चकोल्या (वरणफळं )

श्रीयुत संतोष जोशी's picture
श्रीयुत संतोष जोशी in पाककृती
26 Jun 2008 - 7:25 pm

साहित्य : तयार साधं वरण ; चिंच,गुळ,गोडामसाला,मीठ,लाल तिखट, कणिक , ओवा , कोथिंबीर , तेल , साजुक तूप , लसुण

कृति :
कणिक भिजवताना त्यात थोडं मीठ,लाल तिखट ,ओवा , कोथिंबीर घालणे.
थोडं जाडसर लाटून त्याचे शंकरपाळे करणे.
तयार वरण उकळायला ठेवून त्यात चिंच ,गुळ,गोडामसाला,मीठ,लाल तिखट घालणे.
वरणाला साजुक तूपाची लसणाची फोडणी देणे आणि ते शंकरपाळे कच्चेच त्या उकळत्या वरणात सोडणे.
शंकरपाळे वरणात नीट शिजल्यानंतर उतरवून भाताबरोबर किंवा नुसतं खायला सुद्धा खूप छान लागतं
यात चिंच आणि गुळ जरा जास्तंच घालावे.

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

26 Jun 2008 - 7:36 pm | विसोबा खेचर

संतोषशेठ,

सह्हीच पाकृ दिली आहेस. अगदी साधी व सोप्पी!

आता माझी एक फर्माईश -

मुरबाडी आमटीची पाकृ दे! :)

तात्या.

सूर्य's picture

26 Jun 2008 - 9:22 pm | सूर्य

म्हणजे माझी खुपच आवडती. पाककृती दिल्याबद्दल धन्यवाद.

- सूर्य.

पद्माकर टिल्लु's picture

26 Jun 2008 - 10:37 pm | पद्माकर टिल्लु

आई शप्पथ !!! खूप दिवसानी ह्या पाककृतीची माहिती मिळाली !!! तोन्डाला पाणी सुटले!!! मिपा वरचे फो टो तर लाजवाब!!!
आवडीने खाणारा ( खवय्या)
पद्माकर

भाग्यश्री's picture

26 Jun 2008 - 10:56 pm | भाग्यश्री

ओह मी कणकेत कधी हे सगळं घातलं नाही... नेहेमी नवरा म्हणायचा ती कणकेची चव ब्लान्ड लागते.. पण मी फक्त मीठ च घालयचे..
हे लक्षातच नाही आलं!! सहीच करून पाहते आजच!!

http://bhagyashreee.blogspot.com/

चतुरंग's picture

26 Jun 2008 - 11:30 pm | चतुरंग

माझी आवडती फळं! :)

(स्वगत - चला आता ह्या आठवड्यात फळं करा, अशी फर्माईश करायचा एक सॉल्लिड मौका मिळाला ;) )

चतुरंग

सहज's picture

27 Jun 2008 - 7:12 am | सहज

आवडती डिश

ज्ञानेश's picture

2 Jul 2008 - 11:38 pm | ज्ञानेश

खरच अप्रतिम डिश आहे...!!!

आम्हि मस्त आस्वाद घेतला....आभारि आहोत...!!!

काल लॉग वीकेन्डचा शेवटचा दिवस होता. घरी आल्यावर करुन पाहीले. छान झाले. मी त्यात वाटाणे, फुलकोबी, गाजर टाकल्यामुळे चव ज्यास्त चान्गली लागत होती. ;)