चित्रपट

छपाकसे पेहेचान ले गया...

शा वि कु's picture
शा वि कु in जनातलं, मनातलं
13 Jan 2020 - 10:00 pm

दीपिकाच्या जेएनयु वारी मुळे मोकळ्या थिएटरची अपेक्षा होती. आणि अपेक्षेप्रमाणे तिकीटघरापाशी तानाजीसाठी हिssss मोठ्ठी रांग, आणि छपाक साठी अगदी तुरळक लोग. पण खुर्च्यांमध्ये स्थानापन्न झाल्यावर हळूहळू गर्दी वाढली. सिनेमाच्या पहिल्या पाच मिनिटांमध्ये थिएटर सम्पूर्ण भरलं. अगदी बरं वाटलं.
हा सिनेमा पाहायचा हे तर सिनेमा जाहीर झाल्यावरच ठरवलेलं, बऱ्याच कारणांमुळे-

1) मेघना गुलजार- मेघना गुलजार ही अगदी आवडती दिग्दर्शिका. तलवार भयानक म्हणजे भयानक आवडला होता. राझी तलवार इतका नाही आवडला, पण तरी दिगदर्शिकेवरचा विश्वास तसाच टिकून राहिला.

चित्रपटविचारप्रतिसादप्रतिक्रियाआस्वादसमीक्षामाध्यमवेधमतशिफारस

पानिपत चित्रपट परीक्षण: सोपी करून सांगितलेली गुंतागुंतीची कथा!!

निमिष सोनार's picture
निमिष सोनार in जनातलं, मनातलं
8 Dec 2019 - 8:37 pm

माझे हे परीक्षण वाचण्याआधी महत्वाची सूचना:

चित्रपटसमीक्षा

चित्रपट परीक्षण/रिव्यू : फत्तेशिकस्त : दमदार सर्जिकल स्ट्राइक

bhagwatblog's picture
bhagwatblog in जनातलं, मनातलं
19 Nov 2019 - 4:58 pm

“शिवरायांचे आठवावे रूप । शिवरायांचा आठवावा प्रताप ॥ शिवरायांचा आठवावा साक्षेप । भूमंडळीं ॥१६॥ शिवरायांचे कैसें चालणें । शिवरायाचें कैसें बोलणे॥ शिवरायचे सलगी देणें । कैसे असें ॥“ शिवराया बद्दल कितीही पुस्तके लिहिली आणि कथा चित्रपटात दाखवल्या तर कमीच पडेल. राजांची प्रत्येक लढाई, पराक्रम, कर्तृत्व, माणसं जिंकण्याची कला, आणि बुद्धीबळातील अजोड चाली प्रमाणे खिंडीत गाठून शत्रूवर केलेली मात यावर चित्रपट निघू शकतो. राजांचे उत्तुंग कर्तृत्व आणि पराक्रम आभाळाच्या परीघा सारखा होता.

चित्रपटसमीक्षा

फत्तेशिकस्त (चित्रपट कथा आणि परीक्षण)

निमिष सोनार's picture
निमिष सोनार in जनातलं, मनातलं
16 Nov 2019 - 6:45 am

फत्तेशिकस्त मराठी चित्रपट: (कथा आणि परीक्षण)
- निमिष सोनार, पुणे

दिगपाल लांजेकरचा "फर्जंद" मी बघितला होता आणि आवडला होता. फत्तेशीकस्त येईल असे कळल्यावर तो बघायचे ठरवले होते आणि बघितला! मी चित्रपटाची कथा सांगत जातो आणि परीक्षण "चौकोनी कंसातील" वाक्यात अधून मधून येईलच!! कथा किचकट असल्याने थोडी विस्ताराने सांगतो म्हणजे हे संपूर्ण परीक्षण वाचल्यावर तुम्हाला चित्रपट समजायला सोपा जाईल.

चित्रपटसमीक्षाविरंगुळा

"पानिपत"चे ट्रेलर आणि ऐतिहासिक भूमिका

निमिष सोनार's picture
निमिष सोनार in जनातलं, मनातलं
7 Nov 2019 - 10:18 pm

सदाशिवराव पेशवेंच्या रोलसाठी आशुतोष गोवारीकरने अर्जुन कपूरला निवडून चूक केली हे "पानिपत" चे ट्रेलर पाहील्यावर बरेच जण म्हणत आहेत. अशीच काहीशी फिलिंग आशुतोषने "जोधा अकबर" मध्ये हृतिकला घेतले होते तेव्हा माझी होत होती. कहो ना प्यार हैं, धूम 2, क्रिश, कोई मिल गया यासारखे रोल करणारा हृतिक ऐतिहासिक राजाच्या भूमिकेत फिट बसेल याला माझे मन मानायला तयारच होत नव्हते, पण जोधा अकबर पाहिल्यानंतर हृतिक मला त्या भूमिकेत अतिशय योग्य वाटला. पण "मोहेंजो दडो" मात्र फ्लॉप झाला, त्यातही हृतिक ऐतिहासिक भूमिकेत होता.

चित्रपटविचारविरंगुळा

ऐसी दिवानगी..

चिनार's picture
चिनार in जनातलं, मनातलं
6 Nov 2019 - 11:49 am

परवा शाहरुखचा बड्डे होता. रात्री एका चॅनेलवर त्याचाच "दिवाना" लागला होता. मग काय.. कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बघणं सुरु केलं. (खरं कारण असंय की, आजकाल रिमोट हातात आल्यावर चॅनेल बदलण्यासाठी लेकीची वेगळी परवानगी घ्यावी लागते. ती सुद्धा महत्प्रयासाने मिळवली होती.म्हटलं दिवाना तर दिवाना पण रिमोट हातचा गेला नाही पाहिजे!)

चित्रपटविरंगुळा

हम हैं मता-ए-कूचा-ओ-बाज़ार की तरह...

समीरसूर's picture
समीरसूर in जनातलं, मनातलं
31 Oct 2019 - 2:17 pm

सहजच युट्युब चाळता चाळता एका गाण्याचे सजेशन दिसले. "हम है मता-ए-कूचा-ओ-बाजार की तरह…". उत्सुकता चाळवली. मी गाणे लावले. एका दळभद्री, अंधार्‍या खोलीमध्ये रेहाना सुलतान जमिनीवर बसून हे गाणे गात आहे. अर्थातच, ती बैठकीमध्ये धनिक-शेठ लोकांचे मनोरंजन करणारी गायिका असावी हे लक्षात येते. तिचा चेहरा अश्रूंनी भिजलेला आहे. डोळ्यांमध्ये कमालीची असहायता आहे. कमल कपूर (जो अनेक जुन्या चित्रपटांमध्ये तर होताच पण 'जो जीता वही सिकंदर'मध्येदेखील कदाचित होता) एका बाकावर बसून गाण्याचा आस्वाद घेत आहे आणि संजीव कुमार संतापाच्या आगीत होरपळून निघतोय.

संगीतचित्रपटआस्वाद

InShort 5 – Printed Rainbow (शॉर्ट-फिल्म)

मनिष's picture
मनिष in जनातलं, मनातलं
23 Oct 2019 - 11:27 am

भारतीय अ‍ॅनिमेशन मुळातच फार प्रचलित नाही, त्यातही अ‍ॅनिमेशन बनवलेच तर ते मुलांसाठीच असते असा साधारणपणे आपल्याकडे समज आहे. त्यात प्रौढांसाठी अ‍ॅनिमेशन बनवणे, तेही २००६ च्या सुमारास किती अवघड असेल ह्याची कल्पना आपण करू शकतो. 'प्रिंटेड रेनबो' ही अशीच एक मोठ्यांसाठी बनवलेली, अगदी चुकवू नये अशी तरल अ‍ॅनिमेशन फिल्म आहे.

चित्रपटआस्वाद