आठवण
परडीत काढुन ठेवला मोगरा तरी
हातास सुगंध तसाच राही कितीतरी वेळ
तसचं तुला स्मरुन लिहलं मी काही तरी
शब्दास सुगंध तुझाच राही कितीतरी वेळ
-प्राजक्ता
परडीत काढुन ठेवला मोगरा तरी
हातास सुगंध तसाच राही कितीतरी वेळ
तसचं तुला स्मरुन लिहलं मी काही तरी
शब्दास सुगंध तुझाच राही कितीतरी वेळ
-प्राजक्ता
मदनाच्या भेटीला आज रती ही आली
चंद्राच्या कुशीत ती चांदणी विसावली
तुझ्या माझ्या प्रितीसाठी रात्र थबकली
दूर का उभी तू तिथे ये इथे जवळी
1 आकाशातून खिडकीत, खिडकीतून फोटोत उतरलेला चंद्र,
तुला WhatsApp वर पाठवला की मग कुठे माझी पौर्णिमा सुरू होते.
अन तुझा त्यावर reply आला की ती शारदीय होते.
2माहीत असतं, "छान, ओके किंवा तूच माझा चंद्र"
याहून दुसरा तुझा reply येणार नाही.
पण तरी मी खूष असते कारण मला कळतं
याहून अधिक तुला खरंच काही सुचणार नाही.
3 आठवतं? एका रात्री एअरपोर्टवरवरून तू मला कॉल केला होतास.
तू घरी पोचेपर्यंत आपण बोलत होतो. .
तेव्हा चंद्रसुद्धा खिडकीपाशी थांबून राहिला होता.
एका कोपर्यात अंग फुगवून बसली होती सूरनळी
टोकावरल्या डोळ्यांनी मला पाहत होती ||
माझ्याशी बोलायला लागली ती जेव्हा
खरे नाही वाटले मला तेव्हा
तुम्हालाही माहित आहे ही आहे थापेची गोळी ||
"
अनेक गोष्टीं मधे उपयोग माझे जळी स्थ्ळी
तरी तुम्ही का बोलतात घालून घे रे सूरनळी
हेअर पीन ने कान कोराल तर त्याने सूजेल कानाची पळी ||
पूर्वी आदेशांना होता मोठा बाजार भाव
साहेबांच्या मागे धावायचे सगळे रंक आणि राव
आता मात्र न्याय आहे बळी तो कान पिळी ||
ओळखीतल्या सगळ्या मुलांना राखी बांधणारी छोट्टीशी बाला,
काॅलेजमध्ये ज्याला टाळायचं त्यांनाच राखी बांधणारी मुग्धा.
रक्षाबंधनाचे मेसेज फक्त कझिन्स ग्रुपमध्ये टाकणारी प्रगल्भा..
आणि तो सरसकट सगळ्यांनाच फाॅरवर्ड करणारी प्रौढा..
"तिच्या" या चारही रुपांना एकत्र ओवणारी तरीही अलगद विलगणारी पण खुलवणारी,
ती राखी!
पाऊस! पाऊस!!
पाऊस! पाऊस!! झाला सारा
भणाणलेला त्यासवे आला वारा
वारा उडवीतो माझे मन
मनामध्ये तू आहेस खरा
चिंब मी भिजलेली
माझ्यासवे तुझे भिजले तन
हिरव्या रानात घेवूनी कवेत
मीच हरवले माझे मन
पाणी आले पानोपानी
झाडे भिजली रानोरानी
मिठीत तुझ्या मी आलंगूनी
विसरले मी, गेले हरवूनी
- बी ऑलवेज लाईक मी
- ऑलवेज युवर्स पाभे
०३/०८/२०१९
वाचायला(च) गेलो,
लिहून काय आलो?
आमंत्रण नव्हते तरी
ज्ञान पाजळून आलो ..
ना अर्थ आशयाचा
बोली.. लावून आलो .
कावलेल्या समयी
भडास काढून आलो ..
होते कोण न कोण
बघतोच मी कशाला ?
बिना वातीचेच (मुद्दाम)
कंदील लावून आलो ?
धागे जरी भिकार
डोके फिरवून आलो..
जाऊ मुळी न देता
संधी साधून आलो .
(जालिय विचारवंत आणि सल्लागारांना समर्पित)
तुझ्या माझ्यासवे....
तुझ्या माझ्यासवे कधी गायचा पाऊसही
तुला बोलावता पोहोचायचा पाऊसही
पडेना पापणी पाहून ओलेती तुला
कसा होता नि नव्हता व्हायचा पाऊसही
तुला मी थांब म्हणताना तुला अडवायला
कसा वेळीच तेव्हा यायचा पाऊसही
मला पाहून ओला विरघळे रुसवा तुझा
कश्या युक्त्या मला शिकवायचा पाऊसही
कशी भर पावसातही आग माझी व्हायची
तुला जेव्हा असा बिलगायचा पाऊसही
आता शब्दांवरीया फक्त उरलेल्या खुणा
कधी स्मरणे अशी ठेवायचा पाऊसही
***********************
विडंबन
मनोमनी
मनोमनी कोणाच्या काय असते
कधी नाही कळायचे।
समजा कळले असते तर
अग बाई!अरेच्चा! व्हायचे।।