धाव धाव टीम लिडरा
बग आली माझ्या कोडा
किती आता गुगलावे?
एआय मदतीला घ्यावे?
डेडालाईन मृत्यू भासे
चहा कॉफी नरडी डाचे
आता उद्धरण्या केवळ
तूच येई धावत सबळ
पाषाणाच्या चुकल्या कोडी
टेस्टर, क्यू.ए. इग्नोर करी
- पाभे
२६.०३.२०२४
अरे अरे टीम मेंबरा
कशाला फुका आरडाओरडा
आळशा आधार बार्ड
वापर की जरा कार्ड (पक्षी - डोके)
कमी कर टंगळ मंगळा
झडकरी काम उरकी बाळा
ऑफिस आता बंद होई
बायको घरी वाट पाही
रामे म्हणे ऐशा नरा
माराव्या मोजुनी पैजारा
प्रॉम्प्ट होता चांगला
बार्ड तरीही गंडला
बार्ड झाले जेमिनी
आज झाले एनिमी
वाटले जे गेम-चेंजिंग?
निघाले ते नेम-चेंजिंग
गपटाचे धरता पाय
भरकटे तोही हाय..
अपॉलॉजीचा नुसता पूर
सोल्यूषण राहिले दूरदूर..
मस्तच, पण टीम मेंबरांच्या
छान
मस्त
वा !
पाभे यांची माफी मागुन
वा, रामे, झकास!
लै भारी
प्रॉम्प्ट होता चांगला
खरच प्रतयक्षाहून प्रतिमा
अरे अरे पाषाणा....
हाहाहा--गवि आणि कर्नलकाका
चूक झाली कुठं गावंना
भारी आहे
डोळे ओले झाले