अंदाज आरशाचा वाटे खरा असावा... या गज़लेचे विडंबन.
सिच्युएशन अशी..
जिचे माझ्यावर नितांत प्रेम आहे, अशा त्या माझ्या भार्येची रीतसर परवानगी घेऊन,
`...पण नऊच्या आत परत या' ही अशक्यप्राय अट मान्य करुन अस्मादिक मित्रांच्या बरोबर
मद्यमैफलीला गेले. मित्रांनी आग्रहाने खूप पाजली. `काही काळजी करु नकोस. आम्ही आहोत.
वहिनीनी तुला दार उघडून आत घेतल्यावरच आम्ही जाऊ...' अशी आश्वासने दिली. मैफल रात्री
बारा वाजता संपन्न झाली. मित्रांनी दगा दिला. कडाक्याच्या थंडीत, निर्मनुष्य रस्त्यावर...
मला माझ्या दारासमोर उभे केले. दार वाजवले. आणि माझ्या संतप्त बायकोची चाहूल लागताच
मला एकटे सोडून पोबारा केला. पण तिने दार उघडलेच नाही.
त्या क्षणाची ही व्यथा... भीमराव पांचाळे गाताना आधी काही ओळी
गातात, त्या सकट...
पोचवाया जी आली ती माणसे गेली कुठे?
शूर आणि धीट सारी माणसे गेली कुठे?
मी तिला भलताच भितो, माहिती त्याना जरी
आग्रहाने पाजणारी माणसे गेली कुठे?
दारासमोर माझ्या मी एकटाच उरलो
बायकोला भ्यायलेली माणसे गेली कुठे?
......
(मी माझ्याच दारात नेमका येतो, त्या अर्थी..)
अंदाज बायकोचा वाटे खरा असावा
शुद्धीवरी अजूनी नवरा जरा असावा
भेटून अंगणाला, इतुके विचार आता
निजण्यास का न येथे, मज कोपरा असावा
मी पायरीवरी त्या कुडकुड करीत होतो
झोंबे मला जो वारा तो बोचरा असावा
ते बंद दार आणि निद्रा न आवरे ही
ज्याची उशी मी केली तो उंबरा असावा
(तिचा राग क्षणिक हे सत्य. पहाटे दार उघडेल
तेव्हा ती माझी जुनीच प्रेमळ, प्रसन्न बायको असावी एवढीच इच्छा...)
उघडेल दार तेव्हा संपून राग जावो
माझ्या समोर माझा तो मोगरा असावा
अविनाश ओगले...
Taxonomy upgrade extras
| लेखनविषय: |
|---|
वाचने
10831
प्रतिक्रिया
16
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान!
हा हा हा..
हा हा हा हा हा हा हा
खरं आहे!
In reply to हा हा हा हा हा हा हा by धोंडोपंत
दारु लय भरि
In reply to हा हा हा हा हा हा हा by धोंडोपंत
विडंबन आवडले.
अंदाज बायकोचा वाटे खरा असावा
बदल हवाय ना? हा घ्या बदल...
In reply to अंदाज बायकोचा वाटे खरा असावा by दीपा॑जली
झ्याक
In reply to बदल हवाय ना? हा घ्या बदल... by अविनाश ओगले
छान..
आम्हाला केशवसुमारांचे विडंबन अधिक आवडले...
In reply to छान.. by विसोबा खेचर
:)
In reply to आम्हाला केशवसुमारांचे विडंबन अधिक आवडले... by अविनाश ओगले
बस का..
In reply to आम्हाला केशवसुमारांचे विडंबन अधिक आवडले... by अविनाश ओगले
कीती तरी
वा.छान. पुढील .........
अफलातून