गौतम बुद्धांची एक कथा.
बुद्ध हे मनोविजयी होते हे सर्वज्ञात आहे. ते नेहमी शांत, सस्मित, आणि प्रसन्न असत. त्यांच्या सहवासात येणारया लोकांनाही या प्रसन्नतेचा लाभ होत असे. पण काही लोक असेही होते की त्यांना गौतमांना मिळणारा सन्मान सहन होत नसे. त्यांचा अगदी जळफळाट होत असे. असाच एक माणूस एकदा गौतमांना रागवावयास भाग पाडायचेच, त्यांचा अपमान करायचाच, फजिती करायचीच असे ठरवून त्यांच्या प्रवचनाच्या ठिकाणी आला.
प्रचंड जनसमुदाय जमला होता. तथागत शांतपणे त्या समुदायाला मार्गदर्शन करत होते. तेंव्हा हा माणूस तेथे पोचला आणि सर्वांसमोर त्याने गौतमांना न भूतो न भविष्यति अश्या शिव्या दिल्या. जमलेले लोक अस्वस्थ झाले, संतापलेही. पण तथागत शान्त होते. त्यांच्या चेहरयावरील स्मित जरासुद्धा ढळले नव्ह्ते. तो माणूस बराच वेळ अद्वातद्वा शिव्याशाप देत होता. बरयाच वेळाने तो थकून थांबला व डोळे तारवटून गौतमांकडे पहात राहिला.
तथागतांनी स्मितहास्य केले व शान्त स्वरात ते बोलले,
"मी तुला एक प्रश्न विचारू काय?"
"विचारा" तो गुरगुरला.
"जर तुला कोणी एखादी वस्तू भेट दिली आणि ती भेट स्वीकारण्यास तू नकार दिलास तर त्या भेटीवर मालकी कुणाची?"
"मालकी?"
"हां, ती भेटवस्तू कोणाकडे राहील?"
"इतकही कळत नाही? सोपं आहे, ती वस्तू त्या देणारयाकडे राहील" तो माणूस म्हणाला.
"अगदी बरोबर!" तथागत स्मित करीत म्हणाले, "मग जर मी तुझे हे शिव्याशाप स्वीकारण्यास नकार दिला तर ते कोणाकडे रहातील?"
तो माणूस सुन्न झाला आणि तथागतांच्या चरणी लागला.
तात्पर्य: जगात कोण आपल्याला काय बोलेल यावर आपण नियंत्रण ठेवू शकत नाही. पण त्यांच्या स्तुतिशापांचा स्वीकार करणे न करणे हे पुर्णपणे आपल्याच हाती असते. आपण स्वताचा अपमान करून घ्यायचा म्हटला तर तो घोर अपमान होऊ शकतो अन्यथा ते असतात केवळ शब्दांचे बुडबुडे! ऑफिसात, समाजात वावरतांना हे जर लक्षात ठेवले तर खूपच मनस्ताप कमी होऊ शकतो. मला याचा स्वानुभव आलेला आहे म्हणून हे मी सर्वांसाठी शेअर करीत आहे. थोडे दिवस उपयोग करुन पहा व मला तुमचा अनुभव कळवा.
वाचने
26110
प्रतिक्रिया
40
मिसळपाव
प्रतिक्रिया
वाह!खरे
शाब्बास..
छान...
......त्या भेटीवर मालकी कुणाची?
अशीच एक..
बहुधा
In reply to अशीच एक.. by प्राजु
व्वा
देणार्या
हा हा हा हा हा
In reply to देणार्या by लिखाळ
पण..
तंग
सर्वांनी? अ
In reply to तंग by कपिल काळे
डांबिसि
In reply to तंग by कपिल काळे
+१
In reply to डांबिसि by अभिज्ञ
जीवनात उपयोगी पडणारी.
मस्तच.
आणखी एक व्हर्जन
शिष्या
In reply to आणखी एक व्हर्जन by कोलबेर
आज्जिबात जमणार णाही ..
हे असले
In reply to आज्जिबात जमणार णाही .. by टारझन
प्रकाटाआ
In reply to हे असले by ३_१४ विक्षिप्त अदिती
टारुबाळचं खरच आहे
मस्त लिहिल आहे.
बोधकथा
आयला!
काका, तुम्ह
In reply to आयला! by पिवळा डांबिस
तुम्ही
बोधकथा ..
कोण म्हणतो?
In reply to बोधकथा .. by मनीषा
हा हा हा !!!
In reply to कोण म्हणतो? by पिवळा डांबिस
ठ्ठोऽऽऽ!!!!:)
In reply to हा हा हा !!! by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
अरे बापरे!!
In reply to ठ्ठोऽऽऽ!!!!:) by पिवळा डांबिस
णमो अरिहंताणं
In reply to ठ्ठोऽऽऽ!!!!:) by पिवळा डांबिस
क्या बात
In reply to णमो अरिहंताणं by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
णमो णमः!!
In reply to णमो अरिहंताणं by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
कुठे मिळते?
In reply to कोण म्हणतो? by पिवळा डांबिस
कुठे मिळते?
In reply to कुठे मिळते? by मनीषा
आरारारारा
In reply to कुठे मिळते? by पिवळा डांबिस
तुमची बोधकथा आवडली
कधीही उपयोगी सल्ला...छान.. पण