Skip to main content

एक सहज कवीता

लेखक श्रीयुत संतोष जोशी यांनी शनिवार, 21/06/2008 13:51 या दिवशी प्रकाशित केले.
एक तरी मैत्रीण असावी बाईकवर मागे बसावी जुनी हीरो होंडा सुद्धा मग करिझ्माहून झकास दिसावी ! एक तरी मैत्रीण असावी चारचौघीत उठून दिसावी बोलली नाही तरी निदान समोर बघून गोड हसावी ! एक तरी मैत्रीण असावी कधीतरी सोबत फिरावी दोघांना एकत्र पाहून गल्लीतल्या सगळ्या पोरांची जिरावी ! एक तरी मैत्रीण असावी जिच्याशी निर्मळ संवाद असावा कधीतरी छोट्या भांडणाचा एखादाच अपवाद असावा.. एक तरी मैत्रीण असावी आयुष्याच्या अनोळखी वळणावर तुमच्या व्यथा वेदनांवर तिने घालावी हळूच फुंकर.. एक तरी मैत्रीण असावी जिच्या मैत्रीत विश्वास रुजावा तुमचासुद्धा खांदा कधी तिच्या दुःखाने भिजावा.. एक तरी मैत्रीण असावी चांदणीसारखी मैत्रीच्या आकाशात मित्रांचे दिवे मावळले म्हणजे चालावं पुढे तिच्याच प्रकाशात..
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 2186
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया

ही कविता तुमची आहे काय... ??? नाही कोठे तरी वाचली आहे आधी !! नसेल तर.. तात्या.. ला सांगा ! राज जैन माणसाने जगावे कसे .... स्कॉच सारखे .. एकदम आहिस्ता!!! ....एकदम देशी प्रमाणे चढून उतरण्यात काय मजा :?

संदिप खरेच्या कवितांच्या वळणासारखी हि कविता आहे छान. संतोष, तुझी असली मुळात तर तुझं कौतुक. तुझी नसली तर कुणाचं कौतुक करू ते सांग.

In reply to by मिसळपाव

नाही , माझी नाही. माझ्या वाचनात आली , आवडली , म्हणुन शेअर केली. हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.