मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कविता माझी

वाऱ्यावर जसे पान

चांदणे संदीप ·
नीज भरते दिशांत माझे रिते नीजपात्र उतरूनि ये अंगणी जरी हळुवार रात्र रात्र रात्र जागते गोड स्वप्नातूनि धुंद गात राहते अबोल मौनातूनि येती कानी दुरून सूर सारंगीचे छान मन खाई हेलकावे वाऱ्यावर जसे पान पान पान जागते पाचूच्या बनातूनि शुभ्र सोनसकाळी झळाळते दवातूनि - संदीप चांदणे

व्हॅलेंटाईन दिनी

श्रीगणेशा ·
कोणे एके काळी व्हॅलेंटाईन दिनी मोठ्या उत्सुकतेने मी आणली होती साडी होती जरी साधी ती खुश मात्र झाली प्रयत्न केला खूप तिने पण नीट नेसता नाही आली गोंधळली क्षणभर हसली ती म्हणे हे ध्यान माझ्या भाळी पण गोड आठवण प्रेमाची तिने अजूनही जपून ठेवली आता एवढ्या वर्षांनी सुचतील कशा प्रेम ओळी पण मला पाहायची असते तिच्या गालावरील सुंदर खळी त्यासाठी कविता विनोदी ऐकून म्हणे अजून नाही जमली मला वाटलं कविता तिला म्हणायचं होतं साडी (सौं साठी!)

कळते जगत जाताना

चांदणे संदीप ·
लेखनविषय:
युगायुगांचे असते एकटेपण लाखोंच्या सोबतीने जगताना खोल खोल भासते आयुष्य रितेपन भरून काढताना अनामिक नात्याची वीण दिसते कधी घट्ट बसताना नकळत मग तुटते काही तिथे मनापासून गुंफताना डोळ्यादेखत ढळते, ज्यात वेचले आयुष्य रचताना हे असे घडू नये वाटते नेमके तेच घडत असताना पतंग विसरतो दाहकता पिंगा घालून जळताना आयुष्यही असते असेच कळते जगत जाताना - संदीप चांदणे

शीर्षक सुचले नाही

चांदणे संदीप ·
लेखनविषय:
झोप येईनाच आज झोप हवी असताना जांभयाच्या येती लाटा वर तारे मोजताना काय आणून वहावे निद्रादेवीच्या चरणी झोप येऊन निवांत उद्या उजाडेल झणी किती थकून भागून देह दिला पसरून डोळ्यात बाहुल्यांना काय दिसते अजून? दिसे कालचा प्रकाश अन्, तम भेसूर उद्याचे त्यांच्या मध्ये भांबावले पाऊल हळव्या झोपेचे एक मायेचा, माथ्याला हवा सांगणारा हात सोड उद्यावर, नीज खूप झाली आहे रात - संदीप भानुदास चांदणे (मंगळवार, २१/१२/२१)

मोकळ्या करा पखाली

चांदणे संदीप ·
लेखनविषय:
काव्यरस
परिणती असो वा नियती पानगळीत पाने गळती पण, झाड उन्मळून पडता हा दोष कुणाच्या माथी? बहरून सळसळणारे झाड आपुल्या ताली जमिनीवर पडते तेव्हा ना त्याला उरतो वाली कोमेजून करपून जातील कोवळी फुले त्यावरची वेळीच छाटणी करवून रूजवात करा फुटव्यांची वादळ नवे येण्यापूर्वी मोकळ्या करा पखाली रूजणाऱ्या अंकुरांना घ्या मायेच्या हाताखाली - संदीप चांदणे (मंगळवार, ११/०५/२०२१)

तिथे कोणी नि:शब्द

अनन्त्_यात्री ·
लेखनविषय:
नव्या अंतरिक्षी पुन्हा प्राणपक्षी जसा झेप घेण्यास सरसावतो... ....खगोलातल्या अद्भुताच्या स्वरांनी चिदाकाश व्यापून झंकारतो ...स्थलाच्या त्रिमितीत कालाक्ष थोडा उगा विरघळावा तसा भासतो .....जिथे चुंबिते पाणरेषेस व्योम तिथे कोणी नि:शब्द झंकारतो

सांजरंग

चांदणशेला ·
लेखनविषय:
काव्यरस
किरणांची पाऊले मिटून हळूच गेली उन्हे परतून पाखरांचा सूर सांजपंखी हुरहुर राहिली उरी रेंगाळून निळ्या नभी ढगांची रांग उभी तांबूस रंग गेला त्यात भरून घरट्यात किलबिल पडे काजळी भूल दिशा साऱ्या गेला हरवून रातराणीचा गंध झाल्या वाटा धुंद पसरले माथ्यावर चांदण्याचे रान

वस्त्र विणताना..

Bhakti ·
लेखनविषय:
वस्त्र विणताना, मन धागा गुंफताना..हवा रंगांचा कोमल बाज, गहिवर स्पर्श साज! रेशीम पाण्याची धार, त्यात चंद्राची साद.. अलगद सांडलेले, प्राजक्त देठ सहवास.. चोचीत धरलेले, आकाश मोतियाचे भास! वाऱ्याची मंगल गुज, हिरवळ मखमल पाऊल वाट.. सागराची तुफान गाज, मातीवर रेंगाळलेली वेडी लाट! -भक्ती

कदाचित...

शिवाजी होळगे ·
लेखनविषय:
काव्यरस
... हे षडयंत्र असेल कदाचित??? तेव्हा धर्म अफुची गोळी आहे अस म्हणणारा मार्क्स नव्हता ... कदाचित धर्मभोळी माणसं होती. उत्तर वैदिक काळापासून चालत आलेली जाती पातीची उतरंड होती. ...आणि नंतर त्या उतरंडीत घातलेला हैदोस माफीला पण लज्जित करेल असा होता. ...पण राम सगळ्या स्तरात जिवंत होता. ... आणि मग आलं इस्लाम नावाच्या शांततेचे वारं??? ... चक्रिवादळ. आणि सगळे जग रोंदल गेलं. फक्त हटवादी शांततेसाठी. ... तिथे नव्हती दयामया, नव्हती शरम,नव्हती सद्सद्विवेक बुद्धी... आहो मंदिराचा इतिहास काय पाहता.. सोमनाथ काय ? काशिविश्वेश्वर काय? अयोध्या काय? तुळजाभवानी काय? पांडुरंग काय? ... ...

सांज फुले

चांदणशेला ·
लेखनविषय:
काव्यरस
सांज फुलांनी भरू दे काळोखा रंग सावल्यांत उतरू दे धूसर झाली मावळतीची वाट मोहरला लाल केशरी क्षितिजाचा तट पंखात घेऊन भोवतीची वारे परतू लागली चुकार पाखरे सूर्य मिटून राने अंधारली प्रकाशज्योत अलगद विजून गेली अंबरी आकार घेई अर्धी चंद्रकोर रात्र पावलाने पुढे येई हळुवार