Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by कॅप्टन जॅक स्पॅरो on Sat, 11/14/2015 - 14:15
लेखनविषय (Tags)
धोरण
मांडणी
वावर
संस्कृती
कला
नृत्य
नाट्य
संगीत
धर्म
पाकक्रिया
इतिहास
वाङ्मय
कथा
बालकथा
कविता
चारोळ्या
प्रेमकाव्य
बालगीत
मुक्तक
विडंबन
गझल
भाषा
उखाणे
प्रतिशब्द
म्हणी
वाक्प्रचार
व्याकरण
व्युत्पत्ती
शब्दक्रीडा
शब्दार्थ
शुद्धलेखन
सुभाषिते
विनोद
साहित्यिक
समाज
जीवनमान
तंत्र
kathaa
राहणी
औषधोपचार
प्रवास
भूगोल
देशांतर
राहती जागा
नोकरी
विज्ञान
क्रीडा
अर्थकारण
अर्थव्यवहार
गुंतवणूक
ज्योतिष
फलज्योतिष
सामुद्रिक
कृष्णमुर्ती
राशी
राजकारण
शिक्षण
मौजमजा
चित्रपट
छायाचित्रण
रेखाटन
स्थिरचित्र
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
विचार
प्रतिसाद
सद्भावना
शुभेच्छा
अभिनंदन
प्रतिक्रिया
आस्वाद
समीक्षा
माध्यमवेध
लेख
बातमी
अनुभव
मत
शिफारस
सल्ला
माहिती
संदर्भ
चौकशी
प्रश्नोत्तरे
मदत
वाद
प्रतिभा
भाषांतर
विरंगुळा
*ढिस्क्लेमर* १. अस्मादिक टिव्ही नेहेमी पाहात नाही. २. ऐन दिवाळीच्या कधी नव्हे ते सलग दोन दिवस आणि एक विकांत असणार्या सुट्टीमधे दोन दिवस भेसेणेलने माती खाल्ल्यामुळे ब्रॉडबँड बंद असल्याने सोफ्यावर निर्विकारपणे बसलेलो असताना हा दुरचित्रवाणीय मानसिक अत्याचार आमच्यावर करण्यात आलेला आहे. तस्मात तु टी.व्ही. बघतोस का असा कुत्सित स्वरात विचारलेला प्रश्ण फाट्यावर मारण्यात येईल. (असे प्रश्ण टपालाने पाठवायचा पत्ता: पौड फाटा: ड्रॉपबॉक्स क्रमांक ४२० (अ)(प)ल्याडची पुण्यनगरी). ३. फालतु वाद घालणार्याच्या घरच्या स्त्रीवर्गास हे एपिसोड्स डाउनलोड करुन डीव्हीडी/ पेन ड्राईव्ह मार्गे पुरवुन बदला घेणेत येईल. ४. लेखामधे खंडेरायाचा उल्लेख आहे तो सिर्यलच्या नावाखाली घुसडलेल्या कपोकल्पित गोष्टींचा उद्धार करण्यासाठी. वरिजिनल खंडेरायावर आमचही बानुपेक्षा जास्तं आणि म्हाळसेपेक्षा अंमळ कमी प्रेम आहे. तस्मात कोणाचं काहीही दुखावलं जाणार असेल त्याने लेख पुढे वाचु नये. ५. ह्या सिर्यलींमधुन अनेक नामवंत कलाकारांना चक्क वाया घालवण्यात आलेले आहे. माझा आक्षेप फक्तं कला सादर करायच्या उथळ पद्धतींना आहे. कलाकारांविषयी प्रेम आणि आदर वाटतो आणि वाटत राहिलं. ------ सद्ध्या संध्याकाळी हापिसातुन वेळेवर घरी (स्वतःच्या, मित्रांच्या, शत्रुंच्या आणि नातेवाईकांच्या) जायचं म्हणजे पोटात मोठा गोळा येतो. कारण हापिसातुन कधीमधी वेळेमधे निघता आलेचं तर घरी पोचेपर्यंत ७ वाजलेले असतात. आणि घरी एका फेमस चॅनेलवर खंडोबाच्या नावानं करमणुकीचा "खेळखंडोबा" चाललेला असतो. दोन बायकांच्या तावडीत सापडलेला आमच्या महाराष्ट्राचा खंडोबा पाहिला की त्याची दया येते बॉ. कजाग म्हाळसा आणि पझेसिव्ह बानुच्या वादावादीमधे खंडोबाचे खाण्यापिण्याचे हाल होउन हल्ली "बाडी" कमी व्हायला लागल्याचे आमच्या "फ्रेश आय पर्स्पेक्टिव्हच्या" लक्षात आलेले आहे. ह्या सिर्यल (सिर्यल किलर हा शब्द ओळीने खुन करणारा ह्या अर्थाने आला असावा का असल्या बकवास सिर्यलींचा मारा करुन खुन करणारा असावा ह्याविषयी आमच्या मनामधे अंमळ शंका आहे. अंमळ शंकांचे अभ्यासक श्री.श्री बॅटमॅन ह्यांनी ह्या शंकेचे सिर्यलांचा सखोल अभ्यास करुन निराकरण करावे असे आवाहन (आव्हान पण) आम्ही करतो) दाखवायच्या आधी त्यांच्या डिस्केमर मधे नाट्यमय रुपांतराचा डिस्क्लेमर दाखवलाय. म्हणजे खंडेरायाच्या भक्तांच्या रोषाला तोंड नं द्यायला लागावी ह्याची एक पळवाट. बाकी मला लहानपणापासुन शंकर ह्या भोळ्याभाबड्या आणि त्रिनेत्री देवाबद्दल कायम असणारी एक शंका म्हणजे त्यांची दैत्यवर्गावर असणारी विशेष कृपादृष्टी. ह्या कृपादृष्टीची तुलना हल्ली फक्तं वोटब्यांक सांभाळायसाठीच्या कृपादृष्टीशीचं होउ शकते. आधी दैत्यांना भरमसाठ प्रिव्हीलेजेस देउन ठेवायचे आणि नंतर बहुतांश वेळा आमच्या गरिब भोळ्या भाबड्या विष्णुभगवानांनी ते निस्तरायचे असा सगळा प्रकार हो. असो तो वेगळा विषय आहे. म्हाळसेला आपणचं जगन्माता पार्वती असल्याचं स्मरण ज्यादिवशी होईल त्याचं दिवशी जान्हवीची डिलीव्हरी पार्वतीकृपेने होणार असं काही उडत उडत कामावर आलेलं आहे. खरं खोटं खंडोबा जाणे. बाकी ह्या वेळेमधे मॅचचा नुस्ता स्कोअर पहायसाठी चॅनेल बदलायचा प्रयत्न सदागरिब, हताश, नम्र अश्या गृहपुरुषांनी केला की त्यांच्या घरच्या म्हाळसा त्यांच्यावर करवदायला लागतात हा अण्भव सगळ्यांनी घेतलेला असेलचं. असो. खंडोबा ह्या गृहकलहातुन लवकर सुटो अशी श्रीबालगणेशचरणी प्रार्थना. हा खेळखंडोबा संपत नाही तोपर्यंत सद्गुणी, दयाळु, जगत्राता, निसर्गप्रेमी, मातृप्रेमी, हापिसकर्मचारीप्रेमी, अतिनम्र, सहनशिलतेचा महामेरु, शामच्या आईच्या बाळानंतरचा एकमेव संस्कारी, मधुमंदा क्रुरकर्मी ह्यांच्या सुडोकुमधुन जन्माला आलेला श्री बाळ "काहीही म्हणजे काहीही" चाळे करायला टीव्हीवर येतो. घरामधल्या पाच-पाच (बेबी, मोठी आई, छोटी आई, अजिजीला आलेली आई अज्जी, लगनाळु मावशी...हा लागली टोटल बरोबर) आयांच्या संस्कारांना बळी पडलेलं हे बाळ घरच्या सुसंवादांना कंटाळुन दाढी वाढवुन हापिसात स्टाफबरोबर गप्पा मारायला जातं. एवढ्या बायकांमधे हा एकटा पुर्षा कशाला म्हणुन अधुन मधुन प्रसाद ओक त्या नुसत्या वयाने आणि वजनाने वाढलेल्या अकलेने अडिच वर्षांच्या सणकी बेबीशी गोग्गोड भांडणं काढताना दाखवलाय. श्री च्या बाबांनी मधे कधीतरी दर्शन देउन एवढ्या बायकांना टॅकल करायचा गुण आपल्यामधे नसल्याचं लक्षात घेउन खुबीने पळ काढलेला आहे हे आमच्या तल्लख मेंदुला लक्षात आलेलं आहे. आठवड्याला एखाद्या कष्टमरच्या माथी गोखले गृहौद्योगामधल्या वाटाण्यांच्या अक्षता लावल्या की हे गुणी बाळ कजाग सासु, लग्नाळु मेव्हणा, गुढगी रोगाने ग्रासलेला (का त्रासलेला) मेकप थापलेला सासरा, मानलेली "मोरॉनिक" मेव्हणी, हापिसमधला शिपाई कम चहावाला कम मॅनेजर कम कौटुंबिक अ‍ॅडवायजर कम सांगकाम्या ई.ई. च्या अडचणींमधे नाकं खुपसायला तयार होतो. जान्हवीकडे अता वाढीव प्रेग्नंन्सीच्या वाढीव खर्चामुळे ग्रस्तं असल्याने तिच्याकडे वडलांची गुढग्याची कवटी रिपेर करायला पैसे नाहित. शिवाय पराजया सहकारी ब्यांकेत मठ्ठं पोरीशेजारी बसुन ती जे अंग मोडुन गप्पा मारायचं काम करते ते पाहुन ब्यांका बुडायचं अजुन एक कारण असा एक रिपोर्ट रघुराम राजन सरांना पाठवुन द्यावा असं मनात येतं. हल्ली ह्या सिरियलचे प्रायोजक बदललेले दिसतात. पुर्वीच्या प्रायोजकांच्या राज्यात जान्हवीचा बाप निमुट खटियापे पडुन कजाग बायकोकडे दुर्लक्ष करत असे. हल्लीचे नवे प्रायोजक उत्तेजक औषधांचे उत्पादक असावेत. कारण जान्हवीचे पिताश्री "नव्या जोमाने/ आर्टिफिशिअल नवशक्तीने/ नौजवान जोशाने" हल्ली कजाग बायकोवर ओरडा-आरडाही करतात म्हणे. त्यांच्या त्या बारावीला किमान ४५ वेळा नापास झालेल्या सद्गुणी चिटुकल्या पिटुकल्या पिंट्याने कुठल्यातरी ओढुन ताणुन आनी-पानी करनार्‍या प्वॉरीशी लगीण जुळवुन आयशीला स्क्रीनवर थयथयाट करायला वाढिव स्कोप दिलेला आहे तो वेगळाचं. नै तो कुठल्या हापिसात नोकरी करतो त्यांचा पत्त्या म्या शोधु र्‍हायलोय बरं का. कारण डबल ग्रॅज्युएट पोरंपोरी बेरोजगार फिरत असताना लग्नं करण्याएवढी स्टेबिलीटी ह्या १२ वी फेल नुमुन्याला कुठल्या हापिसात मिळाली तिथं काही वॅकन्सी आहे का बघावी म्हणतो. सहस्त्रबुद्धे असं कोकणस्थ ब्राह्मणी आडनाव लावलेली त्याची आई एवढे शिव्याशाप देताना पाहुन आम्ही याची देही याची डोळी धन्य झालो. ह्या सिर्यलच्या निर्मात्या/ दिग्दर्शक/ लेखिका इत्यादिंनी आता जान्हवीला बळजबरिने हॉस्पिटलमधे नेउन सिझेरियन करुन प्रेक्षकांना लागलेल्या प्रसववेदनांमधुन त्यांची सुटका करावी हि नम्र विनंती. निर्मात्याने हे करुन दाखवल्यास त्यांना आम्ही आमच्या खर्चाने जय-आदिती अविवाहित हापिस हनिमुन पेश्शल टुर्स अँड ट्रॅव्हल्स लिमिटेडच्या स्पेशल पॅकेजने ट्रिपला पाठवु. हवं तर त्या सिरियलमधल्या पिंट्याच्या हनिमुनमधेही (आर्थिक रे बाबांनो किती वाईट विचार कराल?) मदत करु. वरची दोन गिर्‍हाईक आम्ही आमच्या रेफरन्सने जय-आदिती अविवाहित हनिमुन पेश्शल टुर्स अँड ट्रॅव्हल्स लिमिटेडच्या हापिसात पाठवत आहोत. तरी त्या हापिसचे एकमेव कार्यक्ष आणि बढती मिळवणारे कर्मचारी श्री. जय ह्यांनी त्यांच्या टुरींची प्रेझेंटेशन्स बनवुन ठेवावीत हि आग्रहाची विनंती. ह्यांचं ऑफिस म्हणजे बॉस पासुन शिपायापर्यंत अगदी सगळे एकेक नमुने. ऑफिसचा बेसिक नियम काय तर म्हणे लग्नं झालेले एंप्लॉयी नकोत. का त्याचं कारण न्युक्लिअर बाँबच्या रेसिपीएवढं गुढं ठेवलयं. आमच्या हनिमुन पॅकेजेसमधे आम्हाला लग्नं झालेली लोकं चालणार नाहित असा पण पुर्वी त्यांच्या बॉसने केलेला असावा त्यामुळे ऑफिसचे बिझनेस प्लान वाया जात असणार. ह्या सिरियलमधे सगळ्यात जास्तं घडणारी गोष्ट म्हणजे योगायोग हि होय. योगायोगाने लग्नं झालेले जय-आदितीला ह्याच्चं हापिसात एकत्र जॉब मिळतो काय. ह्या हापिसात योगायोगानेचं बॅकग्राउंड चेक वगैरे फालतु प्रकार बॉस- एच.आर. वगैरे करत नसतात. योगायोगाने त्यांचा पेइंग गेस्ट मालक हापिसच्या मातोश्री आईसाहेब उर्फ आऊ (शक्ती कपुरच्या आउचा ह्यांच्याशी काही संबंध नाही) ह्यांचा बालसवंगडी निघतो म्हणे. योगायोगाने जयचा अत्यंत महामा...म...महामायाळु सासरा त्याच्याच बॉसचा बिझनेस पार्टनर बनुन त्याची चामडी सोलायला लागतो. अरे बिझनेस पार्टनरशिप म्हणजे काय भातुकलीचा खेळ आहे का? उद्या कोणीहि येईल आणि पार्टनर होईल. काय त्याला नियम, कागदपत्रांची खेकटी, सी.ए./ सी.एस. लोकांची इन्व्हॉल्वमेंट नावाचा प्रकार अस्तित्वात असतो का नाही? ते एक असो. ऑफिसामधल्या बहुतांश स्त्रीवर्गाला एकचं काम आहे ते म्हणजे जयबाळावर त्याच्या बायकोसमोर लाईन मारणं. ती कोण उद्धट महामाया आहे त्या ऑफिसमधे ती अगदी नेटाने हात धुवुन पाठीमागे लागलेली असते. उरलेल्या बायका स्त्रीधर्माला अनुसरुन एकमेकींची खोटी कौतुकं करणं, रेसिप्या शेअर करणं, दिवाळीचा फराळ घेउन येउन कौतुकं करुन घेणं वगैरे प्रकार करत असतो. त्या ऑफिसमधे एक खत्रुड नवरे मॅनेजर आहे त्याला कोणी हिंग लाउन विचारत नाही. तो येउन तोंड जमेलं तेव्हडं वाकडं करुन कामं करा म्हणुन ओरडायला लागला की त्याला "कोणीही यावं आणि टिचकी मारुन जावे" उक्तीने फाट्यावर मारतात आणि आपापल्या टैमपास कामांमधे गुंततात. ते पु.लंच्या असा मी असामी मधे "आमची बेनसन जानसन कंपनी कोणीही काम नं करता कशी चालते" ह्या वाक्याचा तंतोतंत प्रत्यय येथे येतो. आता हे हापिसातल्या कर्मचार्‍यांचं कौतुक झालं. आता बॉसकडे वळु या. ह्या ऑफिसमधल्या खत्रुड बॉसची तीन महत्त्वाची कामं म्हणजे आदितीचं तोंड फाटेपर्यंत कौतुक करणं. एक दिवसा आड जयला शिव्या घालणं आणि कौतुक करणं. आणि तिसरं महत्त्वाचं काम म्हणजे हापिसामधे येणं. जय आदितीचे पेइंग गेस्ट वाले काका काकु म्हणजे थेट भगवंताचे व्यवहारी अवतार हो. काकांचं महत्त्वाचं काम म्हणजे जय आदितीला टोमणे मारणं, त्यांच्याकडुन महिन्याचं भाडं वसुल करणं आणि काकुंवर डाफरणं. त्याबदल्यात ते जयच्या पिताश्रींचा फुकट सांभाळ करतात म्हणे. जयच्या वहिनीचं वागणं अगदी कधी कधी त्या जान्हवीच्या आईला लाजवेल एवढं अप्पलपोटं असतं. असो. अजुन पर्यंत तरी सौभाग्यवतीचा एपिसोड पाहिलेला नाही त्यामुळे नो कमेंट्स. एकच अपेक्षा वैभव मांगले ला वाया घालवलेला नसेल. झी मराठी वरच्या ह्या सगळ्या काळ्या ढगांमधे सोन्याची किनार असावे असे दोन शो नक्की आहेत. ते म्हणजे चला हवा येउ द्या आणि दिल दोस्ती दुनियादारी. चला हवा येउ द्या ची सगळी टिम अत्रंगी धमाल करत असते सेटवर. काहीवेळा एपिसोड पाणचट असतात. पण किमानपक्षी वरच्या तद्दन भिकार आणि टाकाउ सिरिअल्स पेक्षा बरेचं बरे असतात सगळे एपिसोड. भाउ कदम, भारत गणेशपुरे, सागर कारंडे, कुशल बद्रिके, मानसी नाईक, श्रेया बुगडे वगैरे अत्रंग्यांना सांभाळणारा डॉ.निलेश साबळे ह्यांना सगळ्यांना अगदी मनापासुन अभिनंदन. दिल दोस्ती दुनियादारी पण भन्नाट सिरियल आहे. F.R.I.E.N.D.S. चं मेलोव्ड डाउन वर्जन म्हणुन मी दि.दो.दु. कडे मोठ्या अपेक्षेने पहातोय. फ्रेंड्स मधले एपिसोड्स त्यांच्या कल्पना एज रेटींग आणि कुपमंडुक वृत्तीमुळे जसेच्या तसे भारतीय प्रेक्षकांपर्यंत पोचु शकणार नाहित. पण तरीही ही सिरियल नक्की आवडते. जोई, चँडलर, रॉस, मोनिका, रेचल, फिबी ची भारतीयं रुपं पाहुन बरं वाटतं. कधी वेळ मिळाला तर बघायला नक्की आवडते. झी मराठीने कृपया टुकार मालिका काढणं सोडुन अश्या दोन सिरिअल्स सारख्या सिर्यल्स काढाव्या हि सिर्यस विनंती. बाकी जान्हवीला डिलिव्हरीच्या शुभेच्छा.
  • Log in or register to post comments
  • 35233 views

प्रतिक्रिया

Submitted by अत्रुप्त आत्मा on Sun, 11/15/2015 - 05:56

In reply to ही: ही: ही: by एस

Permalink

जय मल्हार!

जय मल्हार! Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by अजया on Sun, 11/15/2015 - 08:00

Permalink

भारी लिवलंय!!

भारी लिवलंय!! सध्या सुट्टीवर आल्याने टीव्ही लावला जातोय.मध्ये एक दिवस सहा सासूवाली मालिका बघितली!!! परत हात लावला नाही टिव्हीला. न संपणारी वाचायच्या पुस्तकांची यादी असताना टिव्हीची वेळच येत नाही हे सुदैवच म्हणायचे!!
  • Log in or register to post comments

Submitted by अभिजीत अवलिया on Sun, 11/15/2015 - 20:41

Permalink

वाक्यावाक्याशी सहमत आहे

वाक्यावाक्याशी सहमत आहे कॅप्टन !!!
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on Mon, 11/16/2015 - 07:47

Permalink

हा धागा मिसला होता. छान

हा धागा मिसला होता. छान लिहिलय. त्या बानूचं आणि खंडेरायाचं लग्नं होणार आहे ना? की झालं? श्री आणि जानवीजोडाला वर्षभरात पाह्यलेलं नाही. नुसत्याच बाळंतपणाच्या वावड्या उठतायत. चुकून जय आणि अदिती असलेली शिरियल लावली गेली. पहिला भाग पाहिला, मग मधलाच कुठलातरी, ज्यात जावेच्या घराची वास्तूशांत असते. मग त्यातल्यात्यात शेवटचा भाग पाहिला. ष्टोरीत काही फरक वाटतच नाहीये. अदिती ही भयंकर सोशल दाखवलिये...............म्हणजे सोसणारी! हे असलं काही दाखवण्यापेक्षा खडतर प्रसंगातून ते दोघेही घरी व हापिसात कशी वाट काढतात हे दाखवायला हवं असं वाटलं. जौ दे! काय करायचं ते करा म्हणावं.
  • Log in or register to post comments

Submitted by Sanjay Uwach on Mon, 11/16/2015 - 11:44

Permalink

कांही कांही मालिकांची सुरूवात

कांही कांही मालिकांची सुरूवात फार चांगली असते. घरातील सर्व मंडळी कधी वेळ होते याची आतुरतेने वाट पहात असतात,नंतर नंतर त्यातील उत्कंठतेचा भाग संपल्यावर वास्तविक मालिका संपायला हवी ,असे न होता निर्माते त्यात रोज एक अनावश्यक धागे घुसडून ती मालिका इतकी कंटाळवाणी करतात की पहाणारा टीव्ही बंद करून टाकतो, एखादी कथा सुरू झाल्या नंतर त्याला कांहीतरी योग्य शेवट हा हवाच.
  • Log in or register to post comments

Submitted by तुडतुडी on Mon, 11/16/2015 - 20:30

Permalink

@DEADPOOL . केवळ लाखो लोक

@DEADPOOL . केवळ लाखो लोक जेजुरीला जातात ह्यावरून खंडोबाच देवत्व सिद्ध होत नाहीत . लाखो लोक आजपर्यंत कोल्हापूरच्या अंबाबाई ला विष्णुपत्नी लक्ष्मी समजत होते . आता त्याची आई समजतात . माझं म्हणणं खोडून काढण्यासाठी काही शास्त्रीय आधार देत येत असेल तर बघा . मी चुकीचं बोलत असेल पण महात्मा बसवेश्वर , चक्रधर स्वामी , एकनाथ महाराज पण खोट बोलतील का हो ? ह्याच विषयावर नुकताच १ धागा आला होता . त्यावरचे प्रतिसाद वाचावेत .
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Tue, 11/17/2015 - 12:10

In reply to @DEADPOOL . केवळ लाखो लोक by तुडतुडी

Permalink

लाखो लोक आजपर्यंत

लाखो लोक आजपर्यंत कोल्हापूरच्या अंबाबाई ला विष्णुपत्नी लक्ष्मी समजत होते . आता त्याची आई समजतात .
हे कधी सिद्ध झाले म्हणे?
  • Log in or register to post comments

Submitted by चांदणे संदीप on Tue, 11/17/2015 - 12:25

In reply to लाखो लोक आजपर्यंत by बॅटमॅन

Permalink

Mon, 16/11/2015 - 20:30

Mon, 16/11/2015 - 20:30
  • Log in or register to post comments

Submitted by संदीप डांगे on Sat, 11/21/2015 - 09:51

In reply to Mon, 16/11/2015 - 20:30 by चांदणे संदीप

Permalink

ख्या ख्या ख्या.... =)) =)) =)

ख्या ख्या ख्या.... =)) =)) =))
  • Log in or register to post comments

Submitted by यशोधरा on Tue, 11/17/2015 - 14:42

In reply to @DEADPOOL . केवळ लाखो लोक by तुडतुडी

Permalink

हे काय नवीन?

हे काय नवीन?
  • Log in or register to post comments

Submitted by DEADPOOL on Sat, 11/21/2015 - 20:41

In reply to @DEADPOOL . केवळ लाखो लोक by तुडतुडी

Permalink

सॉरी

सॉरी पण तुम्ही मूर्खपणाचा कळस गाठता आहात! लक्ष्मी विष्णूची आई? हळू बोला!!!!
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीरंग_जोशी on Mon, 11/16/2015 - 23:07

Permalink

क लिवलय क लिवलय

क लिवलय क लिवलय. कर्मधर्मसंयोगाने या सर्व मालिकांपैकी एकही कधीच पाहिली नसल्याने बरेच संदर्भ कळले नाहीत...
  • Log in or register to post comments

Submitted by अन्नू on Fri, 11/20/2015 - 14:53

In reply to क लिवलय क लिवलय by श्रीरंग_जोशी

Permalink

काय?

एकही मालिका पाहिली नाही??? पुण्यवान आहात.
  • Log in or register to post comments

Submitted by कपिलमुनी on Tue, 11/17/2015 - 14:33

Permalink

कोकणस्थी शिव्या शाप

कोकणस्थ ब्राह्मणी आडनाव लावलेली त्याची आई एवढे शिव्याशाप देताना
कोब्रांनी शिव्या दिल्या तर एवढे काय रे मनाल लावून घ्यायचे ?
  • Log in or register to post comments

Submitted by संदीप डांगे on Sat, 11/21/2015 - 09:51

Permalink

चिमणराव, लेख झक्कास. :-)

चिमणराव, लेख झक्कास. :-)
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com