Skip to main content

जालावरील संक्षिप्त शब्द

लेखक विद्याधर३१ यांनी बुधवार, 25/06/2008 22:45 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या आपण आंतरजालावर खूप शब्दांची संक्षिप्त रूपे वापरतो. जसे १) व्य. नि. / विरोप = व्यक्तिगत निरोप. २) ह. ह. पु. वा. = हसून हसून पुरे वाट ३) पु. ले. शु. = पुढील लेखनाला/स शुभेच्छा. यातील काही शब्दांचे पूर्णार्थ माहीत नसल्यास बरेच वेळा प्रतिसादांचा अर्थे समजत नाही. तरी आपण वापरत असलेले संक्षेप येथे नोंदवावे यासाठी हा धागा सुरु करत आहे. प्र क टा आ म्हणजे काय?

वाचने 7126
प्रतिक्रिया 18

प्रतिक्रिया

In reply to by बेसनलाडू

अरे मला वाटत होते की हा काही प्रकट आभाराचा प्रकार आहे कि काय? विद्याधर

लकेच घ्या. (हलका)बेसनलाडू

खवः खरड वही खफः खरडायचा फळा सखाराम गटणे (धमु, छोटा डॉन, आंद्या, पिवळा डांबिस, विजुभाउ इ. यांच्या वर्गातला :))

बेला - बेसनलाडू पिडा - पिवळा डांबिस धमु - माल मुलगा छोटि - छोटी टिंगी केसु - केशवसुमार (कृपया अहघ्या (अत्यंत हलके घ्या)) :) चतुरंग

हघेहेसानलगे = हलकेच घ्या हे सांगणे न लगे.

चूभूद्यावी/द्या घ्यावी/घ्या. (बिनचूक)बेसनलाडू

ह.भ.प. :- ळूच जी ळवणारा भापो : भावना पोहोचल्या स्वलाकन : स्वता:ची लाल करुनघेऊ नये कुबड्या खविस
तू भारी ...तर मी लई भारी...
http://picasaweb.google.com/prashants.space

In reply to by टारझन

अजुन ऐक ह.भ.प.: हरभरे भरडण्यात पटाईत ह.भ.प.: हरी भक्त परायण (फक्त अती सात्वीक लोकांसाठी) सखाराम गटणे (धमु, छोटा डॉन, आंद्या, पिवळा डांबिस, विजुभाउ इ. यांच्या वर्गातला :))

In reply to by सखाराम_गटणे™

ह. भ. प. = हळूच भलतीकडे पाहणारे ;) --(निरिक्षक) लिखाळ.

हा माझा आणि तात्यांचा फेवरीट .... " आ. का. का. क. ना. हे. ज. जा. आ." म्हणजे " आम्हाला काव्यातले काहीही कळत नाही हे जग जाहीर आहे" हा धम्याचा ... "क. ठ. हा. मा. घे. स्मा." म्हणजे " कपाळावर ठप्पकन हात मारुन घेणारी स्मायली" ... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

हहडोपा - हसून हसून डोळ्यात पाणी हहमुव - हसून हसून मुरकुंडी वळली हहपोदु - हसून हसून पोटात दुखले