लेखकमीनल गद्रे.यांनी मंगळवार, 22/01/2008 01:40 या दिवशी प्रकाशित केले.
मेघानी केली अवनीची पूजा
कधी थेंबांनी आला पाऊस राजा
हिमपाकळ्या अलगदल्या ताज्या
अंगणी माझ्या तृणावरी विसावल्या.
नवरस ,नव आल्हाद ताजा
वाटे पूजेची मज मौजमजा
मेघाची काय वर्णावी भक्ती
कळेना अशी ही सॄष्टीची युक्ती.
छान कविता.
मला वाटते 'अलगदल्या' हाच शब्द असावा आणि मला तोच जास्त आवडला. 'उलगडल्या' सुद्धा असेल, पण अलगदल्या म्हणजे हळूच अलगद खाली आल्या आणि विसावल्या...
बिपिन.
अलगदल्या म्हणजे हळूच अलगद खाली आल्या आणि विसावल्या...
वा वा!!! बिपिनराव धन्यवाद. ही कल्पना विचारातच घेतली नव्हती. अलगदल्या!!! आता त्यामागची कल्पना कळल्यावर हा शब्दही खूप खूप आवडला :)
-ऋषिकेश
प्रतिक्रिया
सॄष्टीची युक्ती
खूपच छान..
हिमपाकळ्या
हिमपाकळ्या अलगदल्या
छान...
मलाही वाटते 'अलगदल्या' असावा
In reply to छान... by बिपिन कार्यकर्ते
अलगदल्या
In reply to छान... by बिपिन कार्यकर्ते
खूप छान
कविता फारच .....