साहित्य : तयार साधं वरण ; चिंच,गुळ,गोडामसाला,मीठ,लाल तिखट, कणिक , ओवा , कोथिंबीर , तेल , साजुक तूप , लसुण
कृति :
कणिक भिजवताना त्यात थोडं मीठ,लाल तिखट ,ओवा , कोथिंबीर घालणे.
थोडं जाडसर लाटून त्याचे शंकरपाळे करणे.
तयार वरण उकळायला ठेवून त्यात चिंच ,गुळ,गोडामसाला,मीठ,लाल तिखट घालणे.
वरणाला साजुक तूपाची लसणाची फोडणी देणे आणि ते शंकरपाळे कच्चेच त्या उकळत्या वरणात सोडणे.
शंकरपाळे वरणात नीट शिजल्यानंतर उतरवून भाताबरोबर किंवा नुसतं खायला सुद्धा खूप छान लागतं
यात चिंच आणि गुळ जरा जास्तंच घालावे.
सह्ही!
वरणफळे
आई शप्पथ !!!
ओह मी
वा! वा!
In reply to वा! वा! by चतुरंग
+१
खरच
मजा आली.....जुन्या आठवणी ताज्या झाल्या