कविता माझी

कदाचित...

शिवाजी होळगे's picture
शिवाजी होळगे in जे न देखे रवी...
8 Oct 2021 - 7:18 pm

... हे षडयंत्र असेल कदाचित???
तेव्हा धर्म अफुची गोळी आहे अस म्हणणारा मार्क्स नव्हता ...
कदाचित धर्मभोळी माणसं होती.
उत्तर वैदिक काळापासून चालत आलेली जाती पातीची उतरंड होती.
...आणि नंतर त्या उतरंडीत घातलेला हैदोस माफीला पण लज्जित करेल असा होता.
...पण राम सगळ्या स्तरात जिवंत होता.
... आणि मग आलं इस्लाम नावाच्या शांततेचे वारं???
... चक्रिवादळ.
आणि सगळे जग रोंदल गेलं. फक्त हटवादी शांततेसाठी.
... तिथे नव्हती दयामया, नव्हती शरम,नव्हती सद्सद्विवेक बुद्धी...
आहो मंदिराचा इतिहास काय पाहता..

कविता माझीकविता

सांज फुले

चांदणशेला's picture
चांदणशेला in जे न देखे रवी...
3 Oct 2021 - 10:12 am

सांज फुलांनी भरू दे
काळोखा रंग सावल्यांत उतरू दे

धूसर झाली मावळतीची वाट
मोहरला लाल केशरी क्षितिजाचा तट

पंखात घेऊन भोवतीची वारे
परतू लागली चुकार पाखरे

सूर्य मिटून राने अंधारली
प्रकाशज्योत अलगद विजून गेली

अंबरी आकार घेई अर्धी चंद्रकोर
रात्र पावलाने पुढे येई हळुवार

कविता माझीकविता

आरोग्य पाठ भाग दोन

कर्नलतपस्वी's picture
कर्नलतपस्वी in जे न देखे रवी...
28 Sep 2021 - 9:34 am

हरी मुखे म्हणा
हरी मुखे म्हणा

सुर्या सम जीणे
उदयास्त पाळणे
गजर न वाजणे
राम प्रहरी

दोन भाकरी
चारी ठाव करी
पंढरीची वारी ( morning walk)
नेम धर्म

चंद्रोदया माजी
अस्तासं पावणे
निद्रा समाधिस्त
नित्य होय

नको ते दिक्षीतं
नको जुवेकरी
का उगा छळशी
जठराग्नी

जिव्हेंचे चोचले
नाही मोह माया
न शीणवी काया
आणी मन

हेची नित्य कर्म
आरोग्याचे मर्म
मनुष्य जन्म दुर्लभ
हेची जाण

हरी मुखे म्हणा
हरी मुखे म्हणा

कविता माझीआरोग्य

आरोग्य पाठ भाग दोन

कर्नलतपस्वी's picture
कर्नलतपस्वी in जे न देखे रवी...
28 Sep 2021 - 9:22 am

हरी मुखे म्हणा
हरी मुखे म्हणा

सुर्या सम जीणे
उदयास्त पाळणे
गजर न वाजणे
राम प्रहरी

दोन भाकरी
चारी ठाव करी
पंढरीची वारी ( morning walk)
नेम धर्म

चंद्रोदया माजी
अस्तासं पावणे
निद्रा समाधिस्त
नित्य होय

नको ते दिक्षीतं
नको जुवेकरी
का उगा छळशी
जठराग्नी

जिव्हेंचे चोचले
नाही मोह माया
न शीणवी काया
आणी मन

हेची नित्य कर्म
आरोग्याचे मर्म
मनुष्य जन्म दुर्लभ
हेची जाण

हरी मुखे म्हणा
हरी मुखे म्हणा

कविता माझीआरोग्य

शब्दांची कर्णफुले

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जे न देखे रवी...
24 Sep 2021 - 9:18 am

शब्दांची कर्णफुले

प्रसन्न सुंदर सुगंधी सकाळी
प्रेम बरसले अवचीत अवकाळी
नाहत्या ओलेत्या भोर केशांतून
थेंब तयाचे अवतरले भाळी

ओठी शब्द फुलून आले
शब्दांचे मग मोती झाले
तु ते हळूवार उचलूनी घेत
कर्णफुलांसम कानी ल्याले

इशाराकविता माझीजिलबीप्रेम कवितामाझी कवितामुक्त कवितारतीबाच्या कवितालावणीवाङ्मयशेतीवाङ्मयकविताप्रेमकाव्य

जल-आशय!

अत्रुप्त आत्मा's picture
अत्रुप्त आत्मा in जे न देखे रवी...
9 Jun 2021 - 11:47 pm

जलाशयाच्या उदरामध्ये, गूढ कहाणि वसते आहे.
मनात माझ्या काही का ही?, म्हणता आतच बसते आहे.

कविता माझीअद्भुतरसकविता

आज जरी

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in जे न देखे रवी...
11 May 2021 - 11:23 am

चंद्रधगीने रातराणी
उत्फुल्लपणे-
परिमळेल तेव्हा

व्याधविद्ध मृगशीर्ष जरासे
मावळतीवर-
ढळेल तेव्हा

केतकीत नागीण निळी
टाकून कात-
सळसळेल तेव्हा

नि:शब्दांची धून खोलवर
रुजून ओठी-
रुळेल तेव्हा

वास्तवतळिचे अस्फुट अद्भुत
कणाकणाने-
कळेल तेव्हा...

....वीज शिरी
कोसळली तरीही,
सावरेन मी

अद्भुत अवघे विरून, वास्तव
क्षणोक्षणी मग-
छळेल तेव्हा...

....आज जरी
निष्पर्ण तरी
बहरेन उद्या मी

कविता माझीकवितामुक्तक

कवितेनंतर

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in जे न देखे रवी...
23 Apr 2021 - 8:37 pm

कवितेनंतर बाकी उरल्या
शब्दांचे विभ्रम मी बघतो
ऐकून आहे ठिणगीचाही
बघता बघता वणवा होतो

वळीव कोसळता वणव्यावर
राखेची रांगोळी होते
अगणित थेंबांतिल थोड्याश्या
थेंबांची पागोळी होते

सोसून पागोळ्यांचा मारा,
तरारून अंकुर जो फुटतो
वृक्ष होऊनी त्याचा, अनघड
शब्दांनी तो डवरून जातो

पाठशिवणीचा नाद लावुनी
शब्द बीज वळचणीत रुजते
कधीतरी त्यातून अचानक
ओळ नवी कवितेची फुलते

- पण ओळीच्या पैलतिरावर
अनाघ्रातसे काही उरते

कविता माझीकवितामुक्तक

श्रीरंग....

Jayagandha Bhatkhande's picture
Jayagandha Bhat... in जे न देखे रवी...
2 Apr 2021 - 8:20 am

श्रीरंग....

सावळ्याचा शाम रंग..
भक्तिमाजी गोपी दंग..
प्रेमाचे उधळुनि रंग..
स्वानंदे भिजले अंग..
ममत्वाचा होई भंग..
अहंतेचा सुटे संग..
वैराग्याचा मनी तरंग..
उजळुन जाई अंतरंग..
जाणिवेत "मी" च गुंग..

"तो" चि "मी" श्रीरंग...
"तो" चि "मी" श्रीरंग...

जयगंधा...
६-३-२०१७.

कविता माझीकविता

तू जीव माझा- तू प्राण माझा - आलीस तू अवचिता

चित्रगुप्त's picture
चित्रगुप्त in जे न देखे रवी...
29 Mar 2021 - 5:55 pm

तू जीव माझा -
तू प्राण माझा -
घ्यावया
नच होतीस आली
मालूम होते मला

शौच्यालयात घुसता
मग सावरून बसता
मोबाइलात रमता
आलीस तू अवचिता

जवळि जवळ येता
मग कडकडून डसता
मम उष्ण रक्त प्रशिता
मेरा चैन-वैन सब लुटिता

वाजवून टाळिका
मी जीव तुझा - मी प्राण तुझा
- हरिला -
अल्विदा मच्छरिनी -
अल्विदा.

.

अनर्थशास्त्रअभय-काव्यआठवणीआयुष्याच्या वाटेवरइशाराकविता माझीकाहीच्या काही कविताकैच्याकैकविताघे भरारीचाहूलजिलबीजीवनप्रेम कविताफ्री स्टाइलभावकवितामाझी कवितारतीबाच्या कवितारोमांचकारी.लाल कानशीलवाङ्मयशेतीविराणीहझलभयानककरुणरौद्ररससंस्कृतीनाट्यवाङ्मयकवितामुक्तकसमाजजीवनमानमिसळमेक्सिकनराहणीराहती जागाविज्ञानव्यक्तिचित्रमौजमजा