श्वास...
श्वास...
जीर्ण झाली सारी पाने
आता हवा एक देठ नवा
तिच फुले अन तेच वारे
आता हवा गंध नवा
सावल्यांनी घेरले आहे
आता हवा एक सूर्य नवा
ओशटलेली सारी नाती
आता हवा एक बंध नवा
जुने झाले श्वास सारे
आता हवा एक श्वास नवा
राजेंद्र देवी
श्वास...
जीर्ण झाली सारी पाने
आता हवा एक देठ नवा
तिच फुले अन तेच वारे
आता हवा गंध नवा
सावल्यांनी घेरले आहे
आता हवा एक सूर्य नवा
ओशटलेली सारी नाती
आता हवा एक बंध नवा
जुने झाले श्वास सारे
आता हवा एक श्वास नवा
राजेंद्र देवी
अग्नीशलाका म्हणू तुजला
की नवदुर्गेची ओळख तू
झाशीवली राणी तुझ्यात
चन्नमाची आठवणं तू
सीता तू, द्रौपदी तू
कुंती... गांधारी ती तू
जिजाऊचा वास तुझ्यात
माधवाची रमा ही तू
तू न अबला... तू सबला
कणखर मनाची..भाऊक तू
तू आता न प्रवाह पतिता
प्रवाहाचा मार्ग तू
तुझ्या करी बळ सहस्त्रांचे
मनी दयाभाव प्रेषितांचे
निर्णयक्षम् आत्मा तुझा गे
जगाचा एक आधार तू
आठवणींचा वसंत
वेळी अवेळी भासे मज चाहूल
वाजे तुझे पैंजणांविना पाऊल
लागताच तुझी चाहूल
मम हृदयी भृंगारव झाला
आठवणींची पाणगळ झडली
फुटली पालवी चैत्राला
शोभून दिसते गळ्यात तुझ्या
पर्णफुलांची माला
संपले बळ पंखातले
नाही मिळाले घरटे या पाखराला
काय नेणार बरोबर मज पुसशी
नेणार मी या आठवणींच्या वसंताला
राजेंद्र देवी
मनात असावा सतत श्रावण....
तुझे येणे जणू असते वादळ, ऐनभरातले
तुझे बोलणे जणू असते गीत, सुरातले
तुझी ओढ असते जणू पाणी, पुरातले
तुझे रुसणे असते जणू लटके, प्रेमज्वरातले
तुझे लाजणे उधळत असते रंग, गुलाबातले
तुझी आठवण येणे असते जणू ऊन, श्रावणातले
एवढेच असावे मनात असावा सतत श्रावण
जरी दीस असले ग्रीष्मातले.....
राजेंद्र देवी
गौराई...
झाली तीच्या आगमनाची घाई
आता जोडीने येईल गौराई
दारी उमटतील पाउले कुंकवाची
सुख शांती अन समृद्धींची
सजतील लेऊन शालू भरजरी
असेल मध्ये गणराया मखरी
दोन दिसांची असेल माहेरवाशीण
पंचपक्वान्नाचे असेल जेवण
देता निरोप येईल डोळा पाणी
गौराई माझी लाडाची गं राणी
राजेंद्र देवी
मी एकटी ....
एल तीरावर मी एकटी
पैलतीर त्याला नाही
समोर पसरला अथांग दर्या
साजणाचा पत्ता नाही
परतुनी आले सारे
अजून तो आला नाही
रात्रीचा चंद्र देतसे
तो येईल याची ग्वाही
रंग हळदीचा अन मेंदीचा
अजून उतरला नाही
स्वप्नांचे जहाज बुडाले
साजणाचे तारू वाचले का नाही ?
बघत बसते खुणा वाळूतल्या
निरखीत असते लाटांनाही
नकोत रत्ने मज सागरा
का साजण माझा परत देत नाही ?
राजेंद्र देवी
मी सांगितल माझ्या सावलीला,
जा तिला जाऊन भेटून ये.
ती नाही भेटली तर,
तिच्या सावलीशी बोलून ये.
घट्ट मिठी मार तिला,
थोडे अश्रूही गळूदेत खांद्यावर.
तिलाही कळूदेत काय होत माझ,
ती दूर दूर गेल्यावर.
त्रास देउ नकोस तिला
फक्त डोळे भरून पाहून ये.
आणता आली तर तिची छवी,
डोळ्यांत साठवून घेऊन ये.
शांत बैस तिच्याजवळ,
फक्त तिलाच बोलूदेत.
येताना ते सगळे शब्द,
कानात साठवून घेऊन ये.
निघताना काही दिल तिने तर
नको म्हणून सांगून ये.
थोड प्रेम देऊन ये माझ,
आणि थोडस तिच्याकडून घेऊन ये…
मी सूर्य.. मी रवि...
मी दाह... मी अग्नि...
विश्वाचा आधार मी
जीवनाचा आकार मी
प्रकाशाचा उगम मी
श्वासातिल हुंकार मी
सर्वस्वाचा पूर्णाकार मी
तप्त जरी ... निराकार मी
व्यापलेला अवकाश मी.... अन्...
दाहाचा साक्षीदार मी
चंद्राचा शीतल प्रकाश
इंद्रधनूचा कोमलाकार
तप्ततेचा स्वाहाकार
मी एकटा... मी पूर्णाकार!
येकांद्या लैलाचा मजनू बनीन म्हनतो,
मी बी पिरेम करीन म्हनतो...
आयटम नं लाईन
दिली काय, न दिली काय,
आपल्याले हुंगत ऱ्हायची
सवयच हाय,
च्यान्सवर ड्यान्स
मारीन म्हनतो,
मी बी पिरेम करीन म्हनतो...
चिकनी पोरगी
पटली काय, न पटली काय,
पोट्ट्यान्ले चप्पल खायची
वायली हौसच हाय,
चपलीलाबी फुलाने
सजवीन म्हनतो,
मी बी पिरेम करीन म्हनतो...
|| माऊली उत्सव ||
विठु तुझ्या नामानं, 'मी'पणं गळलं
बासुरीगत झालं मनं, रितं न् पोकळं
तुझ्या फुंकरेनं केले, स्वर हे मधाळं
भक्तीरस झालं सारं, जीवन सकळं
जगी नश्वरी नाही, इथे माझा राम
देहभान बनले माझे, फक्त तुझा धाम
तुझ्या दर्शनाची असे, आज मला आस
मनमंदिरात माझ्या, फक्त तुझा वास
देवा तुझ्या नामाची, चढलीया धुंदी
कृतार्थाला सेवेची, दे रे एक संधी
मनामधी वाहीला, तुझाच भक्तीझरा
मनं माझं आतुरलेलं, मिळाया सागरा