एक खटकलेली बातमी ...
गेल्याच महिन्यात वर्तमानपत्रात एक बातमी वाचली...
मथळा होता " लग्नाचे आमीष दाखवून बलात्कार" .........
असल्या बातम्या सतत वाचनात येतात... ही सुद्धा वाचली , त्यात नेहमीप्रमाणेच
..." एक गावाकडची मुलगी होती, कॉलेजात जाणारी , सज्ञान ..तिथे हा एक ओळखीचा मुलगा / बाप्या आला...तिला तो आवडला, प्रेम निर्माण झालं ... घरच्यांची परवानगी मिळणार नाही म्हणून मग त्याने तिला शहरात (पळवून !!! )आणलं... ते दोघे सहा महिने वेगवेगळ्या लॉजवर राहिले, वेगवेगळ्या शहरात राहिले, फिरले... मग नंतर त्याने तिच्याशी लग्न करण्यास नकार दिला.. मग ही पोलीसात गेली आणि त्याच्यावर बलात्काराचा आरोप करत फिर्याद दाखल केली..."....
थोड्याफार फरकाने या बातम्या अशाच असतात...
मला या प्रकारच्या बातम्यांमधली विसंगती नेहमी खटकते.... आमीष म्हणजे काय?
त्याने तिला फसवले ,हे मान्य पण म्हणून बलात्काराचा गुन्हा कसा काय ?? सहा महिने इतक्या लॉजमध्ये हिंडत हिंडत हा तिच्यावर बलात्कार करत होता काय ?? बलात्काराची व्याख्या काय?
...
इथे कोणी कायदा जाणत असेल तर कृपया स्पष्ट करावे... त्याने लग्नाला नकार दिला म्हणून ; सहा महिन्यांपासून घडत असलेल्या व तिच्या संमतीने होत असलेल्या रूटीन घटनेचे एकदम बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्यात रूपांतर झाले?
हे कसे काय बुवा ?किंवा त्याने तिच्याशी सहा महिन्यांनी लग्न केले असते तर मग पूर्वी घडलेल्या त्या सार्या घटना गुन्हा नव्हत्या???
एखाद्या गुन्ह्याची व्याख्या इतकी सापेक्ष कशी असू शकते ?? ( तीच घटना --- असे घडले तर गुन्हा आणि तसे घडले तर गुन्हा नाही..)
यात पुरुषाची चूक आहेच, पण बाई भासवते तितकी इनोसंट भोळी भाबडी कशी काय ? साध्या शब्दांत बोलायचे तर तिने सहा महिने काय त्या क्षणांचा आनंद लुटला नसेल ? म्हणजे आधी "जमानेसे क्या डरना " टाईप सिनेमा प्रमाणे क्रांती करायला पळून जायचे ,तो भौ पळाला की मग एकदम क्रांती वगैरे विसरून पोलीस केस करायची ?
की आम्ही पूर्वीच्या एका धाग्यात लिहिल्याप्रमाणे ही स्त्री " प्रेमात पडल्यावर मला बाई जबरदस्तीच आवडते" अशा विचारांची असते?? आणि लग्न करायला नकार मिळाल्यावर तिला साक्षात्कार होतो की आपल्यावर बलात्कार झाला ???? ही तर जबाबदारी झटकणं झालं...
______________________________
लग्नापूर्वी शरीरसंबंध ठेवणे याबाबत ज्याचंत्याचं वैयक्तिक मत असलं तरी ते अत्यंत जबाबदारीचं काम आहे , असं आमचं वैयक्तिक मत आहे....
स्वतः केलेल्या कामाची जबाबदारी न घेता दुसर्यावर खापर फोडणं सर्वथा चूक...
वाचने
15485
वाचनखूण
प्रतिक्रिया
30
मला वाटते..
पटलं !
मला असं
In reply to मला असं by ऋचा
म्हणजे असा
शोषण कसे काय??
माझ्या
माझ्या माहिती प्रमाणे
In reply to माझ्या माहिती प्रमाणे by पद्मश्री चित्रे
धन्यवाद,
असेच काही
In reply to असेच काही by साती
अशा
लग्नाचे आमीष दाखवून बलात्कार
In reply to लग्नाचे आमीष दाखवून बलात्कार by काळा_पहाड
धन्यवाद..
भादंसं कलम ३७५, ३७६
In reply to भादंसं कलम ३७५, ३७६ by विसोबा खेचर
काय की बुवा ?
ते दोघे
सहमत
In reply to सहमत by चाणक्य
अतिशय सुंदर विवेचन .
सहा
अभिनंदन
मला वाटत...
स्त्री बलात्कार करु शकते ??
विवाहपूर्व संबंध
आक्षेप समजू शकतो, पण
>>नवर्याखे
चांगला मुद्दा मांडला मास्तर तुम्ही.
In reply to चांगला मुद्दा मांडला मास्तर तुम्ही. by वेताळ
परंतु
काही सोपे, काही अवघड
"बाईच्या मर्जीने झाला तर सत्कार नाही तर बलात्कार."
मला खटकलेली बातमी
एक प्रश्न