Skip to main content

तीट

लेखक अनन्त्_यात्री यांनी मंगळवार, 13/05/2025 09:59 या दिवशी प्रकाशित केले.
ओथंबल्या नभाखाली भारलेली हवा सोसाट्याच्या वाऱ्यामध्ये सैरभैर थवा गर्जणारा मेघ शिंपे सृजनाचा ठेवा वीज ओढी कड्यावर ओरखडा नवा काजव्यांच्या ठिणग्यांचा पानोपानी दिवा. आरस्पानी स्वप्नी सांगे शकुनाचा रावा, "दृष्टावल्या भवताला काळी तीट लावा "
लेखनविषय:

वाचने 2093
प्रतिक्रिया 8

प्रतिक्रिया

आगोदरचे सटिक, समर्पक आणी सुंदर शैलीत वर्णन केले आहे. भावले.

वाह .. सुंदर ! अ ति श य चित्रदर्शी ! HPR124

लिहिते राहा. -दिलीप बिरुटे

गर्जणारा मेघ शिंपे सृजनाचा ठेवा वीज ओढी कड्यावर ओरखडा नवा
आवडले!

गर्जणारा मेघ शिंपे सृजनाचा ठेवा वीज ओढी कड्यावर ओरखडा नवा काजव्यांच्या ठिणग्यांचा पानोपानी दिवा. आरस्पानी स्वप्नी सांगे शकुनाचा रावा
व्वा अप्रतिम

सुंदर चित्रण! भवतालाचं आणि भावनांचंही!