मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

बखरीच्या पानाआड

अनन्त्_यात्री · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
बखरीच्या पानाआड पाहिले मी क्षणभर दडपल्या वास्तवाचे छिन्नभिन्न कलेवर प्रचलित इतिहास तुझ्या माझ्या मेंदूतून अज्ञाताच्या शक्यतांना टाके पुरता पुसून जेत्यांचाच इतिहास रुळे मग माझ्या मुखी पराजितांचा ठरतो इतिहास अनोळखी बखरीच्या पानाआड वास्तवाचा भग्न गड त्याच्या झाकल्या गूढाचे कसे सरावे गारूड?

वाचने 1724 वाचनखूण प्रतिक्रिया 6

चित्रगुप्त Mon, 08/11/2025 - 18:15
गहन आशयाची साध्या सोप्या शब्दातली मांडणी आवडली. जेत्यांचाच इतिहास रुळे मग माझ्या मुखी पराजितांचा ठरतो इतिहास अनोळखी ++ हेच रामायण- महाभारत - ग्रीक - रोमन- चिनी - इजिप्शियन - पासूनच्या सगळ्या 'इतिहासा'चे वास्तव.

स्वधर्म Mon, 08/11/2025 - 20:11
बखरीच्या पानाआड वास्तवाचा भग्न गड त्याच्या झाकल्या गूढाचे कसे सरावे गारूड? या ओळी खासच. सत्य फार 'महाग' असते, किंमत दिल्याशिवाय गवसत नाही.