Skip to main content

कवीता

लेखक श्रीयुत संतोष जोशी यांनी शनिवार, 21/06/2008 13:36 या दिवशी प्रकाशित केले.

कविवर्य सुरेश भट यांची ही कवीता

रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा!
गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा!

कोण जाणे कोठुनी ह्या सावल्या आल्या पुढे;
मी असा की लागती ह्या सावल्यांच्याही झळा!

राहती माझ्यासवे ही आसवे गीतांपरी;
हे कशाचे दुःख ज्याला लागला माझा लळा!

कोण्त्या काळी कळेना मी जगाया लागलो
अन् कुठे आयुष्य गेले कापुनी माझा गळा?

सागती 'तात्पर्य' माझे सारख्या खोट्या दिशाः
"चालणारा पांगळा अन् पाहणारा आंधळा!"

माणसांच्या मध्यराञी हिंडणारा सूर्य मीः
माझियासाठी न माझा पेटण्याचा सोहळा!

लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 1909
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया