हॉटेल शिवीभोजन थाळी

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जनातलं, मनातलं
18 Jan 2020 - 8:53 am

हॉटेल शिवीभोजन थाळी

मालक: हॅ हॅ हॅ.

मालक: सोन्या, नालायका बघ रे, गिर्‍हाईक आलं.
हॅ हॅ हॅ या या या.
बसा बसा बसा.

मालक: सोन्या रांडीच्या, पाच नंबरचे कळकटलेले टेबल आरशासारखे पुस, अन गिर्‍हाईकाला काय लागते ते पुस.
हॅ हॅ हॅ.

मालक: सोन्या नरसाळ्या, अरे माझा कडमड्या मोबाईल कुठे आहे? त्या पेताड भाजीवाल्याची भाजी आली नाही अजून. त्याच्या *डीत जास्त माज आलेला आहे. निट वेळेवर भाजी सप्लाय करत नाही तर मग मी थाळीत काय *ट देवू काय?

मालक: सापडला रे मोबाईल. माझ्याच *डीखाली होता रे तो सोन्या शिंदळीच्या. तु गिर्‍हाईकाला तुझे पाणी पाज. हॅ हॅ हॅ.

मालक: अरे तो ढिल्ला पोळीवाला आला नाही अजून सोन्या? कुठे उलथला काय माहित.
त्या आठवी नापास मंदने अजून पोळ्या दिल्या नाहीत. मग भो**च्या थाळीत काय फक्त भात देवू काय रे सोन्या गाढवीच्या?
गिर्‍हाईक देव आहे आपला. त्याला ताटकळत ठेवून ताटात काय ठेवू? आमचा हा? म्हणजे मेंदू?

मालक: अरे दळभद्री, अरे तो गॅस संपलाय किचनमध्ये बघ जरा. नाहितर तुला बसवेल गॅसच्या जागी. हॅ हॅ हॅ.

गिर्‍हाईक १: ओ मालक, किती वेळ लागेल अजून थाळी सजवायला?

मालक: तुम्ही थोडे थांबा हं गिर्‍हाईकदादा. ह्या भा**ऊ पाजी गॅसला आताच संपायला पाहिजे होते. माठ्या, सोन्या भामट्या बघ जरा. येथे येणारे मोठे भुक्कड असतात त्यांची सोय पहायला नको का घनचक्कर? ती कोण पाहणार? तुझा ठोल्या बाप की माझा उलथलेला चुलता?

गिर्‍हाईक २: ओ मालक येथे बघा. चमचा बघा किती घाण आहे? न धुतलेलाच दिलेला दिसतोय.

मालक: अरे तिच्यायला! अरे पोंग्या, बघ जरा तो चमचा, बदलून दे तिन नंबरला. हॅ हॅ हॅ, आजकाल चमचे जरा जास्तच झालेत हो. मधे मधे कडमडतात. त्यामुळे होते चुकून. बाजूला राहून जातो एखादा डुकरासारखा चमचा. आमच्या मोरीतले माणसे म्हणजे एकदम छपरी आहेत बघा. आताच त्या बोंगाड्यांना तासतो.

मालक: अरे ए सुक्काळीचे, जास्त बेवडा मारून आलेत काय आज सकाळी? दळभद्री साले, रोज कुत्र्यासारखे खातात फक्त. अन भांडी निट घासायला नको का तुम्हा नालायकांना? अरे गिर्‍हाईक आमच्या नावाने ओरडते ना बैलांनो.

नोकर: मालक नळाला पाणी आलेले नाही कालपासून. जे आहे त्यातच घकवतोय.

मालक: अरे ए बिनडोक टमरेल, भो**च्य, तु मला आज सांगतो? कालच सांगितले असते तर मागवला असता एखादा पाण्याचा टँकर.

वेटर: एक वडापाव, पंधरा रुपये घ्या मालक.

मालक: अहो, सुटे द्या साहेब पंधरा रुपये. *टभर बिलासाठी कुठे उगीचच पाचशेची नोट काढता.

वेटर: मालक पुढचे गिर्‍हाईक. पाच नंबर. शिवीभोजन थाळी. दहा रुपये घ्या.

गिर्‍हाईक १: हे घ्या दहा रुपये.

मालक: नाव सांगा.

गिर्‍हाईक १: नाव कशाला?

मालक: अहो थाळी घेतली तर नाव सांगावे लागेल. च्यामारी, *टभर पैसे मिळवायचे अन सगळ्या नोंदी ठेवायच्या असे फुकटे काम दिले आहे बघा सरकारने.
गिर्‍हाईक काय एकदम उपाशी असते. येते आपले हादडायला, हॅ हॅ हॅ, म्हणजे तुम्ही नाही हो. उगाच आपले हे.

गिर्‍हाईक १: बरं बरं राहूद्या ते.

मालक: काम काय करतात ते सांगा.

गिर्‍हाईक १: अहो ते कशाला आणखी.

मालक: असे कसे? अहो सगळी कुंडली द्यावी लागेल बघा एकदा का शिवीभोजन थाळी खाल्ली तर. अनुदानीत आहे ना. *टभर पैशात पोटभर खा. हॅ हॅ हॅ.
अच्छा.

मालक: आधार क्रमांक काय?

गिर्‍हाईक १: आता तो पण द्यायचा का?

मालक: मग! अहो आता तर तो येथे द्यावा लागतोय. काय सांगावे पुढे मागे तर सुलभातही द्यावा लागेल. आहात कोठे. आता उद्याच या. रात्री शिवीथाळीची अपेक्षा करू नका. उपाशी झोपा. या पुन्हा शिवीभोजनाचा लाभ घ्यायला.
हॅ हॅ हॅ.

मालक: सोन्या खुळ्या बधीर लेका, शिव्याथाळीचा आजचा कोटा संपला बघ. त्यातल्या त्यात या फुकट्या कामात बरे आहे की फक्त दिवसाच हि शिवीथाळी द्यावी लागते आहे. सोन्या फुकट्या दलिंदरा, अरे, बाहेर बोर्ड लाव शिवीथाळी संपली म्हणून.
हॅ हॅ हॅ.

पाकक्रियावाङ्मयकथाविनोदसमाजपारंपरिक पाककृतीमराठी पाककृतीराजकारणमौजमजाआस्वादलेखबातमीशिफारसविरंगुळा

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

18 Jan 2020 - 1:11 pm | मुक्त विहारि

मस्तच. ...

गंजीफ्रॉक घातलेल्या ढोल्या मालकाचे चित्र डोळ्यासमोर उभे राहिले !
मस्त !!!

गड्डा झब्बू's picture

20 Jan 2020 - 12:25 pm | गड्डा झब्बू

भारी लिहिलंय!! मज्जा आली वाचायला!

कुमार१'s picture

20 Jan 2020 - 7:33 pm | कुमार१

आवडले. छान

हॅ हॅ हॅ...आधी शीर्षक आणि मग लेख वाचून मजा आली!
पुढील लेखनास शुभेच्छा!

चौथा कोनाडा's picture

8 Feb 2020 - 3:52 pm | चौथा कोनाडा

मस्त, खुसखुशीत ! फर्मास खिल्ली, स्किट सादर करण्याजोगे !

बायदवे, पहिल्या दोन-चार दिवसांच्या कौतुकांच्या बातम्या नंतर या शासकिय भोजनाची परिस्थिती कशी आहे काही आयडिया ?