इ-पत्रातून पुढे ढकललेल्या साहित्याबाबत...

सरपंच's picture
सरपंच in काथ्याकूट
20 Jan 2008 - 10:45 pm
गाभा: 

राम राम मंडळी,

काही मंडळी येथे पुढे ढकललेल्या विरोपांतून वगैरे आलेले साहित्य (विशेष करून काव्य,) इथे प्रकाशित करतात. मिसळपावला या प्रकारच्या साहित्याचे वावडे नाही. परंतु जर इथे प्रकाशित होणारे साहित्य हे सभासदाव्यतिरिक्त इतर कुणाचे असेल तर सदर साहित्य प्रकाशित करणार्‍या सभासदाने मूळ साहित्यिकाचे/लेखकाचे/कवीचे/गझलकाराचे नांव जाहीर करणे अत्यावश्यक आहे. जर हे नांव अज्ञात असेल तर संबंधित लेखनाच्या शेवटी 'मूळ लेखक/कवी अज्ञात!' असा उल्लेख करणे अत्यावश्यक आहे.

जर इथे प्रकाशित होणार्‍या पुढे ढकललेल्या साहित्याबाबत वरील सूचनांचे पालन झाले नसेल तर ते साहित्य इथून काढून टाकण्यात येईल/अप्रकाशित करण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी....

मिसळपाव कोणत्याही प्रकारच्या साहित्यचोरीत सहभागी होऊ इच्छित नाही!!

इथे प्रकाशित होणारे साहित्य हे इतर सभासदांनीही इतरत्र कुठे वाचले असल्यास आणि जर सदर साहित्याच्या शेवटी मूळ लेखकाचे नांव नसल्यास/किंवा 'मूळ लेखक/कवी अज्ञात' असा शेरा नसल्यास तसे निदर्शनास आणून द्यावे ही विनंती!

आपला नम्र,
सरपंच.

प्रतिक्रिया

चतुरंग's picture

20 Jan 2008 - 11:41 pm | चतुरंग

हे बघून बरे वाटले.
धन्यवाद.

चतुरंग

ऋषिकेश's picture

21 Jan 2008 - 3:07 am | ऋषिकेश

आवडली. अश्या नियमा बद्दल अभिनंदन आणि आभार

(आभारी) ऋषिकेश

वेडा's picture

21 Jan 2008 - 10:30 am | वेडा

खुपच चांगला नियम आहे

प्रकाश घाटपांडे's picture

21 Jan 2008 - 11:25 am | प्रकाश घाटपांडे

सरपंचांनी घेतलेली भुमिका उचित आहे. मिसळपावच काय पण जालावरील सर्व साहित्यासाठी / संकेतस्थळांसाठी मार्गदर्शक आहे.
प्रकाश घाटपांडे

इनोबा म्हणे's picture

21 Jan 2008 - 11:31 am | इनोबा म्हणे

अशा प्रकारच्या नियमाची गरज होतीच. योग्य वेळी घेतलेला योग्य निर्णय. सरपंचांचे आभार!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

21 Jan 2008 - 7:11 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सरपंचानी घेतलेल्या निर्णयाचे स्वागत करतो आणि त्या बद्दल त्यांचे आभारही मानतो.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सुधीर कांदळकर's picture

27 Jan 2008 - 3:05 pm | सुधीर कांदळकर

धन्यवाद.

धोंडोपंत's picture

27 Jan 2008 - 3:30 pm | धोंडोपंत

सरपंच,

तुमच्या निर्णयाचे स्वागत. अत्यंत योग्य पाऊल उचलले आहे.

आपला,
(सहमत)धोंडोपंत

आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

पिवळा डांबिस's picture

27 Jan 2008 - 11:51 pm | पिवळा डांबिस

सरपंचांचा आदेश शिरोधार्य! लेखनाचे श्रेय मूळ लेखकाला मिळालेच पाहिजे यात दुमत असण्याचे कारण नाही!

तरीही मला एक नम्र सुचना करावीशी वाटते. आपण सर्वांनी हे सुत्र जरा तारतम्याने घेतले पाहिजे. म्हणजे असे की, आपले विचार लिहितांना एखाद्याने जर काही काव्यपंक्ति लिहिल्या तर त्याच्यावर लगेच मूळ लेखकाचे नांव लिहायची सक्ति नसावी. उदाहरणार्थ, एखाद्याने भक्तिमार्गावरील आपले विचार लिहितांना जर "मना सज्जना भक्तिपंथेची जावे" असे लिहिले तर लगेच खाली "रामदास" असे न लिहिल्याबद्दल त्याला अटक करू नये! :)

गद्य लिखाण परिणामकारक होण्यासाठी, आपला मुद्दा सर्वांपर्यंत पोचवण्यासाठी कधीकधी काव्यपंक्ति, म्हणी, सुभाषिते, शेरोशायरी इत्यादि. वापरली जातात. त्यात मधेच असे मूळ लेखकाचे नांव लिहावे लागल्यास लेखकाची लिहितांना आणि वाचकाची वाचतांना लिंक तुटण्याची शक्यता असते. कित्येकदा म्हणी व सुभाषिते यांचा जनक/ जननी माहिती नसतात. त्याखेरीज त्यांच्या अर्थामध्ये उणीव येत नाही हे खरेच! त्यामुळे अशा वापराला मुभा असावी.

बहुत काय लिहिणे? आपण सर्वजन सूज्ञ असा||

(क्रुपाभिलाषी) पिवळा डांबिस

सुनील's picture

28 Jan 2008 - 7:44 am | सुनील

मला वाटते, सदर फतवा हा संपूर्ण लिखाणासाठी आहे, लिखाणाअंतर्गत वापरलेल्या काव्यपंक्ती इ. साठी नाही. म्हणी आणि सुभाषिते यांचे जनक कुणालाच ठाउक नसतात पण काव्यपंक्तीसाठी "कुठल्याशा कवीने म्हटले आहे..." असे लिहून भागू शकेल असे वाटते.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

केशवराव's picture

28 Jan 2008 - 12:31 pm | केशवराव

असेही सरपंच असतात तर. खुपच छान. गावाचा विकास कराल. मला वाटले सगळेच तात्या विंचु.