पाव्हणं आलं होतं कोल्लापुरचंच. जहाल पाह्यजे, तर्री पाहिजे म्हणून सोलापुरात सावजी मटण आन शीग खायला बसलं तर लैच तिखट म्हनून निम्म्यात उठलं.
नुसती वाळली भडंग हाय कोल्हापुरचं तिखत म्हनजे.

विशुमित's picture

7 May 2018 - 7:37 pm | विशुमित
विशुमित's picture

7 May 2018 - 7:37 pm | विशुमित
विशुमित's picture

7 May 2018 - 7:38 pm | विशुमित
विशुमित's picture

7 May 2018 - 9:14 pm | विशुमित

करायचा..!

असो, तर अभ्या अन पाटील ह्यांच्याशी आम्ही सहमत आहोत, अन मुळातच सातारी असल्यामुळे आमचा कोल्हापूर संगट कायम ३६ चा आकडा अस्तुय, तरी एक नमूद करावे वाटते, कोलापुरी तिकट जितकं नॉनव्हेज मधी असतंय त्याच्या पाचपट तिक्कट आमच्या भैरोबाच्या भंडाऱ्यातलं उडदाचं घुटं असतंय! लोटाभर गुळवणी संगती ठेवली तरी हायहुई हुतंय पण तेचायला हे काय मार्केटिंग करून इकायची बाब न्हाय, आपण आपलं निवांत श्याक/घुटं ओरपावं तीनचार भाकरींचा काला करून वर निवांत गुळवणी पिऊन तंबाखूचा बार (तंबाखू फक्त पंढरपुरीच) लावून लवणातल्या रानात झोपावं म्हणे मी.

उपयोजक's picture

8 May 2018 - 8:23 am | उपयोजक

:)

तिकटाचं प्रमाणिकरण झालंच पायजेल.

उपयोजक's picture

8 May 2018 - 8:20 am | उपयोजक

नक्की काय म्हणायचंय?

नाल नाल, तेरे नाल वाला नाल.

श्वेता२४'s picture

8 May 2018 - 10:06 am | श्वेता२४

अशी म्हण आहे. म्हणजे क्षुल्लक गोष्टीचा उपयोग करण्यासाठी मोठा खर्च करायचा. इथे मी कैरी साठी एवढा घाट घातला
तिखट खाण्याबाबत म्हणेन की कोल्हापूरच्या माणसांना बाकीच्याच लोकांनी बदनाम केलाय. कोल्हापुरी तिखट झणझणीत आणि लालभडक असतं पण हायहूय करायला लावणर नसतं. यापेक्षा खानदेश आणि विदर्भत जास्त तिखट खातात कोल्हापूरच्या पादर्थन विशिष्ट तिखट व मसालेदार चव आहे पण ती जीभ पोळणारी नाही. कोल्हापुरी म्हणून तिखटाचा भडिमार करणारे पदार्थ कोल्हापुरी नाहीतच मुळी

अभ्या..'s picture

8 May 2018 - 10:11 am | अभ्या..

असेल बाबा, कोल्हापुरात घोड्याची नाळ असेल.
काही सांगता येत नाही.

श्वेता२४'s picture

8 May 2018 - 10:30 am | श्वेता२४

तुमच्याकडे घोड्याना बूट घालतात का?

अभ्या..'s picture

8 May 2018 - 10:36 am | अभ्या..

हो, पण त्यांना आम्ही नाल म्हणतो, कोल्हापुरात ही नालच म्हणतात. नाळ वेगळी असते.
नाल आणि नाळ मधला फरक कळत नसेल तर द्या सोडून.

संजय पाटिल's picture

8 May 2018 - 10:42 am | संजय पाटिल

:D :D :D

श्वेता२४'s picture

8 May 2018 - 10:44 am | श्वेता२४

बरं झालं चूक लक्षत आणून दिली. मला नालच म्हणायचं होतं पण इतक्यावेळा मी नाळ च टाईप केलं

उपयोजक's picture

17 May 2018 - 7:07 pm | उपयोजक

लक्षात आलं तर :)

जेम्स वांड's picture

8 May 2018 - 10:45 am | जेम्स वांड

तुम्ही म्हणे गणपती नंतर स्वभाव बदलणार होतात स्वतःचा! काय झालं फुडं?

(नालायकपणाशी नाळ जोडलेला नाल न ठोकलेला) वांडो

श्वेता२४'s picture

8 May 2018 - 10:52 am | श्वेता२४

तुम्हाला मी मुंबई मधील भेळेची चांगली ठिकाणे सांगण्याची वर विनंती केली होती. प्रतिसादाच्या प्रतीक्षेत

जेम्स वांड's picture

8 May 2018 - 10:59 am | जेम्स वांड

कारण तुम्ही तुमच्या चवी फिक्स करून घेतल्याती, मुंबईतली भेळ खाऊन तर तुम्ही भेळ खाणे सोडले म्हणता ना! मग तुम्हाला ठिकाणे सांगून तरी काय उपेग, कुठंही गेलात तरी भेळ उत्तमच मिळेल ती तुमच्या चवीला साजेशी नसेल फक्त. त्यामुळे नका विचारू असले प्रश्न परत, तुम्ही आपली परत कैरीच आणा म्हणजे पुन्हा नाल-घोडा-कोल्हापुरी भेळ- रक्काळ्याची हवा वगैरे स्मरणरंजन होऊन जाईल तुमचे.

अभ्या..'s picture

8 May 2018 - 4:27 pm | अभ्या..

तुम्ही म्हणे गणपती नंतर स्वभाव बदलणार होतात स्वतःचा! काय झालं फुडं?

बदलला होता की, मग लग्न झालं माझं. अस्तुरी नेमकी सोलापुरचीच. मग काय सांगायचं म्हाराजा. "तू भांड बिनधास्त कुठं बी" असं म्हनती ती.

जेम्स वांड's picture

8 May 2018 - 5:11 pm | जेम्स वांड

हा प्रश्न इराण अण्वस्त्रसज्ज होण्याहून जास्त स्फोटक दिसतोय ;)

जेम्स वांड's picture

8 May 2018 - 10:50 am | जेम्स वांड

'काटाकिर्रर्र' हा शब्द कोल्हापूरचीच देणगी असतोय न म्हणे? आजवर तिखट म्हणजेच कोल्हापुरी ही ओळख करवून दिली गेली, परत आता तुम्ही म्हणता तिखट म्हणजेच कोल्हापुरी नाय, नेमकं मॅटर काय हाय कोणी सांगेल का?

श्वेता२४'s picture

8 May 2018 - 10:56 am | श्वेता२४

कोल्हापुरी तिखट झणझणीत आणि लालभडक असतं पण हायहूय करायला लावणर नसतं

श्वेता२४'s picture

8 May 2018 - 10:08 am | श्वेता२४

अशी म्हण आहे. म्हणजे क्षुल्लक गोष्टीचा उपयोग करण्यासाठी मोठा खर्च करायचा. इथे मी कैरी साठी एवढा घाट घातला
तिखट खाण्याबाबत म्हणेन की कोल्हापूरच्या माणसांना बाकीच्याच लोकांनी बदनाम केलाय. कोल्हापुरी तिखट झणझणीत आणि लालभडक असतं पण हायहूय करायला लावणर नसतं. यापेक्षा खानदेश आणि विदर्भत जास्त तिखट खातात कोल्हापूरच्या पादर्थन विशिष्ट तिखट व मसालेदार चव आहे पण ती जीभ पोळणारी नाही. कोल्हापुरी म्हणून तिखटाचा भडिमार करणारे पदार्थ कोल्हापुरी नाहीतच मुळी

संजय पाटिल's picture

8 May 2018 - 10:29 am | संजय पाटिल

सही है...

सस्नेह's picture

8 May 2018 - 11:07 am | सस्नेह

वरती बरेच जण टंकटंक करून र्‍हायलेत की कोल्लापुरी लोक्स तिकाट खात न्हाईत म्हनून.
कोलाह्पुरी माणसाला निगुतीनं बनवलेल्या चटणीची सवय आस्तीया, लाळ मिर्चीची भुकटी खाणाऱ्या सोलापूरकरांबरोबर त्याची पंगत जमत न्हाई, आणि हिरव्या मिर्च्या रगडून तोंडात कोंबणाऱ्या वऱ्हाडी मान्साच्या पन जोडीला बसणार न्हाई.
..बाकी पुणेकरांचे तिखट खाणे काय वर्णावे, फोडणीतली मिर्ची काढून उरलेल्या तिखटपणात हाय-हुय करणारी जमात ! (पळा आता ...!)

लाल मिर्ची असे वाचावे, चटणीची आठवण आल्यामुळे लाळ असे झाले ! =))

श्वेता२४'s picture

8 May 2018 - 11:18 am | श्वेता२४

आता जरा बरं वाटलं

जेम्स वांड's picture

8 May 2018 - 11:25 am | जेम्स वांड

आता जरा बरं वाटलं

कोल्हापुरी तिखट से ज्यादा होती हय की कमीच असती हय म्हणे ?

जेम्स वांड's picture

8 May 2018 - 11:24 am | जेम्स वांड

पण तिखट खाऊन त्याचा डंका पिटणारे पण फक्त कोल्हापुरीच दिसतात, हिरव्या मिरच्या खाणारे छपरी असतात हे मात्र मान्य पण सोलापूरकर कधी अशी सेल्समनशिप करताना दिसले नाहीत आजवर.

(पळून उसेन बोल्ट झालेला) वांडो :D

सोलापूरकर कधी अशी सेल्समनशिप करताना दिसले नाहीत आजवर.

कोण म्हणतो ?
चटणीपासून चादरीपर्यंत सोलापूर पसरलंय की हो !

प्रचेतस's picture

8 May 2018 - 11:36 am | प्रचेतस

या चिंचवडात, तुम्हाला नेवाळेची मिसळच खायला घालतो.

मिसळ नको आम्हाला , भेळ, भेळ !
चिंचवडला बरी मिळते का ?

प्रचेतस's picture

8 May 2018 - 12:03 pm | प्रचेतस

भारी मिळते

सस्नेह's picture

8 May 2018 - 12:13 pm | सस्नेह

फिर आयेंगे जरूर :)
कट्टा करा की !

प्रचेतस's picture

8 May 2018 - 12:18 pm | प्रचेतस

ठरवतो पिंपरी चिंचवड कट्टा.

अभ्या..'s picture

8 May 2018 - 11:37 am | अभ्या..

कसली निगुती अन कसली चटणी, चटणी पण शब्द तुमचा राहिला नाही हो आता. त्याच्यावर पण सोलापूरची मोहर बसली.

विशुमित's picture

8 May 2018 - 11:45 am | विशुमित

कपबशीवाली चटणी ना ??

राईट्ट, जयशंकर हाटेल, लांबोटी. पण तिथला मक्याचा चिवडा जास्त फेमस आहे.
चटणी म्हणली की ठेंगील आणि नसले.

शेंगाची चटणी नव्हे रे लेका, कांदा लसूण चटणी !
ही .

सोलापूर काय आणि कोल्हापूर काय, पुण्याच्या खाद्यसंस्कृतीची सर नाय कुणालाही.

काये ना, की पुणेकरांना भायेर खायची लै हौस, तवा सगळ्या भार्तातनं सगळ्या नमुन्याचे खाद्यपदार्थ बनवणारे लोक्स पुण्यात येऊन राहिले, हॉटेलं काढून राहिले, टपऱ्या काढून राहिले. म्हणून भारी झालीय खाद्यसंस्कृती !
...बाकी ही संस्कृती पट्टीची पोहणारी आहे हो, कधी बुडत नाही :D