कदाचित...

शिवाजी होळगे's picture
शिवाजी होळगे in जे न देखे रवी...
8 Oct 2021 - 7:18 pm

... हे षडयंत्र असेल कदाचित???
तेव्हा धर्म अफुची गोळी आहे अस म्हणणारा मार्क्स नव्हता ...
कदाचित धर्मभोळी माणसं होती.
उत्तर वैदिक काळापासून चालत आलेली जाती पातीची उतरंड होती.
...आणि नंतर त्या उतरंडीत घातलेला हैदोस माफीला पण लज्जित करेल असा होता.
...पण राम सगळ्या स्तरात जिवंत होता.
... आणि मग आलं इस्लाम नावाच्या शांततेचे वारं???
... चक्रिवादळ.
आणि सगळे जग रोंदल गेलं. फक्त हटवादी शांततेसाठी.
... तिथे नव्हती दयामया, नव्हती शरम,नव्हती सद्सद्विवेक बुद्धी...
आहो मंदिराचा इतिहास काय पाहता..
सोमनाथ काय ? काशिविश्वेश्वर काय? अयोध्या काय? तुळजाभवानी काय? पांडुरंग काय? ...
... आणि अफगाणिस्तानातील प्रचंड बुध्द काय?
... आणि हे बुतशिकीन पर्यंत सिमीत नव्हतं.
प्रचंड कत्तल,अगणित बलात्कार, बेसुमार कुतरओढ.
सगळ कसं ? मुक्याला ... हाक ना बोंब.
कारण तेव्हा मार्क्स नव्हता.
तेव्हा अयोध्याचा राम काय?, प्रभासपट्टणचा सोमनाथ काय?, काशीचा विश्वेश्वर काय?,महाराष्ट्राची तुळजाभवानी काय?
ही सगळी त्या काळात माणसाला देवत्व प्राप्त करून देणारी विद्यापीठं होती. आणि ही धर्मभोळी, देवभोळी तलवारीने सरसर कापली जात होती.
... म्हणे आपलं नालंदा, तक्षशीला, वल्लभी हे ऑक्स्फर्ड, केंब्रीजच्या पेक्षा दर्जेदार होतं???
काय माहित???
...पण नालंदा बख्तियार खिलजीने जाळलं हे मात्र शंभर टक्के खरं.
का ? कशासाठी?...
पुन्हा तेच त्या काळात मार्क्स नव्हता.
...नाही तर मार्क्स साहेबांच सगळ औरच होत.
त्यांचा जन्म जर्मनीत,
राहायचे इग्लड,
लिहायचे अमेरिकेतील न्यूयॉर्क टाइम साठी,
आणि लिखाणाचा विषय भारतातील धर्म आणि समाजजीवन...
हाच क्रम जर उलटा झाला असता तर आपला 'दास कॅपीटल'
...
...
... कदाचित नव्या रूपात आम्हाला भेटला असता...
... आणि हो तुमचा समाजवाद पण.
... कदाचित.

कविता माझीकविता

प्रतिक्रिया

अमरेंद्र बाहुबली's picture

8 Oct 2021 - 11:58 pm | अमरेंद्र बाहुबली

छान आहे. आणखी येऊद्या.

प्रसाद गोडबोले's picture

9 Oct 2021 - 12:27 am | प्रसाद गोडबोले

ही कविता आहे ?

तुम्हाला मार्क्सवाद , कम्युनिझम , समाजवाद , नवअधुनिकतावाद वगैरे तत्सम बाष्कळपणाला विरोध करायचा असेल , तोही साहित्याच्या अन त्यातही विशेष करुन गद्याच्या मार्गाने तर सर्वप्रथम वृत्तबध्द कविता लिहाव्यात असे सुचवतो , त्यातही मुख्यत्वे मात्रावृत्त , अक्षरगणवृत्त नको, अगदीच वृत्त नसेल तर छंदबध्द, अगदीच तेही नसेल तर किमान जाति तरी हवीच ! किमान अभंग स्टाईल अन बेसिक यमक तरी असावेच असावे !

मुक्तछंद हा साहित्याच्या परंपरेतील अभद्राचार आहे. साहित्यक्षेत्रातील मार्कसवाद्यांना सगळ्यात जास्त कशाने त्रास होत असेल तर ते म्हणजे वृत्त-छंदबध्द कवितेने !

प्रचेतस's picture

9 Oct 2021 - 11:09 am | प्रचेतस

गद्य म्हणून वाचा, हाकानाका.

बाकी कविता आवडली.

सुरिया's picture

9 Oct 2021 - 5:30 pm | सुरिया

मारकस्भाव, गद्य, पद्य आणि मद्य ह्या गोष्टी सोडून सध्य स्थितीत आपण काही हृद्य गोष्टींवर लिहावे अशी लम्र इनंती याटिकानी करत आहे.
हृद्य गोष्टींवर लिहिण्याचा आणि बोलण्याचा आपला व्यासंग दांडगा आहे अशे एका लोकल चित्रांगदेकडून नुकतेच वाचनात आले आहे. ;)
.
धन्यवाद

ही कविता नाही त्याच्या मनातलं स्फुटक आहे.
एवढ्या सगळ्या देव देवता असताना हजारो किमी दूरवरून लोक येऊन अत्याचार करून गेले आणि देवांनी काहीच शिक्षा केली नाही.
एवढंच नव्हे तर अत्याचार करणाऱ्याला उदंड आयुष्य दिलं आणि भारताच्या नरवीर लोकांना 40 च्या आत वीरमरण दिलं.
शिवाजी मिपावर स्वागत.

रावसाहेब चिंगभूतकर's picture

9 Oct 2021 - 8:09 am | रावसाहेब चिंगभूतकर

आणि आता खिलजी च्या वारसांना नरकयातना भोगाव्या लागत आहेत.
पण भारत एक महासत्ता बनण्याच्या दिशेने वाटचाल करतोय.
नैसर्गिक न्याय?

हे निसर्गात नैसर्गीकपणे होत असते. भारतात सोन्याचा धुर निघत होता (?) तेंव्हा पाश्चिमात्य भटक्या निर्वासितांचे आयुष्य जगत होते, आज सुबत्ता तेथे आहे आणी आपण गुलामीच्या मानसिकतेमधे. पाण्यासाठी दाही दिशा व आयुश्यभराची वणवण असणारे पाण्याची वीहीर खोदत होते अन तंत्रज्ञान, विचारसरणी यात विशेष प्रगती नसुनही हाती तेलाच्या विहीरी लागल्या…

मिसफिट्स, गुन्हेगार म्हणुन देशाबाहेर हाकललेले अमेरिकेत पोचले तिथेही तोच उद्योग झाला पण प्रचंड सोन्याच्या खाणी व नैसर्गीक साधन समृध्दी त्या खंडात सापडली… उत्तम खगोलीय तथा भुमीतीचे ज्ञान असणारे, पिरॅमीड,ममी बनवणारे धुळीस मिळाले.

थोडक्यात तुम्ही तंत्रज्ञान, तत्वज्ञान, इश्वर उपासना यात कितीही प्रगत वा समृध्द असा अथवा नसा… शिफ्ट इन पॉवर बाउंड टु बी हॅपन… अँड इट विल कीप हॅपनींग.

माझ्या पुरते विचारले तर इश्वर, त्याची प्रार्थना याचा उगम मनुष्याने कुठेतरी झुकायला शिकावे (आपल्या अहंकाराला झुकायला शिकावे, ज्यातुन कदाचीत त्यापासुन दुर होता येइल) म्हणुन झाला… दुर्दैवाने आज तीच बाब अहंकार उंचावायला मिसयुज होते आहे.

आणि लिखाणाचा विषय भारतातील धर्म आणि समाजजीवन...

हे केव्हा झालं बुवा ?

चांदणे संदीप's picture

9 Oct 2021 - 11:02 am | चांदणे संदीप

लिहित रहा, आम्ही वाचत राहू.
मिपावर स्वागत.

सं - दी - प

ॲबसेंट माइंडेड प्रोफेसर's picture

9 Oct 2021 - 4:23 pm | ॲबसेंट माइंडेड ...

छान.

अथांग आकाश's picture

10 Oct 2021 - 11:37 am | अथांग आकाश

आवडली!!!
1