मुक्तक

चक्र

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in जे न देखे रवी...
18 Jun 2025 - 12:28 pm

कवीने वाचावे
वाचले साचावे
वाचले, साचले
साचले, सुचले
आतल्या आचेच्या
प्रखर धगीत
प्रज्ञेच्या मुशीत
शब्दांच्या साच्यात
अल्लाद ओतून
पाचही प्राणांची
पाखर घालून
उत्फुल्ल, उत्कट
प्रतिभा शिंपून
वाटून टाकावे

पुन्हा एकदा
कागद कोरा ~
सृजन चक्राचा
नवीन फेरा

मुक्तक

इंद्रायणीकाठी

कर्नलतपस्वी's picture
कर्नलतपस्वी in जे न देखे रवी...
16 Jun 2025 - 7:59 am

इंद्रायणी काठी
सुंदर कुंडमळा
वैष्णवांचा मेळा
दाटतो इथे....

पावसाची झडी
इंद्रायणी दुथडी
वैष्णवांची दाटी
इंद्रायणीकाठी......

एकच तो सांधा
वैष्णवांचा वांधा
आड्याल पड्याल
कसे जावे....

विकांती आकांत
एक्याजागी दाटला
सहावेना भार
वैष्णवांचा....

शेल्फ्या,तूनळ्यांची
उडाली एकच घाई
पायपोस कुणाचा
कुणाच्या पायी?....

थरारला सांधा
पेकाट मोडले
वैष्णव अवघे
सांडले,इंद्रायणी

भितोत्सवे आता
उठला कल्लोळ
उडाला गोंधळ
भावीकांचा...

कालगंगामुक्तक

नदीष्ट (ऐसी अक्षरे -२८)

Bhakti's picture
Bhakti in जनातलं, मनातलं
14 Jun 2025 - 11:55 am

नदीष्ट - नदीच्या काठावरती विस्तारलेले भावविश्व

१

गप्पीष्ट, रागिष्ट किंवा नादीष्ट या शब्दांच्या गोतावळ्यात लावला असता नदीच्या प्रवाहाच्या छंदात मग्न तो नदीष्ट!

मुक्तकजीवनमानआस्वादसमीक्षा

शाळेचा पहिला दिवस...

कर्नलतपस्वी's picture
कर्नलतपस्वी in जे न देखे रवी...
10 Jun 2025 - 7:35 am

उन्हाळ्याची सुट्टी संपली. शाळा सुरू झाल्या. वसंत ऋतूत जशी पालवी फुटते ,आनंदाचे वातावरण निर्माण होते तसाच उत्साह, उर्जा शाळेतल्या मुला मुलीं मधे असतो. आई बापाची लगबग,तगमग, व मुलांचा उत्साह बघताना काही पंक्ती सुचल्या.मोठी मुले आपापल्या मित्रांबरोबर पुनर्भेटीचा आनंद घेत होते तर पहिल्यांदाच जाणारी,छोटी आई बापाला बिलगुन होती.

आनंदकंद वृत्तआयुष्यआशादायकउकळीवावरकविताबालगीतमुक्तक

त्रिमितीच्या तुरुंगात

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in जे न देखे रवी...
7 Jun 2025 - 8:46 pm

त्रिमितीच्या तुरुंगात
घुसमटे जीव ज्यांचा
उघडीन त्यांच्यासाठी
मार्ग चवथ्या मितीचा

कळसा नंतर पाया
तिथे नियम असतो
कार्यकारण भावाचा
जाच जराही नसतो

स्थळ-काळात तिथल्या
पेव खाच खळग्यांचे
उतरवी वर्तमान
भूत वेडे भविष्याचे

दोर परतीचे मात्र
नाही कापणार नक्की
आपापल्या कोठडीची
खूण ध्यानी ठेवा पक्की :)

मुक्तक

सुट्टी

माहितगार's picture
माहितगार in जे न देखे रवी...
31 May 2025 - 1:21 pm

सुट्टी

चालत्या घड्ञाळासारखी असावी
बाकीच्या जगाला चालू दिसताना
आत ते नियमीत निवांत
अनवाईण्ड होत असते.
ते इतरांच्या वेळेवर नाही
पळत, इतरांना
स्वतःच्या वेळेवर पळवते.

जेव्हा ते पुर्ण अनवाईण्ड होते
तेव्हा त्याचा आराम चालू होतो
पुन्हा कोणी रिवाईण्ड करे पर्यंत

cyclinggholअनर्थशास्त्रअविश्वसनीयआयुष्यआरोग्यदायी पाककृतीकालगंगागुलमोहर मोहरतो तेव्हाजीवनप्रवासवर्णनबेड्यांची माळरतीबाच्या कविताशेंगोळेशांतरसमुक्तक

चुकलो का मी?

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in जे न देखे रवी...
24 May 2025 - 9:09 pm

दिवास्वप्न पाहत असताना
अधांतराची भक्कम भूमी
सोडुनी थोडा भटकत गेलो
चुकलो का मी?

वायफळाचा मळा उन्हाळी
मृगजळ शिंपून वाढविला मी
पीक पाखरे खाऊन गेली
चुकलो का मी?

वृत्त, छंद, गण बेड्या तोडून
भ्रमरासम स्वच्छंदपणे मी
फिरता, रेखीव वाट विसरलो
चुकलो का मी?

विस्मरणाची गडद सावली
झाकोळत जरी होती तरी मी
स्मरणरंजनी वाहत गेलो
चुकलो का मी?

मुक्तक

गर्जा महाराष्ट्र (ऐसी अक्षरे -२६)

Bhakti's picture
Bhakti in जनातलं, मनातलं
20 May 2025 - 4:12 pm

#गर्जामहाराष्ट्र

लेखक-सदानंद मोरे
अ
इतिहासाची मांडणी हितसंबंधांच्या दृष्टीने करीत राहिल्याने अनेक दोष त्यात येतात, ती अपूर्ण राहते.

इतिहासवाङ्मयमुक्तकप्रकटनआस्वाद

तत्वज्ञान अनुत्तर भिषक्को भगवान बुद्ध आणि अन्य प्रज्ञावंत (ऐसी अक्षरे -२५)

Bhakti's picture
Bhakti in जनातलं, मनातलं
15 May 2025 - 6:16 pm

अतत्वज्ञान अनुत्तर भिषक्को भगवान बुद्ध आणि अन्य प्रज्ञावंत हे संशोधक डॉ .बी. आर जोशी अगदीच छोटेखानी पुस्तक वाचले. भारतीय तत्त्वज्ञान परंपरांपैकी एकाही तत्त्व‌ज्ञानाचा परिपूर्ण अभ्यास करण्यासाठी जन्म पुरेसा नाही, हे पुन्हा पटले.

धर्ममुक्तकसाहित्यिकआस्वादमाहितीसंदर्भ

तीट

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in जे न देखे रवी...
13 May 2025 - 9:59 am

ओथंबल्या नभाखाली
भारलेली हवा

सोसाट्याच्या वाऱ्यामध्ये
सैरभैर थवा

गर्जणारा मेघ शिंपे
सृजनाचा ठेवा

वीज ओढी कड्यावर
ओरखडा नवा

काजव्यांच्या ठिणग्यांचा
पानोपानी दिवा.

आरस्पानी स्वप्नी सांगे
शकुनाचा रावा,

"दृष्टावल्या भवताला
काळी तीट लावा "

मुक्तक