भातुकलीच्या खेळामधली... या कवितेचे विडंबन
(प्रा. विसुभाऊ बापट यांच्या "कुटुंब रंगलंय काव्यात" या कार्यक्रमाच्या १००१व्या प्रयोगानिमित्त आयोजित विडंबन स्पर्धेत प्रथम पुरस्कार प्राप्त विडंबन... परीक्षक- यशवंत देव आणि शिरीष पै)
चाळीमधल्या खोलीमधली राजा आणिक राणी
त्यांच्या तिथल्या संसाराची ऐका एक कहाणी
त्या राजाची खोली होती तिसर्या मजल्यावरती
जिने मोडके अंधारातून उंदीर झुरळे फिरती
लवकर उठती, आणिक भरती खालून वरती पाणी
त्या खोलीला एकच खिडकी आणि एकच दार
शेजार्यांना उत्सुकता या संसाराची फार
जाता येता हळू पाहतो डोकावूनही कोणी
नवेच होते लग्न आणखी खेळ नवा तो सारा
परि तेथल्या खिडकीमधूनी मुळी न येई वारा
झोप न येई, डास चावती, नव्हती मच्छरदाणी
त्या राजाचा पगार थोडा त्यात कसे भागावे?
राणीनेही समजून सारे काहीच ना मागावे
संध्याकाळी कुठे न फीरती, खिशात नसती नाणी
महिन्यामधले दिवस भासती सर्व सारखेची
त्या राजाला फक्त काळजी, एक तारखेची
"करा उधारी चुकती सारी" कालच वदला वाणी
चाळीचाळीमधुनी असती असंख्य राजाराणी
सुरावाचूनी तालावाचूनी गुदमरलेली गाणी
डोळ्यामधूनी अन ओघळती स्वप्ने केविलवाणी...
-अविनाश ओगले
Taxonomy upgrade extras
| लेखनविषय: |
|---|
वाचने
14335
प्रतिक्रिया
22
मिसळपाव
प्रतिक्रिया
खल्लास.../हार्दिक अभिनंदन...
मस्त
लगे रहो ओगले साहेब,
अभिनंदन
नवेच होते
आमच्या आयुष्याचे विडंबन
झकास
मस्त
वा वा पंत
अभिनंदन
वा ! ओगले साहेब
गेले, तेही दिवस गेले!
सुरेख विडंबन
वाह!
मागे एकदा
ते विडंबन
In reply to मागे एकदा by अघळ पघळ
साधं सोपं
In reply to ते विडंबन by सुनील
अतीसुंदर - वास्तव
अतिशय सु॑दर
खूपच छान!
कुटुंब रंगलंय काव्यात
In reply to खूपच छान! by वडापाव
अप्रतिम...