३८-बँकॉक-स्ट्रीट-घोडबंदर रोड ठाणे कट्टा----वृत्तांत.......
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
डिस्क्लेमर : मला फोटो काढता येत नसल्याने मी फोटो काढत नाही.
परवा ठरल्याप्रमाणे, कालचा "३८-बँकॉक-स्ट्रीट-घोडबंदर रोड ठाणे कट्टा" सुरळित पार पडला.
मी आणि सौ.मुवि, कळव्याला, मि.ट्का, ह्याच्या कडे गेलो.
टका आणि मोदक, मुंबईच्या वाहतूकीमुळे थोडे उशीराच आले.
मग टकाच्या गाडीतून कट्ट्याच्या ठिकाणी रवाना झालो.
कळवा ते घोडबंदर हा प्रवास मजल-दरमजल करत गाठला.सुदैवाने टकाच्या मातोश्रींनी वाटेत खायला म्हणून काजू दिले होते.आनच्या सौ.ने आणि मि.मोदक ह्यांनी काजू खात-खातच प्रवास पुर्ण केला.
मी आणि टका मात्र गप्पा-गोष्टी करण्यात दंग होतो.
मोदक नुकतेच पुण्याहून आले असल्याने, उगाच पुणे विरुद्ध इतर असा वाद-विवाद न काढायचे ठरवले.
कट्ट्याच्या मुक्कामावर पोहेचताच, मि.माप आणि सौ.माप ह्यांनी स्वागत केले.
वाहतूकीच्या बोजवार्यामुळे उशीर झाला, अशी कारणमीमांसा त्यांना दिली.
हॉटेल जवळ-पास रिकामेच होते.आता हा टका आपल्याला नक्की काय काय खायला घालतो? असे वाटले पण जातीवंत मिपाकर एकदा टेबलावर बसला की, जे काही समोर येईल ते पोटात ढकलतो.
असो,
मेन्यु कार्ड आधी टकाच्या ताब्यात दिले आणि आम्ही आता टका काय ओर्डर देतो? ह्याकडे कान लावून बसलो.
ट्काने २-३ पदार्थांची ओर्डर दिली आणि सांगीतले की, आता तुम्ही पण ऑर्डर द्या.
पदार्थ टेबलावर येईपर्यंत "माझीही शँपेन" आणि "सुबोध खरे" हजर झाले.
गप्पा रंगत गेल्या आणि मग एक एक पदार्थांच्या मागणीला सुरुवात झाली.
शेवटी मॉकटेल पिवून झाले.पण गप्पा काही संपेनात.
आम्ही वेटरला विचारले की इथे अजून कितीवेळ बसले तरी चालते?
वेटर म्हणाला बसा किती ही वेळ.रात्री १२ला हॉटेल बंद होणार.
आता वेटनेच परवानगी दिल्याने, आम्ही अज्जुन गप्पा हाणायला लागलो.
आमचा एकूण रागरंग बघून आमच्या सौ.ने "गप्पा आवरत्या घ्या" अशी खूण केली आणि मग आम्ही हॉटेल मधल्या गप्पा आवरत्या घेतल्या.
टकाने गाडी सुरु करेपर्यंत रस्त्यावर परत एकदा थोड्याफार गप्पा मारल्या.
टकाने आम्हाला आणि मि.मोदक ह्यांना ठाण्याला सोडले.
मी आणि सौ.मुवि, डोंबोलीला आलो आणि कट्ट्याच्या आठवणी मनांत घोळवत झोपी गेलो.
प्रतिक्रिया
पण कट्टा न करताच झाला, असे
येस यु आर राईट्ट....
कट्टयासाठी काही पण;)
कट्ट्याचं ठिकाण अंमळ हिरवट
कट्ट्याचं ठिकाण अंमळ हिरवट दिसतंय!!
अत्यंत तोकडा वृत्तांत
मुविंचा णिषेध!!
कट्ट्याला जायचे कि नाही हे
चला मुवि, , पुढच्या कट्ट्याच्या तयारीला लागू या.
एक विनंती
ता क -- खवय्यांनी लिहिलेली
Pagination