नमस्कार. आपल्यापैकी अनेकांना "ठण्डी हवाएँ लहरा के आए.. " (गायिका लता, चित्रपट नौजवान वर्ष १९५१) गाणं माहिती असेल आणि आवडत असेल. "रहें ना रहें हम, महका करेंगे..." (गायिका लता, चित्रपट ममता, वर्ष १९६६) हेसुद्धा अनेकांचं आवडतं गाणं असेल. त्याशिवाय "सागर किनारे दिल ये पुकारे" (गायिका लता- किशोर, चित्रपट सागर, वर्ष १९८५) हे गाणं तर माहिती असेलच. तसंच "हमें और जीने की चाहत ना होती" (गायिका लता- किशोर, चित्रपट अगर तुम ना होते, वर्ष १९८३) हे माहिती असेलच.
पण तुम्हांला हे माहिती नसेल की, ह्या चारही गीतांची चाल एकमेकांशी विलक्षण जुळते! १९५१ चं "ठण्डी हवाएँ लहरा के आए" ह्या अल्लड प्रेमगीताला संगीत सचिन देव बर्मनांचं होतं. त्यांची चाल संगीतकार रोशन ह्यांना इतकी आवडली की त्यांनी १९६६ च्या "रहें ना रहें हम महका करेंगे" ह्या अर्थपूर्ण गाण्यामध्ये वापरली! पण गंमत म्हणजे १९६६ च्याही आधी त्यांनी १९५४ मध्येच ती चाल एस. डींची अनुमती घेऊन चांदनी चौक चित्रपटात "तेरा दिल कहाँ है" (आशा भोसले) वापरली होती. "तेरा दिल कहाँ है" हे गीत ऐकताना अगदी "रहें ना रहें हम महका करेंगे" ऐकल्याचा भास होतो! पुढे मग आर. डी. बर्मननीही ही चाल- त्या गाण्यातला मीटर किंवा छंद वापरून "हमें और जीने की चाहत ना होती" आणि "सागर किनारे" ही गाणी दिली! त्याही शिवाय त्याच छंदातील गाणी तमिळ व मल्याळमध्येही रचली गेली! इतरही काही विशेष प्रसिद्ध नसलेली ७०- ८० च्या दशकातली हिंदी गाणी त्याच सुरावटीवर आधारित आहेत. अशी एकूण किमान १० गाणी त्याच छंदातली किंवा सुरावटीतली आहेत. लक्ष देऊन ती ऐकली तर त्यातलं साम्य लगेच कळतं! अगदी १९९३ मध्ये लतानेच गायलेलं व राम- लक्ष्मण ह्यांचं संगीत असलेलं "कहा था जो तुमने" हेही गाणं तशाच चालीचं आहे!
"ठण्डी हवाएँ" गाण्यावर आधारित गाण्यांची ही गंमत मला माझे मित्र भूषण मंडपमाळवींनी सांगितली. खुद्द आर डी बर्मननी एका मुलाखतीमध्ये हा खुलासा केला होता. आणि "ठण्डी हवाएँ" हे गाणंसुद्धा १९३८ च्या “C’est la vie” गाण्यापासून प्रेरणा घेऊन बनवलेलं होतं असं म्हंटलं जातं. पण असं जरी असलं तरी त्या चालीला पुढे वाढवून साकार रूप देणं ही त्या त्या संगीतकाराची कमालच आहे. त्यांचं सूत्र समान असलं तरी प्रतिबिंबं ही स्वतंत्र अभिव्यक्तीही आहेत.
काही गाण्यांमध्ये अशी क्षमता असते की, ते आपल्याला स्वत:शी जोडून देतात. आपल्यामध्ये खोलवर असलेले भाव व्यक्त करतात. असं म्हणतात की, संगीत हे मन आणि ध्यान ह्यांच्यामधला टप्पा आहे. कधी कधी ते आपल्याला मनाच्या पलीकडचा अनुभव देऊन जातं. काही गाणी तर आपले विचारसुद्धा थांबवतात आणि आपल्याला अवाक् करतात. आपल्याला खिळवून ठेवतात. मन शांत करतात व खूप खोलवरची प्रसन्नताही देतात. रहे ना रहे हम हे गाणं असंच! अतिशय विलक्षण अर्थ भरलेला आहे! एक प्रकारे व्यक्ती, अभिव्यक्ती व त्यांच्या प्रतिबिंबांची स्पष्ट सूचना आहे.
रहें ना रहें हम, महका करेंगे
बनके कली, बनके सबा बाग़-ए-वफ़ा में
रहें ना रहें हम
मौसम कोई हो, इस चमन में
रंग बनके रहेंगे हम फ़िज़ा में
चाहत की ख़ुशबू यूँ ही ज़ुल्फ़ों से
उड़ेगी ख़िज़ाँ हो या बहारें
यूँ ही झूमते
यूँ ही झूमते और खिलते रहेंगे
बनके कली, बनके सबा बाग़-ए-वफ़ा में
रहें ना रहें हम, महका करेंगे
बनके कली, बनके सबा बाग़-ए-वफ़ा में
खोए हम ऐसे, क्या है मिलना
क्या बिछड़ना, नहीं है याद हमको
कूचे में दिल के जब से आए
सिर्फ़ दिल की ज़मीं है याद हमको
इसी सरज़मीं पे हम तो रहेंगे
बनके कली, बनके सबा बाग़-ए-वफ़ा में
रहें ना रहें हम
-निरंजन वेलणकर 09422108376. लिहीण्याचा दिनांक: 4 ऑगस्ट 2025.
वाचने
4144
प्रतिक्रिया
28
मिसळपाव
प्रतिक्रिया
लेख आवडला. वरील सर्वच गाणी
आवडला
फूल खिले है गुलशन गुलशन
In reply to आवडला by माईसाहेब कुरसूंदीकर
छान लेखन !
छान लेख
परिंदा मधील तुमसे मिलके ऐसा
"ठण्डी हवाएँ" हे गाणंसुद्धा
उदा मालकंस या रागावर आधारित
छान
In reply to उदा मालकंस या रागावर आधारित by सुबोध खरे
रोचक मुद्दा मांडलात. हो.
In reply to उदा मालकंस या रागावर आधारित by सुबोध खरे
दिसला ग बाई दिसला
In reply to रोचक मुद्दा मांडलात. हो. by गवि
पार्टीतली गाणी
In reply to रोचक मुद्दा मांडलात. हो. by गवि
ओ मेरे सनम ओ मेरे सनम
In reply to पार्टीतली गाणी by हणमंतअण्णा शंक…
अगदी अगदी..
In reply to पार्टीतली गाणी by हणमंतअण्णा शंक…
याच चालीवरचे आणखी एक गाणे
काल शोध घेताना राजेश खन्ना +…
In reply to याच चालीवरचे आणखी एक गाणे by विजुभाऊ
काल शोध घेताना राजेश खन्ना + सुलक्षणा पंडित अभिनीत
बंडलबाज या सिनेमातील " नगमा हमारा गायेंगा जमाना " हे गाणेही याच चालीतले आहे.
संगीतकार आर डी.
प्रिये पहाचे समूहगीत (ते पण
हा.... हा... हा....
In reply to प्रिये पहाचे समूहगीत (ते पण by युयुत्सु
मकासूर... एक्दम भारी नाव आहे!
In reply to हा.... हा... हा.... by चौथा कोनाडा
खरंतर, हा स्वत:ला शास्त्रिय…
In reply to प्रिये पहाचे समूहगीत (ते पण by युयुत्सु
खरंतर, हा स्वत:ला शास्त्रिय संगीत गायक म्हणवून घेतो ह्याबद्दलच याला उलटे टांगून मिरच्यांची धुरी का देऊ नये?
- (मकासुर अजिबात न आवडणारा) सोकाजी
धन्यवाद!
असे पाहण्यात आले आहे की काही
या धाग्यातील आणि
अर्थ
याच विषयावर मागं राजू भारतन
'मार्गारिटा' आणि 'कौन है जो
ओहहह!!
ओहह!! अजूनही हा लेख चर्चेत आहे! सर्वांना पुनश्च मन:पूर्वक धन्यवाद! अनेक नवीन गाणीही सांगितली आहेत! वा!
अजून "हमें और जीने की चाहत न…
अजून "हमें और जीने की चाहत न होती" चित्रपट अगर तुम ना होते (१९८३)
https://www.youtube.com/watch?v=jQE18bMRv0A
गायक: किशोर कुमार आणि लता मंगेशकर, संगीतकार: आर. डी.