सध्या मी काय पाहतोय ? भाग ८
डोर... २ स्त्रियांची कहाणी. दोन वेगळ्या स्त्रिया, वेगळ्या ठिकाणी राहणार्या... एकमेकांना भेटतात कारण त्यामागे एक डोर म्हणजे बंध... हा बंध भावनांचा आणि परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या गरजेचा.नागेश कुकनुर दिग्दर्शित २००६ सालचा हा चित्रपट असुन यात श्रेयस तळपदे ने सहज आणि सुंदर अभिनय केला असुन ज्या दोन मुख्य स्त्रियांची ही कहाणी आहे, त्या भुमिका आयेशा टाकिया आणि गुल पनाग यांनी साकारल्या आहेत.