पुणेरी कथा - पाळावयाचे नियम

DEADPOOL's picture
DEADPOOL in जनातलं, मनातलं
26 Nov 2015 - 10:15 pm

गजाननच्या आशीर्वादाने व शनिवारवाड्याच्या साक्षीने आम्ही 'तुळशीबागेत भेटेल तुला मी' या कथामालेचा शुभारंभ करत आहोत!
प्रस्तुत कथा ही ५१ भागात प्रकाशित होणार आहे.तरीही ही कथा वाचताना पाळावयाची काही पथ्ये!
१. ही कथा ५१ भागात असल्याने कोणीही 'लवकर भाग टाका' अशी प्रतिक्रिया देऊन आपल्या अधाशिपणाचा प्रत्यय देऊ नये. (त्यांना १ ते४ या वेळेत 'चितळे' नामक वाट कशी पहावी या शाळेत पाठवले जाईल.)
२. 'पुभाप्र' नामक पळवाट वापरल्यास त्याला पुण्यात लुंगी घेण्यासाठी पाठवण्यात येईल.
३. १ ते ४ या वेळेत कथेवर प्रतिसाद टाकल्यावर आपण रिकामटेकडे आहात असा अर्थ काढण्यात येईल.
४. व्यनि करून ओळखी काढण्याचा प्रयत्न करु नये. आमच्या ओळखीने चितळे नामक दुकानात पदार्थ लवकर मिळत नाही!
५. रिकामे सल्ले देऊ नये, घरातील पोरं तुम्ही त्यांना सल्ला दिल्यावर हाताखालून काढतात हे आम्हास चांगले ठाऊक आहे.
६. "अय्या किती छान लिहितात तुम्ही" असे म्हणून आपल्या जिलेबिंवर चांगल्या प्रतिसादाची अपेक्षा करु नये,आमच्या वाड्यात आमची हरिश्चंद्र सीनियर म्हणून ख्याती आहे!
७. ही कथा कुठेतरी वाचली आहे म्हणून आम्हाला 'ट्रॅप'मध्ये अडकवायचा प्रयत्न करु नये.आमची एक लघुकथा महाभारत नुकतीच प्रसिद्ध झाली आहे!
८. नसत्या चुका काढू नयेत. शालजोडित देण्यात येतील!
९. "बर झालं कधीचे जोडे नव्हते हो!" म्हणून अपमान करु नये. आम्ही नेहमी दोन नं. कमीच पाठवतो.
१०. आता आपल्या जोड्याचा क्र. आम्हांस कसा माहित हे विचारू नये. असली क्षुल्लक कामे आम्ही शेरलॉक होम्स नामक घरगड्यास सोपवीतो!
११. आम्ही आठवड्यातून फक्त एकच भाग टाकतो. हे काम नसून परोपकार आहे याची आम्हांस जाणीव आहे.

आणखी काही पथ्ये पुढच्या वेळी!

हे ठिकाणधोरणमांडणीवावरसंस्कृतीकलानाट्यइतिहासवाङ्मयकथामुक्तकविडंबनशब्दक्रीडाविनोद

प्रतिक्रिया

नमनालच घडाभर तेल झाल की वो ! पु.भा.प्र.

'पुभाप्र' नामक पळवाट वापरल्यास त्याला पुण्यात
लुंगी घेण्यासाठी पाठवण्यात येईल.
ह.घ्या. ;)

पुणे काय ऑस्ट्रेलिया आहे का हमरिका जिथे लुंगी मिळत नै ऑ ??

अहो जुन्या मायबोलीवर धुंद रवि यांचा 'माझी लुंगी खरेदी' हा लेख वाचा.
जर पुन्हा लुंगी खरेदीसाठी गेलात तर ४ लुंग्या फ्री!!!!!

बोका-ए-आझम's picture

26 Nov 2015 - 11:59 pm | बोका-ए-आझम

मी तो वाचल्यावर हसता हसता बेशुद्ध झालो तो एक-दोन दिवसांनीच शुद्धीवर आलो. लिंक द्या की त्याची.

वा तुमच्यामुळे मी इतका विनोदी धागा वाचला आभार्स् :)

मदनबाण's picture

27 Nov 2015 - 3:17 pm | मदनबाण

@ DEADPOOL
आहाहा... काय अप्रतिम दुवा दिलात ! दगडुशेठ गणपती दुवा देइल हो तुम्हाला ! ;)
हसुन हसुन मुरकुंडी वळली...कं लिवलय कं लिवलय ! { ओय ट्वीटी, अपुन तेरुकु भी थांकु बोलरेला हय, तेराच प्रतिसाद वाचके अपुन लिंक उघणेका उध्योग किया. बोले तो फुल टु टाईमपास हो गया ना भिडु ;) }

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Li-Fi Internet Technology 100 Times Faster Than Wi-Fi

'शुक्रिया,शुक्रिया' (खास नेस्टर स्टाइल!!)

DEADPOOL's picture

27 Nov 2015 - 8:32 pm | DEADPOOL

'शुक्रिया,शुक्रिया' (खास नेस्टर स्टाइल!!)

पीयूषा, मदनबाण, बॅटमॅन याच धुंद रविंवर काही दिवसांपूर्वी प्राणघातक हल्ला झाला होता!!
असहिष्णुता ती हीच!

तुमको पुनेमे लुंगी खरेदी नही पता??

ऐसा कैसा करते जी तुमे . . इधर उधार क बाता पता होणा जरा . लुंगी जैसे तो पता होणाच

अण्णा हे आपल् अद्द्या मेरेकु कैसे पता होना ? पुणे कहाँ मै कहा ? वैसे लोग बाता करते पुणे तिथे काय उणे ये सब झुठ है ना ;)

अद्द्या's picture

27 Nov 2015 - 12:16 pm | अद्द्या

हो न आज्जे . . आपलं ते हे पिव्शे

अगदी अगदी .

एक साधी लुंगी पण मिळत नाही म्हणजे काय

DEADPOOL's picture

26 Nov 2015 - 10:21 pm | DEADPOOL

फारएंड, बॅटमॅन. आणि पराशेठ

परिकथेतील राजकुमार's picture

26 Nov 2015 - 10:28 pm | परिकथेतील राजकुमार

प्रेरणा-
DEADPOOL - Thu, 26/11/2015 - 22:21

फारएंड, बॅटमॅन. आणि पराशेठ

प्रेरणेचे मत घेतले आहे का? ;)

DEADPOOL's picture

26 Nov 2015 - 10:31 pm | DEADPOOL

सॉरी हं!

आदूबाळ's picture

26 Nov 2015 - 10:22 pm | आदूबाळ

चांगलं आहे.

"तुळशीबागेत भेटे तुला मी" असं व्याकरणसूद्द नाव असल्याने कथा वाचायची उच्छुकता ताणली गेली आहे.

DEADPOOL's picture

26 Nov 2015 - 10:24 pm | DEADPOOL

लिहू कधीतरी!

सूड's picture

26 Nov 2015 - 10:28 pm | सूड

या आता! धन्यवाद!!
__/\__

DEADPOOL's picture

26 Nov 2015 - 10:32 pm | DEADPOOL

काहून?

DEADPOOL's picture

26 Nov 2015 - 11:59 pm | DEADPOOL

@सूड
कुठे येऊ?
जरा नीट प्रतिक्रिया देत चला.

अजया's picture

27 Nov 2015 - 8:01 am | अजया

पुभाप्र विदाउट लुंगी!!

DEADPOOL's picture

27 Nov 2015 - 8:36 pm | DEADPOOL

माझ्यामुळे लुंगी फेमस व्हनार!!!!

नाखु's picture

27 Nov 2015 - 9:03 am | नाखु

मला वाटल पुण्यावर दुगाण्या झाडायचा मक्ता फक्त विजुभाऊंनी घेतलाय. चालायचंच टीआर्पी चा मोह कुणाला सुटलाय.भोग आहेत सगळे मिपाकराचे भोगा कर्माची फळे.

-बाराच्या वर्गातला चौदावाला नाखुस

DEADPOOL's picture

27 Nov 2015 - 8:37 pm | DEADPOOL

सही पकड़े!

DEADPOOL's picture

27 Nov 2015 - 8:37 pm | DEADPOOL

सही पकड़े!

विजुभाऊ's picture

28 Nov 2015 - 6:08 pm | विजुभाऊ

नाय वो. मी फक्त पुण्यातले आण्भव ल्हितोव.
तुमी त्येल्ला धुगाण्या म्हंताय....... पुण्यातल्या आण्भवाला धुगाण्या म्हम्तात ह्येच म्हैत न्ह्वते.

DEADPOOL's picture

28 Nov 2015 - 7:39 pm | DEADPOOL

जाऊ द्या ओ भाऊ! आपला टी आर पी वाढतो तेव्हढा!

अभिजीत अवलिया's picture

27 Nov 2015 - 9:11 am | अभिजीत अवलिया

पु.भा.प्र.

कथामाला आल्यानंतर काही प्रतिक्रिया द्यायची सोयच ठेवली नाहीये डेडपुल रावांनी.
११ बुचांतून एखादाच सुटेल बहुतेक.

DEADPOOL's picture

27 Nov 2015 - 8:38 pm | DEADPOOL

खी खी!!!!

पैसा's picture

27 Nov 2015 - 10:18 am | पैसा

ओके

बबन ताम्बे's picture

27 Nov 2015 - 10:23 am | बबन ताम्बे

आणि कथामाला ५१ भागातच का? ५२ का नाही?

DEADPOOL's picture

27 Nov 2015 - 8:40 pm | DEADPOOL

दगडुशेठ गणपतीला प्रसाद! ५१ भाग व पथ्ये ११!!

नियमांची लिखीत पाटी दिसल्याने निषेध व्यक्त करतो ! ;)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Li-Fi Internet Technology 100 Times Faster Than Wi-Fi

मदनबाण's picture

27 Nov 2015 - 10:27 am | मदनबाण

पाटी न दिसल्याने :- असे वाचावे.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Li-Fi Internet Technology 100 Times Faster Than Wi-Fi

नीलमोहर's picture

27 Nov 2015 - 10:29 am | नीलमोहर

"तुळशीबागेत भेटे '' तुला मी"

- पहिल्याच बॉलवर आऊट.

पुणेकर चुकूनही भेटेल म्हणणार नाही, कोणाला म्हणूही देणार नाही ;)

DEADPOOL's picture

28 Nov 2015 - 8:49 pm | DEADPOOL

या प्रश्नाचे उत्तर पुढील भागात दिले आहे!

प्रसाद१९७१'s picture

27 Nov 2015 - 10:41 am | प्रसाद१९७१

जुने झाले हो असले विषय आता. कंटाळा आलाय. पुढचे भाग नाही लिहीलेत तर उत्तम होइल.

DEADPOOL's picture

27 Nov 2015 - 8:41 pm | DEADPOOL

जुने ते सोने!

तुमच्या लेखनशैलीवरून तुम्ही पुणेकर नाही हे लगेच लक्षात येते.

DEADPOOL's picture

27 Nov 2015 - 8:43 pm | DEADPOOL

उरळीकांचन चालेल?

नेक्स्त भाग केवा ??????? :प

DEADPOOL's picture

27 Nov 2015 - 8:43 pm | DEADPOOL

येईल ओ!!

आनंदराव's picture

27 Nov 2015 - 11:13 am | आनंदराव

५० करायचे आहेत का?

जातवेद's picture

27 Nov 2015 - 2:28 pm | जातवेद

पहिला भाग येऊ दे मग बघू.

शिव कन्या's picture

27 Nov 2015 - 5:28 pm | शिव कन्या

पुणेरीच ते! काय पहिला भाग देताहेत!!

DEADPOOL's picture

27 Nov 2015 - 8:44 pm | DEADPOOL

खी खी!