✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

तुझ्या माझ्यासवे......(विडंबन)

O — OBAMA80, Tue, 11/20/2018 - 20:53
तुझ्या माझ्यासवे.... तुझ्या माझ्यासवे कधी गायचा पाऊसही तुला बोलावता पोहोचायचा पाऊसही पडेना पापणी पाहून ओलेती तुला कसा होता नि नव्हता व्हायचा पाऊसही तुला मी थांब म्हणताना तुला अडवायला कसा वेळीच तेव्हा यायचा पाऊसही मला पाहून ओला विरघळे रुसवा तुझा कश्या युक्त्या मला शिकवायचा पाऊसही कशी भर पावसातही आग माझी व्हायची तुला जेव्हा असा बिलगायचा पाऊसही आता शब्दांवरीया फक्त उरलेल्या खुणा कधी स्मरणे अशी ठेवायचा पाऊसही *********************** विडंबन तुझ्या माझ्यामागे कसा यायचा भाऊ तुझाही तुला बोलावता पोहोचायचा भाऊ तुझाही होईना पाच मिनीटे भेटूनी तुला कसा कोठूनी अलगद टपकायचा भाऊ तुझाही तुला मी थांब म्हणताना तुला शोधायला कसा वेळीच तेव्हा उगवायचा भाऊ तुझाही मला पाहून कसा तीळपापड व्हायचा त्याचा कश्या युक्त्या लढवायला लावायचा भाऊ तुझाही कशी शांत बागेत चिडचिड माझी व्हायची तुला जेव्हा असा घेऊन जायचा भाऊ तुझाही आता (माझ्या) अंगावरी फक्त मारल्याच्या खुणा कधी स्मरणात नाही ठेवायचा मला भाऊ तुझाही

प्रतिक्रिया द्या
2306 वाचन

💬 प्रतिसाद (1)

चांगले केलंय. पु ले शु

वन
Sun, 12/02/2018 - 19:29 नवीन
चांगले केलंय. पु ले शु
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा