मिस्सळ मी चापतो, तर्रीची, मिस्सळ मी चापतो...
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
मित्रहो, कोल्हापूरी मिसळ हा आमचा फार `जिव्हा'ळ्याचा विषय.
म्हणूनच आमचे परममित्र मा. धोंडोपंत यानी
मिसळपाव या स्थळाची वाट दाखवताच आम्हाला विलक्षण आनंद
झाला. कोल्हापूरातील विविध मिसळस्थळे आमच्या उत्तम परिचयाची.
`येथे उत्तम मिसळ मिळेल' असा फलक असलेल्या हाटेलात मिसळ कधीच
चांगली नसते... पण ज्या हाटेलावर नावाचा फलकसुद्धा नसतो, अशी उत्तम
मिसळस्थळे केवळ वासावरून आम्ही हुडकत असतो..
परवा कधीतरी `राधा ही बावरी हरीची' हे गाणे मनात घोळत असताना आम्ही
मिसळ चापत होतो... या दोन्हीची कधीतरी सरमिसळ झाली... आणि हे
विडंबन जन्माला आले... तिखट मानून घ्या...
मिस्सळ मी चापतो, तर्रीची, मिस्सळ मी चापतो...
मस्तीत दंग, तो लाल रंग, हा गंध कसा दरवळतो
येताच वास, घेऊन ध्यास, हा पाय त्या दिशे वळतो
ह्या चालत जाता वाटेवरूनी, स्वर्गच हाती येई
मिस्सळ मी चापतो, तर्रीची, मिस्सळ मी चापतो...
उसळ, मिसळ अन् फरसाणा.. पिळून लिंबू घेताना
घास तिखट तो खाताना.. घामल धारा झरताना
हा झणझणणारा स्वाद सदाचा, जीभेस बिलगून राही
हा उनाड कांदा गूज चवीचे कानी सांगून जाई
ह्या चालत जाता वाटेवरूनी, स्वर्गच हाती येई
मिस्सळ मी चापतो, तर्रीची, मिस्सळ मी चापतो...
आज इथे या मिसळस्थळी.. क्षण भाग्याचे दुणावती
नाक सारखे पुसताना, आनंदे डोळे भरती
हे सत्य असे की स्वप्न म्हणावे, भान हरपूनी जाई
मिसळीवाचून जीवनास या अर्थच काही नाही
ह्या चालत जाता वाटेवरूनी, स्वर्गच हाती येई
मिस्सळ मी चापतो, तर्रीची, मिस्सळ मी चापतो...
... (मिसळपावपरायण) अविनाश ओगले, बेळगाव (महाराष्ट्र)
वाचने
8968
वाचनखूण
प्रतिक्रिया
17
वा वा वा वा
जोरदार स्वागत....!
In reply to जोरदार स्वागत....! by विसोबा खेचर
धारवाड डिष्ट्रीक
In reply to धारवाड डिष्ट्रीक by अविनाश ओगले
अविनाशशेठ,
वाह वा !!!
अविनाशराव तुमचे सहर्ष स्वागत!
झकास....
झन्नाट
विडंबन झक्कास आहे.
मस्त विडंबन
वाह!
उत्तम
वा काय मस्त विडंबन
धन्यवाद.... सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद.
अप्रतिम...
धमाल
वा ....... इतरहि