तेव्हा मला तू फार म्हणजे फार आवडतोस

मार्केटयार्डामधुन आठवड्याची भाजी घेउन येताना अचानक मला सोसायटी मधली मैत्रिण भेटते ती एकटीच आलेली असते भाजी घ्यायला दोन मोठाल्या पिशव्या हतात् घेउन, अवघडून , अर्धातास, निमुट उभा रहात, आमच्या गप्पा ऐकणार्या तुझ्या कडे तिरप्या नजरेने बघत ती म्हणते “आमचे हे काल रात्री उशिरा कामावरुन आले दमुन झोपले आहेत बिचारे.

जीवनसंगीत

लेखनविषय:
काव्यरस
देवा तुझ्या नामानं, मीपण गळलं बासुरीगत झाले मनं, रितं न् पोकळं तुझ्या फुंकरेने केले, स्वर हे मधाळं संगीतमय झाले सारे, जीवन सकळं

अस्तित्वाची बोंब

स्फुर्तीदाते: मितभाषी आणि त्यांचे लाघवी मूल. प्रश्न पहिला माझा, रे गड्या मितभाष्या, काय पिवुनि तुवा वाजवला हा ढोल-ताश्या! मूळ बघता सर्व वादांचे असे बस फक्त पिण्याचे अध्यात्म नाहीरे षंढाचे हे तुज नाही कळायाचे. भेद भावा तु बघ जरा अज्ञानास फाडती टरा टरा डोळे फिरवती गरा गरा दंभ नाहीच इथे खरा तुम्हा नसे त्याची प्रचिती म्हणुनि त्या खोटा म्हणती मनापासुनि ते ओरडती अंधारासी मी एकच पणती. हिशोब सरला रे जन्माचा बाकी थोडा असे मिपाचा मिंधा नसे कुणाच्या बा'चा पण मानासाठी घासतो टाचा करु लढाया थुंकायाच्या जोर लावुनि भुंकायाच्या दोन शिव्या

बायको गेली माहेरी..

बायको गेली माहेरी,आलो मी मिपावरी परी कर्तव्याची दोरी, आता गळ्यात आहे. कळले आहे तिला, नवरा मिपा खुळा मारून एक खिळा, ती गेली आहे दिसाल जर ऑन-ला-ईनं, लगेच फोन-मारीनं! (दुत्त दुत्त! https://lh3.googleusercontent.com/-yoZKvSwxxFc/VfzpdSyQoXI/AAAAAAAAhLk/e9PNzHHLamE/s28-Ic42/ao.gif ) आणि करिन तुमच्याशी, व्हॉट्स अप बोल-बंदी.

झाडांच्या सावलीत, राणीच्या बागेत, ... ... येताय ना ? ;)

काव्यरस
प्रेरना माननीय प्रेषक, कंजूस, यांची नैसर्गीकपणे मोकळी-चाकळी माफी मागून :) मिपाकरांच्या सेवेत सादर ... झाडांच्या सावलीत राणीच्या बागेत ने-चर वॉक श्रवणोत्सुक नेत्र वेगळ्या कोनातून मनोरा पाहणारे Appreciation टॉक चिंचेची अन चिनाराची झाडे कुट-कुटली, पुर्व-पश्चिम दक्षीण-उत्तर, गाभुळलेले, हिरवे चढ उतार झेलत हळूवार-मौन कधी जोरदार वाहत्या वार्‍यासंगे बोलके तुषार वळणे डौलदार नजाकत लवलव गवताची पाती झुलता झंकार फुलपाखरे किती चमकदार पक्षीगाती मंजुळ मनाचे तराणे कळ्या फुलतात हळूवार प्रतिक्षा त्या खास किटकांची फुलांचे परागीभवन फळांच्या आशा कधी निराशा

अँड व्हॉट दे सेड ? हॅप्पी न्यू यीअर !! ; ओह मिपाकर हॅप्पी न्यू यीअर !! बरं का ! हॅप्पी न्यू यीअर !!

काव्यरस
क्रिंग क्रिंग क्रिंग क्रिंग क्रिंग क्रिंग क्रिंग क्रिंग स्वप्नात झाले होते पटाईत आमचे (पटाईतांची पटाईतपणे माफी मागून!) पंतप्रधान मोदींचे सचीव !! :) क्रिंग क्रिंग क्रिंग क्रिंग क्रिंग क्रिंग क्रिंग क्रिंग त्यांनी विचारले गेले वर्ष भर काय केले ? ओबामां फोनु आला डू यु नो अँड व्हॉट दे सेड ? हॅप्पी न्यू यीअर !! ओह मिपाकरांना आमचा निरोप द्या ओह मिपाकर हॅप्पी न्यू यीअर !!

आयटीची गोष्ट

लेखनविषय:
काव्यरस
आयटीची गोष्ट I ऐका मायबाप II पुण्ण्याची गणना III येथे नाही IIII पैश्यांचे डोंगर I सोनियाच्या राशी II वाढता डॉलर III दिसो लागे IIII गळ्यामध्ये कार्ड I बडविती बोर्ड II जीवनाची आस III विझवुनी IIII मेल देती घेती I रिलीज भोवती II सुष्ट आणि दुष्ट III एक झाले IIII नाही जात पात I सगळेच एक II ढाळती पदर III युरो साठी IIII लाल लाल ओठ I रंगविती सर्व II गोऱ्या साहेबाचे III चाटू पाय IIII मिळूनिया सर्व I सोडुनिया सत्व II चराचर जणू III रांड वाडा IIII लेकुरवाळी माय I गेली परदेशा II पान्ह्या वीना पोर III सुकलेले IIII कशासाठी सर्व I उर फाटी धाव II खोल गेले डोळे III जिवलगा IIII पुरुषार्थ व्यर्थ I विझे बा

ताज़ी जिल्बी:- स्कार्फ आणि डोळे! ;-)

स्कार्फ आडून चमकती डोळे खुणवून काही बोलताती मनी आमुच्या काही पक्षी हलकेच हळूच उडताती तरंग येतात मनी मग जोवर ती असते पुढे स्वप्न-रंजनाचा पारवा ऊंsssच आकाशी उडे ओढणि ती सँक ती ही डोकावे वॉटर बॉटली सुंदर किती रूप हे भावना मनात साठली हॉर्न मागून वाजताही किल killले तो आरसा निबरल्या आमुच्या मनी फरक न पडे फारसा!

हरल्या आशांनी बघतो, तू मंत्री आगळा नाही

पेरणा आणि प्रेरणा जणू खिशांत नागर मर्जी, जग माझिया वाणीवरती पण अवखळ नागरवासी, मज संत म्हणाले नाही ....... किती काळ उलटला मंत्र्या, नित नवीन म्हणशी तूही ....... जरी रूप पालटले तुही, तू मंत्री आगळा नाही मी परतून आलो तरीही, माझे ना सरले काही दमलो मी घेऊन माला, मज संत म्हटले नाही ....... समजता मोल खातीचे आलेला परतून जाई .......

शष्पचिंतन

लेखनविषय:
किती हा काहूर, ऐकावा आक्रोश, मनाचीच खंत मनापाशी ! आपुल्या विचारे झाकुया बिचारे पिसाट ढेकूण मनामधे || भकास भयाण एकान्त भीषण उंबरात विश्व शोधितो का ? धावे रे कोण्या गर्दीत घामट, आनंदे हुंगतो उंबरेचि || जपून चालती सावध बहीरे जडशीळ ओझे हुंकाराचे | पाहून आधार, अंधार, आडोसा, लागतो कानोसा, मागमूस ?
Subscribe to अभंग