✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

कादंबरी "शाळा " ...लेखक .. मिलिंद बोकील

भ
भडकमकर मास्तर यांनी
Fri, 01/25/2008 - 18:01  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
42493 वाचन

💬 प्रतिसाद (55)

प्रतिक्रिया

ट
टारझन Tue, 03/02/2010 - 00:36 नवीन

'शाळा' मी

'शाळा' मी एका अमेरिका ते भारत प्रवासात जाताना-येताना अशी दोन वेळा वाचली.
हो का? मी अमेरिकेला जाताना दोन पेग मारुन झोपणे प्रिफर करतो यू नो :)
पहिल्या पानापासून वाचायला घेतले की शेवट होईतोवर खाली ठेववत नाही.
अहो खरं काय? माझ्या मित्राला पण असल्यास घाणेरड्या सवयी आहेत..पण बेला तुम्ही तसे वाटत नाही...म्हणूनच विचारले काय? बाकी प्रतिसाद छाणच! -(माळकरी) झेला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेसनलाडू
प
पाषाणभेद Tue, 03/02/2010 - 05:58 नवीन

टार्‍या,

टार्‍या, मागे तू काही पेग वैगेरे घेत नाही असा उल्लेख केलेला आठवतोय. अन आपले पुणेरी पत्रकार यांच्या समावेत तुम्ही सगळे "बसलेले" असतांना तुझ्या पुढ्यात थंड असल्याचा फोटोही बघीतल्याचे आठवते. खरे काय समजावे? आत्ताचे बोलणे की तो फोटो अन तो उल्लेख? की आत्ता सुरू केलीय? बाकी भडकमकर मास्तर खरे बोललात: "सगळ्या शाळा सारख्याच...जो तो पोरगा आपापल्या कर्त्रुत्त्वाने पुढे जातो, हेच खरे..." आत्ताचे आमचे कर्तृत्व पाहून आमचे मास्तर अन आमची शाळा (त्यांच्या) तोंडात बोटेच घालतील. Image removed. डायबेटीस विरुद्ध लढा महाराष्ट्र भाषा असे मराठी | घालीतसे लाथ नडणार्‍यांच्या कटी|| महाराष्ट्र संतकवी पाषाणभेद शके १५६३
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
र
राजेश घासकडवी Mon, 03/01/2010 - 15:41 नवीन

शाळा

बाकी सगळं आधीच इतरांनी लिहिलेलं आहे, त्यामुळे मला जे नवीन वाटतं तेवढंच लिहितो. ही जरी त्या मुलाची गोष्ट असली, आणि पौगंडावस्थेत पदार्पण करण्याच्या वयाचा कॅनव्हास घेतला असला तरी ही जास्त व्यापक कथा आहे असं वाटलं. बालपणात, तारुण्यात जीवनाविषयी खूप अपेक्षा असतात. सगळीकडे काहीना काही रस घेण्यासारखं घडत असतं, इतकं की कुठे लक्ष देऊ आणि कुठे नको असं झालेलं असतं. एक वेळ अशी येते की आपण जगरहाटीला जुंपले जातो. या गमतीजमती मागे पडतात आणि पुढे उरतं ते भकास कष्टप्रद सत्य जीवन. याची ही कथा आहे. लेखकाने हे साधण्यासाठी तंत्र उत्कृष्ट रीतीने वापरलेलं आहे. घनिष्ठ मैत्र्या, स्वच्छंद जीवन, पहिलंवहिलं प्रेम, राजकीय घडामोडींशी जवळून संबंध, बिल्डिंगमधल्या लोकांची संगत या सगळ्या आकर्षक, तारुण्याशी संलग्न गोष्टी समांतरपणे खुलवलेल्या आहेत. शेवटच्या काही पानांत या सगळ्या एकामागोमाग एक मोडून पडतात. ते इतकं चांगल्या प्रकारे साधलंय की तो हे तंत्र वापरतो आहे हे जाणवत पण नाही. सगळी जादू उत्तम रीतीने गुंफलेल्या मोहक बारकाव्यांमध्ये आहे. राजेश
  • Log in or register to post comments
श
शैलेन्द्र Mon, 03/01/2010 - 16:20 नवीन

अगदी

अगदी अगदी, शेवटच्या पानावरची काही वाक्य अगदी मनावर कोरली गेलीत, "आता हळु-हळु माझ्या सगळ लक्षात यायला लागलं-----" आणि मग शिरोड्करच निघुन जाण, सुर्‍याचे मागे पडण, नरुमामाचं लग्न इत्यादी इत्यादी... शेवट चटका देतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी
आ
आशु जोग Wed, 07/30/2014 - 12:27 नवीन

...

अगदी बरोबर राजेश. तुम्ही नेमक्या शब्दात सांगितलेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा