......ह्या आधीचे...
सियाचीन ग्लेशीयर .....भाग २ ...आयुष्याची दोरी
(माझ्या सहका-याने काढलेला फोटो)
........हेलिकॉप्टरने त्या हिमखाईच्या वरती होवर करून ‘जीपीएसचे’ संदर्भ घेतले व जरा लांब वर जाऊन हेलिकॉप्टर उतरवले. तेथेच उतरवले असते तर त्याच्या फिरणाऱ्या पंख्याच्या वाऱ्याच्या रेटाने, अडकलेल्या जवानांना त्रास झाला असता. पॅट्रोल लीडरने रेस्क्यू टीमला भेटून हिमखाई दाखवली. तो पर्यंत हेलिकॉप्टर रेस्क्यू टीमच्या दुसऱ्या दोन जवानांना घेऊन येण्यासाठी परत बेस कँपकडे उडले.......
रेस्क्यू टीम लीडर एक कॅप्टन होता. हिमखाईत डोकावून, आपल्या विजेरीचा झोत हिमखाईत सगळ्या दिशेने पाडत, डोके नकारार्थी हालवत, कॅप्टन स्वतःशीच पुटपुटला, "विश्वासच बसत नाही". हिमखाई, अंदाजे वीस ते तीस फुटा पर्यंत खोल गेली होती. पुढे अरुंद होऊन घळी सारखी आत गेली होती. अरुंद झालेल्या खाईमुळे तो आत पडलेला जवान वाचला होता. पण खाली पडण्याच्या जोराने तो खाईच्या त्या अरुंद फटीत अडकला होता असे वाटत होते. कारण त्याच्याकडून कसलीच हालचाल होत नव्हती. हिमखाईच्या भिंती इतक्या जवळ होत्या की त्या अडकलेल्या स्थितीत त्याला जोरच लावता येत नसावा.
कॅप्टनने त्याच्या विजेरीचा प्रखर झोत त्या जवानाच्या पलीकडे पाडून अजून आत पर्यंत डोकावायचा प्रयत्न केला तेव्हा त्याला काळोखा व्यतिरिक्त काहीच दिसले नाही. विजेरीच्या झोतात अडकलेल्या जवानाला कॅप्टनने न्याहाळले, कोठेही रक्ताच्या खुणा नव्हत्या, हिमखाईत पडल्यामुळे त्याला फार इजा झाली असेल असे वाटत नव्हते. त्याचे हातही मोकळे होते, त्यातल्या त्यात हे बरे होते. टीम लीडर कॅप्टनने त्याला हाक देऊन हात हालवायला सांगितले. पण एका तासापासून त्या गोठवणाऱ्या हिमखाईत राहिल्यामुळे तो जवान अशक्त झाला होता. अशक्तपणा आल्याने त्याच्या हात हालवण्यात काही दम राहिला नव्हता. पण जाणीव अजून कायम होती, त्या निमुळत्या होत गेलेल्या खाईमुळे कदाचित त्याचे कमरे खालील अंग दिसू शकत नव्हते.
परिस्थितीचे प्राथमिक अवलोकन करून झाल्यावर, रेस्क्यू टीमने कामाला सुरवात केली. असे ठरले की पहिल्यांदा बरोबर आणलेल्या एका दुसऱ्या दोरीने त्या जवानाला बांधायचे. बांधलेल्या दोरीचे दुसरे टोक खाईच्या बाहेर काढायचे व पक्क्या बर्फात पहारीने खणून डांबरी खिळ्यांनी पक्के करायचे. हे केल्याने त्या जवानाचे वजन ती दोरी घेईल व निदान तो वजनामुळे अजून आत जाणार नाही. त्याला बांधायचे म्हणजे टीमला हिमखाईच्या आत उतरावे लागणार होते. हे करण्यासाठी टीम, हिमखाईच्या तोंडाजवळचा बर्फ बाजूला करायला लागून व भक्कम अशी नढासळणारी जागा शोधायला लागले. त्यांना डांबरी खिळ्यांनी रेस्क्यू टीमची दोरी पक्की बांधता यावी अशी जागा पाहिजे होती. थोड्याच वेळात, रेस्क्यू टीम ने वापरायची दोरी बांधलेल्या जागेवरून सुटणार, तुटणार किंवा सटकणार नाही अशी जागा शोधली. हे काम चालले होते तेव्हा जवानाला कसे पटकन वाचवता येईल ह्याचा विचार कॅप्टनला सतावत होता. हिमखाईतून एखाद्याला वाचवण्याचे काम खूप अवघड व धोक्याचे असते. बऱ्याच वेळेला हिमखाईमध्ये वितळळेल्या बर्फाचे पाणी होऊन खाली पडता पडताच परत बर्फ तयार होतो त्यामुळे असंख्य निमुळते बर्फाचे भाले, खाईच्या तोंडातून खाली ओघळलेल्या स्थितीत गोठून तयार होतात. भयंकर कडक व टोकदार. ह्या भाल्यांचे नीट ध्यान ठेवले गेले नाहीतर जवानाला वर खेचताना त्याच्या अंगात हे बर्फाचे भाले रुतूनच तो मरायचा. हे टाळण्यासाठी, असे ठरले की, टीम मधल्या एकाने कमरेला दोरी बांधून खाली जायचे, त्या खाईतल्या जवानाला आपल्या पाठीवर बांधायचे, कारण स्वतःहून काही करायची ताकद त्याच्यात बहुदा राहिली नसावी. त्याला पाठीवर बांधल्यावर, आपले स्वतःचे तोंड खाईच्या भिंतीकडे करायचे व हातात वरून येणारी दोरी धरलेली असताना पायांनी भिंतीला जोरात रेटा द्यायचा. रेटा दिल्याने आपण व तो जवान क्षण भर भिंती पासून दूर जातो, त्याचवेळी, वरती असणाऱ्या टीम मधल्या एकाने ती दोरी वर ओढायची. हिमखाईत असणाऱ्याने भिंतीला रेटा देणे व वरच्याने दोरी ओढणे हे एका वेळेला झाले पाहिजे. नाहीतर वरच्या टीम मधल्या जवानाच्या नुसतेच दोरी ओढण्याने ते खाईतले दोघेही भिंतीवर घसटून वर येत असताना बर्फात तयार झालेल्या भाल्यांनी दोघांनाही भोसकले असते. नशिबाने ह्या हिमखाई मध्ये असे टोकदार भाले कमी होते. पण येथे दुसरेच एक संकट होते. अडकलेल्या जवानाला बराच वेळ झाल्यामुळे त्याच्यावर बर्फाची पुटे चढून तो हालू शकत नव्हता. जमलेल्या बर्फाने त्याचे वजनही वाढले होते. कॅप्टनच्या मनात विचार आला... काहीही झाले तरी त्याचे पाय तर गेलेच आहेत. ५० मिनिटे ह्या गोठणाऱ्या शून्यापेक्षा खाली ४० सेल्सियस तापमानात राहिल्याने त्याला वाचवल्यावर सुद्धा बेस कँपवर गेल्यावर डॉक्टर्स ना त्याचे पाय कापूनच टाकावे लागणार होते. कारण एवढा वेळ गेल्यावर नक्कीच त्याला फ्रॉस्ट बाइट झाला असणार होता. कापण्याशिवाय गत्यंतर नाही. पण कॅप्टनला त्याचे पाय कापले जाण्याची काळजी एवढी वाटत नव्हती किंवा दुःख नव्हते. त्याचे पहिले काम त्या जवानाला हिमखाईतून काढायचे होते. तो मरायच्या आधी. बेस कँपवर त्याच्या पायांचे काय होणार ह्या सगळ्या गोष्टी नंतरच्या होत्या व सद्ध्य परिस्थितीत गौण वाटाव्या असा प्रसंग होता.
हे करता असताना त्यांना परत एकदा हेलिकॉप्टराचा आवाज कानावर पडायला लागला. हेलिकॉप्टर, रेस्क्यू करणाऱ्या दुसऱ्या दोन जवानांना घेऊन आले होते. आत उतरण्या आधी अजून एक महत्त्वाची गोष्ट करायची राहिली होती.... हिमखाई किती खोल आहे ते नेमके समजत नव्हते. त्याचा अंदाज घेणे खूप जरूरीचे असते. हिमखाई खूप खोल असेल तर अडकलेल्या जवानाला वाचवण्यासाठी वेगळे प्रकार करावे लागतात. जोखीम पत्करून टीम स्वतःला बांधलेली दोरी सोडून त्यात उतरतात, कारण मोकळ्या हाताने व न बांधल्या गेलेल्या शरीराने काम करायला सोपे जाते व पटकन होते, हे खाई कमी खोल असेल तरच करता येते.
हिमखाईच्या खोलीचा अंदाज सगळ्यात शेवटी घेतला जातो. अगदी आत उतरण्या आधी. असे करण्याला कारण असते. जे खाईत सापडलेले असतात त्यांच्या प्रतिक्रियांचा अंदाज बांधता येतो. आत पडल्यावर त्यांचे वागणे जसा वेळ जाईल तसे बदलत जाते. कधी भीतीने आरडाओरड तर मन स्थिरावल्यावर बदलणारे वागणे ह्या सगळ्याचे एक चक्र असते. हिमखाईत पडल्यापडल्या पहिल्यांदा, व्यक्तीला भीतीने घेरले जाते, व आता आपण मरणार ह्या कल्पनेने अशी व्यक्ती, हातवारे व जोरजोरात किंकाळ्या फोडायला लागतात. जे पडल्या पडल्या मरतात त्यांच्या डोक्यात मरायच्या आधी काय विचार येत असतील ते कळायला मार्ग नाही. पण जे काहीच भाग्यवान असतात व ज्यांना खाईच्या बाहेर जिवंत निघता येते, ते सांगतात की पहिल्या काही मिनिटातच मनावर ताबा बसतो व शांत होऊन बाहेर कसे निघायचे त्याचा विचार सुरू होतो. थोड्याच वेळात त्यांना जेव्हा समजते की त्यांच्यासाठी बाहेरून वाचवण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत तेव्हा त्यांची आशा वाढते व ते पण त्यांच्याकडून प्रयत्न करायला लागतात. अशा भाग्यवानांना मनातून ठाऊक असते की जिवंत राहायची किंमत मोजावी लागेल कदाचित.., कधी हात, किंवा पाय, किंवा हाताची बोटे फ्रॉस्टबाईट मुळे कापावी लागतात. खूप थंड गोठणाऱ्या तापमानात आपले शरीर, बचावासाठी, हाता पायांच्या रक्ताच्या कॅपीलरीज आक्रसून घेतात. हे शरीराचे बचाव तंत्र आहे. त्याने शरीराचे तापमान काही प्रमाणात स्थिर राहते. पण फार वेळ त्या कॅपिलरीज आक्रसलेल्या अवस्थेत राहिल्या तर शरीराचा तेवढा भाग मरून जातो. पण म्हणतातना – सीर सलामत तो पगडी पचास.... ह्या हातपाय गमावण्याच्या विचारांनी ते दुःखी होत नाहीत. पण हे तेव्हाच घडते जेव्हा त्यांना जाणवते की, आपण ज्या हिमखाईत पडलो आहोत ती खूप खोल नाही, मदतीला लोकं आली आहेत, प्रयत्न चालू आहेत, बाहेर हेलिकॉप्टराचा आवाज यायला लागला आहे, व काही वेळातच आपण खाईतून बाहेर येऊ शकू. अशा स्थितीत एकदम मनाला उभारी येते व मना बरोबर शरीर साथ द्यायला लागते. पण काही वेळेला जेव्हा अडकलेल्या जवानाला समजते की परिस्थिती वाटली होती त्या पेक्षा भयंकर आहे तेव्हा कमी झालेली भीती, परत मनात घर करते. अशा अडकलेल्या जवानाच्या मनाला जोरात झटका बसतो. त्याला त्याच्या पुढे उभे ठाकलेल्या मरण ह्या सत्याची जाणीव होते. असा जवान जोर जोरात आरडा ओरडा करायला सुरवात करतो. त्याच बरोबर सुटकेसाठी जेवढे त्राण राहिले उरले असतील ते जमवून तडफड करायला लागतो. आता पण असेच झाले. एका तासाहून जास्त वेळ हिमखाईत पडल्यामुळे प्रचंड थंडीने त्याच्या शरीराच्या सगळ्या संवेदना गेलेल्या होत्या. अशा लोकांना संवेदना गेल्यात हेच समजत नाही व असे वाटत राहते की आपण खाईच्या तळाशी उभे आहोत. जे फसवे असते. फक्त मनाची विचार करायची शक्ती शाबूत असते. नेमक्या अशा वेळेला जर त्या अभाग्याला एकदम जाणीव झाली की खाली हजारो फूट खोल खाईत तो मध्येच लटकला आहे किंवा अडकला आहे, त्या वेळेला त्याला नुकतेच पोहायला शिकलेल्या मुलाला पोहता पोहता एकदम जसे कळते की तो पुलाच्या खोल भागात आला आहे तेव्हा जसे त्याला वाटते तसेच वाटते.
खाईतची खोली जाणून घेण्यासाठी टीम लीडरने हळूच बर्फाचा एक दगड त्या खाईत ढकलला.
'शीट्’. त्या ढकलेल्या दगडाचा खाईच्या भिंतींना आपटत खाली जाण्याचा न थांबणारा किणकिणाट ऐकून कॅप्टन निराशेने उच्चारला. हिमखाई खूपच खोल होती. त्याने स्वतःची दोरी कंबरेला नीट बांधली गेली आहे ते तपासले व अजून वेळ न घालवता खाईत उतरू लागला. खाई बाहेर उभा असलेला त्याचा साथीदार दोरी धरून, हळूहळू जसे लागेल तसे दोरीला ढील द्यायला लागला. हेलिकॉप्टराने आलेल्या टीम मधल्या बाकीच्या दोघांनी सुद्धा खाईत खाली जायची तयारी सुरू केली.
"माइक वन टू बेस. वी आर इन" रेस्क्यू टीम मधल्या एकाने रेडिओत खेकसले.
पंधरा किलोमीटर आणि १०००० फुटा खाली बेस कँपवर एका स्पीकर मधून आवाज प्रसारित झाला. प्रयत्न सुरू झाल्याचे बेस कमांडरला कळले व बेस कमांडरने निःश्वास टाकला. बेस कँपच्या बेस कंट्रोल रूम मध्ये बसलेले अनुभवी नेहमीच अशा संकटाच्या वेळेला रेस्क्यू टीम लीडरला सल्ला लागला तर द्यायला तयार बसलेले असतात. कंट्रोल रूम मध्ये एक डॉक्टर पण असतो. अशीच वेळ आली तर प्राथमिक उपचाराचा सल्ला तो देऊ शकतो. रेस्क्यू टीमला प्राथमिक उपचाराचे प्रशिक्षण दिलेलेच असते. काम करताना रेस्क्यू टीमला अजून कशाची जरूर भासली तर ताबडतोब निर्णय घेऊन बेस कमांडर अजून एका हेलिकॉप्टर बरोबर शक्य असतील त्या गोष्टी पाठवतो.
जवानाला वाचवता वाचवता कधी कधी भावनेच्या भरात रेस्क्यू टीमच्या हातून चुकीचा निर्णय घेतला जातो, त्याने बाकीच्यांच्या जीविताला धोका उद्भवण्याची शक्यता निर्माण होते. अडकलेल्या जवानाला वाचवता वाचवता बाकीच्या सगळ्यांचा जीव धोक्यात येऊ शकतो, अशा वेळेला कंट्रोलरुम मधले अनुभवी असले भावनेच्या भरात चुकीचे घेतलेले निर्णय रद्दबादल करतात. हे त्यांचे काम असते. नाहीतर भावनेच्या भरात खाईत पडलेल्याला वाचवण्यासाठी असे काही विपरीत निर्णय घेतले जातात की सगळ्यांचा जीव धोक्यात येतो.
रेस्क्यू टीमला जाऊन आता एक तास झाला होता. कंट्रोल रूम मधले सगळे घड्याळाकडे बघत डॉक्टरकडे प्रश्नार्थी मुद्रेने नजर वळवली. डॉक्टरने मान हालवत न विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर दिले "स्लिम्, व्हेरी स्लिम चांसेस ऑफ हिज सर्व्हायव्हल"
"बेस वि आर कमींग बॅक." चॉपर पायलटचा रेडिओ बोलत होता. रेस्क्यू टीमला पोहोचवण्याचा त्यांच्या कामाचा पाहिला भाग पूर्ण झाला होता. आता दुसऱ्या भागात रेस्क्यू टीम व त्या आठव्या अडकलेल्या जवानाला घेऊन बेसला परत यायचे राहिले होते. सगळ्यात महत्त्वाचे तेच होते. हा दुसरा भाग त्यांना पूर्णपणे नेहमी जमायचाच असे नाही. कधीकधी त्यांच्या परतीच्या लोकांच्या यादीत म्हणजे मॅनीफेस्ट मध्ये घेऊन गेलेल्या संख्ये पेक्षा कमीच नावे असायची! असे झाले तर फार वाईट वाटायचे सगळ्यांना.
अरुंद तोंडाच्या हिमखाईमुळे तेथल्या टीमने असा निर्णय घेतला की एका वेळेला दोनच मदतनीस खाईत उतरतील. दुसरे दोन, आतले दमले की आत जाण्यास किंवा आत गेलेल्यांना मदत करण्यास खाईच्या तोंडाशी तयार राहतील. अजून एका कारणासाठी ते बाहेर सज्ज राहिले होते ते म्हणजे, वाचवता वाचवता रेस्क्यू टीम मधलेच कोणी फसले तर त्याला लागलीच ओढून बाहेर काढायला.
टीम लीडर, खाईत उतरून अडकलेल्या जवाना जवळ गेला. आता पर्यंत एकटे पडलेल्या जवाना जवळ कोणीतरी आल्यामुळे, त्या जवानाच्या तोंडावर कृतज्ञतेचे भाव उमटले. टीम लीडरने त्याच्या हाताचा विळखा त्याच्या अंगा भोवती घातला तेव्हाच खाली गेलेल्या दुसऱ्या मदतनिसाने एका दोरीचा लूप करून अडकलेल्या जवानाच्या वरच्या अंगाला दोरीने बांधले. तो अजून खाली घसरू नये म्हणून व त्याला वर खेचायला सोपे जावे म्हणून पण. विजेरीच्या प्रकाशात अजून जवळून त्याला बघितल्यावर मदत पथकाला असे कळून आले की तो त्या घळीमध्ये अडकला आहे. काम अवघड आहे पण पूर्वी केलेले असल्या कारणाने त्यांना खात्री होती.
टीम लीडरने दोरीला दोनदा ताण दिला, वरच्यांना कळले आता ओढायला सुरवात करायची म्हणून. सगळ्यांनी मिळून दोरी ओढली. काहीच झाले नाही. त्यांना काही कळेना असे का होत आहे, दोरी कोठे फसली तर नाही ते बघितले पण कोठेही फसली नव्हती. खाईत त्या जवाना बरोबर असलेल्या टीम लीडरने ओरडून अजून जोरात ओढा म्हणून ऑर्डर सोडली.
आता जेवढे जवान खाईच्या वरती होते त्या सर्व जणांनी सगळी ताकद लावली तरी काही होईना. त्या ओढण्याने मात्र त्या अडकलेल्या माणसाला बसलेला दोरीचा विळखा अजूनच घट्ट झाला. एवढे करून सुद्धा अडकलेला जवान थोडा सुद्धा सरकला नाही. परिस्थितीचे गांभीर्य टीम लीडरला पहिल्यांदा कळले, मग टीमला कळले आणि शेवटी त्या अडकलेल्या जवानाला देखील. तो पर्यंत तो अडकलेला जवान शांत होता. त्याला वर काढले जायची आशा होती. रेस्क्यू टीम आल्याने त्याच्या आशा उंचावल्या होत्या. टीमने सुद्धा त्याला धीर दिला होता. रेस्क्यू टीमला तशी शिकवणच असते. अशा खाईत अडकलेल्याला पहिल्यांदा आशा दाखवायची. जीवनासाठी अतिशय महत्त्वाची असते. आशेच्या जोरावर माणूस कठीण परिस्थितही तग धरतो. पण आता त्या आठव्या जवानाला समजून चुकले की आपण अडकलो आहोत. हे कशामुळे झाले असेल? ज्या वेळेला तो खाईत पडला तेव्हा पासून सगळे त्याला सांगत होते हालू नकोस म्हणून. कारण हालण्याने, त्या बर्फाच्या खाईत तो अजून अजून रुतेल किंवा अजूनच आत जाईल व एकदा रुतला गेला की मग तिथे मदत पोहचवता येणार नाही. ह्या भयाने सगळे त्याला हालू नकोस अशी सूचना करत होते. त्याचे मन पण त्याला हेच इशारत होते. कारण हालचालीने ठिसूळ बर्फ तुटतो व आधार सुटल्यावर सरळ खाली हजारो फूट पृथ्वीच्या पोटाशी पडणे जेथून सुटका नाही. पण न हालण्याचा ह्याच निर्णयामुळे सगळा सत्यानाश झाला होता. सगळ्यांना एकदम समजून चुकले की जवान खाईत पडल्यावर जेथे अडकला होता तेथला बर्फ नेहमी आढळणारा ठिसूळ बर्फ नव्हता पण त्या उलट येथे असणारा बर्फ टणक होता. त्यामुळे अशी घट्ट पकड बसली गेली होती की त्याला बांधलेल्या दोरीला कितीही जोर लावून ओढले तरी तो जवान काही सुटत नव्हता. ओढण्यामुळे मात्र दोरी त्याच्या शरीराला आवळत चालली होती. साऱ्यांच्या आशेवर पाणी पडले. आता काहीतरी दुसरा उपाय शोधावा लागणार होता. वेळ निघत चालली होती. तो जेव्हा पडला तेव्हा त्याचे शरीर त्या बर्फाच्या भिंतीला लागल्या मुळे अगदी निमिषासाठी त्याच्या अंगाच्या गरमीने बर्फाचा पृष्ठभाग थोडा वितळता वितळता लागलीच असलेल्या गारठ्याने गोठला गेला असावा व त्या प्रक्रियेत त्याचे अंग बर्फाच्या भिंतीला पक्के चिकटले गेले असावे. आपल्या फ्रीजमध्ये जसे कधीकधी बर्फाचा ट्रे फ्रीझर मध्ये चिकटून बसतो तसा. असे झाले असेल किंवा, ग्लेशीयरच्या पोटामध्ये सारखी हालचाल होत असते, नेमकी तो पडल्या पासून कदाचित खाईचा निमुळता होत गेलेला भाग अजूनच जवळ आला असेल व आपल्या मगर मिठीत त्याला घेतले असेल. हे कारण का ते कारण, कोणालाच कळायला मार्ग नव्हता. ह्या गोष्टीवर विचार करण्या इतका त्यांच्या जवळ वेळ पण नव्हता. त्या घटकेला टीम लीडरला एवढे कळत होते की वरच्या नऊ लोकांची एकवटलेली ताकद त्या दोरीला ओढत होती तरी सुद्धा अडकलेला जवान निघू शकत नव्हता.
टीम लीडरला सुचेनासे झाले. त्याने आपली दोरी दोनदा विशिष्ट तऱ्हेने ओढली, हा वरच्या साथीदारांना बाहेर काढण्यासाठी इशारा होता. त्याला बाहेर येऊन रेडिओवरून बेस कँपच्या कंट्रोल रूम मधल्या अनुभवी लोकांना विचारावेसे वाटत होते. त्यांना माहिती असेल. पूर्वी कधी असे झाले नव्हते. इतकी घट्ट पकड पूर्वी कधी त्याने अनुभवली नव्हती. त्या आणीबाणीच्या प्रसंगामध्ये तो असा एकदम त्या अडकलेल्या जवानाला सोडून वरती आल्याने त्या जवानाच्या मनात काय कोलाहल माजला असेल ह्याचा क्षणासाठी त्याला विसर पडला होता. त्याच्याच्याने हा विचारच झाला नाही. ह्या सगळ्याचा विचार करायची ही वेळ पण नव्हती. त्याला बाहेर कसे काढायचे हा एवढाच विचार काय तो उरला होता.
वरच्या लोकांना दुसऱ्या दोरीची दोनदा झालेली इशाऱ्याची ओढ जाणवली. त्यांनी ओढत असलेली पहिली दोरी सोडली व टीम लीडरला बाहेर काढण्यासाठी, ते दुसरी दोरी ओढू लागले. बाहेर येताक्षणीक टीम लीडरने ऑपरेटर कडून हॅन्डसेट हिसकावून घेतला व हॅन्डसेट तोंडाशी धरून त्यात बोलू लागला "ही इज स्टक. वी कांट पुल हिम आऊट". बेस कंट्रोल रूम मध्ये ही बातमी विजे सारखी चमकली. बेस कमांडरला विश्वासच बसेना. "माइक वन्, कम अगेन" रेडिओ वरून त्याने विचारले. "ही इज स्टक. डॅम इट. ही इज फ्रोझन लाइक अॅन आईस क्यूब. वी ट्राईड पुलींग हिम. ही इज नॉट बजींग." दुसऱ्या ठिकाणी, बऱ्या परिस्थितीत, बेस कमांडरला बरे वाटले असते त्याला कोणी तरी सल्ला विचारत आहे हे जाणून. ह्या कठीण परिस्थितीत त्याच्या कडे देण्यासारखा सल्लाच नव्हता.
"यू नीड मोर मेन अप?"
टीम लीडरने उत्तर दिले "नो यूज. द रोप ईज स्ट्रेचींग." त्याच्या ह्या वाक्याचा अर्थ कंट्रोल रूम मधल्या साऱ्यांना कळले. त्या दोरीला जर का मन असते तर आज तिला ‘दोरी’ असा शब्दप्रयोग करणआऱ्यांचा राग आला असता व अपमान वाटला असता. ही दोरी विशेष वेगळी असते. अद्ययावत तंत्रज्ञान वापरून ह्या महागड्या दोरीची निर्मिती केलेली असते. निर्मिती झाल्यावर प्रत्येक दोरीची वजन उचलण्याच्या क्षमतेची चाचणी केली जाते. ही दोरी शक्तिवान धाग्यांनी बनवलेली असते व शक्तिवान धाग्यांची अशी वेणी घातलेली असते की अगदी सडपातळ दिसणाऱ्या दोरीत भयंकर ताकद असते. पण तरी सुद्धा तिच्यावर जर असीम जोर पडला तर ती ताणली जाऊ लागते व इशारा करते की जोर जास्त होत आहे. ती दोरी सहजच पाच सहा माणसांचे वजन घेऊ शकते.
कंट्रोल रूम मधली मंडळी गोंधळली. टीम लीडरला अजून वाटत होते व विश्वास होता की काही तरी चांगला सल्ला कंट्रोल रूम मधून मिळेल म्हणून. अशा परिस्थितीत कंट्रोल रूम मधल्यालोकांना टीम लीडरला काहीतरी सल्ला देणे भागच होते.
(क्रमशः)
आपण राष्ट्रव्रत घेतले का? त्या बद्दल येथे वाचा
http://rashtravrat.blogspot.com/2010/05/rashtravrat.html
आणि येथे
http://bolghevda.blogspot.com/2010/10/blog-post.html
(मराठी ब्लॉग)
प्रतिक्रिया
4 Jan 2013 - 8:09 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
अश्या परिस्थितीमधे एखाद्याला मागे सोडुन द्यायचा निर्णय घेणं किती अवघड असेल ह्याची कल्पना येते आहे. एवढ्या अडचणींचा सामना करत आपले जवान तिथे सीमा-रक्शण करत आहेत. सगळ्या जवानांना मानाचा मुजरा.
माझ्या चुलत भावाचं पोस्टिन्ग सियाचिन ग्लेशियर्स ला होतं. तो परत आल्यावर त्यानी पण अश्या घटना सान्गितल्या होत्या. सर्व भार्तिय सैनिकन्चे देव रक्शण करो.
4 Jan 2013 - 8:10 pm | अमोल खरे
कठीण आहे. तो बिचारा जिवंत बाहेर येणे कठीण वाचताय. पुढील भाग लवकर टाका. राहावत नाहीये.
4 Jan 2013 - 8:12 pm | सूड
वाचतोय !!
4 Jan 2013 - 9:04 pm | डॉ सुहास म्हात्रे
पुढचा भाग लवकर टाका.
4 Jan 2013 - 9:58 pm | रेवती
वाचतीये. वाचकाच्या मनावर जर ताण येत असेल तर तिथे असणार्यांची परिस्थिती कशी असेल याचा विचार करवत नाही.
4 Jan 2013 - 10:09 pm | विकास
सहमत!
4 Jan 2013 - 10:36 pm | अन्या दातार
सहमत
4 Jan 2013 - 10:11 pm | अर्धवटराव
हे तर काहिच विशेष नाहि. एखाद्या सामान्य पेण्टरचे काम पण एव्हढेच अवघड असते... उगाच कशाला सैन्याच्या परिस्थितीचा बाऊ करायचा (संदभ - मिपावरील जुन्या धाग्यांच्या प्रतिक्रिया)
अवांतर - हे सगळं वाचुन खुर्चीवर बसल्या बसल्या घाम फुटला... त्याकरता प्रत्यक्ष पशिक्षण घेऊन तसली कामे तडीस नेणारे कळिज काय लेव्हलचे असेल.. कल्पना करवत नाहि. हॅट्स ऑफ्फ.
अर्धवटराव
4 Jan 2013 - 10:30 pm | इष्टुर फाकडा
घाम तर फुटलाच पण तो गोठून मीही अडकतो का काय अशी भयानक भीती वाटली !
4 Jan 2013 - 10:36 pm | पैसा
मलाच तिथे बर्फात रुतल्यासारखं वाटायला लागलं. पुढचा भाग लवकर लिहा!
5 Jan 2013 - 1:19 am | संजय क्षीरसागर
वेडं व्हायची वेळ आली. सलाम!
5 Jan 2013 - 4:00 am | कौशी
पैसाताईशी सहमत..
5 Jan 2013 - 8:30 am | ५० फक्त
फार वाईट अशी वेळ येणं, पण नाईलाज आहे किंवा असतो.
आणि काही विशिष्ट परिस्थितींच्या बाबतीत अर्धवटरावांशी देखील सहमत, अर्थात त्याच धंद्यात असल्यानं, अशा ठिकाणी बर्फ नसतो पण जीव जाण्याची पातळी तीच असते आणि वर वर्णन केल्यात तशा दो-या बि-या तर काहीच नसतं..
5 Jan 2013 - 9:05 am | यशोधरा
बापरे...
5 Jan 2013 - 10:37 am | लॉरी टांगटूंगकर
नेमक्या जागी भाग संपव्लात,
असे जब्रा अनुभव वाचतांना थांबणे जमत नाही, जमल्यास भाग सलग टाका...
बाकी, काय लिहावे हे पण कळत नाहीये वाचल्यानंतर ....
5 Jan 2013 - 11:30 am | चैदजा
काल रात्री हा भाग वाचला. त्या जवानेचे काय झाले असेल ह्या विचाराने रात्रभर झोप आली नाही.
5 Jan 2013 - 12:10 pm | सस्नेह
रेस्क्यू टीमच्या धैर्याचे कौतुक वाटते.
5 Jan 2013 - 12:32 pm | शैलेन्द्र
काय लिहू? निःशब्द.. सलाम..
5 Jan 2013 - 2:25 pm | अरुण मनोहर
अशा परिस्थितीत राहून देशाचे रक्षण करणार्या विरांना कोटी कोटी प्रणाम! त्यांचे ऋण आपल्यावर सदैव राहील. पण त्याची अंशतः तरी भरपाई करण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजेत.
5 Jan 2013 - 4:41 pm | केदार-मिसळपाव
फ़्रोस्ट बाईट सारखाच एक अनुभव थोडा जवळून घेतलाय...त्यामुळे बर्फ किती नुकसान करू शकतो हे जाणतो.. तुम्ही प्रचंड छान लिहित आहात. असेच लिहिणे चालू द्या...
5 Jan 2013 - 5:04 pm | स्पंदना
आई ग! वाचत असताना गोठायला झाल. फार टेन्स वाटतय वाचताना.
5 Jan 2013 - 5:35 pm | हारुन शेख
वास्तव कल्पनेपेक्षा जास्त थरारक असते याचा अनुभव देणारं लेखन. मस्त.
5 Jan 2013 - 6:10 pm | प्रचेतस
चित्तथरारक वर्णन
5 Jan 2013 - 6:43 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
लेखनाची शैली अशी की वाचक सर्व घटना अनुभवत आहेत, अशी आहे.
पुढे काय झाले, लवकर लिहा........
-दिलीप बिरुटे
5 Jan 2013 - 6:58 pm | अनन्न्या
......................
5 Jan 2013 - 9:10 pm | पिवळा डांबिस
पुढील भागाची वाट बघतोय...
5 Jan 2013 - 9:29 pm | मुक्त विहारि
चित्तथरारक...
5 Jan 2013 - 9:36 pm | रणजित चितळे
आपल्या सर्वांच्या प्रतिक्रीयांबद्दल आपल्याला धन्यवाद.
पुढचा भाग शेवटचा आहे.
7 Jan 2013 - 10:51 am | चेतन माने
अश्या परिस्थितीत डोकं कसं काय चालू शकत !!!!
पुभाप्र
8 Jan 2013 - 6:40 pm | कवितानागेश
...गोठलेय...... पुढचा भाग टाका लवकर.
8 Jan 2013 - 11:03 pm | एस
तो बर्फाळलेला पण छातीचा भाता अजूनही चालू असलेला जवान, त्याला वाचवण्यासाठी त्या हिमभेगेत उतरलेले व तो बर्फात आता रूतून बसलाय याची जाणीव झालेले ते दोघे, वरती आपल्या सहकार्यांच्या अवस्थेबद्दल चिंतातूर इतर सैनिक, बेसकँपमधील घालमेल आणि क्षणोक्षणी हातातून आयुष्याचा घास थोडाथोडा हिरावून नेत असलेली घड्याळाची क्रूर टिकटिक...
ह्या प्रत्येकाच्या ठिकाणी स्वतःला ठेवून बघतोय.
लेखमाला वाचतोय.
9 Jan 2013 - 12:36 pm | मनराव
अचाट धाडस........ डोळ्या समोर सगळी परिस्थि उभि रहिली.......
9 Jan 2013 - 2:01 pm | मृत्युन्जय
च्यायला. बर्फात अडकलेल्या माणसाला बाहेर काढणे म्हणजे दोरी टाकुन ४ लोकांनी जोर लावुन ओढायचे एवढी सोप्पे गोष्ट नाही हे कळले.
10 Jan 2013 - 6:43 am | रणजित चितळे
?
10 Jan 2013 - 8:45 am | श्री गावसेना प्रमुख
एव्हढी सोपी गोष्ट नाहीये हे त्येन्ना कलले,हे तुम्हला कलले का?
10 Jan 2013 - 2:30 am | उपास
जीवन मरणाच्या दारात थांबलेल्या आणि क्षणाक्षणाने मृत्युजवळ नेणार्या या घटनेचे जबरदस्त शब्दांकन केलेत.
बाळबोध वाटेल पण राहावत नाहीये म्हणून विचारतोय, ह्या एवढ्या कसोटीच्या क्षणी वापरता यावं म्हणून आईस मेल्ट लिक्विड जवळ ठेवता येऊ नये काय? गाड्यांवर आईस (स्नो नव्हे)चे थरच्या थर साचले असताना अमेरिकेत सर्रास वापरला जातो हा प्रकार आणि एका सेकंदात (हो सेकंदात) बर्फ वितळून पाघळायला लागतो.
10 Jan 2013 - 10:03 am | स्पंदना
मग एका सेकंदात सगळच बर्फ वितळेल त्याच्या आजुबाजुचं आणि पडेल ना खाली तो. मला वाटतय अश्या वेळी सारे उपाय अंडर कंट्रोल असावेत.
10 Jan 2013 - 10:13 am | उपास
अहो, दोरीने बांधतायतना त्याला आधी. आणि निदान लिक्विडमुळे भुसभुशीत झाला बर्फ तरी थिजून अडकायला होणार नाही ना. हे लिकिड -३०फ पर्यंत चालतं म्हणे. असो, उगी डोक्यात कीडा आला कारण असं जिवंत बर्फत थिजण ह्याची कल्पनाच करवत नाहीये :(
10 Jan 2013 - 10:08 am | स्पा
पुढील भाग लवकर टाका प्लीज
30 Jan 2013 - 3:08 pm | मनराव
+११११
10 Jan 2013 - 10:15 am | ऋषिकेश
मनावर प्रचंड ताण आला. अश्या परिस्थितीत जगात जिथे जिथे सैन्यच नाहि तर मानवी वस्ती आहे त्या सगळ्यांचेच रक्षण करो अशी प्रार्थना करावीशी वाटली.
अनुवाद उत्तम झाला आहे
10 Jan 2013 - 4:09 pm | तर्री
चीतालेसो : नेहमी प्रमाणेच मनाची पकड व काळजाचा ठाव घेणारे लेखन.