✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

३८-बँकॉक-स्ट्रीट-घोडबंदर रोड ठाणे कट्टा----वृत्तांत.......

म
मुक्त विहारि यांनी
Wed, 09/16/2015 - 15:17  ·  लेख
लेख
डिस्क्लेमर : मला फोटो काढता येत नसल्याने मी फोटो काढत नाही. परवा ठरल्याप्रमाणे, कालचा "३८-बँकॉक-स्ट्रीट-घोडबंदर रोड ठाणे कट्टा" सुरळित पार पडला. मी आणि सौ.मुवि, कळव्याला, मि.ट्का, ह्याच्या कडे गेलो. टका आणि मोदक, मुंबईच्या वाहतूकीमुळे थोडे उशीराच आले. मग टकाच्या गाडीतून कट्ट्याच्या ठिकाणी रवाना झालो. कळवा ते घोडबंदर हा प्रवास मजल-दरमजल करत गाठला.सुदैवाने टकाच्या मातोश्रींनी वाटेत खायला म्हणून काजू दिले होते.आनच्या सौ.ने आणि मि.मोदक ह्यांनी काजू खात-खातच प्रवास पुर्ण केला. मी आणि टका मात्र गप्पा-गोष्टी करण्यात दंग होतो. मोदक नुकतेच पुण्याहून आले असल्याने, उगाच पुणे विरुद्ध इतर असा वाद-विवाद न काढायचे ठरवले. कट्ट्याच्या मुक्कामावर पोहेचताच, मि.माप आणि सौ.माप ह्यांनी स्वागत केले. वाहतूकीच्या बोजवार्‍यामुळे उशीर झाला, अशी कारणमीमांसा त्यांना दिली. हॉटेल जवळ-पास रिकामेच होते.आता हा टका आपल्याला नक्की काय काय खायला घालतो? असे वाटले पण जातीवंत मिपाकर एकदा टेबलावर बसला की, जे काही समोर येईल ते पोटात ढकलतो. असो, मेन्यु कार्ड आधी टकाच्या ताब्यात दिले आणि आम्ही आता टका काय ओर्डर देतो? ह्याकडे कान लावून बसलो. ट्काने २-३ पदार्थांची ओर्डर दिली आणि सांगीतले की, आता तुम्ही पण ऑर्डर द्या. पदार्थ टेबलावर येईपर्यंत "माझीही शँपेन" आणि "सुबोध खरे" हजर झाले. गप्पा रंगत गेल्या आणि मग एक एक पदार्थांच्या मागणीला सुरुवात झाली. शेवटी मॉकटेल पिवून झाले.पण गप्पा काही संपेनात. आम्ही वेटरला विचारले की इथे अजून कितीवेळ बसले तरी चालते? वेटर म्हणाला बसा किती ही वेळ.रात्री १२ला हॉटेल बंद होणार. आता वेटनेच परवानगी दिल्याने, आम्ही अज्जुन गप्पा हाणायला लागलो. आमचा एकूण रागरंग बघून आमच्या सौ.ने "गप्पा आवरत्या घ्या" अशी खूण केली आणि मग आम्ही हॉटेल मधल्या गप्पा आवरत्या घेतल्या. टकाने गाडी सुरु करेपर्यंत रस्त्यावर परत एकदा थोड्याफार गप्पा मारल्या. टकाने आम्हाला आणि मि.मोदक ह्यांना ठाण्याला सोडले. मी आणि सौ.मुवि, डोंबोलीला आलो आणि कट्ट्याच्या आठवणी मनांत घोळवत झोपी गेलो.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
धोरण
मांडणी
वावर
संस्कृती
कला
नृत्य
नाट्य
संगीत
धर्म
पाकक्रिया
इतिहास
वाङ्मय
कथा
बालकथा
कविता
चारोळ्या
प्रेमकाव्य
बालगीत
मुक्तक
विडंबन
गझल
भाषा
उखाणे
प्रतिशब्द
म्हणी
वाक्प्रचार
व्याकरण
व्युत्पत्ती
शब्दक्रीडा
शब्दार्थ
शुद्धलेखन
सुभाषिते
विनोद
साहित्यिक
समाज
जीवनमान
तंत्र
kathaa
राहणी
औषधोपचार
प्रवास
भूगोल
देशांतर
राहती जागा
नोकरी
विज्ञान
क्रीडा
अर्थकारण
अर्थव्यवहार
गुंतवणूक
ज्योतिष
फलज्योतिष
सामुद्रिक
कृष्णमुर्ती
राशी
राजकारण
शिक्षण
मौजमजा
चित्रपट
छायाचित्रण
रेखाटन
स्थिरचित्र
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
विचार
प्रतिसाद
सद्भावना
शुभेच्छा
अभिनंदन
प्रतिक्रिया
आस्वाद
समीक्षा
माध्यमवेध
लेख
बातमी
अनुभव
मत
शिफारस
सल्ला
माहिती
संदर्भ
चौकशी
प्रश्नोत्तरे
मदत
वाद
प्रतिभा
भाषांतर
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
26941 वाचन

💬 प्रतिसाद (61)

प्रतिक्रिया

मस्त

होबासराव
Wed, 09/16/2015 - 15:27 नवीन
:))
  • Log in or register to post comments

आणीबाणी मधली वृत्तपत्रं आणि

प्यारे१
Wed, 09/16/2015 - 15:32 नवीन
आणीबाणी मधली वृत्तपत्रं आणि बातम्या कशा असतील याचा थोडाफार अंदाज आला. चार उशीर, आठ गप्पा, एक गोष्ट, तीन पदार्थ, अबाउट टर्न तेज चल.
  • Log in or register to post comments

आणीबाणी मधली वृत्तपत्रं आणि बातम्या .....सहमत....

मुक्त विहारि
Wed, 09/16/2015 - 15:39 नवीन
आमच्या घरात खरोखरच आणी-बाणी आहे.... सध्या आम्ही उरलो फक्त प्रतिसादा साठी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

फारच नीरस वृत्तांत :(

मी-सौरभ
Wed, 09/16/2015 - 15:47 नवीन
आणलेलं ईनो फुकट गेले
  • Log in or register to post comments

नीरस वृतांत...सहमत....

मुक्त विहारि
Wed, 09/16/2015 - 15:53 नवीन
"ईनो फुकट गेले....." फोटो अजून बाकी आहेत.... आणि मि.मोदक, ह्यांचा प्रतिसाद देखील..... सगळेच मिपाकर फोटो कढण्यात दंग होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मी-सौरभ

हं, अगदीच सरकारी उद्घाटन

मांत्रिक
Wed, 09/16/2015 - 15:53 नवीन
हं, अगदीच सरकारी उद्घाटन कार्यक्रमाचा वृत्तांत वाटतोय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मी-सौरभ

मुवीजी तुमचा माझा प्रतीसाद

मांत्रिक
Wed, 09/16/2015 - 15:54 नवीन
मुवीजी तुमचा माझा प्रतीसाद येक्काच वेळी. अपने तो जमेगी साहब!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मांत्रिक

अपने तो जमेगी साहब!.....

मुक्त विहारि
Wed, 09/16/2015 - 16:16 नवीन
नक्कीच जमेल.... फक्त २ गोष्टी टाळल्यात तर उत्तम........ १. मला नुसतेच "मुवि" असेच म्हणा. २. कृपया "साहेब" म्हणू नका. ("जी" म्हटले की "हुच्चभृ" झाल्यासारखे वाटते आणि "साहेब" म्हटले की गुलामगिरी.मिपाकर कधीच "हुच्च" नसतो आणि कुणाचा "साहेब" पण नसतो.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मांत्रिक

हा

नाखु
Wed, 09/16/2015 - 15:50 नवीन
निव्वळ सरकारी वार्तांकन असून दुर्लक्ष्यात आले आहे !!!! संदर्भ : "सूड वचन" खंड २ भाग १
  • Log in or register to post comments

कट्टा झालाच नाय

पैसा
Wed, 09/16/2015 - 15:55 नवीन
कट्टा झालाच नाय असा सौंशय घ्यायला जागा आहे.
  • Log in or register to post comments

झालायं गं

दिपक.कुवेत
Wed, 09/16/2015 - 18:11 नवीन
याची देहि याची डोळा फोटो बघण्यात आलेले आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

फोटो आधीच कायअप्पा वर पाहिले

मदनबाण
Wed, 09/16/2015 - 16:14 नवीन
फोटो आधीच कायअप्पा वर पाहिले असल्याने कट्टा जोरदार झाल्याचे कळलेच होते,पण वॄतांत लिहण्यात मध्यवर्ती डोंबिवलीकरांनी हात आखाडता घेतल्याचे दिसते ! इ नॉय चॉल बे.... मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- || BLAZE OF GLORY ||
  • Log in or register to post comments

चटावरलं श्राद्ध उरकल्यागत

सूड
Wed, 09/16/2015 - 16:36 नवीन
चटावरलं श्राद्ध उरकल्यागत वृत्तांत!! मदनबाण फोटो बघितलेत म्हणतोय म्हणून कट्टा असावा.... ख-खो ठाण्यातला कौपीनेश्वर जाणे!!
  • Log in or register to post comments

मुळात हा कट्टा ठरला कधी

अत्रन्गि पाउस
Wed, 09/16/2015 - 16:46 नवीन
आमच्या एरियात कट्टा अन आम्हाला पत्ता नाही ?? धिक्कार आमचा !!
  • Log in or register to post comments

मुवि

दिपक.कुवेत
Wed, 09/16/2015 - 18:12 नवीन
एवढा त्रोटक व्रुत्तांत?? आपसे ये उम्मीद नहिं थी!
  • Log in or register to post comments

फोटू दिल्याशिवाय कट्टा झालाय

रेवती
Wed, 09/16/2015 - 18:21 नवीन
फोटू दिल्याशिवाय कट्टा झालाय यावर विश्वास ठेवणार नाही.
  • Log in or register to post comments

जोरदार +१ .. आनी

अत्रुप्त आत्मा
Wed, 09/16/2015 - 18:26 नवीन
जोरदार +१ .. आनी टक्कूमक्कूशोनूचा परतिसाद पन हवा धाग्याव्
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

वृत्तांत कुठे आहे? फोटु नाय

अजया
Wed, 09/16/2015 - 18:46 नवीन
वृत्तांत कुठे आहे? फोटु नाय तर कट्टा नाय!
  • Log in or register to post comments

वृत्तांत कुठे आहे? फोटु नाय तर कट्टा नाय!

मुक्त विहारि
Wed, 09/16/2015 - 19:04 नवीन
ह्याला म्हणतात, घरचा आहेर. एक तर कसे बसे बातमीपत्र टंकले आणि फोटो असलेला मोबाईल घेवून सौ.मुवि, बाहेरगावी गेल्या. आणि ज्यांच्याकडे फोटो आहेत, ते व्हॉटस अपवर गुंतलेले आहेत. आम्ही सध्या इतर आंतरजालीय साधनांचा वापर करत नसल्याने, आमचीच गोची झाली आहे. हे प्रभो, निदान पुढच्या जन्मी तरी मला बर्‍यापैकी फोटोग्राफर बनव.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया

प्रभो!!

एस
Wed, 09/16/2015 - 23:07 नवीन
प्रभोंना व्यनि करून पहा. ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

=))

अजया
गुरुवार, 09/17/2015 - 15:36 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

आवो काय हे? आकाशवाणीवरच्या

खटपट्या
Wed, 09/16/2015 - 22:00 नवीन
आवो काय हे? आकाशवाणीवरच्या बातम्या ऐकल्यासारखे वाटले...जरा मिठ मसाला येवद्या...
  • Log in or register to post comments

नाही तर काय?

नाखु
गुरुवार, 09/17/2015 - 12:18 नवीन
नको तिथं काटकसर करणार्यांचा निसेध असो निसेध असो निसेध असो !!!!

पुण्यातील कट्ट्याची नि:संदीग्ध(?) वेळ ठिकाण व या कट्ट्याचा खुमासदार वृत्तांत आलाच पाहिजे!!!

अभामिपाकट्टाकराफोटोटाकाजळवाकळवापळवामिळवाहळहळवावाचक्संघाकडून मिपाकर हितार्थ जारी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

नाखुकाकांच्या आज्ञेचे पालन

मोदक
Fri, 09/18/2015 - 12:53 नवीन
नाखुकाकांच्या आज्ञेचे पालन करीत वृत्तात देत आहे. गोड मानून घ्यावा. आज भेटू की उद्या असे ठरवता ठरवता शेवटी मंगळवारी भेटण्याचे ठरले. मुवींनी रोखठो़ख धागाही टाकला. ठरलेल्या वेळी टका भेटला आणि आणि आम्ही ठाण्याच्या ट्रॅफीकमधून मुंगीच्या गतीने टकाच्या घरी मार्गस्थ झालो, वाटेत एक शॉर्टकट मारूनही फारसा फायदा झाला नाही. तिकडेही ट्रॅफीक होतेच. या दरम्यान मुविंचे फोनवर फोन येवू लागले "आम्ही २ मिनीटात पोहोचतो आहोत", "जवळच आहोत", "पांच मिनीटात पोहोचतो आहोत" असे सांगत होतो. शेवटी एकदा "जितेंद्र आवाडच्या ऑफीस जवळ आलो आहोत" असे सांगितल्यानंतर मुविंचे फोन थांबले ;) या दरम्यान बिल्डींग नंबर आणि फ्लॅट नंबर ऐकण्यात घोळ होवून श्री व सौ मुवि वेगळ्याच बिल्डींगमध्ये एका ठिकाणी भेट देवून पुन्हा सोसायटीमध्ये येवून थांबले होते. टकाकडे पोहोचून लगेचच त्याच्या चारचाकीतून आम्ही चौघांनी कट्ट्याकडे प्रयाण केले. घरातून लगेचच बाहेर पडलो म्हणून टकाच्या मातोश्रींनी काजूचे एक पाकीट आमच्या हातावर ठेवले होते. सौ मुवि आणि मी त्याचा फन्ना उडवणे सुरू केले. ट्रॅफीकमधून वाट काढत आणि आजुबाजूच्या बेशिस्त वाहनचालकांची विचारपूस करत टका गाडी हाणत होता. यथावकाश ३८ बँकॉक स्ट्रीटवर पोहोचलो. Image removed. आजुबाजूला असलेल्या हॉटेल / दुकानांच्या तुलनेत येथे झकास हिरवा प्रकाश पसरला होता... Image removed. तेथे श्री व सौ मामलेदारच्या पंख्याची भेट झाली व आम्ही सर्वजण वरच्या मजल्यावर प्रयाण केले. डॉ. खरे, माझीही शँपेन हे दोघे येत आहेत अशी माहिती मिळाली. सुरूवात सूप पासून केली. Khou Suey सूप.. Image removed. टॉम यम सूप. Image removed. आणखी बरेच स्टार्टर्स मागवले जात होते व त्याचा फन्ना उडत होता. ऑर्डर देण्याची मुख्य जबाबदारी टकाकडे होती व तो ती जबाबदारी समर्थपणे पार पाडत होता. मात्र कोणत्या पदार्थाचे नांव काय आहे आणि नक्की कोणत्या पदार्थाची ऑर्डर दिली आहे याचा मेळ घालण्याचा टकाने अयशस्वी प्रयत्न केला व शेवटी नाद सोडून दिला. :) मुवि, माप, मी आम्ही लोक सर्वजण समोर येईल ती प्लेट रिकामी करण्यात गुंतलो होतो. एक डिश खूपच आवडली म्हणून तेथल्या बुवाला बोलावून त्याचे (पक्षी: डिशचे!) नांव विचारले असता ती डिश कमळाच्या देठांची एक डेलीकसी आहे असे कळाले. (चवीला खरोखरी स्वादिष्ट असणार्‍या त्या डिशचे नांव कोणाच्या लक्षात आहे का?) आणखी काही पदार्थांचे फटू देत आहे. नांवे विचारू नयेत. Image removed. Image removed. खाणे सुरू असतानाच मॉकटेलची टूम निघाली.. व मॉकटेल्स मागवली गेली... मँगो लिची स्मूदी.. Image removed. व्हर्जिन चॉकलेट मार्टिनी Image removed. या पेयाचे नांव महिती नाही - हे डॉ खरेंनी मागवले / त्यांना मिळाले होते. अधिक माहिती तेच सांगू शकतील. ;) Image removed. आणखी बरेच भाताचे प्रकार आणि करीचे प्रकार मागवले गेले पण त्यांची अप्रतीम चव, भूक आणि गप्पा या गडबडीत फोटो काढणे जमले नाही. हशा आणि खादाडी सोबत गप्पांचे विषय आणि आवाका बदलत होता... टकाने केलेली बँकॉक ट्रीप, प्रत्येकाचे ऑफीस, काम, पोपटी कशी करतात, राजस्थानमध्ये मिळणारे सामिष भोजन व त्याच्या स्पेशल एडीशन्स, वेगवेगळ्या राज्यांमध्ये मिळणारे वेगवेगळे खाद्यपदार्थ असा फेरफटका मारून मुवि, मी आणि डॉक्टर खरे शेवटी "क्रुड ऑईल प्रोसेसींग आणि भारताचा ऑईल रिझर्व" यावर पोहोचलो, टका, श्री व सौ माप आणि शँपेन यांचा उघड वेगळा गट पडला होता व ते कोणत्यातरी दुसर्‍या विषयांवर चर्चा करत होते. आमच्या तेलाच्या चर्चेवरून व मध्यपूर्वेतील देशांच्या उल्लेखांवरून आमच्याबाबतीत "सरहद के ऊस पार" वगैरे कमेंट्स पास केलेल्या ऐकू येत होत्या - त्या फाट्यावर मारून आमची घमासान चर्चा सुरूच होती. यादरम्यान एक कॉम्प्लीमेंटरी डेझर्ट टेबलावर आले. Image removed. शेवटी मुविंनी वेटरला बोलावून "आणखी थोडा वेळ बसले तर चालेल का?" असे विचारले व होकार मिळवला. डॉक्टरांचे वेगवेगळ्या पेशंटचे अनुभव ऐकत ऐकत कट्टा संपला. थाई, इंडोनेशीयन शाकाहारी पदार्थांचा फन्ना उडवला, भरपूर गप्पा झाल्या..! एकंदर मजा आली :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

जळतोय.

प्रभाकर पेठकर
Fri, 09/18/2015 - 13:26 नवीन
अत्तिशय जळावू लिखाण आणि छायाचित्रं. गणपतीचे दिवस असल्याकारणाने 'मोदकाला' क्षमा केली आहे. माझ्या नशिबात कांही असे चमचमीत कट्टे नाहीत ह्याची खंत जरूर आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

माझ्या नशिबात कांही असे चमचमीत कट्टे नाहीत ह्याची खंत जरूर आहे..

मुक्त विहारि
Fri, 09/18/2015 - 18:28 नवीन
दादा.... तुम्ही आता मुंबई परीसरात या तर खरं. परत एक फर्मास कट्टा करू.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती......

प्रभाकर पेठकर
Fri, 09/18/2015 - 22:06 नवीन
अरे मुवि, मी कोणाला दोष देत नाहीये. माझ्याच व्यस्त वेळापत्रकातून, मलाच वेळ मिळाला नाही. नाहितर ह्या खेपेस पुण्याचा कट्टा माझ्या घरीच करावयाचा विचार होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

पराधीन आहे जगती.....ह्या बाबत सहमत....

मुक्त विहारि
Fri, 09/18/2015 - 22:57 नवीन
पण, परत एक डाव प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे? पेचेक ह्या सिनेमातील माझे आवडते वाक्य (मुळ वाक्य वेगळे आहे.मराठी रुपांतर) ======> परत एकदा प्रयत्न करून बघू या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

अत्तिशय जळावू लिखाण आणि

अत्रुप्त आत्मा
Fri, 09/18/2015 - 20:53 नवीन
अत्तिशय जळावू लिखाण आणि छायाचित्रं. गणपतीचे दिवस असल्याकारणाने 'मोदकाला' क्षमा केली आहे.
पूर्ण +++++++++++++१११११११११११११११ दू दू दू दू दू दू मोदक! :-/ ल्लुल्लुल्लुल्लुल्लु :-/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

कट्टेकर्‍यांचे फोटो

एस
Fri, 09/18/2015 - 13:47 नवीन
कट्टेकर्‍यांचे फोटो नसल्यामुळे अजूनही शंकेला वाव आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

१० पैकी

नाखु
Fri, 09/18/2015 - 14:09 नवीन
२ च्य फोटो दिसतायत एक हाटेलाचा आणी एक चोख्णळी पेयाचा त्यामुळे नाइलाजाने तितकेच मार्क द्यावे लागत आहेत. कट्टेकरी दिसेनात कुठे ते? इतक्या "चव"कशी वेळेत एक कट्टा झाला असता पिंची भागात !!!! मोदकराव पुण्यपतनी कट्ट्यास यावे. नाखु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

काकानु.. पुण्यात आल्यावर

मोदक
Fri, 09/18/2015 - 16:15 नवीन
काकानु.. पुण्यात आल्यावर फोनवा. एक नवीन आईसक्रीम पार्लर सापडले आहे. आपल्यासमोर आईसक्रीम "तयार करून" देतात. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

हांगाश्शी!

बोका-ए-आझम
Fri, 09/18/2015 - 15:11 नवीन
इसको कहते है कट्टा! पण कट्टेक-यांचे फटू कुठे सांडले? Xxx नेमका त्यादिवशी वेस्टर्न रेल्वेचा पाय घसरला आणि मग फोन पण बंद झाला. म्हणून अस्मादिक सूप आणि करी रेमटवायला येऊ शकले नाहीत. नाहीतर मुखिया बिहारींचे आमंत्रण मिळाले होते. असो. पुढच्या वेळी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

मोदकभौ

बोका-ए-आझम
Fri, 09/18/2015 - 15:57 नवीन
त्या डिशचं नाव Java Lotus Stems. मस्त लागतो. गळ्याला अंमळ खवखवतो पण.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

भारी प्रकार होता.. आणखी एकदा

मोदक
Fri, 09/18/2015 - 16:07 नवीन
भारी प्रकार होता.. आणखी एकदा घसा खवखवला तरी चालेल. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

खवखवले म्हणजे अळूची देठे

कवितानागेश
Sat, 09/19/2015 - 14:08 नवीन
खवखवले म्हणजे अळूची देठे घातली असणार भेसळ म्हणून! :प
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

ते स्ट्रॉबेरी व्हानीला कोलाडा

सुबोध खरे
Fri, 09/18/2015 - 18:16 नवीन
ते स्ट्रॉबेरी व्हानीला कोलाडा आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

फोटो का टाकले नाहीत हा सध्या

माझीही शॅम्पेन
Fri, 09/18/2015 - 21:48 नवीन
फोटो का टाकले नाहीत हा सध्या जाज्वल्य प्रश्न असला तरी आम्हा कट्टे करी मंडळी मध्ये एक raw चा undercover agent असल्यामुळे राष्ट्रीय गुपित असल्या मुळे फोटो शकलो नाही … असो खर तर कट्टा हुकणार होता म्हणून खंत वाटावी अशी स्थिती निर्माण व्हायच्या आत बॉस ने परवानगी दिली आणि सुसाट ४ उड्डाण पूल गाठून ३८-बँकॉक-स्ट्रीट-घोडबंदर रोड ठाणे येथे १२ मिनिटात हजर झालो (कोण रे ते ठाण्यास ट्राफिक मुळे बदनाम करतंय ) मोदकाची भेट खरतर दारा कट्टा येथे शेकडो वर्षा-पूर्वी झाली होती , एकटा पुणेकर सहसा तावडीत सापडत नाही पण पुन्हा येतोय म्हटल्यानंतर साधी साधली. मी चक्क शेवटी पोहोचाणारा कट्टे करी नाही हे बघून जीव भांड्यात पडला घुसल्यावर श्रीमान श्रीमती माप आणि टका ह्याच्या टेबलावर स्थानापन्न झालो , एका मागो माग एक चविष्ट पदार्थ , अनेक विवादास्पद गरमा गरम विषयावर चर्चा , लय भारी mango litchi स्मूदी एकदम मज्जाच मज्जा बिल द्यायचा सुमारास टक्कू मोक्कु शोनु यांनी काही कुपन स्पॉन्सर दिले , पण नाकी किती कुपन देताय ते सांगा असं ठणकावून सांगून मोदकाने टकाला कात्रज चा घाट दाखवून पूणे करांच नाव बँकॉक मध्ये पण रोशन केल ;) तो पर्यंत ११:३० वाजुन गेले हे कळले च नाही , श्रीमती मुवी यांनी श्रीमान काही तर गुप्त इशारा करून कट्टा पुढे चालू ठेवण्याचा डावं उधळून लावला :) अश्या तर्हेने एक चांगला कट्टा केल्याच समाधान घेवून घरी परत आलो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

मुविकाका प्लीज सांगा ना

अभ्या..
Fri, 09/18/2015 - 21:53 नवीन
मुविकाका प्लीज सांगा ना ह्यांना सगळ्यांना. थोड्या वेळात मला वाटेल की बैंकॉक कट्टा म्हणजे मिपा महा संमेलन होते की काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माझीही शॅम्पेन

>>>> बैंकॉक कट्टा

प्यारे१
Fri, 09/18/2015 - 22:12 नवीन
>>>> बैंकॉक कट्टा ठाण्याचा बैंकॉक कट्टा. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

फोटो का टाकले नाहीत हा सध्या

कॅप्टन जॅक स्पॅरो
Sat, 09/19/2015 - 09:20 नवीन
फोटो का टाकले नाहीत हा सध्या जाज्वल्य प्रश्न असला तरी आम्हा कट्टे करी मंडळी मध्ये एक raw चा undercover agent असल्यामुळे राष्ट्रीय गुपित असल्या मुळे फोटो शकलो नाही …
तो जो एजंट आहे ना त्याला एकदा पुण्याच्या कट्ट्याला कोपर्‍यात घ्यायचा आहे. सद्ध्या वेळ मिळत नाही त्याला पण :/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माझीही शॅम्पेन

धनकवडी IBM वाला तोच ना रे? ;)

मोदक
Sat, 09/19/2015 - 11:22 नवीन
धनकवडी IBM वाला तोच ना रे? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

मुवि फोटो ????

होबासराव
गुरुवार, 09/17/2015 - 15:40 नवीन
कब कब आयेंगे फोटो
  • Log in or register to post comments

खुशखबर.... खुशखबर.......

अभ्या..
Fri, 09/18/2015 - 19:18 नवीन
खुशखबर.... खुशखबर....... खुशखबर............... ज्यांना कुणाला कट्ट्याला यायची ईच्छा असते पण जमत नाही, आपले नाव अन चित्र झळकावे अशी ईच्छा असलेल्याणी मला तुमचे स्वतःचे काहीही खाताना, कुठल्याही कपड्यात असे फोटो पाठवून द्यावेत. मी हव्या त्या ठिकाणी त्यांचा कट्टा फोटोशॉपमध्ये तयार करुन देईन. (कुणीही भेसळ ओळखू शकणार नाही याची ग्यारन्टी) एका कट्ट्याचे तीन चार फोटो तरी देईन. एका कट्ट्याच्या फोटोवर ४ सदस्य ओळखपरेड फोटो फ्री फ्री फ्री. त्वरा करा. ऑफर मोजक्याच कालावधीसाठी. (व्रूतांताचे चार्ज वेगळे पडतील.)
  • Log in or register to post comments

(व्रूतांताचे चार्ज वेगळे पडतील.)

मुक्त विहारि
Fri, 09/18/2015 - 19:23 नवीन
उगाच पैशे खर्च करू नका. आम्ही बातमीपत्र लिहायला नुकतीच सुरुवात केली आहे. आम्ही बातमी-पत्रे प्रकाशित करू.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

आपल्या (न झालेल्या) कट्टयाचे

प्यारे१
Fri, 09/18/2015 - 19:31 नवीन
आपल्या (न झालेल्या) कट्टयाचे फ़ोटो आणि वृत्तांत टाक की! 'पहले इस्तेमाल फिर विश्वास' असं होईल म्हणजे. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

सावधान.

प्रभाकर पेठकर
Fri, 09/18/2015 - 22:10 नवीन
ह्या प्रतिसादामुळे 'आपण हजर असू तोच खरा कट्टा' बाकी सगळे 'फोटोशॉप' असा समज दृढ होण्यास बराच वाव आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

यात कट्टेकर्यांचा फोटु

अजया
Fri, 09/18/2015 - 21:00 नवीन
यात कट्टेकर्यांचा फोटु नसल्याने हे हाटेलाचे फोटो कट्टयाचे म्हणून खपवले असल्याचा संशय घेतल्या गेला आहे !! काय मुवि! कट्टयासाठी काही पण;)
  • Log in or register to post comments

तुमचं नेटवर्क 'लै वीक'

प्यारे१
Fri, 09/18/2015 - 21:27 नवीन
तुमचं नेटवर्क 'लै वीक' झाल्याची शंका घ्यायला वाव निर्माण झालेला आहे...! कट्टयासाठी कैच्या कै. :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया

आज जरा बायको मुलांबरोबर वेळ घालवतो...

मुक्त विहारि
Fri, 09/18/2015 - 22:59 नवीन
उद्या आमच्या सौ.च्या मोबाइल मधले फोटो टाकतो. आम्ही कट्ट्यासाठी काही पण करू. पण कट्टा न करताच झाला, असे सांगणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा