Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by मुक्त विहारि on Wed, 09/16/2015 - 15:17
लेखनविषय (Tags)
धोरण
मांडणी
वावर
संस्कृती
कला
नृत्य
नाट्य
संगीत
धर्म
पाकक्रिया
इतिहास
वाङ्मय
कथा
बालकथा
कविता
चारोळ्या
प्रेमकाव्य
बालगीत
मुक्तक
विडंबन
गझल
भाषा
उखाणे
प्रतिशब्द
म्हणी
वाक्प्रचार
व्याकरण
व्युत्पत्ती
शब्दक्रीडा
शब्दार्थ
शुद्धलेखन
सुभाषिते
विनोद
साहित्यिक
समाज
जीवनमान
तंत्र
kathaa
राहणी
औषधोपचार
प्रवास
भूगोल
देशांतर
राहती जागा
नोकरी
विज्ञान
क्रीडा
अर्थकारण
अर्थव्यवहार
गुंतवणूक
ज्योतिष
फलज्योतिष
सामुद्रिक
कृष्णमुर्ती
राशी
राजकारण
शिक्षण
मौजमजा
चित्रपट
छायाचित्रण
रेखाटन
स्थिरचित्र
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
विचार
प्रतिसाद
सद्भावना
शुभेच्छा
अभिनंदन
प्रतिक्रिया
आस्वाद
समीक्षा
माध्यमवेध
लेख
बातमी
अनुभव
मत
शिफारस
सल्ला
माहिती
संदर्भ
चौकशी
प्रश्नोत्तरे
मदत
वाद
प्रतिभा
भाषांतर
विरंगुळा
डिस्क्लेमर : मला फोटो काढता येत नसल्याने मी फोटो काढत नाही. परवा ठरल्याप्रमाणे, कालचा "३८-बँकॉक-स्ट्रीट-घोडबंदर रोड ठाणे कट्टा" सुरळित पार पडला. मी आणि सौ.मुवि, कळव्याला, मि.ट्का, ह्याच्या कडे गेलो. टका आणि मोदक, मुंबईच्या वाहतूकीमुळे थोडे उशीराच आले. मग टकाच्या गाडीतून कट्ट्याच्या ठिकाणी रवाना झालो. कळवा ते घोडबंदर हा प्रवास मजल-दरमजल करत गाठला.सुदैवाने टकाच्या मातोश्रींनी वाटेत खायला म्हणून काजू दिले होते.आनच्या सौ.ने आणि मि.मोदक ह्यांनी काजू खात-खातच प्रवास पुर्ण केला. मी आणि टका मात्र गप्पा-गोष्टी करण्यात दंग होतो. मोदक नुकतेच पुण्याहून आले असल्याने, उगाच पुणे विरुद्ध इतर असा वाद-विवाद न काढायचे ठरवले. कट्ट्याच्या मुक्कामावर पोहेचताच, मि.माप आणि सौ.माप ह्यांनी स्वागत केले. वाहतूकीच्या बोजवार्‍यामुळे उशीर झाला, अशी कारणमीमांसा त्यांना दिली. हॉटेल जवळ-पास रिकामेच होते.आता हा टका आपल्याला नक्की काय काय खायला घालतो? असे वाटले पण जातीवंत मिपाकर एकदा टेबलावर बसला की, जे काही समोर येईल ते पोटात ढकलतो. असो, मेन्यु कार्ड आधी टकाच्या ताब्यात दिले आणि आम्ही आता टका काय ओर्डर देतो? ह्याकडे कान लावून बसलो. ट्काने २-३ पदार्थांची ओर्डर दिली आणि सांगीतले की, आता तुम्ही पण ऑर्डर द्या. पदार्थ टेबलावर येईपर्यंत "माझीही शँपेन" आणि "सुबोध खरे" हजर झाले. गप्पा रंगत गेल्या आणि मग एक एक पदार्थांच्या मागणीला सुरुवात झाली. शेवटी मॉकटेल पिवून झाले.पण गप्पा काही संपेनात. आम्ही वेटरला विचारले की इथे अजून कितीवेळ बसले तरी चालते? वेटर म्हणाला बसा किती ही वेळ.रात्री १२ला हॉटेल बंद होणार. आता वेटनेच परवानगी दिल्याने, आम्ही अज्जुन गप्पा हाणायला लागलो. आमचा एकूण रागरंग बघून आमच्या सौ.ने "गप्पा आवरत्या घ्या" अशी खूण केली आणि मग आम्ही हॉटेल मधल्या गप्पा आवरत्या घेतल्या. टकाने गाडी सुरु करेपर्यंत रस्त्यावर परत एकदा थोड्याफार गप्पा मारल्या. टकाने आम्हाला आणि मि.मोदक ह्यांना ठाण्याला सोडले. मी आणि सौ.मुवि, डोंबोलीला आलो आणि कट्ट्याच्या आठवणी मनांत घोळवत झोपी गेलो.
  • Log in or register to post comments
  • 26941 views

प्रतिक्रिया

Submitted by सुबोध खरे on Sat, 09/19/2015 - 11:19

In reply to आज जरा बायको मुलांबरोबर वेळ घालवतो... by मुक्त विहारि

Permalink

पण कट्टा न करताच झाला, असे

पण कट्टा न करताच झाला, असे सांगणार नाही. उलट कट्टा झाला तरी एक वेळ सांगणार नाही पण पण कट्टा न करताच झाला, असे कधीच सांगणार नाही असे हवे.
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Sat, 09/19/2015 - 11:30

In reply to पण कट्टा न करताच झाला, असे by सुबोध खरे

Permalink

येस यु आर राईट्ट....

तेस यु आर राइट्ट.
  • Log in or register to post comments

Submitted by होबासराव on Fri, 09/18/2015 - 21:21

Permalink

कट्टयासाठी काही पण;)

:))
  • Log in or register to post comments

Submitted by सूड on Fri, 09/18/2015 - 22:21

Permalink

कट्ट्याचं ठिकाण अंमळ हिरवट

कट्ट्याचं ठिकाण अंमळ हिरवट दिसतंय!!
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Fri, 09/18/2015 - 23:02

In reply to कट्ट्याचं ठिकाण अंमळ हिरवट by सूड

Permalink

कट्ट्याचं ठिकाण अंमळ हिरवट दिसतंय!!

तू गप राव रे. (मनोगत : हा "सूड" पक्का पुणेकर दिसतोय.कध्धी कध्धी म्हणून कौतूक करणार नाही.)
  • Log in or register to post comments

Submitted by कॅप्टन जॅक स्पॅरो on Sat, 09/19/2015 - 09:19

In reply to कट्ट्याचं ठिकाण अंमळ हिरवट by सूड

Permalink

अत्यंत तोकडा वृत्तांत

अत्यंत तोकडा वृत्तांत लिहिल्याबद्दल मिपाकट्ट्प्पा मुविंचा णिषेध!! (बाहुबली) कॅजॅस्पॅ!!
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Sat, 09/19/2015 - 09:34

In reply to अत्यंत तोकडा वृत्तांत by कॅप्टन जॅक स्पॅरो

Permalink

मुविंचा णिषेध!!

णिषेध स्वीकारण्यात आला आहे. खर्‍या मिपाकरांच्या मताचा, आम्ही नेहमीच आदर करतो. (फूल्ल बॉटल लेमनवॉटरच्या नशेत, फुकाचा गहनविचार करून, उद्दाम पणे नाना डू-आय-डी, घेणार्‍या, अवतारी सोंगांपेक्षा, परखड पणे साब्दिक आसूड ओढणारे आणि निखालस प्रेम करणारे, खरे मिपाकर, आम्हाला तरी नेहमीच आदरणीय)
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on Sat, 09/19/2015 - 11:58

Permalink

कट्ट्याला जायचे कि नाही हे

कट्ट्याला जायचे कि नाही हे येणाऱ्या रुग्णांवर अवलंबून होते त्यामुळे शेवटपर्यंत मी येणार आहे हे सांगितले नव्हते. शेवटी रुग्णांनी कृपा केल्याने साडे आठ ला दवाखाना बंद करून मामलेदारांना व्यनी पाठवला (२०.३६ वा) कि निघतो आहे. तेवढ्यात एका डॉक्टरचा फोन आला कि एक रुग्ण पाठवायचा आहे. मी विचारले तातडीचा आहे का? ते नाही म्हणाल्यावर मी उद्या पाठवा सांगून निःश्वास सोडला. घाईघाईने मोटारसायकल काढून अर्ध्या तासात स्थानापन्न झालो. वेगवेगळे थाय पदार्थ टक्याने मागवले होते. नवे विचारली काही तरी विचित्र नावे होती . आपण आंबे खावे, कोयी मोजण्यात काय हशील आहे या विचाराने नवे लक्षात ठेवण्याचे कष्ट घेतले नाहीत. तोंड दोन्ही कारणांनी चालू होते( बडबड आणी खाणे). पदार्थ येत गेले आणी आम्ही खात गेलो. TOM YUM आणी KHOU SUEY अशी सुपची नावे होती JAVA LOTUS STEM, VIETNAMESE SUMMER ROLL, KUNG PAO COTTAGE CHEESE, KATSU SHITAKE MUSHROOM, EXOTIC VEGETABLES WITH BLACK BEAN SAUCE हे STARTERS HOTE. यात भरपूर पोट भरले त्यामुळे फक्त भाताचे पदार्थ घ्यावे यात एकमत झाले आणि KHAO PHAD KRAPAO, NESI LEMAK आणी KHAO PHAT CHE असे तीन भाताचे प्रकार खाऊन पोट भरण्यात आले. यानंतर वर म्हटल्या प्रमाणे तीन तर्हेची मॉकटेल ( एका वर एक फुकट ) म्हणजे सहा ग्लास पिऊन पोटातील उरली सुरली जागा व्यापून बंद करण्यात आली. त्यामुळे वर आईस क्रीम खाण्याचा बेत रद्द करण्यात आला. ज्यांनी कट्टा हुकवला त्यांचे बडीशेप आणी ओवा देऊन सांत्वन करण्यात येत आहे. ज्यांना जळजळ होत आहे त्यांनी त्रिफळा चूर्ण खाऊन आपला उदारागनी शांत करावा असा ( मोफत) सल्ला देण्यात येत आहे. चला मुवि पुढच्या कट्ट्याच्या तयारीला लागू या.
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Sat, 09/19/2015 - 12:07

In reply to कट्ट्याला जायचे कि नाही हे by सुबोध खरे

Permalink

चला मुवि, , पुढच्या कट्ट्याच्या तयारीला लागू या.

पुढच्या कट्ट्याची प्रात्थमिक आखणी झाली आहे. उत्सवमुर्तींना वेळ मिळाला की, ते म्हणतील तिथे आणि ते म्हणतील त्या वेळेला आणि तारखेला कट्टा करायचे ठरले आहे. कट्याची रीतसर घोषणा होईलच.
  • Log in or register to post comments

Submitted by भाते on Sat, 09/19/2015 - 22:44

In reply to चला मुवि, , पुढच्या कट्ट्याच्या तयारीला लागू या. by मुक्त विहारि

Permalink

एक विनंती

कृपया कट्टा सोमवार ते गुरुवार या दिवशी न ठेवता सुट्टीच्या दिवशी / शुक्रवारी किंवा विकांताला ठेवावा म्हणजे कट्टयाचा सदेह आनंद घेता येईल. कट्टा हुकल्यामुळे कट्टा वृत्तांत वाचुन आणि फोटो बघुन समाधान मानावे लागते. माझ्या विनंतीची दखल घेतली जाईल याची खात्री आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on Sat, 09/19/2015 - 12:01

Permalink

ता क -- खवय्यांनी लिहिलेली

ता क -- खवय्यांनी लिहिलेली नावे गुगल करून पहावी( स्वतःच्या जबाबदारी वर). म्हणजे काय पदार्थ आहेत आणी कसे करावे त्याची कृती आणी फोटो सापडतील. जळजळ आणी चिडचिड झाल्यास कट्टेकरी जबाबदार नाहीत.
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com