मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

गूगल फोटोजमधून मिपावर फोटो शेअर करणे. २०२५_०९_२५

कंजूस ·
गूगल फोटोजमधून मिपावर फोटो शेअर करणे. २०२५_०९_२५ google photos वर 'shared album ' कसा तयार करावा आणि का करावा.

google photos वर आपण फोटो अपलोड करतो किंवा backup करतो.
मिपावर फोटो देण्यासाठी एक वेगळा shared album तयार करून त्यास खास नाव दिले ( उदाहरणार्थ = माथेरान मिपा २०२५_०९_१२ किंवा Goa mipa 2024_11_08 ) तर आपल्याला लक्षात येते की हा अल्बम त्या ठिकाणचे त्या तारखेचे फोटो मिपावर लेखात देण्यासाठी आहे आणि तो आपल्याकडून चुकून डिलीट केला जात नाही. हे झाले नाव देण्याबाबत organiser.

shared album 'मध्ये फोटो ठेवल्याने ते वेगवेगळे share करण्याची खटपट वाचते.

चौथा कोनाडा 25/09/2025 - 22:12
अ ति शय महत्वाचं आणि सुलभ करून सांगितलेलं काम. कंजुसजी ... आपण मागच्या महिन्यात हे मला हे व्यनि सांगितले होते.... त्याचा खुप उपयोग होतो आहे. धन्यवाद !

निनाद 26/09/2025 - 13:13
१५ जीबी स्टोरेज कधीच संपले आहे. ५० ते ७५ जी बी फोटो आहेत त्यामुळे google ला खंडणी समान पैसे देण्याशिवाय पर्याय उरलेला नाही!

In reply to by निनाद

कंजूस 26/09/2025 - 13:59
स्टोरेज कधीच संपले आहे.
त्याला पळवाट आहेच. प्रत्येक जीमेल अकाऊंटला १५ जीबी स्टोरेज आहे. आणि आपण अधिक अकाऊंट उघडायला मोकळेच आहोत. माझ्याकडेच सात आहेत. त्यावर बंधन नाही. काय करायचं की दोन तीन rediffmail email account उघडा. त्यांचे पासवर्ड डिटेल कुठेतरी नोंदवून ठेवा. एकाचे Recovery mail option दुसऱ्याला करायचे. फोन नंबर मागितला तर द्यायचा आणि नंतर आणखी एक Recovery mail option देऊन तो फोन नंबरही काढून टाकायचा. नवीन जीमेल अकाऊंट उघडताना नवनवीन नावे द्यायची. Recovery mail option विचारेल तेव्हा एक रेडिफमेल अकाऊंट द्यायचा आणि तिकडे जाऊन verify करा. हल्ली फोन नंबर mandatory आहे तो नंतर द्यायचा. परंतू एका रिकवरीने ऐंशी टक्के काम झालेले असते. पैसे वाचतात पण काम वाढतं. ते म्हणजे सर्व इमेल अकाउंटस नावे, पासवर्ड कुठेतरी नोंदवून महिन्यातून एकदा तरी उघडून मेल पाठविणे करायचे . Activity हवी. अन्यथा बरेच महिने वापर न केल्यास बंद करतात.

In reply to by कंजूस

एका फोन नम्बर वर किती जीमेल अकाऊंट ओपन होतात? सात आठ जीमेल अकाऊंट साठी २/३ तरी फोन नम्बर लागत असतील ना?

In reply to by अनामिक सदस्य

कंजूस 20/11/2025 - 19:59
प्रथम recovery ईमेल ( rediff चा किंवा AOL)टाका आणि तो उघडून अकाऊंट verify करा. मग recovery फोन नंबर देण्यासाठी मागे लागतील तेव्हा अगोदरच दुसरीकडे दिलेला फोन नंबर द्या. त्यावेळेस अडवणूक होणार नाही बहुतेक. मी सहा महिन्यांपूर्वी नवीन जी मेल काढला होता.

In reply to by निनाद

कंजूस 26/09/2025 - 14:03
आणखी एक सिक्यूअर साईट आहे. त्यातून फोटो शेअर होत नाहीत परंतू १५ जीबी फ्री स्टोरेज all media आहे. mediafire.com माझ्याकडे दहा वर्षे आहे. पण गूगल नामवंत आहे.

एका नोनमिपाकराने शिकवलेली टेक्निक! postimage ह्या साईटचे टेलिग्रामवर अकाउंट आहे टोथे जाऊन फोटो टाकायचा, ते डायरेक्ट लिंक जनरेट करतात, तो कॉपी करायची आणी इथे येऊन वर फोटोचे चिन्ह दिसते आहे तिथे पेस्ट करायची. सर्वात खालच्या बॉक्स मध्ये . टाकायचा नी मिपावर पोस्ट करायची!

In reply to by अमरेंद्र बाहुबली

कंजूस 27/09/2025 - 17:16
लोकांना गूगलवर विश्वास आहे. मायक्रोसॉफ्टवर विश्वास आहे. त्याचेच काही टेक्निकल द्यावे लागते. गूगल देतेय १५ जीबी स्टोरेज, सिक्युरिटी, फोनही आहेत android चे. टेलिग्राम अकाऊंट आहे माझे .. त्यावर फोटोंचे फोल्डर बनवता येतात का पाहावे लागेल. वरती ज्या पायऱ्या दिल्या आहेत त्या बऱ्याच वाटल्या तरी काम पाच मिनिटांत होते.

कंजुसकाका, ते अपलोड इमेजेस gmur url द्यायचं ते सर्व बंद झालं वाटतं. मोबाईलमधे जुनं व्हर्जन होतं पण ते चालत नै ये. काही आयडियाची युक्ती ? -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कंजूस 22/10/2025 - 20:03
नाही, काही युक्ती नाही. शेअरिंग लिंक बंद केल्यात. एकूण ती साईटच भारतातून बंद झाली. postimages siteही भारतातून बंद झाली. अमेरिकेत चालू आहे. मी ज्या फोनमधून ( handset) ही वापरत होतो त्यात बुकमार्क केलेले आहेत ते मात्र व्यवस्थित उघडतात. इतर डिवाइसेसमध्ये साईट उघडतच नाही. एकूण आता शेअरिंगसाठी गूगल फोटोज् आणि ड्राईव वापरावे लागणार. मायक्रोसॉफ्टच्या वनड्राईवचे स्टोरेज कमी करून टाकले आहे ( ५ जीबी).

विषारी (टॉक्सिक) माणसे

युयुत्सु ·

विवेकपटाईत 27/09/2025 - 09:25
लेख आवडला. लोकांचा सल्ला ऐकायचा असतो आणि वागायचे आपल्यामना प्रमाणे. मला एका पुणेकरणे मराठी सुधारण्याचा सल्ला दिल्ला. मी थेट दुर्लक्ष करत त्याला म्हणालो, माझी मराठी कशीही असली तरी मिसळपावकर आनंदाने वाचतात. त्त्याचे तोंड एका वाक्यात बंद झाले. बाकी सोशल मीडिया मजा घेण्यासाठी असतो. त्याचा आनंद ही घेता येतो. जर कोणी शिव्या दिल्या तर आपण किती मोठे झालो याचा एक आसुरी आनंद ही आहे.

टॉक्सिक म्हणता येईल की नाही माहीत नाही पण मागे मला डोनेशन मागणाऱ्यांचे फोन यायचे, भाषा अशी असायची की केव्हा देताय किती देताय? गरीब मुलानं द्यायचे आहेत, जसा त्यांचा हक्क होता, मला नाही म्हणायला गिल्टी वाटायचे, मध्ये मॉल मध्ये नी fc रोड वरही रस्त्यात अडवून मुली गरीब मुलांसाठी, अर्भकांसाठी पैसे मागत होत्या, पैसेही अश्या प्रकारे की क्रेडिट कार्ड नंबर वगैरे द्यायचा ऑटो डेबिट होतील महिन्याला हजार किंवा ५०० , मी आढेवेढे घेत नाही सांगायचो, काहीतरी फालतू कारण द्यायचं, पण आता स्पष्ट नाही बोलायला शिकलो आहे, नाही द्यायचे असे स्पष्ट बोलतो, त्यावेळी त्यांचे उतरलेले तोंड पाहून आनंद मिळतो. :)

nutanm 27/09/2025 - 11:37
वरील लिहिलेले घरातल्या सख्खयाचेच असे अनुमव आलेले आहेत बाहेरच्याचही आहेतच, पण घरातल्याचे जळूपणा पैसे, कपडे दागिन्यावर जळून आतमविश्वास खच्ची करणे. कारण स्वताला तितके मिळवण्यासाठी लायकी नाही व कष्टान्ची तयारी नाही. कष्ट व तेही Ernakulam वर्षानुवर्षै करुन मिळवलेले थोडेसेच वैभव पण त्यिवरही जळणे , स्वताकडै नाही म्हणून, मग तुम्ही ही रा ना कष्ट वर्षानुवर्षे. घरिच मस्त दुपारी जेवून झोपून दूसर्याना नावे ठेवून आत्मविश्वास खच्ची करायचा प्रयत्न करून नोकरी सोडायला ऊद्युक्त करुन स्वताला काहीच मिळवता येत नाही . कष्ट करा, झोपू आराम करू नका तडातडा काम करून कष्टसाध्य यश नशिबाचाही थोडा भाग असतोच असतो दुसर्याने मिळवल्यावर जळू नये.

युयुत्सु 14/01/2026 - 10:03
विषारी माणसांना प्रभावीपणे हाताळण्यासाठी त्यांची मानसिकता समजाऊन घेणे आवश्यक असते. युट्युब वर यासाठी असंख्य मार्गदर्शनपर व्हिडीओ उपलब्ध आहेत. असाच एक व्हिडीओ. अवश्य बघण्यासारखा- https://www.youtube.com/watch?v=JdjGnpOb5DI

लेखनविषय:
लेखनप्रकार
आयुष्य शांततेत घालवायचे असेल तर आयुष्यात दुष्ट आणि विषारी लोकांना खड्यासारखे बाजूला करता आले तर आयुष्य प्रवाही बनते. ही माणसे सहसा कोडगी असतात आणि परत-परत आपले विषारी अस्तित्व प्रकट करत राहतात. एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यावर नियंत्रण मिळवताना चडफडतात आणि उघडी पडतात आणि मग जिवाच्या आकांताने अनैतिक मार्गाचा अवलंब करतात. आपण सावध राहिलो तर एक वेळ अशी येते की मग ती उघडी पडतात. काही वर्षापूर्वी एका मानसोपचार तज्ञाने मला फेबुवर फ्रेण्ड-रिक्वेस्ट पाठवली आणि मी ती स्वीकारली. मी तेव्हा फोटोग्राफी करत असे. ही व्यक्ती पण थोडी फोटोग्राफी करायची पण त्यात वैविध्य किंवा प्रयोग नव्हते.

नवरात्री निमित्ताने

Bhakti ·

इथे मात्र आपला संदर्भ चुकला. विठ्तूठला, तू वेडा कुंभार हे गाणे प्रपंच या चित्रपटातील असून चित्रपट १९६१ साली प्रदर्शित झाला होता. मधुकर पाठक दिग्दर्शित, सुधीर फडके यांचे संगीत आणी आवाज. या चित्रपटातील गाणी अधुनिक वाल्‍मीकी गदिमा यांनी लिहीली होती. कथा पटकथा ही त्यांचीच होती. श्रीकांत मोघे,सुलोचना, सीमा देव,शंकर घाणेकर हे दिग्गज कलावंत अनेक राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झालेला कौटुंबिक चित्रपट.

होते कधी कधी . त्याबद्दल क्षमस्व वगैरे काही गरज नाही. लिहायच्या ओघात होतात अशा चुका. बाकी पुन्हा एकदा म्हणेन की घट, सृजन,पुनर्जन्म, स्त्रीस्वरूप आणी नवरात्र याची चांगली सांगड घातली आहे.

In reply to by कर्नलतपस्वी

अभ्या.. 25/09/2025 - 19:39
हो, हो, प्रभात च्या 'संत तुकाराम' ह्या १९३६ च्या चित्रपटामधील "आधी बीज एकले" ही शांताराम आठवल्यांची रचना कित्येकांना संत तुकाराम रचितच आहे की काय असे वाटले होते, कित्येक अभ्यासकांनी त्यासाठी समग्र गाथा पालथी घातली. इतकेच काय तर आजही युट्युबवर लिरिसिस्ट संत तुकाराम म्हणून उल्लेख आहे. आजही संत तुकारामाची भुमिका केलेले विष्णुपंत पागनीसांचे चित्र कित्येक ठिकाणी संत तुकारामाचे चित्र म्हणूनच वापरले जाते. खरे तुकोबाराय कसे दिसायचे ते माहीत नाही पण आपल्या मिपावरील तुकोबाराय हे सुध्दा चित्र पागनीसांच्या इमेजवरुनच केलेले चित्र आहे.

In reply to by अभ्या..

Bhakti 26/09/2025 - 11:10
हो ना, चित्रकारांची ,कवींची कलादृष्टी अचंबित करते. ज्ञानेश्वर महाराजांचेही फेटा घातलेले पावलांवर सर्व शुमचिन्ह हे विशेष दृष्टी(अंध) गुलाबराव महाराज यांच्या कल्पनेने चित्रकाराकडून‌ साकारले आहे. येशूचे चित्र पहिल्यांदा कोणी साकारला असेल.रच्याकने तुम्ही चित्रकार आहात तेव्हा एक प्रश्न विंचीचे ' द लास्ट सपर ' हे चित्र तुम्ही पाहिले का?पाहण्याचा प्लॅन आहे का? दिवसाला फक्त २०-३० लोकांना ते पाहण्याची मूभा असते.विंची द कोड पुस्तकामुळे अक्षरशः एक एक तास हे चित्र मी आंतरजालावर पाहत असे. खुपचं विषयांतर झालं पण I am not robot ;)

In reply to by Bhakti

अभ्या.. 29/09/2025 - 14:43
विंचीचे ' द लास्ट सपर ' हे चित्र तुम्ही पाहिले का?पाहण्याचा प्लॅन आहे का? नाही हो, म्हणजे चित्र हे अभ्यासक्रमात होते, त्याचे फोटोग्राफ्स आणि प्रतिचित्रे पाहिलेली आहेत. दा विन्ची कोड मध्ये पण त्याचा रेफरन्स पाहिला आहे. पण का कोण जाणे द विन्ची आणि मिकालान्जेलो हे सोबत नाव येते तेंव्हा मिकालान्जेलो उजवा वाटायचा. लिओनार्दो तिघामध्ये वयाने सिनियर होता, बहुप्रतिभांचा स्वामी होता, राफायेल आणि मिकालान्जेलो अभिमानाने फक्त चित्रकार आणि थोडे शिल्पकार होते. विंचीची उगीच प्रचंड हाईप होते असे वाटायचे. त्यामुळेच मला लास्ट सपर, मोनालिसा बघण्यात इंटरेस्ट नाहिये बिल्कुल. पण मिकालान्जेलोच्या 'क्रियेशन ऑफ अ‍ॅडम' साठी सिस्टीन चॅपेल आणि 'पिएता' साठी सेंट पीटर्स बॅसिलिका बघायचेच आहे. त्यासाठी पोपमहाशयांनी येऊ दिले तर व्हॅटिकनला जाऊन येणारे.

In reply to by अभ्या..

Bhakti 29/09/2025 - 15:49
+१ क्रियेशन ऑफ अ‍ॅडम मध्ये गॉड ज्यात दाखवला तो भाग मेंदूच्या आकाराचा दाखवला आहे हा सिद्धांत वाचला होता.

अंतरजालावर जेष्इंठ कवयत्री इंदिरा संत यांच्या नावाने सापडते पण वस्तुता ही कवीता एक मिपाकर दिपाली यांनी लिहीली आहे. असे होते कधीकधी.

#नवरात्री निमित्ताने परवा एक आंतरजालीय व्याख्यान ऐकत होते त्यामध्ये हडप्पा काळापासून ते आताच्या काळापर्यंत 'घट' (मडके) याचे बद‌लले स्वरूप, त्या निगडीत प्रथा सांगितल्या गेल्या.

यांत्रिक घड्याळे

कंजूस ·
यांत्रिक घड्याळे माझा घड्याळांशी संबंध आला तो १९८० मध्ये. काहितरी छंद या दृष्टीने एक जुने मनगटी घड्याळ उघडून ,त्याचे भाग सुटे करून जोडले. मग या घड्याळ रिपेंरिंगची हत्यारे, नवीन सुटे भाग कुठे मिळतील याचा शोध घेतल्यावर मुंबईत जे.जे. हॉस्पिटल आणि भुलेश्वर दरम्यान ही दुकाने सापडली. मग याच घड्याळाबरोबर एक गजराचे घड्याळ आणि भिंतीवरचे टोले देणारे घड्याळही उघडले. तर ही सर्व घड्याळे तांत्रिक पद्धतीची होती. डिजिटल जमाना आला १९९५ मध्ये आणि काम बंद झालं. २००५ नंतर मोबाईल येऊ लागले आणि त्यांनी तर बऱ्याच गोष्टींना बाद केलं.

चौथा कोनाडा 24/09/2025 - 17:59
भारी रोचक लेख..... भिंतीवरच्या घड्याळाचा किस्सा भारी आहे. आणि आणि तुमचा घड्याळ दुरुस्तीचा छंद सुद्धा ! मी माझे पहिले रिस्ट वॉच घेतले ते नोकरीला लागल्यानंतर पहिल्या दोन-तीन महिन्यातच .... कारण एकदा कंपनीची बस चुकली .. आणि पोहोचायला उशीर होऊन बॉसच्या शिव्या खायला लागल्या... मग मी सोसायटीचा जेमतेम रक्कमेच लोन काढलं... आणि एक सायकल, टाईम स्टार रिस्ट वॉच मनगटी घड्याळ, आणि फेवरलोबा चे गजराचे घड्याळ.... मनगटी घड्याळ घेण्याचे माझे बजेट नव्हते म्हणून टाईम स्टार घ्यायला लागले.....

प्राईम स्टार पहिले एक-दोन वर्ष ठीक चालले नंतर मात्र कटकटी सुरू केल्या.... काही वर्षांनी एचएमटी घेतले आणि टाइम स्टार धाकट्या भावाला देऊन टाकले.... त्यांनी कुठेतरी हरवून टाकलं, माझी बोलणी खाल्ली .... 1992 साली टायटन नवीनच आले होते तेही सोसायटीच्या लोनवर मिळत होते रुपये दहाशे पन्नास तीन हप्त्यावर... हे मात्र बेस्ट चालले... पुढे कंपनीने एका समारंभा निमित्त कंपनीचा लोगो असलेल्या मोठी डायल असलेलं सोनेरी सुंदर घड्याळ भेट दिले... सर्वच काम डिजिटल सुरू झाल्यानंतर स्क्रीनवर सतत वेळ दाखवणारी पट्टी होती.... घड्याळाची गरज कमी होत गेली हळूहळू मनगटी घड्याळ वापरायचं विसरून गेलो आता मोबाईल मध्येच बघत असतो

माझा घड्याळांशी संबंध आला तो १९८७-८८. माझे वडील घड्याळ दुरुस्ती करणारे होते. हातातली घड्याळे, भिंतीवरची घड्याळे (लोलक असलेली, चिऊताई बाहेर येणारी वगैरे). काही काळ ते टॉवर क्लॉक्स देखील दुरुस्त करत. नंतर ते कंपनीत हजेरी लावणारी घड्याळे दुरुस्त करण्याच्या कंपनीत कामाला लागले. आपणापैकी कोणी २००० सालाच्या अगोदर कोणत्याही मोठ्या ठिकाणी नोकरी केली असेल तर तुमचा ह्या घड्याळाशी नक्कीच संबंध आला असेल. त्यात एक कागदी कार्ड टाकून हँडल दाबले की तुम्ही कामावर येण्याची / जाण्याची तारीख / वेळ त्यावर उमटत असे. कारखान्यांत उशीरा कामावर येणारे, कामाला खोटी / लवकरची हजेरी लावून देण्यासाठी बरेच लोक आमिश दाखवत / धमक्या देखील देत असत). टाईम किपर हा कारखान्यातला एक शक्तीमान हुद्दा होता. मला चित्र डकवता येत नाही म्हणून खाली त्या घड्याळ्याच्या चित्राची लिंक/ दुवा देत आहे. हजेरी लावणारे घड्याळ दूवा क्र. २ तिकडे त्यांनी जवानीची बरीच वर्ष काढली आणि ९०-९२ साली शेठकडे ८०० ऐवजी १००० रुपये पगार मागीतला तेव्हा त्यांना शेठने कामावरुन काढून टाकले. नंतर त्यांनी त्याच क्षेत्रात स्वत:चा व्यवसाय सुरु केला. त्या व्यवसायाच्या जोरावर त्यांनी बरीच प्रगती केली आणि आम्हाला चांगले दिवस दाखवले. एक वेळ अशी होती की घाटकोपर पासून ठाणे पर्यंत लाल बहादूर शास्त्री मार्गावर जेवढ्या कंपन्या होत्या तिकडे सगळीकडे वडीलांना कामे मिळत गेली. एक एक घडयाळाचे वजन २२-२५ किलो असायचे आणि आम्ही त्याकाळी डोंगरावर (उंचावर राहायचो). घड्याळ दुरुस्तीसाठी घरी आणायचे तर अंगावर काटा उभा राहायचा. कमीत कमी १००-१५० पायर्‍या चढून ते घरी न्यावे लागायचे. घरी कोणीही नवागत आला आणि आजूबाजूच्या परिसरात "घड्याळवाले" म्हणुन विचारले की ओळखणारे कोणीही त्यांना घरी आणून सोडायचे. मी देखील कॉलेज जीवनात असताना त्यांना मदत म्हणून ५-७ वर्षे ह्या कामात मदत केली. साधारण २००० सालापर्यंत सगळीकडे संगणक दिसू लागली आणि नंतर कार्ड पंच करणारी मायक्रोप्रोसेसर वर आधारीत हजेरी घड्याळांनी बाजारात प्रवेश केला. तेव्हा वायटुके ची चर्चा जोरात होती आणि मी देखील ही संगणकावर आधारीत हजेरी घड्याळे बंद पडतील आणि आपले जुने सोनेरी दिवस परत येतील अशा मुर्खांच्या नंदनवनात वावरत होतो. मात्र जग जेथून सुरु झाले तेथून पुढे जाते, मागे येत नाही हे घड्याळाच्या व्यवसायात असून मला तेव्हा कळाले नाही. (घड्याळ बंद पडते त्याप्रमाणे जग करोना काळात काही प्रमाणात तात्पुरते बंद पडले हा एकमेव अपवाद ). काही काळ मी देखील 2030 सर्किट वर आधारीत घड्याळे असेंब्ली करुन विकायचा उत्साही उद्योग केला. मजा यायची. एचएमटी / अजंता च्या अगोदर Favre Leuba (गावठी उच्चार फावर लुबा) या कंपनीचे देखील एक साम्राज्य होते. टायटन, सिको , सिटीझन, त्यामानाने फार नंतरचे . सांगायचा मुद्दा म्हणजे माझ्या बाबतीत घरात दिवसरात्र अनेक घड्याळे असल्यामुळे सतत वेळ दिसत राहायचा आणि टकटक आवाज कानात घुमत राहयचा. त्यामुळे आयुष्यात विकत घेऊन कधी घड्याळ हाती बांधले नाही. लग्नात जोडी घडी मिळाली (नवरा बायकोचे सेम डिझाईनचे घड्याळ). बायकोची मर्जी सांभाळ्ण्यासाठी काही दिवस हातात घातले नंतर ठेऊन दिले. कामानिमित्त कंपनीत गेलो तरी संबंध घड्याळाशीच. त्यामुळे हातात घड्याळ न बांधताच जवळपास अचूक वेळ ओळखण्याची कला साध्य झाली होती. आता मोबाईलमधे वेळ दिसते ती वेगळी गोष्ट पण अजूनही हातात घड्याळ बांधून मिरवावे असे वाटत नाही. नंतर इलेक्ट्रॉनिक हजेरी घड्याळे वाढत गेली आणि आमचा व्यवसाय बंद पडला. मी देखील जड अंतःकरणाने शत्रुच्या गोटात प्रवेश केला. (संगणकीय क्षेत्रात प्रवेश केला). तुमच्या लेखामुळे ह्या आठवणी जाग्या झाल्या.

In reply to by धर्मराजमुटके

कंजूस 24/09/2025 - 21:14
@धर्मराजमुटके, तुमचा अनुभव वाचून फारच आनंद झाला. तुमचे वडिल आणि तुम्ही खरेच घड्याळजी. या छंदाबद्दल लिहिण्याचा योग आलाच नाही. २०१२ मध्ये मिपावर आलो आणि घड्याळे रिपेरिंग ९५लाच बंद झाले होते. तसेच ही घड्याळेही बाजारातून मागे पडली होती. अभ्या.. याच्या खरडफळ्यावरच्या खरडीमुळे चालना मिळाली आणि चामुंडराय यांची विनंती आल्यावर विचार केला की जरा लेखाला सुरुवात तर करू. अजून बरेच किस्से आहेत ते लिहीन.

In reply to by धर्मराजमुटके

चौथा कोनाडा 25/09/2025 - 22:09
यात दाखवलेलं ह. ला. घ. बरंच जुनं दिसतंय. आमच्या कंपनीत साधरण १९८५-९० च्या आसपास खालील प्रकारचे ह. ला. घ. वापरात होते. HLV1234 आणि प्रचित दाखवलेले कार्डस, आणि डावीकडे दाखवलेला कार्ड स्टॅण्ड हा आमच्या त्या वेळच्या जीवनाचा अविभाज्य भाग होता.

In reply to by चौथा कोनाडा

अनिरुद्ध प 01/10/2025 - 14:09
मी स्वतः या प्रकारच्या यन्त्राचि निर्मिति आणि सेवा देण्याच्या कम्पनित नोकरिला होतो, त्याच वेळि रेल्वेने सुद्धा अशी टिकिट वेन्डिन्ग मशीन मुम्बै त सर्व रेल्वे स्थानका वर बसवली होति त्यात कुपन टाकुन पन्च केले असता स्थानकाचे नाव आणि वेळ उमटत असे आणि आपण त्या वर प्रवास करु शकत असु. असो . . . लेख आवडला.

In reply to by अनिरुद्ध प

मी स्वतः या प्रकारच्या यन्त्राचि निर्मिति आणि सेवा देण्याच्या कम्पनित नोकरिला होतो
नॅशनल, डिजीटल, दिव्या की अजुन वेगळीच कोणती कंपनी ?

In reply to by धर्मराजमुटके

अनिरुद्ध प 03/10/2025 - 12:39
ठाणे येथे अमेरिकन वाच कम्पनी नावाचे दुकान होते ते सुद्धा अशा प्रकारच्या यन्त्रान्चि निर्मिति करत होते. आता ते अजुन चालु आहे का ते माहित नाही.

In reply to by अनिरुद्ध प

अमेरीकन वॉच कंपनी अजून आहे ठाण्यात पण आता हजेरी मशीन, कुपन वॅलीडेटींग मशीनचे काम बंद केले आहे. हातातली आणि भिंतीवरील घड्याळे विकतात.

कंजूस 24/09/2025 - 21:00
सर्व प्रतिसादकर्त्यांचे आभार. साठ सालच्या अगोदरच्या सर्वांना आपले पहिले घड्याळ कधी घेतले असे घेतले यांच्या आठवणी येत राहातात. कारण फक्त यांत्रिक घड्याळे मिळत होती आणि तीही महाग होती. तीनशे रुपयांना शिलाई मशिन येत असे आणि घड्याळाची तीनशे रुपयांना असे. तर सामान्य मनुष्यांस पगार तिनशेच्या आसपास असे.

In reply to by कंजूस

वय वर्ष विस.पहिले घड्याळ पन्नास वर्षापुर्वी १९७५ साली घेतले होते. तबकडीवर टाईमस्टार असेच काहीतरी लिहीलेले आठवते. रूपये एकशेवीस असेच काही आठवते पण नक्की नाही. दुकानातून युनिट मधे परत जाईपर्यंत बंद पडले. कार्य बहुलतेमुळे पंधरा दिवस दुकानात जाऊ शकलो नाही. तसेही युनिट पासून दहा बारा किलोमीटर दुकान दुर होते. दुकानदार बदमाश निघाला म्हणला हे माझ्याकडून घेतलेच नाही. त्याने मला पावती दिलीच नव्हती. "हम बैठे है ना", अशी गॅरंटी, वॉरंटी दिली होती.खुप बाचा बाची झाली.पण तो ऐकेनाच. शेवटी सटकली आणी माझ्या मित्रानी व मी काऊंटर असलेली नवी जुनी घड्याळे जमिनीवर फेकून दिली आणी पळून गेलो. घड्याळे फुटली काही गटारात पडली बर्‍यापैकी नुकसान झाले अर्थात माझे पैसेही बुडाले कारण त्यावेळेस पैसे जमा करून अशा गोष्टी घ्याव्या लागत. पावती नसल्याने त्याला आमचे नाव गाव पत्ता माहीत नव्हता व मी पण त्या बाजूला फिरकलो नाही. कारण छावणी फार दुर होती. त्यावेळेस एच एम टी घड्याळ कॅन्टीन मधे यायचे पण त्या साठी नंबर लावावा लागत असे. दुसरे घड्याळ कॅन्टीन मधून एच एम टी सोना यलो डायल घेतले. सुट्टीवर गेल्यावर मित्राने काढून घेतले व पैसे खिशात कोंबले. पुढे हाच सिलसिला चालू राहीला. "घे घड्याळ, जा सुट्टीवर, दे मेव्हण्याला,आमक्ल्या,ढमक्याला", बहुतेक वेळा माझे पैसे बुडाले. "तुम्हाला काय, सगळं फुकटात मिळतं",अशी सर्व मित्र,नातेवाईक यानी करून घेतलेली सोईस्कर कल्पना. पुढे एच एम टी चे क्रेझ कमी झाली व पाच सात वर्षानंतर मनगटावर एक घड्याळ स्थिरावले......

एख आवडला. एवढे छोटे यंत्र तास, मिनिट, सेकंद ह्यांचे काटे अचूक कसे चालतात ह्याचे नेहमीच कुतूहल वाटत आले आहे, एकदा युट्यूबवर समजून घ्यायचा प्रयत्न केला होता.

कंजूस 25/09/2025 - 08:24
अकरावी झाल्यावर पहिले घड्याळ घेतले. ७१ साली फावरलुबा घड्याळे तीनशे रुपयांना मिळत. परंतू कस्टम्स खात्याने पकडलेली घड्याळे 'अपना बाजार' सारख्या दुकानांतून १५०-२०० रुपयांना विकली जात. त्यासाठी दुकानाबाहेर रांग लावावी लागे. आठ वाजता दुकान उघडल्यावर त्या दिवशीची चार पाच घड्याळे पहिल्या गिऱ्हाइकास दाखवली जात. तर असे मला १६० रुपयांचे फावरलुबा मिळाले. ते मी बरीच वर्षे वापरले.

आग्या१९९० 25/09/2025 - 11:38
१९७५ चे Tressa Swiss made चावीचे ,स्टील डायल आणि पट्टा असलेले घड्याळ आहे माझ्याकडे. आजोबांनी घेतले होते मला. कधीच बिघडले नाही, अद्याप चालू आहे. रोजच्या रोज चावी दिल्यास अजिबात सेकंदभर मागे पुढे होत नाही. वीस वर्षापूर्वी थंडीच्या दिवसात पहाटे बाईकवरून जात असताना अचानक काच निखळून आली आणि फुटली. फुटलेली काच घेऊन ओळखीच्या घड्याळ दुरुस्ती करणाऱ्या काकांकडे नवीन काच बसवण्यासाठी घेऊन गेलो. त्यांनी पूर्ण मुंबईमध्ये शोध घेतला त्या साईझची वक्राकार तशीच काच मिळाली नाही. शेवटी त्यांनी सपाट पृष्ठभाग असलेली काच लावली. काच बसवण्यापूर्वी त्यांनी घड्याळ खोलून त्यांच्याकडील ब्रशने साफसूफ करून दिले. काम झाल्यावर त्यांनी ह्या घड्याळाची स्प्रिंग आणि आतील यंत्र हे खूप उच्च दर्जाचे आहे असे सांगितले. कधी भविष्यात बिघडले तर माझ्याकडे घेऊन ये फुकटात दुरुस्त करून देईन पण बाहेर दुसरीकडे दुरुस्तीला देऊ नको. अद्याप तशी वेळ आली नाही. आता ते काका आणि त्यांचे दुकानही नाही. हे घड्याळ वॉटरप्रूफ नव्हते. पावसाळ्यात काचेच्या आत वाफ जमून काच धुरकट होत असे. मनगटाच्या उष्णतेचे काही वेळाने वाफ निघून जायची. काचेवर बोटाने घर्षण केले की तात्पुरता धूसरपणा निघून जायचा. त्या काळी घडाळ्यात किती jewels आहेत ह्याचा उल्लेख असायचा. आतील jewels च्या संख्येवर घडाळ्याची किंमत ठरत असे. माझ्याकडील घड्याळ १७ jewels चे आहे.

In reply to by आग्या१९९०

कंजूस 25/09/2025 - 14:28
खरं आहे. काही घड्याळे उघडताना फार काळजी घ्यावी लागते. स्विस घड्याळात विशेषकरून. घड्याळात नदी स्प्रिंग ही एका गोल डबीत बसवलेली असते. त्या डबीला बाहेरून दाते असतात. तर ही डबी बाजूच्या सेंट्रल वीलला फिरवते. ओवरहॉलिंग करताना या डबीचे झाकण उघडून त्यातली स्प्रिंग बाहेर काढून सर्व पेट्रोलने स्वच्छ करून परत ती आत बसवायची असते. पण.... स्विसच्या काही घड्याळांत या डबीवर "DO NOT OPEN" असे लिहिलेले असते. तर हे न वाचताच जर ओपन केलीच तर घड्याळ वाल्याला ती परत बसवणे जमत नाही. तो मेलाच. गिऱ्हाइकाला नवीन घड्याळ घेऊन द्यावे लागते.

सुबोध खरे 25/09/2025 - 12:20
सातवीची स्कॉलरशिप मिळाली १९७७ तेंव्हा वडिलांनी एच एम टी विजय हे घड्याळ घेतले होते. त्यानंतर बरीच वर्षे ते घड्याळ माझ्या मनगटावर होते. नंतर १९९१ एम डी ला ऍडमिशन मिळाली तेंव्हा वडिलांनी टायटन चे सुंदर सोनेरी घड्याळ चामड्याचा पत्ता असलेले होते. १९८७ साली नौदलात रुजू झालो तेंव्हा पासून वाटायचं कि आपल्या हातावर काळ्या रंगाचं इलेक्ट्रॉनिक घड्याळ असावं. पण उगाच पैसे खर्च का करा. वर लिहिलेली दोन घड्याळं होतीच. १९९६ साली दिवाळीला घरी आलो होतो तेंव्हा डोक्यात एक विचार चमकला कि बायको कडे १५-२० साड्या असल्या तरी नवीन साडी घेतलीच जाते मग मी एक जास्त घड्याळ घेतलं तर काय झालं. तसाच उठलो आणि ठाण्याला पोंक्षे वॉच कंपनीत जाऊन ४०० रुपयाला कॅसिओचा क्रोनोग्राफ घेऊन आलो. ते २००६ मध्ये नौदलातून निवृत्त होईपर्यंत हातावर होतं. नंतर ते मुलाने घेतलं. २००८ मध्ये एशियन हार्ट इन्स्टिट्यूट मध्ये विभागप्रमुख असताना एक सिटीझनचं घड्याळ विकत घेतले सोनेरी कडा असलेलं पांढरें घड्याळ त्याला छान चामड्याचा पत्ता होता. ते पाहून एका मित्राने विचारलं कितीला घेतलं ? मी त्याला म्हणालो तूच सांग तो १५ हजार म्हणाला दुसऱ्या मित्राने तसंच विचारलं तेंव्हा त्यालाही हेच म्हणालो तूच सांग तो म्हणाला २० हजार असेल. मी फक्त हसलो. तो खनपटीसच बसला. शेवटी मी म्हणालो तुझा विश्वास बसणार नाही पण हे घड्याळ केवळ ७५ रुपयाला कुर्ला स्टेशनच्या पुलावर घेतलं आहे. ते माझ्या मनगटावर आहे म्हणून त्याची किंमत लोक १५ हजार /२० हजार सांगतात. कारण मी मोठ्या कॉर्पोरेट रुग्णालयात मोठा डॉक्टर आहे म्हणून. किंमत घड्याळाची नाही तर ते वापरणाऱ्या मनगटाची असते. अर्थात घड्याळ चिनी बनावटीचे होते पण सव्वा वर्षे बिनतक्रार चालले. बॅटरी संपल्यावर बॅटरी ची किंमत ७५ रुपये सांगितली मी नकार दिला. केवळ ७५ रुपयात चामड्याच्या पट्ट्यासकट एक वर्ष अचूक चालणारं घड्याळ हे आश्चर्य च नव्हे काय? त्यांनतर मी घड्याळ वापरणे सोडूनच दिले आहे. दवाखान्यात आणि घरात समोरच घड्याळं आहेत आणि बाकी सोनोग्राफी मशीनवर काळवेळ दिसते तशी भ्रमणध्वनीतहि आहे. मग घड्याळ लागतेच कशाला? तीन टायटनची आणि एक एच एम टी विजय अशी घड्याळे पडून आहेत.

In reply to by सुबोध खरे

कंजूस 25/09/2025 - 14:32
अशी घड्याळे घेऊन काही लोक येतात. ती त्यांच्या नातेवाईकांची आठवण असते. चष्मा किंवा घड्याळ आठवण म्हणून ठेवणे सोपे असते. वापरणार नाही पण चालू स्थितीत करून द्या सांगणारे येतात.

विजुभाऊ 25/09/2025 - 14:53
सुरवातीला शाळेत परिक्षेला जाताना आईचे एच एम टी चे घड्याअळ वापरले. नंतर कॅसिओ चे डिजिटल घड्याळ स्टील पट्टावाले वापरले ते बरीच वर्षे टिकले. नंतर पहिली नोकरी लागल्यावर वडिलानी टायटन चे घड्याळ दिले. ते पाचसहा वर्षे वापरले. नंतर पट्टा खराब झाल्यामुळे रस्त्यात हरवले.. लाग्नात सोनाटाचे गोल्डन पट्ट्याचे घड्याळ मिळाले. ते अजूनही ( २५ वर्ष झाली ) वापरतो. खरेतर घड्याळाची गरज पडत नाही. पण ते घड्याळ एक आठवण आणि एक दागिना मणून वापरतो. सोनाटाच्या घड्याळाचे पॉलिश अजूनही टिकून आहे. एकदम नव्यासारखे दिसते

In reply to by अमरेंद्र बाहुबली

चौथा कोनाडा 25/09/2025 - 21:35
खरडफळा हे उत्तमोत्तम धाग्यांचे उगमस्थान झाले आहे!
आता पर्यन्त खरडफळा क्वचित वापरला आहे.... फार काही व्यक्तिगत असेल तरच खफ वापरणे बाकी धागा काढला त र सर्वांनाच चर्चा करता येते.

घरातील गजराचं स्टील चे घड्याळ उघडून ठिक करण्याचा उपद्व्याप कैलास होता पण जमला नाही. मग ते मारूती मंदिर समोरील घड्याळवाल्याकडे दुरूस्त करण्यास दिले. तेच घड्याळाचे वैकुंठ ठरले. पुन्हा बिचारे कधीच घरी आले नाही. १९९० मधे बेसिक कॉम्प्युटर लँग्वेज शिकलो. If then else loop लावून पहिले,अर्थात माझ्या आयुष्यातले डिजीटल घड्याळाचा कोड लिहून डेस्क टाॅपवर चिकटवले. त्यावेळेस संगणक एक जादूई खेळणे होते. सगळ्यांनाच आश्चर्य वाटायचे.

गोरगावलेकर 26/09/2025 - 11:04
कंजूसजी , आपला लेख माझ्या जेठांना वाचण्यासाठी पाठवला होता . त्यांचे गावी असतांना घड्याळ दुरुस्ती - विक्रीचे छोटेसे दुकान होते (साधारण ४ ५ -५ ० वर्षांपूर्वी ) त्या काळी हेनरी सॅन्डोज ची मनगटी घड्याळे चालत . लोक गमतीने यांना हरी सांडूचे घड्याळ म्हणत . भांडवल नसल्याने विविध प्रकारची घड्याळे विक्रीला ठेवणे जमत नव्हते . तेव्हा हरी सांडूचे मूव्हमेंट (केसच्या आतील मशीन ) साधारण ८० रुपयाला मिळे . डायल, केस , पट्टा २ ० -ते २ ५ रुपये . वेगवेगळ्या प्रकारच्या डायल , केस दुकानाच्या काउंटरमध्ये काचेच्या खाली मांडून ठेवत . गिऱ्हाईक आधी डायल वगैरे निवडत आणि त्यानंतर १ ५ -२ ० मिनिटात मूव्हमेंट बसवून घड्याळ दिले जायचे . अगदी लग्नाची खरेदी करणारा नवरदेवही असेच घड्याळ घ्यायचा . घड्याळाची वेळ मागे पडते किंवा पुढे जाते या तक्रारी तर रोजच्याच . यासाठी मूव्हमेंटमध्ये एक गोलाकार स्प्रिंग असायची तिला 'बालतार' म्हणत. ती आखूड-लांब करून किंवा बदलून काम व्हायचे . लेख आवडला आणि लेखाच्या निमित्ताने त्यांच्याही आठवणी ताज्या झाल्या.

In reply to by गोरगावलेकर

कंजूस 26/09/2025 - 11:43
धन्यवाद. मी पण पहिले घड्याळ उघडले ते हेनरी सॅन्डोज 96 . त्यावरच हात साफ केला. ठिकठिकाणी गावागावात विश्वासू घड्याळवाले असत. घड्याळ घ्यायचे म्हणजे त्याच्याकडेच असा परिपाठ होता.

|आजीचे घड्याळ | आजीच्या जवळी घड्याळ कसले आहे चमत्कारिक, देई ठेवुनि तें कुठे अजुनि हे नाही कुणा ठाउक; त्याची टिक टिक चालते न कधिही, आहे मुके वाटते, किल्ली देई न त्यास ती कधि, तरी ते सारखे चालते // "अभ्यासास उठीव आज मजला आजी पहाटे तरी," जेव्हा मी तिज सांगुनी निजतसे रात्री बिछान्यावरी साडेपाचही वाजतात न कुठे तो हाक ये नेमकी "बाळा झांजर जाहले, अरवला तो कोंबडा, उठ की !"// ताईची करण्यास जम्मत, तसे बाबूसवे भांडता जाई संपुनियां सकाळ न मुळी पत्ता कधी लागता ! "आली ओटिवरी उन्हे बघ!" म्हणे आजी, "दहा वाजले ! जा जा लौकर !" कानि तो घणघणा घंटाध्वनी आदळे.// खेळाच्या अगदी भरांत गढुनी जाता अम्ही अंगणी हो केव्हा तिनिसांज ते न समजे ! आजी परी आंतुनी बोले, "खेळ पुरे, घरांत परता ! झाली दिवेलागण, ओळीने बसुनी म्हणा परवचा ओटीवरी येउन !"// आजीला बिलगून ऐकत बसू जेव्हा भुतांच्या कथा जाई झोप उडून, रात्र किती हो ध्यानी न ये ऐकता ! "अर्धी रात्र कि रे" म्हणे उलटली, "गोष्टी पुरे ! जा पडा !' लागे तो धिडधांग पर्वतिवरी वाजावया चौघडा// सांगे वेळ, तशाच वार-तिथीही आजी घड्याळातुनी थंडी पाऊस ऊनही कळतसे सारें तिला त्यांतुनी मौजेचे असले घड्याळ दडुनी कोठे तिने ठेविले? गाठोडे फडताळ शोधुनि तिचे आलो ! तरी ना मिळे !// _ केशवकुमार (प्र. के. अत्रे)

आणि अनेक आठवणी सुद्ध्हा जाग्या झाल्या. दहावी पर्यंत घड्याळ नव्हते त्यामुळे परीक्षेला जाताना वडीलांचे एच एम टी घड्याळ घालुन जायचो कधीतरी. पण त्याला फिरवुन बांधायचा स्टील पट्टा होता त्यामुळे बांधायला कठीण जायचे. त्याला रोज कामवरुन आल्यावर चावी द्यावी लागे. त्याच वेळी घरातील फावर ल्युबाच्या गजराच्या घड्याळालाही. a मग मोठ्या बहिणींची घड्याळे कधीतरी लाडीगोडी लावुन वापरायचो. मग कधीतरी कॉलेजात गेल्यावर वडीलांनाच एक टायटन घड्याळाची जोडी भेट मिळाली त्यातले एक मी घेतले. ते लोकल ट्रेनमध्यी हरवले. मग मधेच एक स्पोर्ट डिजिटल वॉच भेट मिळाले ते वापरले. मात्र २००२ पासुन मोबाईल हाती आला आणि घड्याळ वापरणे सोडले ते आजतागायत. असाच एक लेख चश्मा या वस्तू बद्दल लिहावा म्हणतो.

टर्मीनेटर 26/09/2025 - 18:02
परवा केवळ "नॉस्टॅलजिक केलंत कंकाका..." एवढंच लिहून पोच पावती दिली होती. आज सगळ्यांचे प्रतिसाद वाचले, मस्तच आठवणी / किस्से आहेत सगळ्यांचे आणि त्यातल्या अनेक गमतींशी कमी-अधिक साधर्म्य असणाऱ्या माझ्याही आठवणी असल्यामुळे त्यांच्याशी पटकन रिलेट होता आले त्यामुळे मजा आली! धर्मराजमुटकेंच्या प्रतिसादातील आठवणींशी बऱ्यापैकी समांतर म्हणता येतील अशा गेल्या चार दशकातल्या माझ्या घड्याळ्यांविषयीच्या अनेक आठवणी आहेत त्यातल्या काही दोन मेगाबाईटी प्रतिसादांत लिहितो 😀 माझ्या आईच्या तीन मावश्यांपैकी सगळ्यात धाकटी मावशी पेणची. तिच्या मिस्टरांचे बाजारपेठेत 'आदर्श वॉच कंपनी' नावाचे घड्याळ विक्री आणि दुरुस्तीचे सुमारे पाऊणशे वर्षांपूर्वी सुरु झालेले दुकान आहे. ऐशीच्या दशकात अगदीच लहान म्हणजे शिशुवर्ग - बालवर्गात असल्यापासून उन्हाळ्याच्या सुट्टीत दरवर्षी आम्ही मावस-मामे भावंडे आमच्या आयांबरोबर दोन-तीन दिवसांसाठी पेणला जायचो. सख्खा मामा बदलापूरला राहायचा पण अंबरनाथला ऑर्डनान्स फॅक्टरीत नोकरीला असणारा हा मामा प्रेमळ असला तरी त्याच्या (अति)शिस्तप्रिय स्वभावामुळे आम्हाला त्यावेळी तो फार कटकट्या वाटायचा त्यामुळे आजोळी जायला आम्ही सगळी भावंडे नाखुष असायचो. त्याच्या अगदी उलट परिस्थिती पेण मुक्कामी असायची. मावशीआजीला तीन मुलं, त्यांच्या आणि आमच्या वयातही फार काही मोठे अंतर नसल्यामुळे ते तिघे आम्हाला 'मामा' नामक नातेवाईक न वाटता अगदी जवळचे मित्रच वाटतात आणि त्यांना आम्ही सगळे कायम नावानेच बोलवत आलो आहोत. ह्या तिघांपैकी सगळ्यात थोरला माझ्यापेक्षा दहा वर्षांनी आणि सगळ्यात धाकटा फक्त चार वर्षांनी मोठा आहे. अभ्यास सोडून बाकीच्या सगळ्या ऍक्टिव्हीटीज मध्ये पुढे आणि द्वाडपणा/मस्तीखोरपणाची एखादी स्पर्धा ठेवली असती तर प्रथम पारितोषिक तिघांना विभागून द्यावे लागले असते एवढे अतरंगी. त्यांचे घर/वाडाही चांगला प्रशस्त असल्याने पाच-पंचवीस पाहुणे एकाचवेळी आले तरी जागेची अडचण नव्हती, त्यापेक्षाही जास्त मंडळी जमली तर पोटमाळा होताच! अंगणात आणि परस बागेत आंबा, चिकू, जांभूळ, शेवगा, विविध प्रकारची फुलझाडे आणि एक विहीर आहे. ह्या सगळ्या गोष्टी फार आवडीच्या असल्या तरी खरी मजा त्यांच्या दुकानात यायची. खूप जुन्या चाळीतले तळमजल्यावरचे त्यांचे दुकान लांबीला चांगलेच मोठे होते. 'आगे दुकान, पीछे मकान' अशा प्रकारची रचना असल्याने आजू-बाजूला गुजराती, मारवाडी लोकांची सोनाराची, भांड्या-कुंड्यांची, किराणा वगैरेची दुकाने होती. ती मंडळी पुढच्या भागात आपले व्यवसाय करायची आणि मागच्या खोल्यांमध्ये संसार थाटून होती पण ह्यांच्या पुढच्या व्यावसायिक जागेचा आणि त्या मागच्या तीन खोल्यांचा वापर केवळ व्यावसायिक कारणासाठीच होत असल्याने ते खूप मोठे वाटायचे. पुढच्या दर्शनी भागात ज्याला आपण दुकानाचा गाळा म्हणू, त्यात सर्वात पुढे काचेच्या डिस्प्ले काउंटरमध्ये जेन्टस-लेडीज मनगटी आणि स्टीलची चकचकीत गजराची घड्याळे ठेवलेली असत आणि डाव्या आणि उजव्या बाजूच्या संपूर्ण भिंतींवर आणि समोरच्या भिंतीवर आतल्या भागात जाण्यासाठी असलेल्या दरवाजाचा भाग सोडून बाकीच्या भागावर बहुतांश 'Scientific' कंपनीची लाकडी बॉडीची, काचेचा दरवाजा असणारी लोलकवाली, ठोके पडणारी चावीची मोठी घड्याळे लावलेली असत, त्यातल्या बऱ्याचशा घड्याळांना चावी दिलेली असायची. त्यांचे जेव्हा टोल पडायचे ते ऐकायला खूप मजा यायची, विशेषतः बारा वाजता जेव्हा अनेक घड्याळ्यांचे बारा टोल एकाच वेळी वाजायचे तेव्हा जी कर्णमधुर अशी नादनिर्मिती व्हायची ती खूपच खास वाटायची. मध्यभागी दुरुस्ती करण्यासाठी मध्ये पाय ठेवण्यासाठीची जागा आणि डाव्या-उजव्या बाजूस स्पेअरपार्टस आणि छोटी-मोठी औजारे/हत्यारे ठेवण्यासाठी अनेक ड्रॉवर्स आणि दुरुस्ती दरम्यान घड्याळाच्या नाजूक भागांमध्ये धूळ-माती जाऊ नये म्हणून टेबल लॅम्पने सुसज्ज अशी काचेची मोठी पेटी असलेले लाकडी टेबल असायचे. त्या पुढच्या दुसऱ्या खोलीत लहान-मोठ्या 'पेटी पॅक' घड्याळ्यांचा स्टॉक असायचा आणि त्या पुढच्या तिसऱ्या खोलीत एका कोपऱ्यात टेबलवर घड्याळाच्या सर्व सुट्या भागांची स्वच्छता करण्यासाठी Elma ह्या जर्मन कंपनीचे वॉच क्लीनिंग मशीन आणि दुसऱ्या कोपऱ्यात एक लांब-रुंद लाकडी टेबल होते ज्याचा उपयोग जड औजारे वापरून मोठी घड्याळे उघडण्यासाठी केला जायचा. त्या पुढची शेवटची चौथी खोली ही त्या चाळीच्या मूळ आराखड्यानुसार स्वयंपाक घर होते. ह्या खोलीत मोरी आणि ओटा होता. त्या ओट्यावर विक्री झालेल्या घड्याळ्यांचे आणि सुट्या भागांचे टाकाऊ पॅकिंग मटेरियल आणि खाली चहा पावडरच्या पॅकिंसाठी वापरले जाणारे हलक्या लाकडाचे दोन खोके ठेवलेले असायचे. त्यातल्या एकात चावीच्या लहान-मोठ्या घड्याळ्यांच्या निकामी झालेल्या स्प्रिंग्स आणि अन्य लोखंडी सुटे भाग तर दुसऱ्या खोक्यात निकामी झालेले पितळी सुटे भाग भंगारात देण्यासाठी जमा केले जायचे. भरपूर हवा-उजेड आणि जा-ये करायला मागच्या बाजूला दुसरा दरवाजा असणारी ही खोली आमची खेळण्यासाठीची सगळ्यात आवडती जागा होती. पत्ते, सापशिडी, ल्युडो, नवा व्यापार असे बैठे खेळ तर चालायचेच पण त्या व्यतिरिक्त त्या भंगार द्यायला म्हणुन जमा केलेल्या लहान मोठ्या निकामी स्प्रिंग्स आणि गिअर्स/चक्री अशा वस्तूंचाही वापर करून आमचे काहीतरी उपदव्याप चालायचे. तुटलेल्या स्प्रिंग्सना चावी दिल्यासारखे हाताने गुंडाळून बॉल स्पिन करताना आपण देतो तशी फिरकी देत जमिनीवर सोडल्या की त्या मूळ पदावर येताना अल्पकाळ भुईचक्रासारख्या फिरायच्या. काही वेळा त्या पातळ पट्ट्यांच्या स्प्रिंग्स गुंडाळताना ग्रीप सैल झाली तर बोटे ब्लेड लागल्यासारखी किंचित कापलीही जायची किंवा फिरकी देत जमिनीवर सोडताना अंदाज चुकला तर फॉक्कन उघडणाऱ्या त्या स्प्रिंगचा कोणाच्यातरी पायावर सप्पकन फटका बसायचा आणि चांगलाच वळही उठायचा 😀 मोठ्या घड्याळातले निकामी पितळी गिअर्स आणि चक्र्या-चकत्यांचा वापर करून खेळायचा एक खेळ आम्हाला काकांनी शिकवला होता. काका म्हणजे मावशीआजीचे मिस्टर, म्हणजे म्हंटल तर माझे आजोबाच, पण गंमत म्हणजे त्यांच्या कुटुंबातले सर्व सदस्य आणि आम्ही सर्व नातेवाईक मंडळी त्यांना पहिल्यापासून काकाच म्हणतो, हे तिन्ही मामा लोकही त्यांना बाबा, पप्पा किंवा डॅडी वगैरे न म्हणता 'काका'च म्हणतात. मला हा प्रकार तेव्हाही आणि आताही विचित्रच वाटतो खरा, पण आहे ते असंच आहे 😀 ते असो... तर ह्या काकांच्या शेजारी राहणारे रिसबूड म्हणुन एक गृहस्थ होते. ह्या सख्ख्या शेजाऱ्याचा पोळपाट-लाटणी, ताक घुसळायची रवी, विळीचे पाट, बसायचे पाट, टिपऱ्या, विविध हत्यारे आणि हात अवजारांच्या मुठी, वायरिंगसाठी लागणाऱ्या बॅटन पट्ट्या अशा अनेक प्रकारच्या लाकडी वस्तू बनवण्याचा कारखाना काकांच्या दुकानाच्या बरोबर समोर, रस्त्याच्या पलीकडे होता. लेथ मशीन आणि कुठल्या कुठल्या मशीनवर तयार होणाऱ्या ह्या वस्तूंची निर्मिती प्रक्रिया बघायला पण मजा यायची. त्यांच्या कारखान्यात लाकडी स्विच बोर्ड्स तयार करण्याचे आणि त्यावर स्विच, सॉकेट बसवण्यासाठी ते मापानुसार खाचण्याचे काम मोठ्या प्रमाणावर चालायचे. बोर्डाच्या (सहसा आकाशी किंवा पांढऱ्या रंगाचा) सनमायका लावलेल्या दर्शनी भागावर खाचा पाडल्यावर जे त्याचे लहान-मोठे तुकडे मशीनच्या खाली पडायचे ते तुकडे किंवा रुंद बॅटन पट्टीचे किंवा एखाद्या पातळ फळकुटाचे तुकडे आम्ही तिथून घेऊन यायचो आणि त्यावर सुई, दोरा, टाचण्या, चुका, तारा, रबर बँड अशा सहज उपलब्ध असलेल्या फुटकळ वस्तू आणि मोठ्या घड्याळ्यांचे निकामी पितळी गिअर्स वापरून छोटेसे मेकॅनीझम बनवायचो. खेळाचा नियम एकंच, तो म्हणजे त्या लाकडी बेस प्लेटवर बसवलेल्या गिअर्स, चक्री पैकी कुठलाही एक गिअर किंवा चक्री बोटाने फिरवली की बाकीचे सर्व गिअर्स किंवा चक्र्या पण उलट-सुलट अशा कुठल्याही दिशेने फिरल्या पाहिजेत. ज्याच्या मेकॅनीझममध्ये अशा फिरत्या गिअर्स किंवा चक्र्यांची संख्या जास्ती तो विजेता ठरायचा आणि त्याला काकांकडून काहीतरी बक्षीस मिळायचे. आज हे वाचताना खूप क्षुल्लक वाटेल पण मनापासून सांगतो त्यावेळी घरच्यांनी आणून दिलेल्या, बाजारात उपलब्ध असलेल्या कुठल्याही मेकॅनो पेक्षा हा प्रकार जास्त आनंददायक आणि मजेदार वाटायचा! क्रमश:

In reply to by टर्मीनेटर

अभ्या.. 26/09/2025 - 18:11
टीझरच खतरनाक, पिच्चर भारीच असणारे, आन दो, वाट बघता है. . मेरे हिसाबसे भारी भारी घड्याल कलेक्शनवाला आदमी लगता है तू. आणि लैच बारीक निरिक्षण आणि हत्तीची स्मरणशक्ती असल्याशिवाय इतके डीट्टेल लिहिता येतच नै. आवडते असे लेखन.

In reply to by टर्मीनेटर

कंजूस 26/09/2025 - 19:05
हे लेखन बहुतेक १००१ अरेबियन नाईटस गोष्टींसारखं होणार आहे. . उत्सुकता वाढली आहे. ते स्प्रिंगचे खेळ यावरून आठवलं. रिस्ट वॉचची स्प्रिंग फारच लहान असते आणि फारसा धोका नसतो ती बॅरलमधून सोडवताना किंवा परत भरताना. परंतू हीच जेव्हा भिंतीवरच्या घड्याळाच्या बॅरल ( बंद वाटी सारखी पितळी डबी तीन चार इंच रुंद असते आणि त्यावर बाहेरून दातेही असतात.) मधून काढायची वेळ आली तेव्हा फारच तंतरली होती. स्प्रिंग म्हणजे लोखंडी पट्टाच अडीच तीन फुट लांब. तो पट्टा /पट्टी गुंडाळून त्या वाटीत भरलेली असते. समजा हातातून निसटले दोन्ही तर कपाळमोक्ष नक्कीच. मग मी काय केले, एक आंब्याचे खोके घेतले त्यावर उशी ठेवली व वरून बाजूनं हात घालून ती स्प्रिंग आतमध्ये उलगडली. आणि तशीच भरली.

In reply to by टर्मीनेटर

Bhakti 27/09/2025 - 15:00
ये टर्मीनेटर की लेखन स्टाईल है.... खिळवून ठेवते.जबरदस्त,अगदी रेट्रो युगात गेल्यासारखं वाटलं.

मस्त मजा आली वाचायला. मार्गी यांचा प्रतिसादही उत्कृष्ट. आठवड्यातून एकदा चावी देण्याचे लंबकाचे घड्याळ आमच्या घरी होते. रविवार हा चावीचा दिवस होता. त्याला चावी देण्यात मी आणि माझा मोठा भाऊ यांच्यात चढाओढ होती. म्हणजे तो नेहमीच मला ढकलून चावी देत असे. एकदा तो झोपलेला असतांना मी चावी द्यायचा प्रयत्न केल होता. तेव्हा माझ्या ध्यानात आले की हे ताकदीचे काम होते. शेवटचे दोन फेरे मी देऊं शकलो नव्हतो आणि शुक्रवारी चावी संपल्यामुळे घड्याळ बंद पडले. मग अर्थातच माझी भरपूर टिंगलटवाळी झाली. या घड्याळाला दोन स्प्रिंगा होत्या. चार आकड्याबाजूची चावी घड्याळाची आणि आठच्या बाजूची चावी टोल्यांची. वर्षातून एकदा छंद म्हणून तीर्थरूप ते घड्याळ उघडून तेलपाणी करीत. या घड्याळाची स्प्रिंग दणकट आणि नीट न हाताळल्यास. इजा करणारी होती. आमच्या घरी हॅन्डल फिरवून चावी द्यायचा ग्रामोफोन होता. त्याची देखील स्प्रिंग अशीच दणकट होती. मस्त लेखाबद्दल धन्यवाद.

. वडिलांना हे घड्याळ घरात हवे होते, मागेच ऍमेझॉन वरून मागवून लावले. . मुलाच्या फोटोचे हे घड्याळ बनवून घेतले. आणखी एक घड्याळ आहे , ज्याला खाली जहाजाचा नांगर आहे. . हे आसे.

स्वधर्म 29/09/2025 - 21:21
उत्तम पण हुरहूर लावणारा लेख. धन्यवाद कंजूस काका! आमच्या घरी लहानपणी अभ्यास करायला लवकर उठावे यासाठी जे गजराचे घड्याळ वापरत होतो, ते अतिशय उत्तम दर्जाचे 'हेस' या कंपनीचे होते. त्याची केस स्टेनलेस स्टीलची होती व डायल काळी होती. हिरवट रंगाचे काटे आणि आकडे अंधारात चमकत असत. त्यामुळे किती वाजले ते अंधारातही दिसत असे. त्याला ठेवायला एक लाकडी पेटी होती व त्याला पुन्हा काचेचे दार होते, जे उघडून त्याला रोज न विसरता चावी द्यायला लागायची. त्याचा गजराचा आवाज किर्रर्रर्रर्रर्र असा कर्कश्य होता पण 'कठोर परिश्रमास पर्याय नाही' हा सुविचार न बोलता मनावर ठसवणारा. पुढे ते बरेच मागे पडू लागले किंवा पुढेच जाऊ लागले. शिवाय ते निगुतीने दुरुस्ती करणारे कारागिर आता निघून गेले होते. पुण्यात यशवंत वॉच अँड इलेक्ट्रॉनिक्स यांच्याकडे दुरुस्तीला द्यायला गेलो. त्यांनी सांगितले की एक पिंप भरून तसली गजराची घड्याळे पडली आहेत व आंम्ही आता ही दुरूस्त करण्याचेच बंद केले आहे. अशा प्रकारे लहानपणापासून जीवनाचा भाग असलेल्या त्या गजराच्या घड्याळाला निरोप देताना खूप हुरहूर लागली होती. खूप उत्तम स्थितीतील चालू गोष्टी अशा रिपेअर होत नाहीत, किंवा तंत्रज्ञान कालबाह्य झाले म्हणून टाकून देववत नाहीत. असाच किस्सा निकॉन एफ ५५ डी या फिल्म कॅमेर्‍याबद्दल आहे. फिल्म वापरणंच बंद झाल्याने अजूनही ते एक अत्यंत महागाचं काटेकोर (प्रिसिजन) उपकरण चालू अवस्थेत घरी पडून आहे. काळाचा महिमा.

अभ्या.. 03/10/2025 - 17:49
माझ्या आवडीच्या विषयाला बोर्डावर आणल्याबद्दल कंकाकांना थ्यान्क्स. खरे पाहता घड्याळ म्हणले की मला आठवते ते माझ्या अजोबांचे घड्याळ. ते पोलीस पाटील होते आणि गावाकडे वाड्यात राहायचे. त्यांच्याकडं गाव जवळ असल्याने जाणेयेणे व्हायचेच. वाड्यातल्या माझ्या तीन आवडत्या गोष्टी म्हणजे आजोबांची एकनळी ब्रिटिश(की स्कॉटीश) बंदूक, जुन्या ब्युक कारच्या आकाराचा पानाचा पितळी डबा आणि एक झाकणवाले पॉकेट वॉच. ते वॉच खरेतर बंद पडलेले होते आणि दुरुस्तही होत नव्हते तेम्व्हा ते माझे खेळणे झालेले. बाकी दोन गोष्टींना हात लावू दिला जात नसे. ते पॉकेट वॉच एकदा मी शाळेत घेऊन गेलेलो. बापूजींचे घड्याळ असेच म्हणले सगळेजण. वडिलांच्या हातातल्या घड्याळाला मात्र हात लावू दिला जात नसे. त्यांचे एक हेन्री सँडोझ होते आणि नंतर एक एचएमटी, एक दोनदा ते पटेल वॉच कंपनी मध्ये दुरुस्तीला दिल्यावर आणण्याची जबाबदारी मिळाल्याचे आठवते. कोणते घड्याळ असे विचार्ल्यावर सांगायचे उत्तर "एचेमटी कैलाश" असे माझ्याकडून तीन चारदा वदवून घेतले गेले. ते आयएनएस विक्रान्त सारखे वाटायचे म्हणायला. एक दोन परिक्षांमध्ये ते मी वापरले, दहावीच्यापर्यंत डिजिटल आणि ऑल्विनच्या घड्याळांची क्रेझ होती. एचएमटी घड्याळे पण असायची आणि ट्रॅक्टर पण, कॅसिओची घड्याळे असायची, कॅल्क्युलेटर आणि सिंथेसायझरलाही आम्ही कॅसिओच म्हणायचो. त्यामुळे एलसीडी आणि बटणंवाल्या गोष्टी जपानी लोक भारी बनवतात असे वाटायचे. ज्यु. कॉलेजात मात्र फारसे घड्याळ वापरल्याचे आठवत नाही. दिवसभर मैदानात पडीक असल्याने देखील घड्याळ नकोसेच असायचे. डिग्रीच्या चांगल्या रिझल्टनंतर आतोबांनी चक्क सिटिझन इको ड्राईव्ह दिलेले गिफ्ट. ते महाग होते पण आतोबा एअरफोर्स मध्ये असल्याने ते आम्हाला कॅन्टीनमध्ये स्वस्त मिळालेय असे सांगितले. ते खरे नव्हते. त्यांनी बाहेर विकत घेतेलेले ते. ते आजही महाग आणि क्लासिकच समजले जाते. स्वतःचे असे पहिले घड्याळ इंटर्नशिपच्या पैशात घेतले ते सोनाटा, थोडे टँक वॉच प्रमाणे लंबआयताकार, मेटल ब्रेसलेट, व्हाईट डायल, क्वार्टझ. अजून आहे ते चालू. इथून पुढे चालू झाली माझी घड्याळाची प्रेमकहाणी. ती अजून एक दोन प्रतिसादात. सवडीने, आवडीने.......

‘कालान्तर’ : समाजातल्या व्यापक पडझडीचे वास्तवदर्शन

हेमंतकुमार ·

हेमंतकुमार 22/09/2025 - 08:09
Giovanni della Casa या 16 व्या शतकातील प्रसिद्ध इटालिय कवी, धर्मोपदेशक आणि मुत्सद्याने हे 100 पानी पुस्तक लिहिले होते. ते त्यांच्या मृत्यूनंतर म्हणजे 1558 साली प्रसिद्ध झाले. Galateoचा अर्थ ‘द रूल्स ऑफ पोलाइट बिहेवियर’ अर्थात, समाजात कसे वागावे आणि वागू नये. या पुस्तकात नागरिकांकडून सभ्य आणि सौजन्यपूर्ण वागणुकीची अपेक्षा केलेली आहे. मुळात पुस्तकाचे नाव हे त्यांच्या एका जिवलग मित्राचे नाव होते. हे पुस्तक युरोपात प्रचंड लोकप्रिय झाले व त्याची अनेक भाषांत भाषांतरे झाली. युरोपातील प्रबोधनपर्वात या पुस्तकाचा प्रभाव संपूर्ण युरोपीय संस्कृतीवर पडला आणि त्यातूनच तिथे शिष्टाचाराला महत्त्व प्राप्त झाले. कालान्तराने त्या पुस्तकाचे विशेषनाम असलेले शीर्षक इटालिय भाषेत शिष्टाचारसंहिता या अर्थाने सामान्यनाम बनले. चालू शतकातही त्या पुस्तकाच्या आवृत्त्या निघत असतात. पुस्तकाची पीडीएफ जालावर उपलब्ध असल्याने दोन-चार पाने वाचण्याचा प्रयत्न केला परंतु ते प्राचीन इंग्लिश (की युरोपीय भाषा मिश्रण?) झेपले नाही.

युयुत्सु 22/09/2025 - 11:49
या पुस्तकात नागरिकांकडून सभ्य आणि सौजन्यपूर्ण वागणुकीची अपेक्षा केलेली आहे. वस्तूस्थिती अशी आहे की सभ्यपणा हा आता कमकुवतपणा समजला जातो. नखं दाखवल्याशिवाय मान राखला जात नाही.

कंजूस 22/09/2025 - 19:42
या पुस्तकात लेख आहेत. विषयवार आहेत. ठीक आहे.
सुरुवातीच्या तब्बल 13 लेखांतून शिक्षण पद्धतीत झालेले बदल टिपले आहेत. त्यात पाठांतर, शुद्धलेखन, उच्चार आणि हस्ताक्षरापासून ते संस्कार, गुरु-शिष्य नाते आणि विद्यापीठातील शिक्षणापर्यंतचे मुद्दे हाताळले आहेत. .......
- खरं म्हणजे समाज घडवणे आपलीच जबाबदारी आहे हे शिक्षकांनी उगाचच अंगावर घेतलेले काम ठरले.
आपल्यावरील दीर्घकालीन ब्रिटिश राजवटीमुळे पडलेला प्रभाव आणि जागतिकीकरणानंतर पडलेला अमेरिकी प्रभाव आणि त्यातून झालेला संस्कृतीसंगम यांचे विवेचन .....
- जगात ब्रिटिश लोकांची कामाची पद्धत आणि संस्कृती हीच बरोबर अशी धारणा करून देण्यात आली. जर्मन जपान दूरच राहिले.
सुदृढ समाज जीवनासाठी आपल्यासमोर काही आदर्शांची सतत गरज असते. .....
यासाठी गेल आम्लेट हिचे बे-गमपुरा पुस्तक वाचायला हवे. समाज जीवन खरंच बदलले होते का? किंवा प्रयत्न,तरी होत होते का?
पुस्तकात सार्वजनिक शिष्टाचारासंबंधी तीन-चार प्रकरणे असून त्यामध्ये केलेली युरोपीय संस्कृती आणि आपली तुलना महत्त्वाची आहे. ........
आपल्या संरक्षण दलात अजून ब्रिटिश शिष्टाचारच पाळले जातात. "Chasing the Olive Dream" refers to the memoir by Shivani Oka Jagtap, ( याचे सांपल) किंडलवर सापडेल. कालान्तर वाचले नाही पण.. मला सुचले ते लिहिले. .

In reply to by कंजूस

हेमंतकुमार 23/09/2025 - 07:21
जन्माने अमेरिकी असलेल्या या बाईंनी महाराष्ट्रात येऊन मराठी माणसाशी लग्न केले आणि नंतर शेवटपर्यंत भारतीय नागरिक म्हणून राहिल्या ही माहिती वाचली. त्यांचे दलित उद्धाराचे कार्य प्रशंसनीय आहे ! /-\

Bhakti 22/09/2025 - 20:43
आपल्यावरील दीर्घकालीन ब्रिटिश राजवटीमुळे पडलेला प्रभाव आणि जागतिकीकरणानंतर पडलेला अमेरिकी प्रभाव आणि त्यातून झालेला संस्कृतीसंगम यांचे विवेचन अभ्यासपूर्ण आहे.
ब्रिटिश काळात आधुनिकीकरण बरोबर अनेक न्यूनगंड भारताला जखडले असे म्हटले जाते.ब्रिटिशांना अनुकूल व्यवस्थेत अनेक मूळ संस्कृती लयाला गेली. चांगल्या विषयावर हे पुस्तक आहे.

तिता 27/09/2025 - 04:53
आज सर्वच व्यवसाय भ्रष्टाचारात अडकले असताना थोडाफार आदर्शवाद फक्त याच वर्गात शिल्लक असल्याचे ते म्हणतात....... स्वप्नाळू आहेत हे विचार. शहरात पैशामागे पळतात पण काही तत्वनिष्ठ असतील. ग्रामीण भागात परिस्थिती भयाण आहे.

ok गेल्या 50-60 वर्षांत आपल्या समाजात झालेल्या पडझडीचे चित्रण करणारा 43 लेखांचा हा संग्रह. हे लेख मुळात लोकमत दैनिकाच्या मंथन पुरवणीसाठी लिहिलेले होते. स्वातंत्र्याच्या कालखंडात आपण काय कमावले आणि काय गमावले यांचा हा ताळेबंद. त्यातून लक्षात येते की, कमावण्याच्या बाजूला थोडेच असून गमावण्याच्या बाजूला मात्र भरपूर आढळले आहे. काही स्वागतार्ह बदलांपेक्षा पडझड मात्र कितीतरी अधिक व चिंताजनक आहे.

एआय आणि उत्पादकता

युयुत्सु ·

मारवा 21/09/2025 - 09:03
1 AI संदर्भात व्यक्तिगत माझा फारसा कुठलाही सखोल अभ्यास नाही. मात्र AI मध्ये आज जो माझा एक मित्र अमेरिकेत प्रत्यक्षात काम करतो त्याच्याशी जेव्हा बोलणे होत असते तो एक मुद्दा सतत मांडतो. तो असा की AI संदर्भात त्याची costing हा सर्वात मोठा अडथळा आज तरी आहे. त्याला लागणारा खर्च आणि मिळणारा परिणाम यात आज तरी मोठी gap आहे. अर्थात हे व्यापक एकूण overall AI industry संदर्भातील त्याचे निरीक्षण/ मत आहे. कुठल्याही particular AI च्या वापराबाबत किंवा टूल बाबत नाही. 2 मी स्वतः एक लहान शुद्ध ट्रेडर आहे अर्थात हा माझा मुख्य व्यवसाय नाही. ( शुद्ध शाकाहारी च्या धर्तीवर मी गुंतवणूकदारं नाही) तर पुन्हा माझ्या मर्यादित अनुभवानुसार AI किमान शुद्ध ट्रेडिंग मध्ये "फारसे" उपयोगाचे मला तरी आढळलेले नाही. अर्थात यात माझीही मर्यादा असेल. पण तरीही माझा भारतातील काही उत्कृष्ठ शुद्ध ट्रेडर्स शी संबंध आला त्यातील अनेकांनी या मताला दुजोरा दिला. अर्थात पुन्हा हा डाटा पुन्हा मर्यादित आहे. Fundamental analysis त्यातील मुख्यतः सांख्यिकी आणि clearly defined data मुळे उपयुक्त नक्कीच असावे.

अरे वाह ! मटा च्या लेखाबद्दल अभिनंदन.सध्या सर्वत्र बोलबाला आहे तो, ए०आय० बद्दल. शहर ते खेडे सर्वच ए०आय० बद्दल बोलतात. आपण शेयर बाजाराच्या समभागाच्या विश्लेषणासाठी त्याचा वापर केला आणि त्याचा आपणास फायदा झाला.. व्यक्तिगत शेयर बाजाराच्या अशा विश्लेषणाचा किती फायदा होत असेल हे निश्चित सांगू शकत नाही.. शेयर बाजार नुसता विश्लेषणावर चालत नाही तर त्यावर परिणाम करणारे विविध घटक असतात, त्यामुळे अचानक उसळी घेतलेली शेयर क्षणार्धात जमिनीवर येतात या अनपेक्षित घटनांचे अचूक विश्लेषण कसे करू शकेल असा प्रश्न पडतो. अर्थात आपण त्यातील जाणकार आहात आपल्या लेखनाचा AI च्या वापराचा फायद्याबद्दल पुढील काळात अजुन लिहिते राहालच. लेखाबादल अभिनंदन. ता.क. अल्बेनियातील मंत्रीमंडळात स्थान मिलवलेल्या AI अर्थात बॉटचा उपयोग भविष्यात त्याची उपयोगिता लक्षात येईल. -दिलीप बिरुटे

ए.आय मुळे ज्ञान हे बर्याच प्रमाणात मुक्त होईल. जात पात आधारीत कौशल्ये/ज्ञान ह्याची मक्तेदारी कधीच इतिहास जमा झालेत पण त्याची जागा शैक्षणिक पात्रतेने घेतली होती इथेही अडचण ही आहे कि एखाद्याला तशी इच्छा वा पोटेन्शियल असेल तरी विशिष्ठ पात्रता अर्हित केल्याशिवाय तत्सम शिक्षण मिळणे दुरापास्त होते. उदा.अ ही व्यक्ती कविता करते व त्याला त्याच्या कवितांना संगीत द्यायची इच्छा आहे. आतापावेतो अ लाएखाद्या संगीतकार/गायकाला गाठावे लागत होते त्याची फिज द्यावी लागत होती पण ए.आय ने ही कविता ते गाणे ही मधली गॅपच भरुन काढली आहे. संगीत निर्माण करुन देणारे एखादे ए. आय . टूल हे काम अगदी मिनिटात करुन देते. आता इथे ह्या म्युझिशियन गायक वगैरेंचे गरज तशी संपल्याचे भासते पण त्याच वेळी प्रचंड प्रमाणात जे हौशी नवशे गवशे अश्या टूल चा वापर करुन ह्याच संगीतकार गायकांकडुन ही गाणे फाईन ट्युन करु शकतात.

कंजूस 21/09/2025 - 14:30
लेखाबद्दल अभिनंदन. एआइ म्हणजे "दुसऱ्याचे बघायचे वाकून" इंटरनेट आणि माहितीचा खजिना यांचा वापर करून. तुमच्या शेअर गुंतवणुकीचे उदाहरण घेऊ. बाजारात कुणी कुणी या गुंतवणुकीतून किंवा गुंतवणुकीची उलाढाल/ एक प्रकारची धरसोड करून त्याची संपत्ती वाढवत आहे. त्याची युक्ती आपल्याला जाणून घ्यायची आहे. पण ती कळणार कशी? एआइ तिथे येऊन कोणत्यातरी प्रकारे ती माहिती मिळवून आपल्याला देईल अशी आशा ठेवणे. उदाहरण दुसरे. उद्योग मासे पकडणे. आपल्या गावात/तालुक्यात/..... कुणीतरी मासे पकडतोय आणि त्याला खूप मासे मिळत आहेत पण आपल्याला मिळत नाहीत. मग आपण काय करतो? चवकशा करतो कोण कुठे कधी मासे पकडतो. त्यांचे अनुकरण करतो. एआइ अशी माहिती ठिकठिकाणाहून मिळते का तपासतो आणि आपल्याला आणून देतो. अशी माहिती कुठून मिळते? ज्यांना असे करायचे माहीत आहे ते लोक आपल्याकडील माहिती निरिच्छपणे जालावर ओतत आहेत. त्यांनी ते केलेच नाही तर एआइ बंद पडेल.

गामा पैलवान 21/09/2025 - 23:44
युयुत्सु, लेख चांगला जमलाय. तुम्ही बरेच परिश्रम घेऊन लिहिता ( कृबु वापरून वा अन्यथा ) याचं कौतुक आहे. एक शंका आहे. तुम्ही म्हणता की :
लवकरच माणसाची उत्पादकता त्याच्या ए०आय०च्या वापरावरून निश्चित केली जाईल याची मला खात्री आहे.
यांतनं एक प्रश्न उपस्थित होतो. समजा मी तुमच्या माहितीचा ग्राहक आहे. माहितीचा ओघ तुमच्याकडून माझ्याकडे वाहतोय. तुम्ही कृबु वापरून काही माहिती गोळा केली व मला दिली. ती माहिती आता मी वाचणार. यांत तुमचा मेंदू कमी काळ व्यग्र ( = एंगेज्ड ) होता. कारण की कृबुने तुमच्या कामाचा बराचसा भार उचलला. पण मला मात्र पूर्ण लक्ष देऊन माहिती वाचावी लागणार. माझा मेंदू पूर्णवेळ व्यग्र राहणार. हे थोडं अस्थायी वाटंत नाही का ? हा एक प्रकारचा अन्याय आहे. हाच प्रश्न मी माझ्या एका मित्रास विचारला. तो म्हणाला की 'बिनडोक' माहितीचा वापर 'डोक्याने' करावा लागेल असं स्वप्नांतही वाटलं नव्हतं. कुठे नेऊन ठेवलंय हे जग माझं. मी म्हंटलं की कृबुने 'बिनडोक' या शब्दाची व्याख्याच बदलून टाकलीये. हीच मोठी प्रगती नव्हे काय? मग आम्ही दोघेही जोरजोरात हसू लागलो. बाकी, विनोदाचा भाग वगळता यावर पुढे काही चर्चा करता येईल काय? आ.न., -गा.पै. अवांतर : विट्जेनस्टेईन ( = विज्जेनस्टेईन ) चं नाव जरा सांभाळून घ्या बरंका. मी तुमच्या ज्ञान वा समज यावर भाष्य करीत नाहीये. ही फक्त एक धोक्याची सूचना समजा. माझा हा संदेश आठवला : https://www.misalpav.com/comment/1178078#comment-1178078

युयुत्सु 22/09/2025 - 11:02
श्री मारवा आणि प्रा० बिरूटे ए०आय० ची व्यक्तीगत अनुभूती हत्ती आणि आंधळे या गोष्टीसारखी आहे. तरीपण वेगवेगळ्या अभ्यासानुसार लिखाण, कोडींग, सल्लामसलत, ग्राहकसेवा, उत्पादनक्षेत्र इ० मध्ये ए०आय०ने नि:संशय रचनात्मक योगदान दिले आहे. जिथे ए०आय०चे प्रयोग फसले आहेत तिथे अवास्तव अपेक्षा, दर्जाहीन एकत्रीकरण, विस्कळीत गुंतवणूक अशी कारणे दिली जातात. प्रत्यक्षात व्यक्तीगत पातळीवर ए०आय० बराच उपकारक ठरला आहे आणि आस्थापनांच्या पातळीवर अजुनही लोक धडपडत आहेत (https://explodingtopics.com/blog/ai-statistics) बाकी ट्रेडींग मध्ये म्हणाल तर माझ्या अनुभवावरून इतकंच सांगू शकेन की मॉडेल्स वरचेवर ट्य़ून करावी लागतात. कधीकधी पूर्णपणे टाकून द्यावी लागतात. प्रा० बिरूटे - तुमचा मूळ मुद्दा मला मान्य आहे - एखाद्या कंपनीची पायाभूत कामगिरी चांगली आहे. म्हणून तो शेअर बाजारात चालतोच असं नाही. याचा अनुभव मी पण घेतला आहे. तरी पण आंधळेपणाने गुंतवणूक करायची की डोळसपणे, हे निश्चित ठरवून मग उडी मारणे केव्हाही चांगले. कंजूस आणि कानडाऊ योगेशु ए०आय० ची रीझनिंगची क्षमता वेगाने वाढली असल्याने, नुसती माहिती गोळा करून ए० आय० थांबत नाही तर त्यात सुसंगती/विसंगती शोधुन ती सादर केली जाते. याचा संशोधनात होणारा उपयोग अनन्यसाधारण आहे. या रीझनिंगची क्षमतेकडे अजुनही गंभीरपणे बघितले जात नाही असे मला वाटते. गा०पै० माहितीचा प्रपात त्रासदायक होत असेल तर माहितीचा सारांश काढायला पण ए०आय० तत्परतेने मदत करतो. विज्जेन्स्टाईनबद्दल म्हणाल तर- तुम्ही ज्याला शेंदूर लावला आहे, तो माझ्यासाठी देव असेलच असं नाही.

In reply to by युयुत्सु

कंजूस 22/09/2025 - 11:56
माझा रोख ऐआइच्या स्रोताबद्दल आहे, तो किती जलद आणि तारतम्य पद्धतीने काम करतो याच्या साशंकतेबद्दल नाही. जर मूळ माहिती इंटरनेटवर आणून टाकली गेली नाही तर एआइ लंगडे पडते. काही माहिती छापील पुस्तकांत असते व कॉपीराइट बंधनामुळे एआइला ती मिळवायला कमितकमी आणखी साठ वर्षे थांबावे लागेल.

युयुत्सु 22/09/2025 - 11:13
माझ्या लेखाच्या निमित्ताने आणखी एक अस्सल आणि ताजा अनुभव- हा लेख लिहित असताना नेट वर एक बातमी झळकली. Integrated Industries या पेनी स्टॉकने पाच वर्षात १ लाखाचे ८ कोटी केले (https://www.livemint.com/market/stock-market-news/003-to-24-15-multibagger-penny-stock-integrated-industries-turns-1-lakh-into-8-05-crore-in-five-years-11758176003878.html) साहजिकच माझे कान टवकारले गेले. मी पेनी स्टॉकच्या वाटेला सहसा जात नाही. मग ग्रोकला लेखात लिहील्या प्रमाणे ’ग्रोथ प्रॉस्पेक्ट’ बद्दल विचारले, तेव्हा त्याने विस्तृत चर्चा करून ७/१० मार्क दिले. म्हणून मी लगेच थोडी खरेदी केली (१७ सप्टेंबर). आज हा स्टॉक २५ % वर आहे. ए०आय० चिरायु होवो! कृपया हा गुंतवणूक सल्ला नाही याची नोंद घ्यावी. आंधळेपणे शेअरबाजरात व्यवहार करणे धोक्याचे आहे. आपला अभ्यास पुरेसा नसेल तर मान्यताप्राप्त गुंतवणूक तज्ञांचाच सल्ला घ्यावा.

In reply to by युयुत्सु

गवि 22/09/2025 - 12:45
कृपया हा गुंतवणूक सल्ला नाही याची नोंद घ्यावी. आंधळेपणे शेअरबाजरात व्यवहार करणे धोक्याचे आहे. आपला अभ्यास पुरेसा नसेल तर मान्यताप्राप्त गुंतवणूक तज्ञांचाच सल्ला घ्यावा.
हम्म...

In reply to by युयुत्सु

कंजूस 23/09/2025 - 07:41
इथे म्हणजे शेअर मार्केट बद्दल एआइ ठीक आहे. बाजाराचा कल, चढ उतार यांचे इकडे उपलब्ध असतात त्यांचा वापर करून एआइ इतर सल्लागार सल्ला देतात तसे काम करते.

सुबोध खरे 23/09/2025 - 10:49
ए आय एवढं उत्तम असेल बाजाराच्या कलाबद्दल तर ते वापरणारे आता पर्यंत अब्जाधीश झाले असते. उदा. दरमहा १० % चक्रवाढ व्याजाने पैसे मिळवणारे. पण तसं होताना दिसत नाही. मी पण माझ्या वैद्यकीय कामात ए आय वापरतो. माझ्या अल्ट्रासाउंड यंत्रात ए आय आणि मशीन लर्निंग आहे. त्याने काम सोपे होते. परंतु त्याला एक मर्यादा आहे. दुर्दैवाने माणूस म्हणजे असेम्ब्ली लाईन मधून काढलेले एक उत्पादन नाही. त्यामुळे एका माणसाचा एक अवयव दुसऱ्या माणसात यंत्रासारखा सहज बसवता येत नाहीच. त्यामुळे काही माणसांमध्ये आढळणारे आडाखे इतर माणसांत बरोबर लागू होत नाहीत. आपल्यापैकी प्रत्येक माणूस हा एकमेव आणि अद्वितीय आहे. शिवाय जेवढे ज्ञान जालावर उपलब्ध आहे. त्याचे सार फक्त सगळे ए आय देऊ शकतात. प्रत्यक्ष वापरात त्याचा भरपूर फायदा होईलच असे नाही. एके काळी संगणक आला तेंव्हा वैद्यकीय व्यवसाय उताराला लागेल असे दर्पोक्तीने सांगणारे संगणक अभियंते आजही मी पाहतो आहे. जसं वय वाढतं आहे तसे ते स्वतःच्या शरीराबद्दल संगणकाऐवजी जिवंत डॉक्टरच्या सल्ल्याने जाताना दिसतात.

In reply to by सुबोध खरे

गवि 23/09/2025 - 12:18
तुम्ही म्हणता ते आज शंभर टक्के खरं आहे. एआय मनुष्याला रिप्लेस करू शकत नाही. पण हे अतिशय उच्च अनुभवी तज्ज्ञ आणि दुसऱ्या टोकाला अगदी शारीरिक श्रमाचे काम करणारे लेबर यांनाच अधिक लागू होते. मधला एक वर्ग आहे. बैठे कार्यालयीन काम करणारा, हिशोब, लिखापढी, कायदेशीर कागदपत्रे, किंवा मग चित्रे, लोगो, आर्ट वर्क (खास करून कमी किंवा मध्यम बजेटवाल्या कंपन्यांसाठी) करून देणारे छोटे कलाकार, संगीतकार, ललित किंवा अन्य लेखक या सर्व बुद्धिजीवी वर्गावर मात्र एआयच्या रूपात कुऱ्हाड पडत चालली आणि पुढेमागे तिची धार कमी होईपर्यंत एक दोन पिढ्या ती कापून काढणार हे स्पष्ट आहे. अगदी वैद्यकीय क्षेत्रात देखील.. आत्ता तुम्ही म्हणता ते योग्य आहे. पण पुढचे सांगता येत नाही. तो खूप वेगाने अंतर कमी करतो आहे. अधिक डेटा, अधिक वापर, अधिक ट्रेनिंग, अधिक प्रगल्भता असं यापुढचं एआयचं रुप असेल. काहींना उपकारक, काहींना भयावह..

In reply to by गवि

युयुत्सु 23/09/2025 - 12:39
श्री० गवि तो खूप वेगाने अंतर कमी करतो आहे. या वास्तवाचे आकलन सर्व पातळ्यावर होत नाहीये, ही दूर्दैवाची गोष्ट आहे. मानवी सल्ला आणि एआय चा सल्ला यातील दोष आणि बलस्थानं ज्यांना समजतील तेच यापुढे यशस्वी ठरतील. मानवी सल्ला पैसे टाकूनही "प्रामाणिक"पणे दिला जाईल असे सध्याच्या दिवसात वाटत नाही. तो केवळ नशीबाचा भाग बनला आहे. ए०आय० चुकू शकतो पण "स्वतःच्या फायद्यासाठी" तरी चुकीचे सल्ले देणार नाही. हा मोठ्ठा फरक लोकांना कळेल, तेव्हा मी ११ (कदाचित १११) सत्यनारायण घालेन. परवा एका अर्थतज्ञाचे एच्१बीवरील निर्बंधांविषयी विश्लेषण ऐकले - ए०आय० वरील भरवशामुळे एच्१बी वाल्यांना लत्ताप्रदान केले गेले आहे, असा एकंदर सदर अर्थतज्ञाचा सूर होता आणि ते मला पुर्ण पटले.

In reply to by युयुत्सु

गवि 23/09/2025 - 13:24
स्वतःच्या फायद्यासाठी नव्हे पण करवित्याच्या फायद्यासाठी नक्कीच चुकीचे सल्ले देऊ शकतो.. नव्हे देतोही. याविरुद्ध जगभरात वेगवेगळी एथिकल एआय फ्रेमवर्क्स येत आहेत. माझे कार्यक्षेत्र सध्या याच संबंधात केंद्रित असल्याने मॉडेल डिसेप्शन, नॉन बायस, ट्रान्स्परंसी, ट्रस्ट हे अत्यंत महत्वाचे शब्द बनले आहेत. जे दोष मानवात आहेत ते एआय मध्ये येणारच. ते टाळण्यासाठी अधिकच जास्त कडक कायदे येणार आणि येत आहेत. पण ते अंमलात आणणे अधिकाधिक कठीण होत चालले आहे. त्यामुळे एआय निष्पक्ष, प्रामाणिक उत्तरे देईल असे मानणे भाबडेपणा ठरेल. अर्थात तुमचा मुख्य मुद्दा योग्यच आहे.

In reply to by गवि

अभ्या.. 23/09/2025 - 14:39
बैठे कार्यालयीन काम करणारा, हिशोब, लिखापढी, कायदेशीर कागदपत्रे, किंवा मग चित्रे, लोगो, आर्ट वर्क (खास करून कमी किंवा मध्यम बजेटवाल्या कंपन्यांसाठी) करून देणारे छोटे कलाकार, संगीतकार, ललित किंवा अन्य लेखक या सर्व बुद्धिजीवी वर्गावर मात्र एआयच्या रूपात कुऱ्हाड पडत चालली आणि पुढेमागे तिची धार कमी होईपर्यंत एक दोन पिढ्या ती कापून काढणार हे स्पष्ट आहे. ह्यातली कुर्‍हाड एआय असली तरी चालवणारे जे हात आहेत त्यांच्याकडे अजून एक जस्टिफिकेशन आहे. "अमुकतमुक गोष्टीला इतके पैसे सांगत होतात ना तुम्ही, इ त का वेळ लागेल म्हणून ताणत होतात तुम्ही, तुम्हाला जमणारच नाही ह्या थाटात होतात ना तुम्ही, बघा आता तेच काम एआय वापरुन फुकटात केले मी. एआय वापरुन दोन मिनिटात केले मी, एआय वापरुन घरबसल्या केले मी." हे 'मी' केले म्हणणार्‍यां सुमारांची सद्दी एआय संपवेल तेंव्हा परत बॅक टू बेसिक्स काय? का "एआय प्लीज खाजवशील काय?"

In reply to by अभ्या..

गवि 23/09/2025 - 15:06
अधिकाधिक खोल जाणाऱ्या मुद्द्याला हात घातलास. खूप आहे यात लिहिण्यासारखे आणि विचार करण्यासारखे. मी केले म्हणा किंवा करून घेतले म्हणा.. हा मुद्दा फार मोठा ठरणार नाही दीर्घकाळात. पण शेवटी मूल्य नावाची गोष्ट चिरंतन आहे. सर्वांनाच एखादी गोष्ट घरबसल्या, दोन मिनिटांत, जागच्याजागी, .. आणि जवळपास फुकट, साध्य होऊ लागली की कोणत्याही पदार्थाचे सोने करणारा परीस सापडला तर सोन्याची जी अवस्था होईल तीच या सर्व कलांची होईल यात शंकाच नाही. कचरा वाढत चालला आहे. कोणतेही तंत्रज्ञान दीर्घकाळ सर्वांना फुकट देणे कोणालाच शक्य नाही. जेव्हा त्याची खरी किंमत मोजावी लागेल तेव्हा या सुमारांची सद्दी खाडकन संपेल. शिवाय त्या तंत्रज्ञानाला हवे तसे वाकवू शकणे हेही शक्य आहेच. त्यातून विश्वासार्हता हेही मूल्य जेव्हा ढासळायला लागेल तेव्हा आपोआप कंट्रोल येईल. निवडक आणि दर्जेदार या विशेषणांना आत्तापेक्षा अधिक "मूल्य" येईल. हे सर्व कोणत्याही कायद्यांनी नव्हे तर बाजाराच्या नियमांनी घडेल.

In reply to by गवि

अभ्या.. 23/09/2025 - 15:13
कोणत्याही पदार्थाचे सोने करणारा परीस सापडला तर सोन्याची जी अवस्था होईल तीच या सर्व कलांची होईल यात शंकाच नाही. नाही गविराज, सगळेच सोन्याचे झाल्यानंतर (आयवील लव धिस मोमेंट यू नो) परिसाची किंमत काय ह्याचा विचार करा. सोने मुबलक झाले तरी ते सोने आहे, परीस हा त्यानंतर फक्त दगड आहे.

In reply to by अभ्या..

अभ्या.. 23/09/2025 - 15:19
म्हणून अजूनही वाटते की काय सोन्याचे करायचे (किंवा सोन्याचे काय करायचे) ते कळणारा ईंटेलिजन्स तो ट्रु इंटेलिजन्स.

In reply to by अभ्या..

गवि 23/09/2025 - 15:43
सगळेच सोन्याचे झाल्यानंतर (आयवील लव धिस मोमेंट यू नो) परिसाची किंमत काय ह्याचा विचार करा.
दोन्हीची किंमत एकामागून एक घसरत शून्याकडे जाणे अटळ.

In reply to by गवि

गवि 23/09/2025 - 15:48
अर्थात यामागे असे (कदाचित चुकीचे) गृहीतक आहे की परीस सहज उपलब्ध आहे किंवा सहज स्वस्तात मोठ्या स्केलवर बनवता येतोय. एरवी परिसाचे निर्माते एकत्र येऊन कधी ना कधी तो दुर्मिळच कसा राहील हे किंमतीच्या किंवा तुटवड्याच्या मार्गाने सुनिश्चित करतील ही जास्त शक्यता. सर्वकाही फिरून पुन्हा तिथेच येते. मूल्य नसेल तर कशाला काही दीर्घकालीन अस्तित्व नाही.

In reply to by गवि

अभ्या.. 23/09/2025 - 15:59
मूल्य नसेल तर कशाला काही दीर्घकालीन अस्तित्व नाही. अ‍ॅक्चुअली. एक मस्त केस स्टडी आहे, आपल्याच पुण्या मुंबईच्या मध्ये घडलेली. राजा रविवर्म्याने मळवलीला स्टुडिओ टाकला. स्टुडिओ म्हणा प्रिंटिंग प्रेस म्हणा, नाव त्याचे चित्रशाळा. त्यासाठी पैसा वापरला तो मोठमोठ्या राजा रजवाड्यांची चित्रे रंगवून मिळालेला. चित्रे हिंदू देवतांची प्रामुख्याने, सुरुवातीला व्हिज्युलाईज करणार रविवर्मा, मॉडेल्स घेणार भारतीयच. रंगवणार तोच. रिप्रॉडक्शन साठी त्याचे आर्टवर्क बनवणार तोच. ते घेऊन त्याच्या प्रती छापणार जर्मन्स. विकणार सगळ्या हिंदुस्थानात. घेणार सगळी गरीब जनता ज्यांना रविवर्म्यासारख्याच थोर चित्रकरांची चित्रे विकत घेणे परवडत नव्हते. रविवर्म्यावर केस पडली अश्लीलता आणि नग्नतेच्या दर्शनाची. . आता पूर्ण ह्या सगळ्यात कीती, कोणती मूल्ये आणि ती कशी पणास लागली बघा....

In reply to by अभ्या..

मारवा 24/09/2025 - 11:29
आता पूर्ण ह्या सगळ्यात कीती, कोणती मूल्ये आणि ती कशी पणास लागली बघा.... यातून तुम्हाला काय सुचवायचे आहे ? यात तर मला सरळ अर्थशास्त्र दिसत आहे . कुठली मूल्ये पणाला लागली या मध्ये नेमकी ?

In reply to by सुबोध खरे

सोत्रि 23/09/2025 - 22:04
शिवाय जेवढे ज्ञान जालावर उपलब्ध आहे. त्याचे सार फक्त सगळे ए आय देऊ शकतात. प्रत्यक्ष वापरात त्याचा भरपूर फायदा होईलच असे नाही.
AI च्या फारच वरवरच्या माहितीवरून असं म्त झालेलं असू शकतं. AI चा आवाका फक्त सार देणं ह्याच्या फार पलिकडे गेला आहे आणि प्रचंड वेगाने तो घातांकीय (exponential) वेगाने वाढतो आहे. BlackRock ही बलाढ्य investment company AI प्रचंड मोठ्या प्रमाणात वापरते, बाजाराचे कल, 'सेंटीमेंट अ‍ॅनालिसीस' वापरून, शोधून त्यानुसार Event Detection करू शकते. चॅटजीपीटीला खालिल प्रश्न विचारा, How does BlackRock use AI models for trading? - (AI समर्थक) सोकाजी

In reply to by सोत्रि

सुबोध खरे 24/09/2025 - 09:24
एक ४५ वर्षाचा निरोगी माणूस निम सरकारी नोकरीत आहे त्याचा पगार ५०,००० आहे पण त्याला निवृत्तीवेतन नाही तर त्याला ६० वर्षानंतर दरमहा किती रुपये लागू शकतील? या सरळ सध्या दिसणाऱ्या प्रश्नाचे सरळ उत्तर ए आय देऊ शकेल का? सध्या तरी नक्कीच नाही. भविष्यात - कदाचित हो. मानवी आयुष्य हे गणित नाही त्याचे अनेक पैलू आहेत. तीस वर्षांपूर्वी संगणकाबद्दल छातीठोक पणे बोलणाऱ्या संगणक अभियंत्यांसारखेच सध्याचे ए आय चे समर्थक बोलत आहेत. तेंव्हा चालू द्या

In reply to by सुबोध खरे

गवि 24/09/2025 - 09:31
मानवी आयुष्य हे गणित नाही त्याचे अनेक पैलू आहेत.
ए आय नेमके यासाठी आहे. आत्ता तपशीलवार लिहिणं जमणार नाही. म्हणून इतकेच. तुम्ही विचारलाय तशा प्रश्नाचं उत्तर इन फॅक्ट एआयच अधिक चांगले देईल. त्याच्याकडे असे खूप खूप "पैलू" नोंदवून त्यांना योग्य ते वेटेज देण्याचे सामर्थ्य आहे. अगदी लक्षावधी पैलू आणि असंख्य मिती.

In reply to by गवि

सुबोध खरे 24/09/2025 - 09:50
गवि साहेब मी ए आय चा विरोधक मुळीच नाही उलट त्याचा अभ्यासक, ग्राहक आणि समर्थकसुद्धा आहे. माझ्या स्वतःच्या क्षेत्रात याचा आम्ही फार मोठा उपयोग करून घेतो आहोत. रेडिओलॉजी हा विषय सर्वात आधुनिक (१८९५ मध्ये क्ष किरणांचा शोध लागेपर्यंत हा विषय अस्तित्वातच नव्हता) संगणकाचा सर्वात प्रथम आणि सर्वात जास्त उपयोग करून घेणारा आहे. तसेच या विषयाचे कृत्रिम बुद्धिमत्तेबद्दल आहे. परंतु ज्या तर्हेने काही लोक सर्व काही ए आय च आहे म्हणतात त्याबद्दल आश्चर्य वाटते

In reply to by सुबोध खरे

गवि 24/09/2025 - 10:01
मी ए आय चा विरोधक मुळीच नाही उलट त्याचा अभ्यासक, ग्राहक आणि समर्थकसुद्धा आहे.
तुम्ही विरोधक आहात असे माझेही मत नाहीच.. आणि मी देखील खास समर्थक आहे असेही नव्हे. :-)

In reply to by गवि

युयुत्सु 24/09/2025 - 10:38
श्री० खरे यांनी विचारलेला प्रश्न किंचित सुधारणा करून विचारला - एक ४५ वर्षाच्या निरोगी माणसाचा वर्तमान मासिक पगार ५०,००० रुपये आहे आणि त्याला निवृत्तीवेतन (पेन्शन) नाही. प्रश्न हा आहे की वयाच्या ६० वर्षानंतर (म्हणजे निवृत्तीनंतर) चे आयुष्याचे प्लॅनिंग करण्यासाठी कोणते घटक विचारात घेतले पाहिजेत? मला शक्य तेव्हढी मोठी प्रश्नावली दे. यावर मिळालेले उत्तर असे (मराठीच्या चुका काढू नयेत) - ### निवृत्ती नियोजनासाठी विचार करण्याचे घटक: विस्तृत प्रश्नावली तुमच्या प्रश्नानुसार, ४५ वर्षांच्या निरोगी व्यक्तीला (मासिक पगार ५०,००० रुपये, पेन्शन नाही) वयाच्या ६० वर्षानंतरच्या आयुष्याचे नियोजन करण्यासाठी विविध घटक विचारात घ्यावे लागतात. हे घटक वित्तीय, आरोग्य, कुटुंबीय, जीवनशैली, जोखीम, महागाई इत्यादींशी संबंधित आहेत. मी शक्य तितकी मोठी आणि विस्तृत प्रश्नावली तयार केली आहे, जी तुम्हाला स्वतःचे मूल्यमापन करण्यास मदत करेल. ही प्रश्नावली विविध श्रेणींमध्ये विभागली आहे, जेणेकरून प्रत्येक घटक स्पष्ट होईल. ही प्रश्नावली भारतातील निवृत्ती नियोजनाच्या अभ्यासांवर आधारित आहे, जसे की डेमोग्राफिक फॅक्टर्स, वित्तीय साक्षरता, जोखीम सहनशीलता, बचत सवयी, आरोग्य खर्च आणि सरकारी योजना. प्रत्येक प्रश्नाला उत्तर देताना, तुम्ही तुमची सद्य स्थिती, उद्दिष्टे आणि जोखीम विचारात घ्या. ही प्रश्नावली १००+ प्रश्नांची आहे, जेणेकरून ती शक्य तितकी मोठी आणि सर्वसमावेशक होईल. उत्तरांवर आधारित, तुम्ही वित्तीय सल्लागाराशी चर्चा करू शकता. #### १. वैयक्तिक आणि डेमोग्राफिक घटक (Demographic Factors) हे घटक तुमच्या वय, शिक्षण, उत्पन्न आणि कुटुंबावर आधारित आहेत, जे निवृत्ती नियोजनावर प्रभाव टाकतात. 1. तुमचे सध्याचे वय किती आहे? (उदा., ४०-५०, ५०-६०) 2. तुमचे लिंग काय आहे? (पुरुष/स्त्री/इतर) 3. तुमचे वैवाहिक स्थिती काय आहे? (विवाहित/अविवाहित/घटस्फोटित/विधवा) 4. तुमचे शिक्षणाचा उच्चतम स्तर काय आहे? (उदा., हायस्कूल, पदवी, पदव्युत्तर, डॉक्टरेट) 5. तुमचे शिक्षणाचे विशेषज्ञता काय आहे? (उदा., कॉमर्स/व्यवसाय, विज्ञान, कला, इतर) 6. तुमचे सध्याचे व्यावसायिक स्थिती काय आहे? (वेतनधारी, व्यावसायिक, स्वयंरोजगारित, इतर) 7. तुमचे वार्षिक उत्पन्न किती आहे? (उदा., २.५ लाखांपेक्षा कमी, २.५-५ लाख, ५-१० लाख, १० लाखांपेक्षा जास्त) 8. तुमच्यावर किती आर्थिक अवलंबित व्यक्ती आहेत? (उदा., मुले, वृद्ध आई-वडील; संख्या: ०, १-३, ४ किंवा जास्त) 9. तुम्ही शहरी किंवा ग्रामीण भागात राहता का? 10. तुमचे घराणे किती सदस्यांचे आहे, आणि गेल्या १० वर्षांत त्यात काय बदल झाले आहेत? 11. तुम्ही सरकारी किंवा खाजगी क्षेत्रात काम करता का? (ऑर्गनाइज्ड/अनऑर्गनाइज्ड सेक्टर) 12. तुम्ही किती वर्षांपासून काम करत आहात? 13. तुम्ही कधी विदेशात काम केले आहे का, आणि त्याचा तुमच्या निवृत्तीवर कसा प्रभाव पडेल? #### २. वित्तीय साक्षरता आणि ज्ञान (Financial Literacy) वित्तीय ज्ञानाशिवाय नियोजन अशक्य आहे; हे घटक तुमच्या माहितीवर आधारित आहेत. 14. तुम्हाला कंपाऊंड इंटरेस्ट (चक्रवाढ व्याज) आणि त्याचा बचतीवर कसा प्रभाव पडतो हे समजते का? (हो/नाही) 15. महागाई (इन्फ्लेशन) पैशाच्या मूल्यावर कसा प्रभाव टाकते हे तुम्हाला माहित आहे का? (हो/नाही) 16. टाइम व्हॅल्यू ऑफ मनी (पैशाचे वेळेनुसार मूल्य) आणि त्याचे निवृत्ती नियोजनातील महत्व तुम्हाला माहित आहे का? (हो/नाही) 17. विविध गुंतवणूक पर्याय (उदा., शेअर्स, बॉन्ड्स, म्युच्युअल फंड्स) आणि त्यांचे जोखीम व परतावा तुम्हाला माहित आहेत का? (हो/नाही) 18. गुंतवणुकीत विविधता (डायवर्सिफिकेशन) जोखीम कमी करण्यासाठी कशी मदत करते हे तुम्हाला माहित आहे का? (हो/नाही) 19. तुम्ही कधी वित्तीय सल्लागाराकडून सल्ला घेतला आहे का? (हो/नाही; हो असल्यास, कोणाकडून?) 20. तुम्ही वित्तीय साक्षरता कार्यशाळा किंवा सेमिनारमध्ये भाग घेतला आहे का? (हो/नाही; हो असल्यास, किती उपयुक्त होते?) 21. तुम्हाला सरकारी योजना जसे NPS (नॅशनल पेन्शन सिस्टम), APY (अटल पेन्शन योजना), PPF (पब्लिक प्रॉव्हिडंट फंड) यांच्याबद्दल माहित आहे का? (हो/नाही) 22. तुम्ही स्वतः वित्तीय योजना बनवण्यात किती आत्मविश्वास बाळगता? (खूप, काहीसे, तटस्थ, नाही, पूर्णपणे नाही) 23. तुम्ही वित्तीय उत्पादनांची वेबसाइट्स किंवा ब्रोकर्सद्वारे गुंतवणूक कशी करावी हे समजता का? (हो/नाही) 24. तुम्ही तुमच्या वित्तीय ज्ञानाचे स्व-मूल्यमापन कसे कराल? (१-५ स्केलवर, १=कमी, ५=उच्च) 25. तुम्ही डिजिटल प्लॅटफॉर्म्स (उदा., अॅप्स, ऑनलाइन टूल्स) वापरून निवृत्ती नियोजन करता का? (हो/नाही) #### ३. जोखीम सहनशीलता आणि दृष्टिकोन (Financial Risk Tolerance and Attitude Towards Retirement) जोखीम घेण्याची क्षमता आणि निवृत्तीबद्दलचा दृष्टिकोन नियोजनावर प्रभाव टाकतात. 26. तुम्ही उच्च परताव्यासाठी आर्थिक नुकसानाची जोखीम घेण्यास तयार आहात का? (पूर्णपणे सहमत, सहमत, तटस्थ, असहमत, पूर्णपणे असहमत) 27. तुम्ही जोखीमपूर्ण गुंतवणुकीत (उदा., शेअर्स, डेरिव्हेटिव्ह्स) निवृत्ती निधीसाठी गुंतवणूक कराल का? (पूर्णपणे सहमत, सहमत, तटस्थ, असहमत, पूर्णपणे असहमत) 28. तुम्ही सध्याच्या खर्चाला प्रतिबंध घालून निवृत्तीसाठी बचत करू शकता का? (पूर्णपणे सहमत, सहमत, तटस्थ, असहमत, पूर्णपणे असहमत) 29. निवृत्ती नियोजन तुमच्यासाठी किती महत्वाचे आहे? (१-५ स्केलवर) 30. तुम्हाला निवृत्तीनंतर आरामदायी जीवनासाठी किती पैशांची गरज पडेल हे स्पष्ट आहे का? (पूर्णपणे सहमत, सहमत, तटस्थ, असहमत, पूर्णपणे असहमत) 31. तुम्ही नवीन गुंतवणूक योजनांचा शोध घेता का ज्या निवृत्ती फायदे देतात? (पूर्णपणे सहमत, सहमत, तटस्थ, असहमत, पूर्णपणे असहमत) 32. तुमच्याकडे निवृत्तीसाठी बचत योजना आहे का, आणि तुम्ही ती पाळता का? (हो, नाही, कधीकधी) 33. तुम्ही निवृत्ती नियोजनाला प्राधान्य देता का? (पूर्णपणे सहमत, सहमत, तटस्थ, असहमत, पूर्णपणे असहमत) 34. तुम्हाला निवृत्तीबद्दल सकारात्मक दृष्टिकोन आहे का? (उदा., उत्साही, चिंतित, तटस्थ) 35. तुम्ही जोखीम टाळण्यासाठी सुरक्षित गुंतवणुकी (उदा., फिक्स्ड डिपॉझिट) पसंत करता का? (हो/नाही) 36. महागाई, व्याजदर कमी होणे किंवा कर वाढ याबद्दल तुम्ही किती चिंतित आहात? (१-५ स्केलवर) 37. तुम्ही अॅन्युइटी (जीवनभर उत्पन्न देणारी योजना) खरेदी करण्यास इच्छुक आहात का? (हो/नाही; हो असल्यास, किती टक्के संपत्ती?) #### ४. बचत आणि गुंतवणूक सवयी (Savings and Investment Habits) बचत ही निवृत्तीची आधारभूत आहे, विशेषतः पेन्शन नसताना. 38. तुम्ही महिन्याच्या उत्पन्नाचा किती टक्के बचत करता? (उदा., १०%, २०%, ३०%+) 39. तुमची बचत मुख्यतः कोणत्या उद्देशासाठी आहे? (निवृत्ती, आपत्कालीन फंड, शिक्षण, इतर) 40. तुमच्याकडे विशिष्ट निवृत्ती बचत खाते आहे का? (हो/नाही; हो असल्यास, कोणते?) 41. तुम्ही कोणत्या गुंतवणूक पर्यायांचा वापर करता? (उदा., म्युच्युअल फंड्स, फिक्स्ड डिपॉझिट, इन्शुरन्स, रिअल इस्टेट, शेअर्स, PPF, NPS, इतर) 42. तुम्ही वार्षिक किती रक्कम निवृत्तीसाठी बचत करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे? 43. तुम्ही निवृत्ती वय कोणते ठरवले आहे, आणि त्यानंतर उत्पन्न कसे मिळेल? 44. तुम्ही सध्या किती बचत केली आहे? (उदा., ५ लाखांपेक्षा कमी, ५-१० लाख, १० लाखांपेक्षा जास्त) 45. तुम्ही बचत सुरू करण्यास उशीर केला आहे का, आणि त्याबद्दल पश्चाताप आहे का? (हो/नाही) 46. तुम्ही तुमच्या बचतीचे वार्षिक तपासणी करता का? (हो/नाही; किती वेळा?) 47. तुम्ही डायवर्सिफाइड पोर्टफोलिओ (विविध गुंतवणुकी) राखता का? (हो/नाही) 48. तुम्ही ऑनलाइन चॅनेल्स (उदा., बँक अॅप्स) द्वारे गुंतवणूक खरेदी करता का? (हो/नाही) 49. तुम्ही फायनान्शियल अॅडवायझर किंवा कुटुंब/मित्रांच्या सल्ल्यावर अवलंबून आहात का? (हो/नाही) 50. तुम्ही सरकारी योजनांमध्ये (उदा., APY, NPS) भाग घेता का? (हो/नाही; हो असल्यास, किती योगदान?) #### ५. आरोग्य आणि वैद्यकीय घटक (Health and Medical Factors) आरोग्य खर्च निवृत्ती निधीचा मोठा भाग खातो. 51. तुम्ही सध्या निरोगी आहात का, आणि तुम्हाला कोणते दीर्घकालीन आजार आहेत का? (हो/नाही) 52. निवृत्तीनंतर आरोग्य खर्चासाठी किती निधीची गरज पडेल असे तुम्हाला वाटते? 53. तुमच्याकडे हेल्थ इन्शुरन्स आहे का? (हो/नाही; हो असल्यास, किती कव्हरेज?) 54. तुम्ही क्रॉनिक आजार (उदा., डायबिटीज, हृदयरोग) साठी तयारी केली आहे का? (हो/नाही) 55. निवृत्तीनंतर वैद्यकीय खर्च सोशल इन्शुरन्सपेक्षा जास्त होतील अशी चिंता आहे का? (हो/नाही) 56. तुम्ही आरोग्य तपासणी नियमित करता का? (हो/नाही; किती वेळा?) 57. तुम्ही निवृत्तीनंतर लाँग-टर्म केअर (उदा., नर्सिंग होम) साठी योजना केली आहे का? (हो/नाही) 58. तुम्ही आरोग्य खर्चासाठी वेगळा फंड तयार करत आहात का? (हो/नाही; किती?) 59. जीवन अपेक्षा (लाइफ एक्स्पेक्टन्सी) किती वर्षांची अंदाजे आहे? (उदा., ७०, ८०, ९०+) 60. तुम्ही व्यायाम, आहार इत्यादींमुळे आरोग्य सुधारण्यासाठी प्रयत्न करता का? (हो/नाही) #### ६. कुटुंब आणि सामाजिक समर्थन (Family and Social Support) कुटुंब समर्थन कमी होत असल्याने हे महत्वाचे आहे. 61. निवृत्तीनंतर तुम्ही कुटुंबावर (उदा., मुले) अवलंबून राहाल का? (हो/नाही) 62. तुमचे कुटुंब जॉइंट किंवा न्यूक्लियर आहे? आणि त्यात बदल होत आहेत का? 63. तुम्ही मुले किंवा कुटुंबाला निवृत्ती निधी देण्याचे विचार करता का? (हो/नाही) 64. तुम्ही निवृत्तीनंतर कुटुंबाजवळ राहण्याची योजना आहे का? (हो/नाही) 65. तुम्ही कम्युनिटी अॅक्टिव्हिटीज किंवा रिटायरमेंट ग्रुप्समध्ये भाग घ्याल का? (हो/नाही) 66. तुम्ही कुटुंबीयांवर आर्थिक भार टाकू नये म्हणून योजना केली आहे का? (हो/नाही) 67. तुम्ही वारसा (इनहेरिटन्स) नियोजन केले आहे का? (हो/नाही; कोणाला देणार?) 68. तुम्ही कुटुंबीयांसोबत निवृत्ती योजनेची चर्चा केली आहे का? (हो/नाही) #### ७. महागाई, आर्थिक जोखीम आणि अर्थव्यवस्था (Inflation, Economic Risks and Economy) महागाई आणि बाजारातील बदल निधी कमी करू शकतात. 69. महागाईचा तुमच्या बचतीवर कसा प्रभाव पडेल असे तुम्हाला वाटते? (उच्च, मध्यम, कमी) 70. व्याजदर कमी होण्याची चिंता आहे का? (हो/नाही) 71. कर वाढ किंवा नवीन करांचा प्रभाव कसा पडेल? (उच्च, मध्यम, कमी) 72. आर्थिक अनिश्चितता (उदा., मंदी) साठी तुम्ही तयार आहात का? (हो/नाही) 73. तुम्ही महागाई-समायोजित (inflation-adjusted) उत्पन्नाची योजना केली आहे का? (हो/नाही) 74. बाजारातील उतार-चढाव (मार्केट व्होलॅटिलिटी) साठी तुम्ही कसे तयार आहात? 75. तुम्ही गॅरंटीड उत्पन्न (उदा., फिक्स्ड रिटर्न्स) पसंत करता का? (हो/नाही) 76. तुम्ही कॅपिटल प्रिझर्वेशन (मूळ रक्कम सुरक्षित) साठी प्राधान्य देता का? (हो/नाही) #### ८. कर आणि कायदेशीर घटक (Tax and Legal Factors) कर बचत आणि कायदे महत्वाचे आहेत. 77. तुम्ही कर-मुक्त गुंतवणुकी (उदा., PPF, NPS) वापरता का? (हो/नाही) 78. निवृत्तीनंतर कर दायित्व किती असेल असे तुम्हाला वाटते? 79. तुम्ही विल (will) किंवा एस्टेट प्लॅनिंग केली आहे का? (हो/नाही) 80. सरकारी पेन्शन योजनांचे नियम तुम्हाला माहित आहेत का? (हो/नाही) 81. तुम्ही कर सल्लागाराशी चर्चा केली आहे का? (हो/नाही) 82. निवृत्तीनंतर कर वाढण्याची शक्यता किती आहे? (उच्च, मध्यम, कमी) #### ९. निवृत्ती उद्दिष्टे आणि जीवनशैली (Retirement Goals and Lifestyle) निवृत्तीनंतरचे जीवन कसे असेल हे ठरवा. 83. निवृत्तीनंतर तुम्ही किती आरामदायी जीवन जगू इच्छिता? (वर्णन करा) 84. तुम्ही निवृत्तीनंतर काम कराल का (पार्ट-टाइम)? (हो/नाही) 85. तुम्ही प्रवास, छंद किंवा नवीन कौशल्य शिकण्यासाठी बजेट ठेवले आहे का? (हो/नाही) 86. तुम्ही निवृत्तीनंतर घर बदलाल का (उदा., छोटे घर)? (हो/नाही) 87. तुम्ही निवृत्ती निधीचा किती टक्का खर्च करण्याचे उद्दिष्ट आहे? (उदा., ४% नियम) 88. तुम्ही निवृत्ती फंड गॅप (कमी पडणे) साठी योजना केली आहे का? (हो/नाही) 89. तुम्ही निवृत्ती उद्दिष्टांसाठी लिखित योजना आहे का? (हो/नाही) 90. तुम्ही निवृत्तीनंतर सामाजिक योगदान (उदा., स्वयंसेवा) कराल का? (हो/नाही) #### १०. इतर घटक आणि मूल्यमापन (Other Factors and Assessment) 91. तुम्ही निवृत्ती नियोजनासाठी AI किंवा टेक टूल्स वापरता का? (हो/नाही) 92. तुम्ही सोशल मीडिया किंवा इन्फ्लुएन्सर्सच्या सल्ल्यावर अवलंबून आहात का? (हो/नाही) 93. तुम्ही ग्रॅट्युइटी (gratuity) किंवा इतर लाभांचा विचार केला आहे का? (हो/नाही) 94. निवृत्तीनंतर उत्पन्न स्रोत कोणते असतील? (उदा., गुंतवणूक, किराया) 95. तुम्ही आपत्कालीन फंड (emergency fund) तयार केला आहे का? (हो/नाही; किती महिन्यांचा?) 96. तुम्ही जीवन विमा किंवा टर्म इन्शुरन्स आहे का? (हो/नाही) 97. तुम्ही निवृत्ती नियोजनातील संघर्ष (उदा., सध्याचा खर्च vs. बचत) कसे हाताळता? 98. तुम्ही तुमच्या योजना वार्षिक अपडेट करता का? (हो/नाही) 99. तुम्हाला निवृत्ती नियोजनातील सर्वात मोठी आव्हान काय वाटते? (खुला प्रश्न) 100. एकूणच, तुम्ही तुमच्या निवृत्ती नियोजनाबद्दल किती समाधानी आहात? (१-५ स्केलवर) 101. तुम्ही रिटायरमेंट कॅल्क्युलेटर वापरून तुमचा फंड अंदाज लावला आहे का? (हो/नाही) 102. तुम्ही क्लायमेट चेंज किंवा पर्यावरणीय बदलांचा निवृत्तीवर प्रभाव विचारात घेतला आहे का? (हो/नाही) 103. तुम्ही निवृत्तीनंतर परदेशात राहण्याची योजना आहे का? (हो/नाही) 104. तुम्ही तुमच्या योजना कुटुंब किंवा सल्लागाराशी शेअर करता का? (हो/नाही) 105. शेवटी, तुम्ही निवृत्ती नियोजन सुरू करण्यासाठी काय बदल कराल? (खुला प्रश्न) ही प्रश्नावली पूर्ण केल्यानंतर, तुम्ही तुमच्या उत्तरांचे विश्लेषण करू शकता आणि आवश्यकता असल्यास व्यावसायिक मदत घ्या. हे भारतातील अभ्यासांवर आधारित आहे, ज्यात पेन्शन नसलेल्या व्यक्तींसाठी वैयक्तिक बचत आणि योजना महत्वाच्या आहेत. जर अधिक तपशील हवा असेल, तर सांगा! ########### आता या सर्व प्रश्नांची प्रामाणिक उत्तरे देऊन परत प्रश्न विचारून बघितल्या अधिक विश्वासार्ह उत्तरे मिळतील याची मला खात्री आहे. टीप- या धाग्यावर शांत पणे आनंद घेत भोंडला खेळल्या बद्दल धन्यवाद!

In reply to by सोत्रि

युयुत्सु 24/09/2025 - 10:55
खरोखर झोपेत असलेल्याच उठवता येते. तुमचा मुद्दा १००००१% बरोबर आहे. अशा लोकांना मी अगोदरच राईट ऑफ केले आहे. पण अशा प्रश्नांमुळे इतर लोकांची दिशाभूल होउ नये म्हणून हा खटाटोप आहे.

In reply to by युयुत्सु

सुबोध खरे 24/09/2025 - 11:32
है शाबास १०५ व्हेरिएबल्स आणि त्यात प्रत्येकात ३-४ पर्याय म्हटल्यावर १०५ चा तिसरं किंवा चौथा घात इतके प्रचंड पर्याय म्हणजे अक्षरशः लाखो व्हेरिएबलस झाले. आणि एवढे सर्व व्हेरिएबल्स टाकल्यानंतरही "आवश्यकता असल्यास व्यावसायिक मदत घ्या" हे आहेच कि. म्हणूनच म्हटलं चालू द्या.

In reply to by सुबोध खरे

सोत्रि 24/09/2025 - 10:42
मी ए आय चा विरोधक मुळीच नाही उलट त्याचा अभ्यासक, ग्राहक आणि समर्थकसुद्धा आहे. माझ्या स्वतःच्या क्षेत्रात याचा आम्ही फार मोठा उपयोग करून घेतो आहोत.
क्या रे ये! घोडा चतुर ... घोडा चतुर ... एक पे रेहना, य तो घोडा बोलो, या चतुर बोलो! - (ए आय पडोसनचा पडोसी) सोकाजी

In reply to by सोत्रि

मारवा 24/09/2025 - 11:42
Either or असा आग्रह कशासाठी. डॉ खरे स्पष्ट सांगत आहेत की ते ai चे ग्राहक आहेत वापरत आहेत. त्यांचा आक्षेप कदाचित त्याच्या मर्यादेवर असावा. माझा आक्षेप मला एखाद्या गोष्टी बद्दल mixed feelings असतील काही भाग आवडत असेल काही अजिबात पटत नसेल तर हरकत काय आहे. मिश्र भूमिका= दांभिकता हे समीकरण अतिशय चुकीचे आहे.

In reply to by मारवा

मारवा 24/09/2025 - 11:46
संगणक शाप की वरदान ही dichotomy अत्यंत चुकीची आणि rigid अशी आहे. अमुक तमुक शाप की वरदान या मध्ये आग्रह हा एका बाजूनेच निर्णय घ्या असा असतो. प्रत्यक्ष आयुष्यात असे कधीच होत नाही सुरुवात जोडीदारापासून करून बघा ते ही सोडा अनेक बाबी या मिश्र स्वरूपाच्या असतात. सोपेकरण करणे ही चांगली बाब असली तरी नेहमी करता येत नाही.

In reply to by मारवा

सुबोध खरे 24/09/2025 - 20:50
एक उदाहरण देतो आहे कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून फुप्फुसाच्या सिटी स्कॅन मध्ये बारीकशा गाठी ज्या काही वेळेस डोळ्याने स्पष्ट दिसत नाहीत किंवा नजरचुकीने राहून जातात अशा गाठी दिसून येतात. या गाठीचे नंतर विश्लेषण केले जाते. हे दुधारी शास्त्र आहे. कारण यात जे कर्करोग मानवी बुद्धिमत्तेला दिसले नाहीत ते दिसून येतात आणि त्याच्या वर उपचार त्वरित होतो. आता याची दुसरी बाजू अशी आहे कि अनेक गाठी कर्करोगाच्या नसतात ज्या इतर वेळेस मानवी नजरेस पडल्याचं नसत्या. पण एकदा त्या नजरेस पडल्या कि त्याचे विश्लेषण करणे आवश्यक होते. कारण तो कर्करोग आहे का? हे कृत्रिम बुद्धिमत्ता सुद्धा नक्की सांगू शकत नाही जोवर तुम्ही बायोप्सी करत नाही तोवर त्या गाठी खात्रीने कर्करोगाच्या नाहीतच हे सांगता येत नाही. म्हणजे बायोप्सीचा अहवाल येत नाही ( याला साधारण एक आठवडा लागतो) तोवर रुग्णाचा आणि नातेवाईकांचा जीव टांगणीवर लागतो. आता तुमच्या फुफुसात सुई घालण्यासाठी प्रथम त्या जागेवर भूल द्यावी लागते. सुई आत गेल्यावर कधी कधी फुप्फुस पंक्चर होते. मग त्याची उस्तवार करावी लागते. एवढा अव्यापारेषु व्यापार केल्यावर बायोप्सीत ती गाठ धोकादायक नाही हे सिद्ध होते. उलट अशी गाठ शोधली नसती तर बरे झाले असते असे लक्षात येते. आता यात कृत्रिम बुद्धिमत्ता चांगली कि वाईट? हे उत्तर ०-१ असे बायनरी नाही. अशा गाठींना INCIDENTALOMA म्हणतात. About 30% of all chest computed tomography (CT) scans contain one or more pulmonary nodules. Even in smokers — those at highest risk for lung cancer — nodules are usually benign; in the National Lung Screening Trial, 96% of all nodules (and 93% of nodules ≥ 6 mm) were benign.https://pmc.ncbi.nlm.nih.gov/articles/PMC5809217/ आता तुम्ही सिगरेट पित असलात/ नसलात तर तुम्ही या ४ %( किंवा ७ %) मध्ये आहेत का कि ९६ % हे काही कृत्रिम बुद्धिमत्ता सांगू शकत नाही. Nodules smaller than 6 mm do not need to be routinely followed up, given that such nodules have been determined to be very low risk. In those nodules that require follow-up, chest CT is usually recommended between 3 and 12 months. वरील वाक्य सांख्यिकीसाठी उत्तम आहे पण आपल्या फुप्फुसात एक गाठ आहे हा किडा ज्याच्या डोक्यात शिरला आहे त्याला शांत मनाने झोप लागत नाही कि रोजच्या कामात लक्ष लागत नाही. मग तो शेअर बाजारात असो कि बँकेत नोकरी करत असो. सुदैवाने आपल्याकडे तुम्ही रुग्णालयात जाऊन बायोप्सी करून आपली मन:शांती मिळवू शकता. इंग्लंड सारख्या देशात जोवर डॉकटर ठरवत नाहीत तोवर तुम्हाला पुढचा सिटी स्कॅन करता येत नाही. म्हणजे तुम्ही लटकलात. ऑब्जेक्टिव्ह विचार करता येतो कि ९६ % हा कर्करोग नाही पण मानवी मनाची चिंता कशी मोजणार. एक शांत डोह आहे निळेशार पाणी आहे सर्व कसं छान चाललेलं दिसतंय. मध्येच त्या डोहात एक मगर पाण्याखालून वर येते आणि त्या शांततेच्या चिंध्या उडतात अशी स्थिती रुग्णाची होते. हे कृत्रिम बुद्धिमत्तेला कसे कळेल आणि तिच्याकडून सांत्वनाचे दोन शब्द मिळतील का? माहिती नाही. विरहार्त मनाचे स्मित सरले, गालावर आसू ओघळले- होता हृदयाची दो शकले जखमेतुन क्रंदन पाझरले- घाली फुंकर हलकेच कुणी.. अशी हलकी फुंकर घालायला जवळचा माणूसच लागतो. कृत्रिम बुद्धिमत्ता नाही असो.

In reply to by युयुत्सु

सुबोध खरे 25/09/2025 - 09:53
वा! च्युईंग गम सारखं आहे हे. कितीही चघळा पोटात काही जात नाही आणि काही काळाने स्वादही राहत नाही. केवळ थुकण्याच्या लायकीचं. कुणी मोठ्या माणसाने पाठीवरून हात फिरवावा त्याच्या ऐवजी इंग्रजी लकबीने dont worry म्हणण्यासारखं चालू द्या

In reply to by गवि

युयुत्सु 24/09/2025 - 10:11
तुम्ही विचारलाय तशा प्रश्नाचं उत्तर इन फॅक्ट एआयच अधिक चांगले देईलज्या हे ज्यांना समजणार नाही (आणि समजून घ्यायची तयारी आणि कुवत नाही) ते लवकरच आउटडेट होतील. मला बिरबल आणि बादशहाच्या एका गोष्टीची आठवण झाली. बादशहाकडे एक ज्योतिषी आला. बादशहाने त्याची ख्याती ऐकली होती. ज्योतिषी म्हणाला, मी सर्वांचे भूत-भविष्य-वर्तमान जाणतो. बादशहाने त्याला दुसर्‍या दिवशी दरबारात यायला सांगितले आणि बिरबलाला त्याची परीक्षा घ्यायला सांगितले. दुसर्‍या दिवशी दरबार भरला तेव्हा बिरबल आणि ज्योतिषी हजर झाले. बिरबलाने आपल्या उपरण्यामध्ये एक पाखरू लपवून आणले होते. ते पाखरू त्याने हातात धरले आणि ज्योतिषाला म्हणाला, "माझ्या हातात जे आहे ते जिवंत की मेलेले आहे हे सांग?" हे असे विचारले जाणारे प्रश्न बिरबलासारखे आहेत. पण ए०आय० ज्योतिषासारखे दावे करत नाही. कळीचा मुद्दा असा (ज्याकडे मुद्दामून दूर्लक्ष केले जाते) वरील "साध्या" प्रश्नाने नियोजन करून आयुष्याचे प्लॅनिंग करणे सहज शक्य आहे. उदा० या प्रश्नाच्या अनुषंगाने नवी माहिती जशी उपलब्ध होईल, तसा प्रश्न अपडेट करण्याने अधिक उपयुक्त सूचना ए०आय० कडून मिळू शकतात. वेगवेगळ्या शक्यतांचा विचार करायला ए०आय० मदत करतो. उअपाय सुचवतो. हे ए०आय० चे बलस्थान आहे. सध्याच्या ए०आय० ची रीझनींगची क्षमता अचाट आहे. उदा वरील प्रश्नाला ग्रोक ए० आय० ने दिले उत्तर असे - एक ४५ वर्षाच्या निरोगी माणसाचा वर्तमान मासिक पगार ५०,००० रुपये आहे आणि त्याला निवृत्तीवेतन (पेन्शन) नाही. प्रश्न हा आहे की वयाच्या ६० वर्षानंतर (म्हणजे निवृत्तीनंतर) त्याला दरमहा किती रुपयांची गरज पडू शकते. हे अनुमान काढण्यासाठी काही मूलभूत गृहीतके घेतली आहेत: - निवृत्तीचे वय: ६० वर्षे (आजपासून १५ वर्षांनंतर). - वार्षिक पगारवाढ दर: ७% (भारतातील सरकारी/निम-सरकारी क्षेत्रातील सरासरी वाढ लक्षात घेऊन). - निवृत्तीनंतर आवश्यक उत्पन्न: निवृत्तीपूर्वीच्या शेवटच्या पगाराच्या ८०% (रिटायरमेंट प्लॅनिंगमध्ये सामान्यतः ७०-८०% चा रेशो वापरला जातो). - महागाई दर: ७% (भारतातील ऐतिहासिक सरासरी ७.३७% आहे). ### गणना: - आजचा पगार: ५०,००० रुपये/महिना. - १५ वर्षांनंतरचा अंदाजित शेवटचा पगार: ५०,००० × (१.०७)^१५ ≈ १,३८,००० रुपये/महिना. - निवृत्तीनंतर दरमहा आवश्यक रक्कम: १,३८,००० च्या ८०% ≈ १,१०,००० रुपये. हे अनुमान आहे आणि वैयक्तिक परिस्थितीनुसार (जसे की जीवनशैली, वैद्यकीय खर्च, महागाईतील बदल) ते १,००,००० ते १,५०,००० रुपयांपर्यंत असू शकते. निवृत्तीपूर्वी बचत आणि गुंतवणुकीद्वारे (जसे SIP, PPF, NPS) हे साध्य करता येऊ शकते. व्यावसायिक आर्थिक सल्लागाराशी चर्चा करणे उचित ठरेल. दर तीन किंवा सहा महिन्यानी नवी माहिती बदलेले संदर्भ विचारात घेऊन, ए०आय० च्या लक्षात आणून देऊन, हा प्रश्न परत-परत विचारला गेला पाहिजे. पण आजकाल मला नम्र लोकांना मदत करायला आवडते.

युयुत्सु 23/09/2025 - 11:00
ना०मू० काकांचा हटवादीपणा हटवादी लोकांमुळे देशाचे कसे नुकसान होते याचा उत्तम नमूना - https://www.msn.com/en-in/news/india/if-murthy-and-sikka-had-agreed-ca-founder-shares-how-infosys-openai-bet-in-2015-could-have-changed-india-s-ai-story/ar-AA1N3d5C?ocid=msedgntp&pc=EDBBAN&cvid=68d22ad16586443baa84ce34486ba221&ei=23

गणेशा 24/09/2025 - 12:29
कामात busy असल्याने प्रतिसाद वाचले नाहीत. आणि प्रतिसाद लिहायला वेळ लागेल मला. पण यावर विस्तृत लिहू शकेल मी.. म्हणजे तुम्ही जे गुंतवणुकी बद्दल लिहिले आहे, त्या विषयी.. Still ते कसे screener (queries ) इतके योग्य नाहीच माहिती देऊ शकत..तसेच एक AI options bot बनवला होता मी गेल्या वर्षी(मी fundamental नुसार गुंतवणूक करतो, पण बनवला होता) . पण त्याच्या मर्यादा वगैरे.. आणि या बाबतीत लिहू शकतो.. कदाचित वेगळा लेख लिहावा का हा विचार करतोय..जो कि माझ्या अगोदरच्या मार्केट च्या धा ग्याचा पुढचा भाग असेल. जरी मी DATA & AI field मध्ये आहे, आणि काही काल AI technical architect होतो.. तरी DATA या angle वर लिहू शकतो.. AI बद्दल मी तितका positive नाहीये.. पण फक्त data शोधून देणे या बद्दलच फक्त AI सिमीत नक्कीच नसला पाहिजे.. निवांत लिहिल. अर्थात वेळ मिळाला तर

सर्वप्रथम म.टा. मध्ये लेख आल्याबद्दल अभिनंदन!! दुसरे म्हणजे आपण गुंतवणुक सल्लागार किवा किमानपक्षी तुम्हाला उपयोगी पडलेल्या चांगल्या टिप्स देणार असाल (ए आय वापरुन) तर होणार्‍या फायद्याच्या ५% फी मी द्यायला तयार आहे. यात केवळ शुद्ध पैसे कमवायचा हेतू आहे. टिका किवा उपरोध नाही.

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

गणेशा 24/09/2025 - 13:17
या पेक्षा तुम्ही स्वतः का शिकत नाही? असो, personal accenture ला च असल्यास भेटू तिथे :-) मग बोलू. अवांतर : मी असे खूप पैसे कमवले असते, परंतु, एक तत्व मी पाळतो, share market मध्ये कोणाकडून पैसे नाही घायचे आणि द्यायचे पण नाही.. तुम्ही ज्या टिप्स म्हणतायेत त्याचा अभ्यास आणि का असे फुकट दिलेय मी माझ्या friends ना जे अभ्यास करत नाही आणि जिवाभावाचे मित्र options आणि trading मध्ये उगाच गटांगळ्या खात होते. ते लाखो च्या profit मध्ये आहेत आता :) एकच उद्देश जेंव्हा पैसे जास्त बनतील तेंव्हा तो आनंद उपभोगायला तुमच्या जवळ मित्र पाहिजेत आणि ते हि तो आनंद साजरा करू शकतील.. नेमके खूप कामात असल्याने जास्त लिहू शकत नाहीये.. Just इथले प्रतिसाद हि वाचलेत आता. धागा भरकटवण्याचा उद्धेश नाही.. नंतर नीट बोलेन

टर्मीनेटर 24/09/2025 - 15:03
अत्यंत भंपक लेख! लेख आणि सगळे प्रतिसादही वाचले... मध्यमवर्गीय नसलेल्या माणसाने त्याच्या दृष्ठिने असलेल्या टिपिकल मध्यमवर्गीय विचारसरणीतून लेख लिहिलाय असे वाटले. १०५ मुद्द्यांची प्रश्नावली तुम्ही दिली आहेत. त्याची माझ्या पद्धतीने (वास्तविक) उत्तरे दिली तर काय रिझल्ट्स येतील ह्याची कल्पना आहे का? कल्पना नसूदे पण अशी त्यांची उत्तरे येतील ह्याची कल्पना तरी केली असेल का? मला ह्या विषयावर तुमच्याशी चर्चा करायला नक्कीच आवडेल! (मागे 'सोने खरेदी' ह्या विषयावर तुमच्याशी चर्चा करायची खूप ईच्छा होती पण ती काही (मला वैयक्तिकरित्या अजिबात पसंत नसलेल्या प्रशासकीय कराणांमुळे पूर्ण होऊ नाही शकली ह्यासाठी अत्यंत दिलगीर आहे) आता ही चर्चा कदाचित होऊ शकेल असे वाटते आहे ( हा कदाचित माझा गैरसमज असू शकेल) असो... ह्या विषयावर तुमच्याशी चांगली चर्चा होऊ शकेल असे वाटते.....

युयुत्सु 24/09/2025 - 16:35
श्री० टर्मीनेटर तुमच्या भावना पोचल्या पण मुद्दे समजले नाहीत. सध्या सोने हा माझ्यासाठी सध्या महत्त्वाचा विषय नसल्याने मी हातातले काम टाकून वेळ देऊ शकेन की नाही माहित नाही. पण तुमचे लिखाण, अभ्यास, विचार जर लक्षात घ्यावेसे किंवा प्रतिसाद देण्या योग्य वाटले तर अवश्य देईन. पण अगोदर तुम्ही तुमची बाजू मुद्देसूद मांडा. टीप - तुम्हाला माझा लेख भंपक वाटल्याबद्दल मला अजिबात राग नाही. चिंता नसावी.

युयुत्सु 24/09/2025 - 16:42
तुमची बाजू मांडताना पूर्ण विचार करा! मला तुमची बाजू भंपक वाटली तर चर्चा होणार नाही.

In reply to by धर्मराजमुटके

अभ्या.. 24/09/2025 - 17:10
सध्या विद्या फक्त सिध्दार्थ रॉय कपूरला शोभते. विनय (पाठक) स्ट्रगलिंग अ‍ॅक्टर आहे अजूनही, सिध्दार्थ प्रचंड यशस्वी निर्माता आहे.

In reply to by अभ्या..

विनय (पाठक) स्ट्रगलिंग अ‍ॅक्टर आहे अजूनही ? माझ्या मते तो "चलो दिल्ली" चित्रपटातनंतर यशस्वी झालाच आहे.

टर्मीनेटर 24/09/2025 - 17:57
"तुमच्या भावना पोचल्या पण मुद्दे समजले नाहीत"
'कुठला मुद्दा समजला नाही ह्यावर कृपया प्रकाश टाकावा...'
"सध्या सोने हा माझ्यासाठी सध्या महत्त्वाचा विषय नसल्याने मी हातातले काम टाकून वेळ देऊ शकेन की नाही माहित नाही."
सध्याच काय सोने हा तुमच्यासाठी कधीच महत्त्वाचा विषय नव्हता, पण टूल किटचा एक भाग म्हणुन तुम्ही त्यावर लिहिले होते आणि ते किती भंपक होते हे जगजाहीर आहे. आणि असल्या फालतुगिरीवर व्यक्त होण्यासाठी प्रत्येकवेळी मी तरी अजिबात वेळ देऊ शकत नाही Sorry to say! पण ते असो... आता हा भंपक लेख लिहिताना तो फक्त AI विषयी असता तरी हरकत नव्हती पण त्यात तुम्ही शेअर बाजार घुसवलात ही गोष्ट माझ्या दृष्टीने हकरतीस पात्र आहे! असो... खरोखर AI बद्दल कळवळा असेल तर यंदाच्या दिवाळी अंकाची थीम AI आहे तेव्हा त्यात आपण काहीतरी उद्बोधक लिहावेत, ते वाचायला आणि खरोखर ज्ञानवर्धक असेल तर त्याचे मनमोकळेपणाने कौतुक करायला नक्कीच आवडेल! [गेल्या वर्षी 'निवडणूक/राजकारण' ही (एक) थीम होती, पण इथे बाकी वर्षभर राजकारणावर आपले (असलेले - नसलेले) ज्ञान पाजळणाऱ्या सगळ्या महापुरुषांनी सपशेल पळ काढला होता, सगळे अगदी 'रणछोड दास' म्हणतात तसे झाले होते ते सगळे महाभाग] असो, धाग्याच्या शीर्षकातून जे अभिप्रेत होतंय त्या विषयावर (तुमची ईच्छा असल्यास) तुमच्याशी चर्चा करायला मला खरंच आवडेल!
तुम्हाला माझा लेख भंपक वाटल्याबद्दल मला अजिबात राग नाही. चिंता नसावी.
तो तर वाटलाच आहे आणि त्याबद्दल राग किंवा चिंता वाटली काय आणि नाही वाटली काय who cares 😀

In reply to by टर्मीनेटर

युयुत्सु 24/09/2025 - 20:16
पण त्यात तुम्ही शेअर बाजार घुसवलात ही गोष्ट माझ्या दृष्टीने हकरतीस पात्र आहे! इतकंच ना? कुणाचं काय तर कुणाचं काय?

In reply to by युयुत्सु

टर्मीनेटर 25/09/2025 - 01:03
इतकंच ना?
'एआय आणि उत्पादकता' ह्या शीर्षकाचा आणि शेअर बाजाराचा काय संबंध आहे? I mean ह्यात नक्की कुठली उत्पादकता तुम्हाला अभिप्रेत आहे?
कुणाचं काय तर कुणाचं काय?
Lol

In reply to by टर्मीनेटर

युयुत्सु 25/09/2025 - 07:27
ही चर्चा व्यवस्थित पुढे नेण्यासाठी काही मूलभूत बाबींवर एकमत होणं अपेक्षित आहे. तसेच फक्त तुम्ही प्रश्न विचारणार आणि मग दुगाण्या झाडणार असाल तर ते पण मला मान्य नाही. त्याला मी चर्चा म्हणत नाही. तसेच मला तुमच्या बोद्धिक आणि वैचारिक खोलीचा अंदाज आला तर तुमच्याबद्दलचा डिफॉल्ट/बेसिक आदर टिकायला मदत होईल. ही माझ्यादृष्टीने एक आवश्यक अट (नेसेसरी कंडीशन) आहे. तेव्हा तुम्ही मला प्रथम तुमची उत्पादकतेची व्याख्या सांगावी. ती व्याख्या घेऊन शेअर बाजाराचे उदा०कसे चुकीचे आहे, याचे निरूपण करावे. मला तुमचा मुद्दा पटला तर मी पटला असं जाहिर करेन. नाही पटला तर तुमच्या युक्तीवादातले दोष शक्य तेव्हढ्या सभ्य भाषेत मांडायचा प्रयत्न करेन. ही सभ्यता तुमच्या मध्ये दिसली नाही तर माझ्याकडून चर्चा बंद केल्याचे जाहिर करेन. एकतर्फी तुम्ही प्रश्न विचारायचे आणि मी उत्तरे देणं इतकंच अपेक्षित असेल तर आपण इथेच थांबू... तसेच ही चौकट मान्य असेल तर पुढे जाउ या.

In reply to by युयुत्सु

युयुत्सु 25/09/2025 - 08:34
आणखी एक... ही चर्चा चालू झाल्यास प्रथम श्री० टर्मीनेटर यांच्याशी चर्चा करण्यात माझी प्राथमिकता असेल. मध्येच कुणी तोंड खुपसून चर्चा/मुद्दा/युक्तीवाद भरकटवायचा प्रयत्न केल्यास माझ्याकडून सदर व्यक्तींची दखल घेतली जाणार नाही.

In reply to by युयुत्सु

टर्मीनेटर 26/09/2025 - 18:39
तेव्हा तुम्ही मला प्रथम तुमची उत्पादकतेची व्याख्या सांगावी.
उत्पादकतेची व्याख्या मी काय करणार? पण जी सर्वमान्य व्याख्या प्रचलित आहे ती खाली इंग्रजी आणि मराठीत देतो (जी मला मान्य आहे त्यात तुम्हाला काही भर घालायची असेल तर अवश्य घालावीत)
Productivity is a measure of efficiency that shows the amount of goods or services produced (output) relative to the resources used (input) over a specific period of time. In simpler terms, it's about accomplishing more with less effort, time, or resources. Productivity can be applied at an individual, organizational, or national level, with higher productivity often leading to better standards of living and economic growth. --- उत्पादकता म्हणजे संसाधने किती कार्यक्षमतेने वापरली जातात आणि त्यातून किती उत्पादन (वस्तू किंवा सेवा) निर्माण होते, याचे मोजमाप . सोप्या भाषेत, कमी संसाधनांमध्ये जास्त उत्पादन करणे किंवा समान उत्पादन करण्यासाठी कमी संसाधने वापरणे म्हणजे उत्पादकता वाढवणे होय. उत्पादकता कशी मोजतात? उत्पादकता मोजण्यासाठी उत्पादन (आउटपुट) आणि वापरलेले इनपुट (उदा. श्रम, वेळ, पैसा) यांचे गुणोत्तर काढले जाते. सूत्र: उत्पादकता = उत्पादन (आउटपुट) / इनपुट उत्पादकतेचे प्रकार आर्थिक उत्पादकता: याचा अर्थ वस्तू किंवा सेवांच्या उत्पादनाची कार्यक्षमता होय. वैयक्तिक उत्पादकता: एखादी व्यक्ती किती सातत्याने आणि कार्यक्षमतेने काम पूर्ण करते किंवा उद्दिष्टे साध्य करते, यावरून ती मोजली जाते. उत्पादकता का महत्त्वाची आहे? कार्यक्षमता: संसाधनांचा प्रभावी वापर होतो.
आता ह्या व्याख्येतुन प्रतीत होणाऱ्या अर्थाने तुम्हाला 'एआय आणि उत्पादकता' ह्या शीर्षकात 'उत्पादकता' अभिप्रेत आहे की 'कार्यक्षमता' ह्या अर्थाने अभिप्रेत आहे ते कृपया स्पष्ट करावेत म्हणजे पुढील चर्चेची दिशा ठरवता येईल!

In reply to by टर्मीनेटर

युयुत्सु 27/09/2025 - 07:25
श्री० टर्मिनेटर ’उत्पादकता’ (प्रॉडक्टीव्हीटी) आणि ’कार्यक्षमता’ (एफिशिअन्सी) या दोन वेगवेगळ्या संकल्पना आहेत. त्या न समजल्याने त्यांचा चुकीचा वापर होऊन गोंधळ निर्माण होतो. त्यात ’उत्पादकतेच्या प्रकारांमध्ये ’वैयक्तीक उत्पादकता’ हा महत्त्वाचा भेद आहे. इथे तुम्हाला या दोन संकल्पनांचे स्वतंत्र अस्तित्व मान्य करायचे नसेल तर आपल्याला पुढे जाता येणार नाही. एखादी कृती (टास्क) मी पूर्वी करू शकत नव्हतो आणि ती आता करू शकत असेन तर माझी उत्पादकता वाढली असे म्हणता येते. हीच कृती मी पूर्वी करू शकत होतो पण आता जास्त चांगली/परिणामकारक करू शकत असेन, तर माझी कार्यक्षमता वाढली असे म्हणता येते. आता माझ्या लेखातील उदा० विषयी - पूर्वी मी पायाभूत विश्लेषण (फंडामेंटल ॲनालिसिस) करू शकत नव्हतो. मला त्याचा माझ्या गुंतवणूक विषयक निर्णय प्रक्रियेत वापर करता येत नव्हता. आता मला ए०आय० मुळे ते करता येते. त्यामुळे माझी त्यात ’वैयक्तीक उत्पादकता’ वाढली आहे. मी पूर्वी करत होतो त्यापेक्षा चांगले पायाभूत विश्लेषण (फंडामेंटल ॲनालिसिस) आता करू असेन तर माझी कार्यक्षमता वाढली आहे, असे म्हणता येते. पायाभूत विश्लेषण (फंडामेंटल ॲनालिसिस) या जागी खालील कृती वापरून हेच निकष तुम्ही लावू शकता. उदा०- लेखन युक्तीवाद बुद्धीवादळ (ब्रेन्स्टॉर्मिंग) माहिती मिळवणे माहितीचे पृथ:करण करणे इ० इ० मी पायाभूत विश्लेषण (फंडामेंटल ॲनालिसिस) करण्याच्या निमित्ताने ए०आय० चा वापर करताना एक महत्त्वाची गोष्ट शिकलो आणि त्याचा बनविलेला ठोकताळा असा- एखाद्या कंपनीच्या व्यवसायासाठी वातावरण पोषक आहे, पण कंपनीची कामगिरी चांगली नाही (महसूल, विक्री, नफा कमी होणे इ०) तर काही तरी मोठी गडबड आहे. एखाद्या कंपनीच्या व्यवसायासाठी वातावरण पोषक आहे, पण कंपनीची कामगिरी आहे (महसूल, विक्री, नफा वाढणे किंवा गेला बाजार स्थिर इ०) तर कंपनी विचार करण्याजोगी आहे. एखाद्या कंपनीच्या व्यवसायासाठी वातावरण पोषक नाही, पण कंपनीची कामगिरी चांगली/बरी आहे (विशेषत: लाभांशाचे वाटप) तर डोळे मिटून पैसे गुंतवावेत. आता ए०आय० वातावरण पोषक आहे की नाही आणि कंपनीची कामगिरी या प्रश्नांची उत्तरे विश्वासार्ह देऊ शकतो, असे माझे मत बनले आहे. माझ्या उत्तराशी तुम्ही किंवा इतर कुणी सहमत नसतील तर "वुई कॅन अग्री टु डिस-अग्री" या संकेतानुसार इथेच थांबू या... टीप- सुबोध खरे या व्यक्तीच्या कोणत्याही प्रश्नाला उत्तरे मिळणार नाहीत.

In reply to by युयुत्सु

सुबोध खरे 27/09/2025 - 09:24
सुबोध खरे या व्यक्तीच्या कोणत्याही प्रश्नाला उत्तरे मिळणार नाहीत. आपल्या कडून कोणतीही सुसंबद्ध उत्तरे मिळतील अशी माझी मुळात अपेक्षाच नाही. मी आपल्या अनेक लेखातील विसंवाद किंवा दर्पोक्ती दाखवून देतो याबद्दल आपली जळजळ होते याला काही उपाय नाही. मीच बरोबर आणि मलाच सगळ्या विषयातील सगळं कळतं अशा व्यक्ती कडून कोणत्या उत्तराची अपेक्षा असेल ?

In reply to by टर्मीनेटर

युयुत्सु 25/09/2025 - 07:32
खोडसाळपणे माझ्या तोंडी मी जे कधी बोललोच ते घालणे, मध्येच जुन्या धाग्यांचे संदर्भ घेऊन ओच्यात घेईन नाही तर पदरात घेईन स्टाईलमध्ये भांडत बसायचे असेल तर त्याला मी विकृत मानसिकता समजतो. आपण याची काळजी घ्याल अशी आशा करतो.

In reply to by युयुत्सु

युयुत्सु 25/09/2025 - 07:59
खोडसाळपणे माझ्या तोंडी मी जे कधी बोललोच ते घालणे, हे वाक्य खोडसाळपणे माझ्या तोंडी मी जे कधी बोललोच नाही ते घालणे, असे वाचावे

युयुत्सु 26/09/2025 - 15:46
 Research from NYU has found that frontier models from OpenAI, Google, and Anthropic can now pass all three levels of the CFA (chartered financial analyst) exam, including difficult Level III essay questions that eluded them two years ago. Models completed the exam in minutes versus the 1,000 hours humans typically spend studying across multiple years for all three levels. OpenAI's o4-mini scored highest at 79.1% on the challenging essay portion, with Gemini 2.5 Pro and Claude 4 Opus reaching 75.9% and 74.9%. https://www.prnewswire.com/news-releases/goodfin-and-nyu-stern-professor-srikanth-jagabathula-release-landmark-study-showing-ai-models-perform-at-a-level-above-and-beyond-the-cfa-level-iii-exam-standards-302562278.html

 आज म०टा०च्या संवाद या पुरवणीत माझा प्रसिद्ध झालेला नवीन लेख ए०आय० आणि उत्पादकता -- राजीव उपाध्ये माझी कन्या शाळेत असताना बर्‍याचदा मी तिला आणायला जायचो. शाळा सुटायच्या अगोदर सहसा मी तिथे पोचलेला असे. मग मला काही निरीक्षणे करायचा छंद जडला. शाळा सुटली की काही मुले शाळेच्या सूचनांना झुगारून गेटच्या दिशेने धावत सुटायची. मग निरीक्षणे करताना असे लक्षात आले की ठराविक मुलेच शाळा सुटल्यावर धावत सुटतात. मग हळूहळु असं लक्षात आलं की शाळा सुटल्यावर ही मुले (आणि मुली) फक्त शारीरिक दृष्ट्या चपळ नाहीत तर अभ्यासात पण बर्‍यापैकी पुढे होती.

गावाची ख्याती

विजुभाऊ ·

सौन्दर्य 25/09/2025 - 00:05
खूप वर्षांपूर्वी सिमला-कुलु-मनालीच्या ट्रीपला निघालो होतो. आम्ही एकूण चार कुटुंबे, एकूण सदस्य १५ -१६ जण होतो. ट्रीपच्या दरम्यान अनेक लहान - मोठ्या ढाब्यांवर जेवलो, कित्येक वेळा प्रत्येकाने वेगवेगळी ऑर्डर दिली, परुंतु पैसे देताना तोंडी घेतलेली ऑर्डर, ढाब्यावरचा मुलगा तोंडीच गल्ल्यावरच्या माणसाला सांगायचा व आश्चर्य म्हणजे कधीच आमच्याकडून जास्त पैसे, अगदी चुकीने देखील घेतले गेले नाहीत . हीच कथा मध्यप्रदेशची. राजस्थानची टूर मात्र फारच त्रासदायक ठरली होती, पावलो पावली फसवेगिरी अनुभवास आली.

परवा इथे विले पार्ल्यात गाण्यातल्या मित्रासोबत एका रजवाडी चहाच्या दुकानात चहा प्यायलो. सोबत काही बिस्किटे ही खाल्ली.

खपली

देवू ·

काही जखमा असतात जिवनभर भरत नाही,भळभळत रहातात. लहान मुले लवकर विसरतात. वेळेचे एम सिल लागते पण आत जखम ताजी असते. छान मांडणी.आवडली.

अभ्या.. 22/09/2025 - 15:33
दुसर्‍या परिच्छेदात कथनकार मी आणि कथापात्र शिरिष ह्यात गल्लत झाली आहे थोडीशी. तेवढी वगळता सुरेख.

सिद्धार्थने लवंगी फटाका पेटवून अंधाऱ्या बोळात फेकला. फट्ट! असा आवाज बोळात घुमला, क्षणभर उजेड पसरला , आणि सिद्धार्थ पुटपुटला, " कोणीतरी बसलंय मागच्या कंपाउंडवर. " त्याने एक कागद मशालीसारखा पेटवून हातात धरला, कागदाच्या थरथरणाऱ्या ज्वाळेच्या प्रकाशात तो आणि मित्रांची गॅंग कंपाउंडकडे निघाली. " अरे ! शिरीष एवढ्या अंधारात काय करतोयस इथे ? " सिद्धार्थने विचारले. प्रकाशात त्याला शिरीषच्या डोळ्यात अश्रू दिसले. त्याने शिरीषला भिंतीवरून खाली उतरवले. ताईच्या सासर्‍यांची तब्येत बरी नसल्याने, ती मागील दोन वर्ष माहेरी आली नव्हती.

सागर तळाशी

अनन्त्_यात्री ·
लेखनविषय:
सागर तळाशी | तुटल्या केबल त्याने जगड्व्याळ | लोच्या झाला || १ || बाह्य जगताशी | संबंध तुटला येरू डोकावला | आत तेव्हा || २ || अनाहत नाद | आला समेवर कल्लोळ सुस्वर | उसळला || ३ || स्थूल ओलांडून | ओसंडे सूक्ष्मात ऐसी ज्याची रीत | दिसला तो || ४ ||