मनाचा एकांत - सरोवरातील नाव

['मनाचा एकांत' ही शृंखला इथे संपत आहे. सगळ्या कवितांना मनापासून दाद देणाऱ्या, त्यातल्या काहींचे विडंबन पाडणाऱ्या सर्व रसिकजनांचे दिल से आभार! :)] पहाडातला जख्ख दद्दू सरोवरात नाव सोडून पलीकडे निघून गेला तेव्हापासून, नाव हलत नाही, डुलत नाही, पण जराशीही कुजत नाही! सरोवरात कुणाला येऊ देत नाही, सरोवरातून कुणाला जाऊ देत नाही! सरोवरभर तिचीच प्रतिबिंबे खोलवर.... भरल्या सरोवरातल्या रित्या नावेसाठी, . . . दुसरं काय असतो एकांत म्हणजे तरी! शिवकन्या

!! माझ्या सवता !!

लेखनविषय:
काव्यरस
सुख आणि दुःख, या दोघी दिव्य कांता, माझ्या एका छताखाली, सवे नांदतात आता !!१!! सुख थांबता थांबेना, दुःख वीरता विरेना, दोघी जन्मांच्या सवती, काही केल्या ही जमेना !!२!! सुख - माझी लडीवाळी, मात्र ऐट तिची भारी, नित्य शालू तिच्या अंगी, लोकांची रांग लागे दारी !!३!! दुःख - माझी अर्धांगिनी, तीच एकटी माझ्या उराशी, तिचा एक साडीचा संसार, जशी स्वतःघरी दासी !!४!! सुख - जेव्हा आली माझ्या घरी, साजरे झाले मोठे सण, वायू गेली माझ्या शिरी, अंगी आले मोठेपण !!५!! दुःख - जेव्हा आली ती नांदाया, काळ होता तो कठीण, धुंदी डोळ्यातली गेली, तेव्हा आले मज जाण !!६!! दोघे प्राणवायू माझे, नच कर्मे त्यांच्या वाचून, असे समान

एकमेकांना सोडून जातांना...!

लेखनविषय:
काव्यरस
एकमेकांना सोडून जातांना एक गोष्ट माझ्यासाठी करशील, आयुष्याच्या सायंकाळ पर्यंत माझी आठवण जपून ठेवशील, जातांना फक्त शेवटी मला तुझा चेहरा मन भरुन बघू देशील, स्मरणात तो न मिटण्यासाठी... जाता जाता तुझा हात माझ्या हातात देशील, तुझ्या स्पर्शाची ऊब जपून ठेवण्यासाठी... जाता जाता तुझ्या डोळ्यातील अश्रु मला वेचायचे आहेत पुढील जीवनात विस्तवाच्या निखार्यावर .....शिंपडण्यासाठी.....

तू आणि मी

अशी एक फक्त कल्पना असावी. सोनेरी त्या क्षणाला एकांताची साथ असावी...! गुलमोहराचा बहर, आणि तिथेच आपली भेट असावी...! जसे एखाद्या पाखराची, गोड ड्रीम डेट असावी...! तू मात्र,,, आवडत्या आकाशी रंगाच्या, पोशाखात असावी...! आकाशालाही हेवा वाटावा, इतकी तू सुंदर दिसावी...! निरोप घेतांना डोळ्यांमध्ये, अश्रूची एक झलक असावी...! डोळ्यामधले भाव जाणूनी, नाजुकशी ती मिठी असावी...! जीव ओतला तुझिया पायी, आशा तुझीही हीच असावी...! एकमेकांची साथ अशी ही, दरवेळी रम्य असावी...!

जरा जपून

बोलतांना जरा जपून बोलावं शब्द ही अर्थ बदलतात चालतांना जरा जपून चालावं कधी रस्ते ही घात करतात झुकतंना जरा जपून झुकावं कधी आपलेच खंजिर खुपसतात ओळखतांना जरा जपून ओळखावं कधी मानसे आपला रंग बदलतात पाऊल टाकतांना जरा जपून टाकावं कधी फुले ही काटे बनतात मागतांना जरा जपून मागाव कधी आपलेच भाव खातात नात जोडतांना जरा जपून जोडावं कधी नकळत धागे तुटून जातात...!

आयुष्य

लेखनविषय:
पायाला लागली ठोकर तिथे बांधायचे घर जिथे काहिच नाही तिथे आभाळ आहेच वर जिवनाचे पुस्तक लिहिले मी स्वत:च्या चेहर्यावर वाचता आले तर विश्वास ठेव वेदनांच्या त्या शब्दांवर तूला कधीच ह्या मनाचा मजकूर समजला नाही मी बंद लिफाफा आहे जो कुणी उघडलाच नाही मी समजवण्याचा प्रयत्न केला पण तो कुणाला समजलाच नाही मन माझे कुणाला कळलेच नाही, तळ हातावर पोट घेऊन कष्टकरी बनवत फिरत होते, इवल्याशा पोटाची भुक भागावी म्हणूनच तर रक्त जाळत होते...!

फक्त तुझ्यासाठी...! 2

तु गेलीस पण हा मावळता सुर्य पौर्णिमेचा चंद्र आणि चांदण्या तेथेच स्तब्ध राहिल्या फक्त तुझ्यासाठी मनामध्ये प्राजक्तांच्या फक्त तुझ्यासाठी एकदा वादळ ही सुटले पण ते ही शांत झाले फक्त तुझ्यासाठी येत्या पावसाळ्यात आनंदाचे झरे वाहणारे फक्त तुझ्यासाठी शेवटी-शेवटी या फुलांमधील गंध ही सुगंधीत होणार फक्त तुझ्यासाठी आकाशातील तार्यांचा शितल गारवाही मंदावणार फक्त तुझ्यासाठी तो रोजचा वारा आहे पण तो रोजचा आहे पण तो तुला विसरणारा आहे फक्त तुझ्यासाठी माझ्या प्रेमाच्या फुलांची ओंजळ फक्त आणि फक्त तुझ्यासाठी...!

दिसत जावं माणसानं

लेखनविषय:
हल्ली मोबाईल आणि सोशल मिडियामुळे भेटीगाठी अधिकच दुर्मीळ होऊ लागल्या आहेत. याच विषयावर एका मित्राने आज एक सुंदर हिंदी कविता पाठवली आणि विषय जिव्हाळ्याचा असल्यानं चटकन मराठी रुपांतर/भाषांतर सुचलं. आधी मराठी आवृत्ती आणि मग त्याची मूळ हिंदी कविता असं देतो आहे. हिंदी कवी कोण ते मात्र समजू शकलं नाही.

मनाचा एकांत - काळे पाणी

अंदमानातले काळे पाणी, कोलूबेड्याहंटरकदान्न सोबत तीव्र अपमानाचा overtime ! साम्राज्याचा उग्र दर्प अन देशाने केलेली प्रेमळ उपेक्षा....... असे सगळे, अन वरती थोडी जयहिंदची जाळी ! या जीवघेण्या विषाणूजिवाणूंमध्येही, काही काही रक्तांचे malnourishment कि काय ते झालेच नाही! उलट, तुरुंगाच्या अजस्त्र काळभिंतीही त्यांच्या जहालहळव्या लेखणीने cultured झाल्या! मातृभूमीच्या मृत्युंजय विरोत्तमांसाठी, . . . दुसरं काय होता एकांत म्हणजे तरी! - शिवकन्या

व्यथा

लेखनविषय:
व्यथा भावनेचा कोंडमारा घाव जे जिव्हारा कसा आवरू आता आयुष्याचा पसारा सांगू व्यथा कोणाला आहे कोण ऐकणारा कसा आळवू न कळे सुना सुना देव्हारा गुंतलास कोठे तू कोणास उध्धारा व्याकुळले नयन दे दर्शन परमेश्वरा राजेंद्र देवी
Subscribe to भावकविता