✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

आंतर्जालावर प्रत-अधिकाराची मालकी कशी ठरावी? मालकाची ओळख काय? चोराची काय?

ध
धनंजय यांनी
Mon, 01/21/2008 - 21:42  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
5552 वाचन

💬 प्रतिसाद (8)

प्रतिक्रिया

शक्यता

सुनील
Mon, 01/21/2008 - 21:53 नवीन
एकच व्यक्ती दोन विभिन्न संकेतस्थळांवर वेगवेगळ्या नावांनी वावरणे सहज शक्य आहे (किंबहुना, एकच व्यक्ती एकाच संकेतस्थळावरदेखील वेगवेगळ्या नावाने वावरते, हे वास्तव तूर्तास दूर ठेवू!). अशा वेळेस एक करता येईल, की, त्या व्यक्तीस पूर्वप्रसिद्धी असे डिस्क्लेमर देण्यास भाग पाडता येईल. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments

सहमत

इनोबा म्हणे
Mon, 01/21/2008 - 22:06 नवीन
सुन्याशी सहमत, या प्रकारे साहित्य प्रसिद्ध झाले असल्यास मानहानी टाळण्याकरीता लेखकाने स्वतःच ती काळजी घ्यायला हवी. प्रश्न असा आहे की जर ते साहित्य उचललेले असल्यास व नविन लेखकाने पुर्वीचा लेखक आपणच आहे असा दावा केल्यास,ते साहित्यचौर्य कसे ओळखावे? साहित्यचौर्य रोखण्याकरीता क्रिएटीव कॉमन्स या परवान्याचा उपयोग होईल का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील

साहित्य चोरणे.......!!!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 01/22/2008 - 19:46 नवीन
साहित्य चोरणे याला फार मोठी परंपरा आहे, असे वाटते. :) पण,असे प्रकार रोखण्यासाठी काय केले पाहिजे हा प्रश्न मात्र कठीणच आहे. टोपण नावाने लिहिणा-याने पुर्वप्रसिद्धीचा उल्लेख केला पाहिजे. पण,उचललेल्या लेखनाबाबत काही नियम आहेत, जसे संशोधनात आपण पुर्वसुरींच्या मताचा परामर्ष घेतो. पण, निव्वळ चालूगिरीच्या बाबतीत काय करु शकतो हे मात्र काही माहित नाही बॊ..........!!! उदाहरणार्थ :- रौशनीच्या आंतरजालावरील लेखनाच्या प्रिन्ट काढून जर मी लेखक म्हणुन माझे नाव टाकले तर ? कायदा काय म्हणतो.........आणि त्याचा लेखक काय कार्यवाही करु शकतो त्याची माहिती कोणी देईल काय ? प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

तात्या चोरून नेईल अशी कोणाची पुण्याई! :)

विसोबा खेचर
Tue, 01/22/2008 - 20:39 नवीन
उदाहरणार्थ :- रौशनीच्या आंतरजालावरील लेखनाच्या प्रिन्ट काढून जर मी लेखक म्हणुन माझे नाव टाकले तर ? कायदा काय म्हणतो.........आणि त्याचा लेखक काय कार्यवाही करु शकतो त्याची माहिती कोणी देईल काय ? ओ बिरुटेशेठ, अहो माझी रौशनी अजून लिहून पूर्ण होऊ द्या की! मग ढापा अगदी जरूर!! :)) ( ह घ्या ) असो, माझ्यापुरतं बोलायचं तर आम्ही पडलो साला फकीर माणूस. आमचं लेखन कुणी ढापलं तर ढापू दे तिच्यायला! आमचं लेखन कुणी ढापलं आणि स्वत:चं म्हणून छापलं तर आमचं लेखन कुणाला ढापावंसं वाटण्याइतपत तरी बरं आहे, एवढंच आम्ही समाधान मानू! बाकी, खुदा सब देख रहा है. तात्या मिपात नाही, तात्या नाही मनोगती तात्या चोरून नेईल अशी कोणाची पुण्याई! एवढं म्हणून आम्ही गप्प बसू... :) काय बिरुटेशेठ, खरं की नाही? आपलाच, तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

तात्या,

बिपिन कार्यकर्ते
Wed, 01/23/2008 - 12:18 नवीन
आवडलं... बिपिन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

बिरुटेन्शी सहमत

विद्याधर३१
Tue, 01/22/2008 - 21:39 नवीन
कारण तात्यान्ची ऱोशनी ओर्कुटवर प्रसिध्द झाली आहे. विद्याधर
  • Log in or register to post comments

अरे वा! :)

विसोबा खेचर
Tue, 01/22/2008 - 22:04 नवीन
अरे वा! कोण आहे तो साहित्यचोर? आम्हाला तरी कळू द्या! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विद्याधर३१

चोरीच्या मालावर .....

सुधीर कांदळकर
Sun, 01/27/2008 - 15:20 नवीन
"हा चोरीचा माल आहे" असे लेबल नसते. तसेच सरपंच अथवा प्रशासक यांना अंतर्ज्ञान नाही. त्यामुळे ते प्रेषकाचेच आहे असे गृहीत धरणे क्रमप्राप्त आहे. सरपंचांनी प्रत्येक सदराबरोबर ते स्वतःचेच असल्याबद्दल प्रेषकाचे एक प्रतिज्ञापत्र घ्यावे. तरीहि चोरी झालीच तर मिपा त्याबद्दल जबाबदार राहणार नाही. चोरी आढळल्यास त्या सदस्यावर कायम बहिष्कार टाकावा. शक्य असल्यास कायदेशीर कार्यवाही करून पोलिसांचा ससेमिरा मागे लावून द्यावा.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा