भारतरत्न, सर, नाईटहूड किताबांबद्दल काही ..........
नव्या वर्षाच्या प्रारंभाबरोबरच काही नव्या गोष्टींची चर्चा सूरू होते. पण आज मला एका वेगळ्या गोष्टींबद्दल चर्चा करू वाटते ती म्हणजे वेगवेगळे पूरस्कार, ते मिळवणार्या व्यक्ती, त्यांचे निकष, समाजावर त्यांचा प्रभाव व समाजाला त्यांच्यापासून मिळणारी प्रेरणा व होणारा फायदा.........
गेल्या २-४ दिवसापासून "सचिन तेंडूलकरला" भविष्यात दिल्या जाणार्या "सर किंवा नाईटहूड" सन्मानाबद्दल मिडियात चर्चा चालू झाली आहे ....
मग यात हा पूरस्कार मिळवणार्या ईतिहासातिल व्यक्ती, त्यांचे कर्तूत्व, समाजावर त्यांचा प्रभाव यासारख्या अनेक गोष्टींवर काथ्याकूट झाला. मग "सचिन" त्यासाठी कसा योग्य आहे अथवा नाही हे ठरवण्यासाठी अनेक परिसंवाद झडले. मग यातून अजून एक सूर निघाला की सचिनने हा पूरस्कार स्वीकारू नये कारण हा पूरस्कार ब्रिटिष संघराज्यातिल देशात राहणार्या लोकांसाठी आहे, म्हणून स्वतंत्र भारतात राहणार्या सचिनने तो स्विकारू नये .....
[ अवांतर : दिलिपकूमारच्या "निशान-ऍ- पाकीस्तान" च्या वेळी हाच गदारोळ ऊडाला होता .............]
***ह्या लेखाचा महत्वाचा उद्देश म्हणजे "भारतरत्न" पूरस्काराच्या निमित्ताने ऊडालेला गदारोळ.***
* लालक्रिष्ण आडवाणींनी यावर्षी हा पूरस्कार " वाजपेईंना " दिला जावे असे एक विधान करून एका नव्या चर्चेला तोंड फोडले आहे. यानिमिताने "वाजपेई" यांचे लहानपणापासून देशाला वाहून घेतलेले जिवन, त्यांनी केलेला त्याग, त्यांची जनमानसातिल प्रतिमा, लोकांवर प्रभाव, संघातील घडणीमुळे जपली गेलेली कठोर राष्ट्रनिष्ठा यासारख्या अनेक मुद्द्यांचा उहापोह झाला. काही "कट्टर भाजपा" वाल्यांनी " कॉग्रेस" सरकार वाजपेईंना हा पूरस्कार देणार नाही असे विधान करून नव्या वादाला तोंड फोडले, स्वता वाजपेईनी आपण या साठी योग्य उमेदवार नसल्याचे जाहीर केले. त्यातच ज्यांची " गल्लीभूषण" पूरस्कार सुध्धा मिळवण्याची लायकी नाही अशा अर्ध्या हळकूंडात पिवळ्या झालेल्या लोकांनी यावर दिलेली प्रतिक्रीया व त्यातून उडालेला गोंधळ अशी अनेक नाट्ये घडली ........
* त्यातच "बाळासाहेब ठाकर्यांचे" नाव या पूरस्काराच्या शर्यतीत आल्यामुळे या विषयाला नवे वळण मिळालेले आहे. जर कर्तूत्व, व्यासंग, धडाडी, देशनिष्ठा हे जर पूरस्काराचे निकष असतील तर यासाठी बाळासाहेंबांसारखी व्यक्ती आजच्या घडीला अख्ख्या देशात नाही. मी तर असे म्हणेन की यामुळे या पूरस्काराची शान वाढेल. [ बाळासाहेब हे भारतरत्न पूरस्कारापेक्षा मोठे आहेत असे मला म्हणायचे नाही.]
पण पून्हा एकदा त्यांची निर्भीड शैली व कट्टर हिंदूत्वाचा इतिहास हा यामार्गी अडथळा बनण्याची शक्यता आहे. तसे पाहता आयूष्यात स्वता एकही पद न स्वीकारणारे बाळासाहेब हा पूरस्कार स्वीकारणाची शक्यता कमीच आहे.
त्यांना त्यांची "हिंदूह्रिदयसम्राट" ही उपाधी कोठल्याही पूरस्कारपेक्षा मोठी व प्रिय वाटत असल्यास त्यात काही नवल नाही.......
काही वर्षापूर्वी "अमिताभला" हा पूरस्कार द्यावा अशी कोणीतर गूंडी सोडून दिली होती..................
या निमित्ताने असे पूरस्कार कोणाला मिळावेत [ राजकारणी, शास्त्रज्ञ, समाजसेवक, कलाकार, अभिनेते की आणखी कोणी ???] , पूरस्कारांचे निकष, निवडीची पध्दत यासारख्या अनेक मुद्द्यांचा उहापोह "मिपा" च्या मंचावर व्हावा अशी माझी ईच्छा आहे ...........
वाचने
7061
वाचनखूण
प्रतिक्रिया
13
माझे मत...
In reply to माझे मत... by विसोबा खेचर
सहमत..
In reply to माझे मत... by विसोबा खेचर
भारतरत्न
In reply to भारतरत्न by पिवळा डांबिस
अगदी सहमत
In reply to भारतरत्न by पिवळा डांबिस
अनुमोदन ..
नाईटहूड आणि भारतरत्न
In reply to नाईटहूड आणि भारतरत्न by सुनील
सहमत!
In reply to सहमत! by ऋषिकेश
भारत रत्न ?
In reply to नाईटहूड आणि भारतरत्न by सुनील
भारतरत्न
सचिनला हा
In reply to सचिनला हा by प्राजु
"संगीतमार्तंड पंडीत जसराज " यांचा सुध्धा तेवढाच हक्क आहे ....
वाजपेयींनी असे काय ...
पूर्णविराम..........